कोसला

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
9 May 2017 - 7:53 pm

उगाच किंचीत धुगधुगलेला
विस्कळीत अन विखुरलेला
अस्ताव्यस्त भरकटलेला
पंचविशीतला पालापाचोळा
मी एक उदाहरणार्थ कोसला

(अर्थात भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा भावानुवाद)

अनुवादकवितामुक्तक

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

9 May 2017 - 11:16 pm | जव्हेरगंज

अर्रर्र...

सतिश गावडे's picture

9 May 2017 - 11:54 pm | सतिश गावडे

भावानुवाद की सार?

अनुवाद = एका भाषेतला मजकूर शब्दशः दुसर्‍या भाषेत रुपांतरीत करणे

नुकतेच आपण तांत्रिकदृष्टीनं अयोग्य असलेला परंतू ( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणारा आणि मुळ लेखनाचा गाभा बयाँ करणारा तुफान विनोदी अनुवाद वाचला.

भावानुवाद - एखाद्या भाषेतील साहित्य शब्दशः दुसर्‍या भाषेत रुपांतरीत न करता ज्या भाषेत मुळ साहित्य रुपांतरीत करायचे आहे त्या भाषेच्या लकबी, ती भाषा बोलणार्‍या भाषिकांची संस्कृती आणि जीवनमान इत्यादी गोष्टींचा विचार करुन केलेले पुनर्लेखन.

सुचना: चुकभुल देणे घेणे. माझ्या व्याख्या चुकीच्या असल्यास थंड डोक्याने सांगणे. स्वतःला ज्ञानी समजणार्‍या अतीशहाण्यांनी माझी अक्कल काढू नये.

संदीप-लेले's picture

10 May 2017 - 6:19 pm | संदीप-लेले

<<<( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणारा आणि मुळ लेखनाचा गाभा बयाँ करणारा >>> याचसाठी केला होता अट्टाहास ! धन्यवाद !

भावानुवाद की सार? - सार, सारांश, गाभा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या. भावानुवाद शब्द चुकला असावा, चूभूद्याघ्या.

<<< तांत्रिकदृष्टीनं अयोग्य असलेला ... तुफान विनोदी अनुवाद वाचला.>>> मला तरी काहीच तांत्रिक चूक दिसत नाही. लिहिताना विनोदी लिहायचा मानस नव्हता. तुम्हाला तुफान विनोदी वाटले ते अलाहिदा !