भर रस्त्यावर
कुत्री तुटून पडली होती.
एका बेवारस प्रेतावर
कुत्री भुंकत होती.
गुरगुरत होती
त्यांच्यातली त्यांच्यात
रस्ता निर्मनुष्य नव्हताचं
पण
ते कुत्री हाकलून लावावीत
असं कुणालाचं वाटतं नव्हतं.
एका ही माणसाला पुरून टाकण्यापेक्षा
प्रेत जाळून टाकण्यापेक्षा
अशी खाऊ दयावीत कुत्र्यांना
असं वाटत असेल सर्वांना
पण
पुन्हा कुत्र्यांचं राज्य येईल असं
वाटलं नव्हतं कुणाला.
मी तरी काय करू ?
ते कुत्री हाकलणं आता शक्य नाही
मला तरी तसं वाटतं नाही.
ते प्रेत माझ्या बापाचं असलं
म्हणून काय झालं ?
राज्य तर .
कुत्र्यांच आहे ना आता .
...................................................
.
परशुराम सोंडगे,पाटोदा
प्रतिक्रिया
2 Apr 2017 - 2:40 pm | जव्हेरगंज
काहितरी आगळ वेगळ आहे.
पण,
नीटशी समजली नाही!!!!
2 Apr 2017 - 9:20 pm | परशु सोंडगे
शेतक-याचा प्रश्न वर नुसत
भुंकले जातं.
त्याच्या बाबतीत संवेदनशील नाही
राजव्यवस्थेतील
माझा बाप शेतकरी..
धन्यवाद
2 Apr 2017 - 3:31 pm | अभ्या..
आह्ह्ह्ह्ह्ह्ह,
समजली, पूर्णपणे समजली,
जाळ हाय राव तुमच्या लेखनात, जब्बरदस्तच.
कीपीटप
2 Apr 2017 - 9:21 pm | परशु सोंडगे
धन्यवाद
2 Apr 2017 - 3:49 pm | चित्रगुप्त
राज्य तर .
कुत्र्यांच आहे ना आता .
परशुराम सोंडगे,पाटोदा
9673400928
..............या शेवटल्या चार ओळी जबरदस्त.
ठेव ते वर.... कीपीटप.
2 Apr 2017 - 9:22 pm | परशु सोंडगे
धन्यवाद
3 Apr 2017 - 8:49 am | आषाढ_दर्द_गाणे
....पण थोबाडीत मारल्यासारखे वाटले. सुन्न केलेत.
4 Apr 2017 - 8:26 am | परशु सोंडगे
धन्यवाद
3 Apr 2017 - 12:34 pm | विशुमित
जबरा..!!
4 Apr 2017 - 8:26 am | परशु सोंडगे
धन्यवाद
सर जी
5 Apr 2017 - 2:42 pm | वकील साहेब
उत्तम जमली आहे
5 Apr 2017 - 3:08 pm | पैसा
उत्तम कविता