(दे कुटाणे सोडुनी...)

खेडूत's picture
खेडूत in जे न देखे रवी...
16 May 2017 - 6:42 pm

घेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या'
मी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया !

एक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको
बक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको

*****

पास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही
केटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही

लावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली
कोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही

वागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी
सांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी

मैत्रिणी वर्गातल्या त्या झाल्या आताशा काकवा
पोरे तयांची येऊनि तुज मामा म्हणाया लागली

'पास झाला' ऐकण्या हे आई तुझी आसुसली
'वायडी' होऊ नये ही प्रार्थना मम ओठांवरी

आखरी संधी तुला मी देईन या सेमिस्टरी
दे कुटाणे सोडुनी अन लाज आता बाळगी

... सुमडीत

अविश्वसनीयकविता माझीकोडाईकनालजिलबीबालसाहित्यभूछत्रीगझलभाषाप्रतिशब्दकालवणमिसळ

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

16 May 2017 - 7:15 pm | टवाळ कार्टा

M3 चा उल्लेख नसल्याने फाउल धरण्यात येत आहे
बाकी कुटणे झकासच ;)

खेडूत's picture

17 May 2017 - 11:34 am | खेडूत

:)
या एम-३ मुळेच सात वर्षे रखडलेला वर्गातला एकजण डोळ्यासमोर होता. त्याच्याइतक्या वेळा कुणीही एम-३ ला बसलेले पाहिले नाही (९ वेळा). पण त्याचं काही बिघडलं नाही हे वेगळं!
इथे एका कंपनीत हेड्ड असलेला गेली १५ वर्षे तिकडं अमेरिकेत सायबाचं शेपूट आहे.

टवाळ कार्टा's picture

17 May 2017 - 11:55 am | टवाळ कार्टा

७ वर्षे रखडला आणि काही बिघडले नाही कसे म्हणता

डिप्लोमाच्या आधारावर नोकरी सुरूच होती- (आमची सगळ्यांचीच. )
इथे तो कंपनीचा प्रमुख असला तरी लक्ष्य सगळे अमेरिकेत कधी जातोय याकडे होते, पण बी ई पूर्ण झाल्याशिवाय जाता येत नव्हते! :)
शेवटी आमच्यानंतर पाच वर्षांनी झाला एकदाचा. पण नेटवर्किंग मधे बॉस होता...जाताना १० वर्षे अनुभव घेऊन गेला!

पैसा's picture

16 May 2017 - 7:37 pm | पैसा

विंजिनिअरानी होतकरू विंजिनिअरांसाठी लिहिलेली कविता! अंमळ करुण रसातही आहे. :D

एस's picture

16 May 2017 - 8:39 pm | एस

_/\_ बाकी विंजिनेरांना विंजिनेरिंग सोडून बाकी सगळं येत असतं असं ऑब्झर्व्हेशन आहे. खरं हाय का नाय? ;-)

यशोधरा's picture

16 May 2017 - 9:42 pm | यशोधरा

=))

इरसाल कार्टं's picture

17 May 2017 - 7:03 am | इरसाल कार्टं

समस्त विंजीनेर णिशेद करतील बरं तुमचा अश्याने.
Lol

कंजूस's picture

17 May 2017 - 7:08 am | कंजूस

वा

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 May 2017 - 9:18 am | ज्ञानोबाचे पैजार

जब्रा रचना..! आवडली.

अता अन्य कवींकडे लक्ष्य द्यावे असे सुचवितो.
(उगा या कवींना वाटायचं आपल्याला लक्ष्य करतायत.)

पैजारबुवा,