रमज़ान व विजयादशमी निमित्ताने... राष्ट्रवादी मुस्लिमांचे कर्तव्य

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
9 Oct 2008 - 1:29 pm

रमज़ान व विजयादशमी निमित्ताने...
राष्ट्रवादी मुस्लिमांचे कर्तव्य
पुण्यातल्या राष्ट्रवादी मुसलमानांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांनी पुढाकार घेऊन अशा दुष्ट प्रवृत्तींना आळा घातला नाही तर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम राष्ट्रवादी मुसलमानांनाच भोगावे लागतील. मुस्लिम वस्त्यातून राष्ट्रविरोधी प्रचार केला जातो का? असा प्रचार करणारे कोण आहेत? त्यांना आधार देणारे कोण आहेत? यांची माहिती राष्ट्रवादी मुस्लिमांनी मिळवायला हवी देशातील अनेक घटनांचे धागेदोरे पुण्यात आढळलेले आहेत. त्यामुळे अशा विषयांशी संबंधित व्यक्तींच्या कारवायांवर लक्ष ठेवायला पोलिसांना वा गुप्तचर यंत्रणेला आवश्यक मदत करायला मुसलमान राष्ट्रवादी व्यक्तींना पुढे यायला हवे. पुण्या-मुंबईलाच नव्हे तर देशात अशांतता माजणार नाही घातपात घडणार नाही म्हणून हिंदूंपेक्षा मुसलमानांनीच अधिक दक्ष, अधिक सावध अन् अधिक सक्रीय राहाण्याची जरूरी आहे. मुसलमान अशा प्रकारे वागतील तर देशात होणारे घातपात टळतील. घातपात करणाऱ्यांसाठी येणाऱ्या आणि साह्य करणाऱ्या देशद्रोहींना छपवण्याचा प्रयत्न मुसलमानांना धोकादायक ठरेल. प्रत्येक बॉम्ब स्फोटाच्यामुळाशी एकजात मुस्लिम आरोपी आहेत. कोंढव्यातील आरोपी शोधताना पोलिसांना मुस्लिम समाजानेच मदत केल्याची घटना यादृष्टीने महत्वाची आहे. बहुसंख्य मुसलमानांना इथे कुठलाही प्रक्षोभ माजावा, अशांतता निर्माण व्हावी, तणावाचे वातावरण राहावे असे वाटत नाही. अशा कारवायांना साथ देण्यात आपण उध्वस्त होऊ याची कल्पना इथल्या मुसलमानांना आहे. भारताशी बेईमान होणे त्यांना मंजूर नाही. अशा मुसलमानांनी सावधपणे वागून, राष्ट्रद्रोही कारवायांना उघडे पाडण्यात पुढाकार घ्यायला हवा. घातपात घडल्याने जो प्रक्षोभ निर्माण होईल त्याला आवर घालणे सोपे नक्कीच नाही. घातपात होऊ न देण्यासाठी जागरूक रहाणे सोपे व शहाणपणाचे आहे. वस्तीत रहायला येणारा कोण आहे, काय करतो याची माहिती ठेवणे जरूरी आहे. कोंढव्यात ही अशी मंडळी राहतात याची माहिती पोलिसांपर्यंत कोणी पोहोचवली नाही या अन अशा घटनांनी मुसलमानांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली आहे. विश्वास संपादन करण्यासाठी रा्ष्ट्रवादी मुसलमानांनी अशा राष्ट्रद्रोहींची माहिती द्यायला हवी अन् राष्ट्रीय प्रवाहात आम्ही आहोत हे दाखवून द्यायला हवे. एवढीच अपेक्षा विजयादशमी दिवशी सीमोल्लंघनाच्या निमित्ताने व्यक्त करायला हवी.

समाजराजकारणसद्भावना

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

9 Oct 2008 - 2:16 pm | सखाराम_गटणे™

सहमत

-----
आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो.
:)

ऋषिकेश's picture

9 Oct 2008 - 2:50 pm | ऋषिकेश

वरील स्फुटाच्या भावनांशी सहमत
मात्र हे कार्य केवळ राष्ट्रवादी मुसलमानांनी नव्हे तर प्रत्येक राष्ट्रवादी नागरीकाने करणे गरजेचे बनले आहे. त्यातही केवळ पुणे नाहि संपूर्ण देशात गरजेचे बनले आहे. आज पुण्यात आहे म्हणून तुमच्या शेजारी असे घडणार नाहि असे मुळीच नाहि.

अवांतरः बाकी "दसर्‍यानिमित्त" मुसलमानांना संदेश हे बाकी खास! ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Oct 2008 - 11:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही ऋषिकेशचं म्हणणं पटतं. जागृती फक्त मुसलमानांमधेच व्हावी असं का? मुंबई बाँबस्फोटाच्या खटल्यात शिक्षा झालेले अनेक हिंदूही आहेतच ना ज्या लोकांनी स्फोटकं शेखाडीपासून मुंबईत येण्यास मदत केली. आणि मुसलमान हिंदू समजापासून वेगळा राहिला किंवा आपण सगळे भारतीय न रहाता हिंदू-मुसलमान राहिलो यात सगळा दोष आपण मुसलमानांच्या पारड्यात टाकून मोकळे होणार का?

त्यांनी पुढाकार घेऊन अशा दुष्ट प्रवृत्तींना आळा घातला नाही तर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम राष्ट्रवादी मुसलमानांनाच भोगावे लागतील.

हा नक्की कोणाचा पराभव? हिंदूंचा, पोलिस यंत्रणेचा, प्रसारमाध्यमांचा का भारत या देशाचा आणि त्यातल्या नागरीकांचा?

अवांतरः "दसर्‍या"निमित्त मुसलमानांना सीमोल्लंघनाचा संदेश हे विचित्र वाटलं आणि "राष्ट्रवादी" नावामुळे आता शरद पवार किंवा असं काही वाचायला मिळेल असं वाटलं.

आंबोळी's picture

10 Oct 2008 - 11:06 am | आंबोळी

अवांतरः "दसर्‍या"निमित्त मुसलमानांना सीमोल्लंघनाचा संदेश हे विचित्र वाटलं आणि "राष्ट्रवादी" नावामुळे आता शरद पवार किंवा असं काही वाचायला मिळेल असं वाटलं.

हो ना.... मलापण हे स्फूट वाचुन संपवे पर्यंत सारखे आता भाजप मुसलमानाना, नंतर शिवसैनिक मग मनसैनिक मुसलमानाना संदेश असेल असे वाटत राहीले.

अवांतरः बाकी "दसर्‍या"निमित्त मुसलमानांना सीमोल्लंघनाचा संदेश हे लै आवडले. दर वेळी आपणच गोलटोप्या घालुन इफ्तारपार्ट्या का झोडायच्या? त्यानीपण सोने लुटू दे... तिळगूळ वाटू दे आणि हळदीकुंकवाचे समारंभ घेउ देत.

आंबोळी

विजुभाऊ's picture

9 Oct 2008 - 4:06 pm | विजुभाऊ

रमजान दसरा आणि राष्ट्रवादी मुसलमान यांचा काय सम्बन्ध आहे.
हिन्दु सण साजरे केले तरच त्यांचा राष्ट्रवाद दिसुन येईल असे तुम्हाला म्हणायचे आहे.
केवळ धर्मानेच जर राष्ट्रीयता ठरणार असेल तर माझ्या सारख्याने जो दोन्ही धर्मीय आहे त्याने काय करायचे?
मुस्लीम समाजात शिक्षणाचा अभाव आहे. त्याबद्दल धार्मीक आकस न बाळगता योग्य पद्धतीन समाज सुधारणा केली तर तो समाज साक्षर होईल दुर्दैवाने कोणत्याच राजकीय पक्षाला हे परवडणारे नाही.
हिन्दु संघटनादेखील मुस्लीमाना सामावुन घेताना " हा मुसलमान असूनही आम्ही त्याला आमच्यात सामावून घेतोय असे दाखवत असतात.
भारतात मुस्लीम लोकसंख्या पुष्कळ आहे. पण ६० वर्षांनन्तरही आपण त्याना समजात योग्य पद्धतीन सामावुन घेत नाही.

अनामिका's picture

9 Oct 2008 - 5:14 pm | अनामिका

आपले विचार अत्यंत योग्य आहेत .पण ऋषिकेश म्हणाला त्याप्रमाणे सावध व सतर्क राहाणे फक्त राष्ट्रवादी मुसलमानाचेच कर्तव्य नसुन प्रत्येक राष्ट्रवादी नागरीकाचे आहे.
स्वधर्मिय आहेत म्हणुन त्यांना साथ देणे हे केंव्हाही गैरच.अशाने मुसलमान समाजाकडे इतर धर्मियांचा संशयाने बघण्याचा दृष्टिकोन बळावतो आहे आणि यात निरपराध व राष्ट्रवादी मुसलमानांची देखिल ससेहोलपट होताना आढ्ळते आहे.
एकगठ्ठा मतांचे राजकारण करताना स्वतहाला निधर्मि म्हणवणार्‍या पक्षानी हेतुपुरस्सर या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कायम टाळले.यांचे अनावश्यक लांगुलचालन करण्याच्या नादात चुकीच्या गोष्टिंना खतपाणी घातले गेले.त्याचीच फळे आज हा समाज भोगत आहे.आज पर्यंत शि़क्षणाप्रती अनास्था असल्याचे चित्र मुस्लिमसमाजात दिसत होते पण आता तो गैरसमज देखिल दुर झालाय. पकडले जाणारे उच्चशिक्षित असल्याचे निदर्शनास येत आहे.स्त्रीयांना दुय्यम दर्जाची वागणुक देऊन ,शरियतचे कायदे वापरुन त्यांचे यथोचीत शोषण मुस्लिम समाजात होताना आढळते. हे दुष्टचक्र जर मुस्लिम समाजाने स्वत पुढे येउन थांबवले नाही तर भस्मासुराप्रंमाणे त्यांचा नाश अटळ आहे.
वीजुभाऊ तुमचे विचार पटले नाहीत्.मला तरी ते एकांगी वाटले.मुख्यप्रवाहात येण्यापासुन कुणीहि रोखलेल नाही पण त्यासाठी आपले वेगळेपण विसरता आले पाहिजे.
मला इथे एक गोष्ट नमुद करावीशी वाटते आहे.१९९५ साला पासुन माझ्या कुटूंबाने अष्टविनायक यात्रेचा संकल्प केला आहे आणि आम्ही दरवर्षी भारतात गेल्यावर अष्टविनायक यात्रा करतो आणि आज पावेतो ही यात्रा करताना आमच्यासोबत वाहन चालक म्हणुन येणारा इसम हा मुसलमान आहे पण तो प्रत्येक देवळात स्वत येतो .तसेच आमच्या घरच्या प्रत्येक कार्यामधे त्याचा सहभाग असतो अगदि गणपतीची आरास करताना देखिल त्याचा सहभाग हा असतोच असतो.आज माझ्या मुलांना त्याच अत्यंत लळा लागला आहे.आणि त्याला आम्ही आमच्या घरातील एक सदस्य समजतो.
असो "सुक्या बरोबर ओले जळते 'या उक्ती प्रमाणे सध्या अशा दशतवादी कारवाया करण्यात गुंतलेला मुसलमान हा आपल्या धर्मबांधवांचा घात करतो आहे.यासाठी राष्ट्रवादी मुसलमानांनी पुढे येणे जास्त गरजेचे व संयुक्तिक आहे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

"अनामिका"

सुक्या's picture

10 Oct 2008 - 5:25 am | सुक्या

मी शशिकांत / ऋषिकेश यांच्या मताशी सहमत आहे. राष्ट्रद्रोही काम करनार्‍याला थांबवनं हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. त्यात हिंदू किंवा मुसलमान या गोष्टी गौण आहेत. दहशतवादाचे सर्वाधिक दुष्परिणाम मुसलमानांनाच नव्हे तर सार्‍या समाजाला भोगावे लागतात. जोपर्यंत आपन जात / धर्म या गोष्टींकडे सहिष्णु द्रुष्टीकोनातुन पहानार नाही तो पर्यन्त याचे समाधान शक्य नाही .

विजुभाऊंचे विचार मलाही पटले नाही. रमजान दसरा यासारखे सण हे राष्ट्रीयतेचे नाही तर संस्क्रुतीचे प्रतीक आहेत. राष्ट्रीयता ही जात , धर्म या सगळ्यांच्या पलीकडे आहे त्यामुळे केवळ धर्माने राष्ट्रीयता ही कधीच ठरत नाही. माणुस एक धर्माचा असो की दोन, एखाद्याचे विचार हेच त्याची राष्ट्रीयता ठरवतात.

दसर्‍यानिमित्त मुसलमानांना संदेश वगेरे मला थोडं गौण वाटलं. शशिकांतला जे सांगायचं ते पोहोचलं म्हनजे झालं.

आमच्या होस्टेलच्या मेस चा आचारी मुसलमान होता. जितक्या आनंदाने तो शीरखुर्मा बनवायचा तितक्याच भक्तीभावाने होस्टेलच्या गणपती साठी मोदक बनवायचा. विसर्जनाच्या मिरवनुकीत गुलाल उडवत नाचायलाही यायचा. शेवटी सारे धर्म देव / अल्ला कुठे आहे विचारले की आकाशाकडे बोट दाखवतात.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

शशिकांत ओक's picture

10 Oct 2008 - 2:59 pm | शशिकांत ओक

सीमोल्लंघन हे दसरा या सांस्कृतिक सणाचे एक महत्वाचे वैशिष्ठ्य आहे. त्यात अमुक एक धर्माचा सण असा अर्थ मला अपेक्षित नाही.
वैचारिक सीमोल्लंघन करा असे राष्ट्रवादी मुस्लिमांना आवाहन आहे. याचा अर्थ अन्य, विशेषतः हिंदूंनी आपल्या समाजासाठी काहीच प्रबोधन न करणे अपेक्षित नाही.
एखाद्या घरातील वांड व हूड मुलांचा उपद्रव त्यांच्या पालकांना आपण आवर्जून सांगतो. त्यांनी त्यांच्या मुलांना ताब्यात ठेवावे असे आपणास अपेक्षित असते. त्याच प्रमाणे आपल्या स्वतःच्या घरातील तापट व त्रासिक मुलांना तितक्याच निष्ठूरपणे योग्य वळण लावणे इतरांना अपेक्षित असते.
जसे वर्गातील दंगेखोर मुलांना काबूत ठेवायची जबाबदारी जशी त्या त्या क्लास टीचरची असते, नवरा-बायकोच्या भांडणात तिऱ्हाइताने, वा शहाण्याने पडू नये असे म्हणतात. त्याच प्रमाणे मुस्लिम समाजातील समंजस व विचारी व्यक्तींनी पुढाकार घेऊन या बिकट परिस्थितीतून कसा मार्ग काढावा यासाठी त्वरित एकत्र यावे असे माझा सूर आहे.
राहिली गोष्ट हिंदू संघटनांच्या आक्रमकतेची. त्या संघटना सामान्यपणे हिंदूंवर होणाऱ्या आघाताला रोखण्यासाठी निर्माण झाल्या. अति उत्साही लोक प्रत्येक संघटनेत असतातच. त्यांच्या अतितायीपणामुळे काही अवांछनीय घटना होतात.
'ए वेन्सडे' सिनेमा पाहिला व एका सामान्य माणसाला प्रकर्षाने जे वाटले त्या मूडमधून लिहिले गेले.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Oct 2008 - 3:17 pm | प्रकाश घाटपांडे

या बाबतीत ओकांशी सहमत आहे. बहुसंख्य मुस्लिम समाज हा इथल्याच मातीतला आहे. इथेच तो धर्मांतरीत झाला आहे. असे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री महंमद फजल यांनी सांगितले होते.
एकदा धर्मांतरीत झाला कि परतीचे दरवाजे बंद होते.
(मानवधर्मी)
प्रकाश घाटपांडे

घाटपांडे यांनी चांगली माहिती दिली. धन्यवाद !

छोटा डॉन's picture

10 Oct 2008 - 7:23 pm | छोटा डॉन

सीमोल्लंघन हे दसरा या सांस्कृतिक सणाचे एक महत्वाचे वैशिष्ठ्य आहे. त्यात अमुक एक धर्माचा सण असा अर्थ मला अपेक्षित नाही.
वैचारिक सीमोल्लंघन करा असे राष्ट्रवादी मुस्लिमांना आवाहन आहे. याचा अर्थ अन्य, विशेषतः हिंदूंनी आपल्या समाजासाठी काहीच प्रबोधन न करणे अपेक्षित नाही.

सहमत आहे...
एकदम सुस्पष्ट भुमीका ...

उत्तम लेख, अभिनंदन !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

गोडवा's picture

7 Apr 2013 - 6:15 pm | गोडवा

मला वाट्ते काही तरी फार चुकते आहे. फार मोठा गैरसमज होत आहे. मला वाटते अज्ञान हिन्दू मधे आहे. नाही माझे मत पक्के आहे. मी वाचन भरपुर केले आहे. जगात फक्त दोनच धर्म. एक मुस्लीम दुसरा गैर मुस्लीम. मुस्लीमाचे आद्य कर्तव्य फक्त एकच ते की गैर मुस्लीमाला मुस्लीम करने. तो नाही होत असेल तर त्याला हाल हाल करुन ठार मारने. आणि जर तो असे करत नसेल तर तोच खरा मुस्लीम नाही. दार उल हरब व दार उल इस्लाम म्हनजे काय ते माहीत करा. हाजी, काझी, गाझी काय ते माहीत करा. डा. सुब्रमन्यम स्वामी काय म्हनतो ते वाचा,तु नळी वर ऐका जरा. भारत पाकिस्तान ची फाळनी का झाली ते माहीत करा. मुसलमांनाना वेगळा देश पाहीजे होता. तो त्यांनी घेतला. शर्त ही होती की सगळे मुसलमान ईथुन जातील. गेले नाही. तीथले गैर मुसलमान पुर्नपने संपले. जे आहेत ते संपन्याच्या वाटेवर आहेत. हे साठ वर्शात झाले. ईथे वेड्यांच्या गप्पा चालु आहेत की मुसलमान गणपती, दसरा, दिवाळी का साजरी करत नाहीत? त्यांना ६० वर्ष झाले तरी हिन्दू का सामावून घेत नाहीत. वा रे वा. पहीले तो डा. फकीर माईक म्हनतो ते नीट ऐका तु नळी वर. मग वेड्या सारख्या गोष्टी बोला ईथे येउन. बाकी तुम्ही ईथुन ६० वर्षात नमाज पढला नाहीत, बुर्के घातला नाहीत तर कसे जिवन्त रहाता ते बघा. ज्याने भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने वाचले नाही तो भारतीय नाही. हे पुस्तक पहीली पासुन ते पदवीपर्यन्त कम्पलसरी केले नाही तर तो देश भारत नाही. सगळेच चुकले . चुकतच येत आहे. दुर्दैव. ईंग्लंड परेशान आहे. शरीयत कायदा लागु करा म्हनतायेत तीथे मुस्लीम. फ्रान्स ख्रीस्चियन होता. मुस्लीम झाला. मुस्लीमांना विचारताहेत की तुम्ही भारतातल्या सगळ्या लोकांना नमाज का पढायला लावत नाहीत. तर ईथे चर्चा होत आहे की मुसलमांनाना दसरा का साजरा करायला सोबत घेत नाहीत? छान आहे. मुर्ख पना ची हद्द आहे. ईथे वेड्या सारखे चर्चा करन्या ऐवजी एकदा त्या फकीर नाईक ला भेटुन त्यालाच दसर्याचे निमंत्रन देउन बघा ना मुर्खांनो. गंम्मत अशी आहे की भारतात आधीच लोकशाही आहे. म्हनजे ज्याची लोकसंख्या जास्त त्याचे सरकार. म्हनजे आपोआपच ईथुन ६० वर्षानी मुसलमांनांची लोकसंख्या हिन्दूंपेक्शा जास्त होनार. आपोआपच मुसलमानांचे सरकार बननार. मग आपोआपच शरीयत कायदा लागू होनार. मग आपोआपच झीझीया कर येनार. मग आपोआपच भारताचे पाकीस्तान होनार. भारताचे काय घेउन बसला आहात हो तुम्ही. अमेरीका, युरोप परेशान आहे. एकदा बान्ग्ला देशातील हिन्दूंना विचारुन तर बघा तो जगतो तरी कसा बाबा म्हनुन? मलेशिया तील हिन्दू जगतात तरी कसे माहीत आहे काय? काहीच माहीत नाही. नीट काही माहीत करुन घ्यायचे ही नाही. खरा ईतीहास माहीत नाही. निघाले वेडे कशावरही चर्चा करयला. बाकी तुमच्या चर्चेला विचारते कोन हो? म्हने राश्ट्र वादी मुस्लीम. मुस्लीम हा राश्ट्र वादी बीदी काहीही नसतो. तो फक्त मुस्लीम असतो. जे मुस्लीम नाहीत ते फक्त काफीर असतात. काफीरांना मुस्लीम करने हेच फक्त मुस्लीमांचे आद्य कर्त्यव्य असते. ते जाउद्या. दिवसातुन ५ वेळा जो भोंगा ऐकु येतो ५ मिनिटे. काने किट्ट होतात आवाजाने. जवळ गर्वार्शी असेल तर तीचा गर्भपात होईल एव्हढा मोठा आवाज अचानकच सुरु होतो. कुठेही विज नसेल तरी ह्या कामाला विज कमी पडत नाही. ह्याचा नियम कधीच मोड्त नाही. तो म्हनतो तरी काय हे माहीत आहे काय? ते अरबी मधे असल्याने तुम्हाला समजत नाही. समजुन ही तुम्ही काहीच करु शकत नाहीत. कारण तुमच्यात हिम्मत नाही.

गोडवा's picture

7 Apr 2013 - 6:35 pm | गोडवा

मला एक भारतीय मुसलमान भेटला, पाकिस्तान्या बहोत हरामी रहते है. बोलते है तुम लोग मुस्लीम हो ही नही. हिन्दुस्तान मे रहते हो ईसलियी तुम हिन्दू ही हो. मला म्हने ह्मारे दुश्मन हिन्दू नही ज्यु लोग है. मला त्याचे बोलने ऐकुन गम्मत वाटली. बाकी गणपती ची मिरवनुक मशीदीसमोरुन जात असताना ब्यान्ड बाजा नाच बन्द करावा लागतो. जसे काही अन्त्य यात्राच चालली आहे असे. मग थोडे पुढे गेल्यावर सगळे चालु. ही परीस्थीती मी लहान असताना माझ्या गावात पाहीली होती. आता काय आहे कोन जाने. बाकी जे तो अकबरुदीन ओवेसी नावाचा नीच बोलला ते जरा ऐकुन बघा. तु नळी वर आज ही आहे. भोकर ला तो बोलला. मुर्खांनो अयोध्येला राम मंदिर कधी बान्धता ते बघा. कशी मथुरेचे बघा. नन्तर तुमचा धर्म आस्तीत्वात कसा राहील ते बघा. गाढावा सारखी ईथे चर्चा करुन काहीही उपयोग नाही. बाकी तुम्हाला विचारते तरी कोन हो? तुमचे वाचते तरी कोन हो? जर कुन्या मुसलमानाने हा धागा वाचला आणि त्याला तो समजला आणि जर त्याने हा सेन्सार नाही करवला तर तो मुसलमानच कसला?

वेताळ's picture

7 Apr 2013 - 6:36 pm | वेताळ

अरे बाबा एकदम कडवे विचार आहेत.......

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2013 - 6:42 pm | अत्रुप्त आत्मा

@कोंढव्यातील आरोपी शोधताना पोलिसांना मुस्लिम समाजानेच मदत केल्याची घटना यादृष्टीने महत्वाची आहे. बहुसंख्य मुसलमानांना इथे कुठलाही प्रक्षोभ माजावा, अशांतता निर्माण व्हावी, तणावाचे वातावरण राहावे असे वाटत नाही. अशा कारवायांना साथ देण्यात आपण उध्वस्त होऊ याची कल्पना इथल्या मुसलमानांना आहे. भारताशी बेईमान होणे त्यांना मंजूर नाही. अशा मुसलमानांनी सावधपणे वागून, राष्ट्रद्रोही कारवायांना उघडे पाडण्यात पुढाकार घ्यायला हवा. >>> या भावनेशी सहमत.

पण,तरिही

....

राष्ट्र्वादी मुस्लिम म्हणजे काय? माहित आहे का? मौलाना आझाद शेवटपर्यंत राष्ट्र्वादी मुस्लिम होते.राष्ट्र्वादी मुस्लिम याचा अर्थ आपण सज्जन/भोळ्या मनाने लावलेला दिसतो. राष्ट्र्वादी मुस्लिम म्हणजे मुस्लिम राष्ट्र यावं असं वाटणारा मुस्लिम होय. कारण त्याशिवाय असणार्‍या भारतराष्ट्र किंवा अगदी हिंदुराष्ट्र याच्याशी इस्लाम धर्मानुसार एकनिष्ठ्ता ठेवता येत नाही. म्हणुनच जे फाळणीच्यावेळी अखंड भारतवादी मिसलमान होते त्यांना राष्ट्र्वादी मुस्लिम म्हणण्याची चाल पडली.आता ते अखंड भारतवादी होते(मौलाना आझाद आणी त्या मताचे सर्व) त्यांना भारत अखंड कशासाठी हवा होता.? तर पाकिस्तानचा १ छोटासा तुकडा घेऊन उरलेल्या भारतात,मुस्लिम अल्पसंख्य होण्यापेक्षा अजुन काहि काळ थांबुन संपूर्ण भारतावर हळुहळू मिस्लिम अंमल निर्माण करण त्यांना हवं होतं. तेच कुराणानुसार बरोबर आहे,व पाकिस्तान मागणं चूक आहे,अशी त्यांची भुमिका होती. इस्लामप्रमाणे दुसरा राष्ट्रवाद/दुसरा देव/दुसरी संस्कृती/दुसरा धर्म किंवा त्याच्या परंपरा मानणं हे कोणत्याही काळात गैर-इस्लामिक ठरत असतं. असं जर का काहि पाळत असतील,तर ती संख्याबळ कमी असल्यामुळे करायची एक अपरिहार्य तडजोड असते.

याउप्परही हमिद दलवाईं सारखे खरेखुरे राष्ट्रवादी असतातच,त्यांना तुंम्ही बेशक राष्ट्र्वादी मुस्लिम म्हणा.कारण त्यांना आपणच आपल्या धर्माचं पहिलं भक्ष असतो याची नम्र जाणिव असते/होति. अता त्यांना उरलेला बिगर मुस्लिम समाज बरोबर घेत नाही,किंवा मदत करत नाही.ही तक्रार असेल तर ती एकदम मान्य. :)

> ज्याने भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने वाचले नाही तो भारतीय नाही. हे पुस्तक पहीली पासुन ते पदवीपर्यन्त कम्पलसरी केले नाही तर तो देश भारत नाही <

हे अगदी खरे आहे.

सहा सोनेरी पाने वाचायलाच हवे

ते एक विणोदी पुस्तक आहे. सबब कंपल्शन मस्ट आहे.

बाळ सप्रे's picture

12 Apr 2013 - 10:31 am | बाळ सप्रे

चला म्हणजे हे पुस्तक या देशात कम्पलसरी नाही म्हणजे हा भारत नाही.. :-)

आणि पहिली ते पदवी एकच पुस्तक !! :-)
पुस्तक कसेही असो हे विचार विनोदी नक्कीच आहेत..

खादाड_बोका's picture

11 Apr 2013 - 10:10 pm | खादाड_बोका

अगदी बरोबर बोलला......आणी आश्चर्य असे की तुझा प्रतीसाद अजुन उडवीला नाही मिपावरुन.