कॅरॉट

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
5 Apr 2017 - 4:33 pm

मॉलमधील टॉप फ्लोअरला तो बसला आहे
ती बसली आहे
संगीत आहे
ब्लॅकफॉरेस्ट आहे
एसीची चिलिंग शांतता आहे
त्याच्या हातात एक पेन आहे
मंद हसत तो म्हणाला.
"हाऊ अबाउट अ सेल्फी, डाईंग टू टेक इट विथ यू?"
तिच्या ओठांचा आपोआपच चंबू झाला
कोपराला छातीचा ओझरता स्पर्श...
आणि
क्लिक!

---

डिलक्स अपार्टमेंट. फिफ्थ फ्लोअर. टू बीएचके.
हळूहळू लिफ्ट वर येत आहे. आतमध्ये खुर्ची टाकून बसलेला पोरगा पेपरमध्ये काहिबाही वाचत आहे. त्याला बहुतेक तिची चाहूल नसावी.

"झाला का इंटरव्ह्यू?"
"यप"
"लागली का नोकरी?"
हाऊ डिसगस्टींग. नोकरी फोकरी काही नाही.
इट्स ए जॉब मॅन. इट्स ए जॉब!

----

झंडू फार्मासिटीकल्स. न्यू जॉईनिंग. वेलकम. वगैरे.
ऑफिसमध्ये एसी सुद्धा नाही. गरगर फॅन आणि नुसती फळकुटे.
"धिस इज एचएसके. न्यू अपकमिंग प्रोजेक्ट."
"साऊंडस् गुड"
"वील यू डू कॉस्टींग? यू हॅव ए वीक"
"एम आय सपोजड् टू डू धिस? "
"या.."
"सॉरी, आय एम हिअर टू डू रिसर्च ओन्ली"

फकींग कलिग.

---

पुन्हा एकदा, डिलक्स अपार्टमेंट. ग्राऊंड फ्लोअर. लिफ्टमन ऑन द चेअर.

दाबावी का हिला खोपच्यात घेऊन
आहाहा! काय ती कलिंगडं.
"मॅडम तुम्ही सफारी स्टॉर्म घ्या. त्या क्रिस्टामधी काय ठिवलंय?"
"अरे टोयाटो यार, ब्रँड बघ. अॅटोमॅटीक आहे अजून"
"अहो पण xyz xyz xyz..."
"अरे पण xyz xyz xyz..."
अजून घालावी का हिला खोपच्यात. आहाहा! आता दाबलीच पाहिजे.
नालायक पांडू.

---

रोजचाच झंडू. मरगळ मरगळ. एसी केबिन & मॅनेजिंग डिरेक्टर.
"सो, हाऊज गोइंग?"
"इट्स परफेक्ट कंपनी फॉर मी सर. एम एनजॉइंग माय वर्क"
"हाऊ अबाऊट एचएसके. वील यू डू कॉस्टींग?"
"ऑफकोर्स सर, विथ प्लेजर. वील कंप्लिट बिफोर टार्गेट डेट"
"कीप इट अप माय गर्ल"
गॉर्जिअस बॉस!

----

गेटवर.
"सलाम मेमसाब"
मुच्छड मुच्छड मुच्छड वॉचमन.
वय झालं आता. तरी असली थेरं.

----

डिलक्स अपार्टमेंट. किती महागडं आहे.
किचनमध्ये मॅगीचं एक पॅकेट पडलं आहे.
झुळझुळीत नाईट गाऊनवर ती बेडवर पडून आहे.
अॅपल स्मार्टफोन हातात आहे. याचे अजून किती हप्ते फेडायचे बाकी?
क्लिव्हेज अॅडजस्ट करत ऑन केलेला फ्रंट कॅमेरा.
ओठांचा चंबू.
क्लिक!
इट्स रॉकींग!

---

"सलाम मेमसाब"
"सलाम"
"---"
"आपकी मुछे तो बडी डरावणी है यार.."
"हाहाहा"
फेसबुक भावड्या फेसबुक. हाईस कुठं. विथ चंबू फोटो!

----

बॉस ऑफ दी इयर. झंडू का झंडू.
"फ्रॉम लास्ट थ्री मंथ, यू हॅव डन नथिंग विथ धिस एचएसके कॉस्टींग? इक्सप्लेन टू मी"
"आय हॅव प्रीपेयर्ड धिस स्प्रीडशीट."
"डोन्ट शो मी डॅट 'शिट' अगेन"
"बट सर..."
"लिव.."
हाऊ एंबरॅसिंग!

----

फोन फोन फोन फोन फोन
इट्स टाईम टू रीझाईन

#विथ ऑनर

---

मॉलमधील कॅफेटेरीयात एक 'बडा' आदमी बसला आहे. सूट बूट टाय.
ती पण बसली आहे. स्कर्ट टॉप सँडल.

संगीत. इट्स देअर
ब्लॅकफॉरेस्ट. इट्स देअर
एसी. विथ चिलिंग सायलेन्स.
"गुड ट्रॅक रेकॉर्ड! देअर इज नथिंग स्टॉप यू टू जॉइन अस"
"थँक यू सर. वुड यू माइंड इफ आय टेक सेल्फी विथ यू"
"ओह प्लिज शुअर... हं हं हं"
ओठाचा चंबू..
वन मोअर प्लिज
गालाला गाल..
वन मोअर प्लिज
छातीचा भार पाठीवर रुतलेला
क्लिक!

कथामौजमजाप्रतिभा

प्रतिक्रिया

वरुण मोहिते's picture

5 Apr 2017 - 4:51 pm | वरुण मोहिते

जुना संदर्भ असेल तर मला भाऊ पाध्ये ह्यांची आठवण झाली .
थालीपीठ हा कथासंग्रह .