कथा आणि व्यथा
बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!!
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."
कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
प्रतिक्रिया
17 Mar 2017 - 7:01 am | उगा काहितरीच
सरकारने नेमक काय करावं ?
17 Mar 2017 - 9:44 am | चिनार
हाच प्रश्न मलाही पडलाय..
दुसरा प्रश्न : गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पूर्ण वर्षात एकही नैसर्गीक आपत्ती आल्याचे ऐकिवात नाही. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी नक्की कश्यासाठी हवी आहे?
मागच्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी ऐवजी इतर सुविधा देण्याचे ठरवले होते. त्यालाही शेतकऱ्यांचा विरोध होता.
शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे हे मान्य..पण सरकारनी नेमके काय करणं अपेक्षित आहे.
17 Mar 2017 - 10:41 am | विशुमित
मी पण ऍक्टिव्ह शेतकरी आहे. शेतीत मला जे प्रश्न भेडसावत आहेत आणि त्यासाठी सरकार ने काय करावे हे माझ्या अल्पमतीनुसार लवकरच लिहतो.
(आलो जरा दारं फोडून)
17 Mar 2017 - 11:54 am | मोदक
लेखाच्या प्रतिक्षेत.
एका लेखात बसेल असे वाटत नाही पण शक्य होतील तितके मुद्दे विचारात घ्या.
बियाणांची खरेदी, खते, मनुष्यबळाची उपलब्धता, हवामान, यंत्रे व त्यांची देखभाल, तयार मालाची वाहतूक, बाजारपेठा, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेवटी ग्राहक.
सध्याची व्यवस्था बघितली तर उत्पादित मालाचे "शेतकरी ते ग्राहक" असे वन वे ट्रॅफिक आहे आणि शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये अनेक भिंती आहेत त्यामुळे शेतकर्यांच्या अडचणी नक्की काय आहेत ते सर्वांना त्याच तीव्रतेने कळेल असे नाही.
ग्राहकाने त्याच मालाला मोजलेला पैसा अनेक चाळण्यांमधून जाऊन शेतकर्याकडे परत येतो.
या व्यवस्थेमुळे दोघे जण वेगवेगळ्या दिशांकडे बघून उत्तरे शोधत आहेत (हे माझे वैयक्तीक मत आहे)
तुम्ही अॅक्टीव्ह शेतकरी असल्याने, तुमच्या लेखमालेने निदान एकमेकांची भूमीका समजायला सुरुवात झाली तर चांगले होईल.
17 Mar 2017 - 12:08 pm | चिनार
जरूर लिवा विशुमित भौ..वाट पायतो..
खरं सांगू का...भारत हा कृषीप्रधान देश आहे हे वाक्य जितकं जुनं झालंय तेव्हढंच शेतकरी संकटात आहे हे सुद्धा जुनं झालंय..आता कायमस्वरूपी उपाययोजना सुरु करण्याची वेळ आली आहे असं वाटतं.
17 Mar 2017 - 12:32 pm | विशुमित
वाक्य किती ही जुने झाले तरी सिंधू संस्कृती पासून भारत हा कृषिप्रधान देशच आहे हे का नाकारायचं, हा माझा पहिला मुद्दा.
आणि शेती हा सतत बदलणारा आणि हेलकावे खाणारा व्यवसाय आहे, त्यावर कायम स्वरूपी उपाय योजना होऊ शकत नाही (कॊणत्याचं व्यवसायात ती होऊ नाही शकत)
खाली अप्पा म्हणाले तसे जमत नसेल परवडत नसेल तर धंदा बंद करून टाका. बरोबर आहे त्यांचं. म्ह्णूनच तर आमच्या आई बापाने आम्हाला शिकायला लावले, नोकरी करायला लावली.
बाकी विषयांतर बाजूला ठेवतो. काही मुद्दे कागदावर उतरवले आहेत. एकदा फायनल झाले की टंकतो.
17 Mar 2017 - 12:40 pm | मोदक
लवकर टंका..!
17 Mar 2017 - 12:47 pm | चिनार
मी नाकारत नाय हो बाप्पा...
विदर्भातल्या शेतकऱ्यांचे हाल जवळून बघितले आहेत. काहीतरी करायला हवं असं नेहमी वाटतं पण काय करावं
हे कळत नाही.
17 Mar 2017 - 9:49 am | अमरप्रेम
कर्ज माफी देऊन शेतकऱ्यांचा काही फायदा होत नाही. शेतकऱ्याची परिस्थिती सुधारत नाही.
एक कर्ज सरकारने फेडलं तरी परिस्थिती तशीच असल्यामुळे दुसरं कर्ज घ्यावंच लागतं.
अशावेळी सरकारने कर्ज माफी ऐवजी शेतकऱ्यांच्या समृद्धी साठी शेतमालाला हमीभाव मिळवून द्यावा व कर्जावरील व्याज माफ करावे.
17 Mar 2017 - 10:38 am | विशुमित
कथेत सांगितल्या प्रमाणे तूर्तास कर्ज माफी करावी आणि म्हाताऱ्याला दवाखान्यात हलवावं. नंतर कर्ज मुक्ती का ते वॉटर फिल्टर का ते संडास वगैरे हळू हळू केले तरी चालेल. वेळ आहे अजून २ अडीच वर्ष. पुढील पंचवार्षिक पण मिळण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांना नक्की कर्ज मुक्ती मिळेल याची आशा करतो.
(आता एक प्रश्न मुद्द्याचा आहे पोरं म्हाताऱ्याला दवाखान्यात हलवायला टाळाटाळ का करत असावीत. उत्तर उघड आहे गौरंटी आहे म्हातारं आता काही कामाचं उरलं नाही आणि जेवढं लवकर मरेल तेवढं वाटून खायला बरं.)
17 Mar 2017 - 11:02 am | सतिश गावडे
सरकारने कर्जमाफी करण्यापेक्षा ज्या ब्यांकांचे कर्ज शेतकरी लोकांनी घेतली आहेत त्या ब्यांका शेतकऱयांना कर्ज माफ का करत नाहीत?
17 Mar 2017 - 2:23 pm | मार्मिक गोडसे
सरकारने कर्जमाफी करण्यापेक्षा ज्या ब्यांकांचे कर्ज शेतकरी लोकांनी घेतली आहेत त्या ब्यांका शेतकऱयांना कर्ज माफ का करत नाहीत?
सरकारने शेतकर्यांची कर्जमाफी केल्यास बँकांना सरकार भरपाई देते. परंतू, बँकांनीच शेतकर्यांचे कर्ज माफ केल्यास बँकांना भरपाई कोण देणार? बँका नवीन कर्ज कसे देणार?
17 Mar 2017 - 11:23 am | श्रीगुरुजी
रामूआण्णा चालताफिरता कधी होता का? जेव्हापासून बघतोय तेव्हापासून आपण वेगवेगळ्या कारणांनी आजारी आहोत असंच तो सांगतोय. पोरांनी स्वतःचा संसार सोडून, मुलेबाळे वार्यावर सोडून, शहरातील नोकरी सोडून आयुष्यभर त्याचीच सेवा करायची का?
17 Mar 2017 - 11:48 am | विशुमित
अगदी पोरांच्या मनातलं बोलला..!!
गावातल्या पुढाऱ्यांचे काय जातंय म्हणायला बापाला बघा म्हणून. तुच्छ लेकाचे..!!
17 Mar 2017 - 11:52 am | विशुमित
च्याआयला तो रामू अण्णा शहरात पण राहायला नको म्हणतो. २ दिवस झाले की म्हणतो इथे लय बांधून ठेवल्यासारखा वाटतं.
(तसं नेतंय कोण रामू अण्णाला शहरात म्हणा? आपलं उगाच वर वर म्हणायचं "अण्णा तुम्ही आमच्या बरोबर राहा इथे")
17 Mar 2017 - 11:56 am | अप्पा जोगळेकर
झेपत नाही तर शेती सोडून द्यावी. सारखी सारखी काय भीक मागायची ?
वडा पावची गाडीवाले, रिक्षावाले, छोटे न्हावी, भुर्जी पाववाले, रस्त्यावर कपडे विकणारे, खेळणी विकणारे सगळे गरीबच असतात आणि सगळेच कर्जाच्या ओझ्याखाली असतात. ते मुकाट्याने कर्ज फेडतात.
यंदा पाउस चांगला झाला तरी रड आहेच.
17 Mar 2017 - 12:13 pm | विशुमित
दहा रुपयाचा वडापाव कोणी ८ रुपयाला देतो का?
रु.२ रुपये कमी आहेत म्हणून रिक्षावाला ऐकतो का?
न्हावी कटिंग मध्ये डिस्काउंट देतो का ?
रस्त्यावर कपडे विकणारे, खेळणी विकणारे त्यांच्या कर्जाचा आकडा कोठे प्रकाशित झाला आहे का?
वरील सगळ्या धंद्याचे मार्जिन तर आपल्याला नक्की माहित असेल.
चांगला पाऊस झाला म्हणूनच तर वांदे झाले. पेरलं नसतं तर पुढचा खर्च तरी वाचला असता.
(च्यायला तो रामू अण्णा कोठेच भीक मागताना दिसत नाही. नाही जमलं कर्ज फेडायला तर मरून जातो, नाही नेले पोरांनी दवाखान्यात तर खाटेवरच प्राण सोडतो. त्या पोरांच्या म्हातारीला आणि गावातील पुढाऱ्यांना काही काम नाही. त्यांच्यामुळे रामू अण्णाला २% ची किंमत नसलेल्या शहरी पोट्ट्यांचे ऐकायला लागतेय)
17 Mar 2017 - 12:31 pm | अप्पा जोगळेकर
आतबट्ट्याचा धन्दा सोडून द्यावा.
एक नोकरी गेली तर दुसरी शोधतात तसेच.
17 Mar 2017 - 12:36 pm | विशुमित
एक भाबडा प्रश्न- अकाउंटंट चा जॉब सुटला तर प्रोडक्शन इंजिनेरच जॉब मिळेल का हो?
17 Mar 2017 - 1:46 pm | गामा पैलवान
विशुमित,
तुमच्याशी सहमत आहे. शेती हा जॉब नाही. सर्वकाही पैशात मोजायचं नसतं. शेतकऱ्याची दुरवस्था जाणीवपूर्वक जोपासली गेली आहे. यामागील उद्दिष्ट कॉर्पोरेट शेती आणणे हेच आहे. एकदा ती आल्यावर चाळीस रुपये किलोने मिळणारा गहू चारशे रुपयांवर गेला की पढतपंडितांना जाग येईल. अर्थात तोवर वेळ टळून गेलेली असेल.
आ.न.,
-गा.पै.
17 Mar 2017 - 2:19 pm | विशुमित
अगदी बरोबर आहे 'गामा'जी. शेती १००% धंदा म्हणून नाही करता येत. शेतकऱ्याला बऱ्याच जणांचे हित संबंध जपावे लागते. मजूर किती ही परवडले नाही तरी त्यांच्या कडून तुम्ही ढोरा सारखे काम नाही करून घेऊ शकत जे फौंडरी वगैरे कारखान्यांमध्ये करून घेतले जाते तसे.
19 Mar 2017 - 1:05 am | पिजा
मजुरांचा प्रश्न हा अलीकडच्या काळातला. त्या आधी शेतीतल्या मजुरांनाही ढोरासारखंच काम होतं. ९० नंतर वाढत्या स्थलांतरामुळे डिमांड-सप्लायचा गॅप तयार झालाय त्यामुळे बांधावरचे(मध्यम/मोठे) शेतकरी अडचणीत आल्येत. ह्यात ऊस, BT कॉटन चाही हातभार आहेच.
17 Mar 2017 - 3:24 pm | अप्पा जोगळेकर
कॉर्पोरेट शेती आली तर बरेच आहे. कॉम्पितिशन वाढेल आणि स्वस्ताई येईल.
रिलायन्स फ्रेश आले तेव्हा पण लोक असेच बोंबलत होते. आता गरीब लोक सुद्धा स्वस्त पडते म्हणून डी मार्टात दिसतात.
17 Mar 2017 - 12:58 pm | चिनार
विशुमित भौ..
वडापाव वगैरे इतर व्यवसाय शेतीशी कंपेयर करता येत नाही त्यामुळे आप्पांचा मुद्दाच मला अमान्य आहे.
पण..
वडापाव विकणारा त्याची पूर्ण सप्प्लाय चेन स्वतः मॅनेज करतो(तोच बनवतो आणि तोच विकतो) त्यामुळे त्याने मिळणार प्रॉफिट पूर्ण त्याच असतं.
रस्त्यावर कपडे विकणाऱ्याचे कर्ज कुठे प्रकाशित झाले नसले तरी साधारणतः: हे लोक मार्केट मधून "पर डे इंटरेस्ट' या प्रमाणे कर्ज घेतात. शंभर रुपये घेतले तर दुसऱ्या दिवशी एकशे दोन परत करावे लागतात. हा दर शेतीकर्जाच्या दरापेक्षा कितीतरी जास्त आहे.
17 Mar 2017 - 1:38 pm | कलंत्री
वाढती लोकसंख्या, जमीनीचे वाढत्या किंमती, खताच्या वाढत्या किंमती, मजूरीचे वाढते दर आणि या पार्श्वाभूमीवर बाजारभावातील हेलकावे यामूळे शेतकरी खरेच उध्वस्त झाला आहे हेच खरे.
शेतीच नसेल माणसे काय खातील बरे या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे.
17 Mar 2017 - 1:57 pm | पुंबा
शेतीच्या समस्या केवळ शेतजमीनीचे पिढ्यानापिढ्या होणार्या विभाजनामुळे किंवा लहरी पाऊसमानामुळे निर्माण झालेल्या नाहीत. तंत्रज्ञानाचा अत्यंत कमी वापर, शेतीतील इनपूट कॉस्ट्स अत्यंत महाग असणे, शेतमालाला चांगला भाव मिळेपर्यंत थांबने शक्य नसणे, सरकारला शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आलेले अपयश, अनुदानांचे वाटप अनुलक्ष्यी नसणे, शेतीतून बाहेर पडू इच्छीणार्या तरूणाला इतर व्यवसाय, उद्योग क्षेत्रात सामावून घेण्यात आलेले अपयश, खते-बियाणे-अन्नप्रक्रिया या क्षेत्रात स्वदेशी संशोधने न होणे आणि सर्वात महत्त्वाचे बाजारपेठेला अॅक्सेस नसणे या मुख्य समस्या आहेत. कर्जमाफी हा उपायच नाही, त्याने अत्यंत चुकीचा पायंडा पडेल. किमान सुधारणा केल्याखेरीज नुसत्या एका वर्षी कर्ज माफ केल्याने शेती फायद्यात येईल असा विचार करणे मुर्खपणाचे आहे.
17 Mar 2017 - 2:00 pm | विशुमित
शेती मालाचे उत्पन्न कसे वाढवता येईल याचा प्रश्न आता जवळपास उरलाच नाही. बहुतांशी शेतकरी (लहान/मोठे दोन्ही) नवं नवीन बियाणे आणि तंत्रज्ञानाचा उपयोग शेती मध्ये करत आहेत. जिथे शक्य/आवश्यकता आहे तिथे ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, ट्रॅक्टरची वेग वेगळी अवजारे (स्वमालकीची /भाड्याने), माती परीक्षण, त्यानुसार पाणी आणि खतांचा वापर आणि पिकांचा उत्पादन पोर्टफोलिओ ठरवण्याची पद्धत बदलली आहे. त्यासाठी खर्च ही तेवढ्याच पटीने करावा लागतो. हे फक्त पश्चिम महाराष्ट्रातच होते असे नाही. सगळी कडे थोड्या अधिक प्रमाणात प्रगती झाली आहे. यामुळे उत्पन्न कैक पटीने वाढलेले दिसते आहे. इथं पर्यंत शेतकऱ्यांनी स्वतःमध्ये आमूलार्ग बद्दल घडवून आणला आहे.
खरा प्रश्न इथून पुढे चालू होतो. तो म्हणजे वितरण. या बद्दल कोणतेच सरकार ठोस निर्णय घेत नाहीत. त्याला कारणे ही तशीच आहेत.
सरकार आणि ग्राहकाने काय करायला हवे ते एक एक मुद्दे मी शक्य तेवढ्या लवकरात टंकण्याचा प्रयत्न करेल. माझ्या लेखनाचा आवाका एवढा नाही म्हणून सांभाळून घ्यावे. कृपया याला कोणी भीक म्हणू नका विनंती आहे.
17 Mar 2017 - 2:05 pm | पुंबा
विशुमीत, लोकांच्या प्रतिक्रियांचा विचार न करता लिहा. जे जेन्युईन प्रश्न आहेत ते मांडा. तुमच्याप्रमाणे इतरही लोक जे प्रत्यक्ष शेती धंद्यात आहेत त्यांनीदेखील आपल्या व्यावहारीक समस्या मांडल्या तर आपल्या सर्वांनाच हा विषय मुळापासून समजू शकेल.
17 Mar 2017 - 3:13 pm | वरुण मोहिते
आम्ही पण आहोत
17 Mar 2017 - 2:00 pm | मार्मिक गोडसे
सरकार नियोजनात कमी पडतंय. उदा. डाळींसाठी सरकारने प्रोत्साहन दिले, यंदा पाउसही उत्तम झाल्यामुळे तूरीचे विक्रमी उत्पादन झाले. तूरीला हमीभाव ५०५०/क्विं.) मिळूनही नाफेडने बारदाणा नसल्याने खरेदी बंद केली त्याचा फायदा व्यापार्यांनी उठवला व नडलेल्या शेतकर्यांकडून भाव पाडून (३५०० - ३४००) तूर खरेदी केली. शेतकरीही ट्रकचे भाडे परवडत नसल्याने नाफेडच्या खरेदीची वाट बघण्यापेक्षा मिळेल त्या भावात व्यापार्याला तूर विकतोय. हेच जर डाळी साठविण्यासाठी पुरेशी गोदामे, वजनकाटे व बारदाणे उपलब्ध केली असती तर आज ही वेळ आली नसती.
कांद्याच्या बाबातीतही तिच बोंब आहे. कांद्याचे अमाप उत्पादन झाले, परंतू पुरेशा प्रमाणात रेल्वे वॅगन उपलब्ध न झाल्याने शेतकर्याला कांदा मातीमोल भावात विकावा लागला. उत्पादन खर्चही निघत नसेल तर बँकेकडून घेतलेलं कर्ज शेतकरी कधी व कसं फेडणार?
17 Mar 2017 - 2:16 pm | पुंबा
ही किती फालतू कारणे आहेत? ही असली कारणे सांगून जर शेतकर्याला नाडलं जात असेल आणी त्या वेळेला त्याच्या मदतीला कोणीच जात नसेल तर त्या राजकारण्यांना आता कर्जमाफीसाठी गळे काढण्याचा अधिकार आहे का? सरकारने शेतमालाच्या साठवणूक, विक्री, विपणन व्यवस्थेत अमुलाग्र सुधारणा करण्याची गरज आहे.
17 Mar 2017 - 3:19 pm | वरुण मोहिते
डाळींची निर्यात आज वाढली . पुरेशी गोदामं फक्त निर्यातीसाठी जास्त असतात . त्यामुळे निर्यात वाढली कि भाव पडतो त्याचा फायदा अडत वाले व्यापारी आणि एक साखळी चालू होते . कारण सगळ्याच डाळीचं उत्पादन त्या क्वालिटी मध्ये बसत नाही . त्यामुळे भाव पडणं पद्धतशीर प्रकार सुरु होतो.
17 Mar 2017 - 3:47 pm | अप्पा जोगळेकर
ट्रकचे भाडे परवडत नाही, बारदाणा नाही हे काय कारण आहे का ? जो माल ईप्सित स्थळी पोचवता येत नाही तो माल तयारच कशाला करावा ?
एखादा कारखाना सलग १० वर्षे तोट्यात चालला तरी तो चालूच ठेवायचा का ?
हे सगळे अनुदाने आणि कर्जमाफी लाटायचे धन्दे तर नाहीत ना.
कर्जमाफी झाली तर 'बसूया' ब्लॅक डॉग घेऊन असे पंढरपूरचा एक शेतकरी+कुक्कुटपालक मित्र कालच म्हणाला फोनवर.
ओझेगावला अवकाळी पाऊस झाला म्हणून म्हणे पाहणीसाठी लोक पण आले होते.
यासाठी असते का कर्जमाफी ?
शिवाय शेतकरी सहसा जोडधंदे पण करतात.
दुधाच्या धंद्यात तगडा प्रॉफिट मिळवता येतो असे काहीसे विशुमित साहेबांनी एका धाग्यात लिहिल्याचे आठवते.
17 Mar 2017 - 4:17 pm | मार्मिक गोडसे
ट्रकचे भाडे परवडत नाही, बारदाणा नाही हे काय कारण आहे का ?
खरेदी केन्द्रावर नाफेडकडून तूर खरेदी थांबल्यावर तूर रस्त्यावर टाकून दयायची काय? नाफेडच्या पुढील खरेदीच्या दिवसापर्यंत ट्रकमालक तितक्या दिवसाचे भाडे घेणारच ना? शेतकर्याला हा भूर्दंड कशासाठी?
तूरीची प्रतवारी करुन बारदाण्यात भरण्याची जबाबदारी नाफेडची असते शेतकर्याची नाही.
17 Mar 2017 - 2:40 pm | मार्मिक गोडसे
सरकार व्यापार्यांच्या नफेखोरीला खतपाणी घालतय.
17 Mar 2017 - 2:53 pm | मोदक
कुठले सरकार..? कधीपासुन..?
17 Mar 2017 - 3:22 pm | वरुण मोहिते
जेव्हा कोणतरी विरोधी पक्ष नेते होते ना तेव्हापासून
17 Mar 2017 - 3:32 pm | विशुमित
मुद्दा क्र.१-शेतकऱ्यांचे सगळे सातबारे बँकेसारखे आधार नंबर ने जोडा.
==> ७/१२ वर जे पीक पाणी लिहले जाते हे बऱ्याच ठिकाणी मोघम लिहलेले असते.
माझ्या ७/१२ वर ऊस, गहू आणि ज्वारी लिहलेले आहे. प्रत्येक्षात आम्ही ज्वारी गेले १४-१५ वर्ष झाली कधी केलीच नाही. जी ज्वारी पेरली ती फक्त जनावरांच्या चाऱ्या साठी.
इतर पिके जसे की सोयाबीन, टोमॅटो, भेंडी, काकडी दर वर्षी घेत असतो पण त्याचा लेखा जोखा कोठे च सापडत नाही.
सांगायचं मुद्दा हा आहे की सरकारकडे लागवडीची खरी माहिती गेली पाहिजे जेणे करून नियोजन करायला त्यांना पुरेसा वेळ मिळेल.
उसाची लागवड करतो तेव्हा त्याची नोंद सभासदाला सहकारी कारखान्यामध्ये करावी लागते. तेथील कृषी अधिकारी येऊन खात्री करून जातात. मग त्यांच्या कडे तब्बल ११ महिने असतात नियोजन करायला. मग त्या नोंद नंबर नुसारच उसाला तोड येते. हे इतर पिकांसाठी सरकारला शक्य नाही का? सरकारी शेतकी अधिकारी हे करू शकणार नाही का? तर हे शक्य आहे.
ऊसाप्रमाणे इतर पिकांची सरकार दरबारी संगणीकृत नोंदणी करण्याची जवाबदारी शेतकऱ्यांवर टाकावी आणि कृषी अधिकाऱ्यांनी त्याची काटेकोर पद्धतीने पडताळणी करून सरकारला माहिती पुरवावी. नियोजन मंडळाने/नीती आयोगाने ह्या चे विश्लेषण येणाऱ्या संभावित उत्पनाचे नियोजन करावे. हवामान, पर्जन्य आणि इतर आपत्ती गृहीत धरून उत्पन्न +- २०% धरावे. येणारे उत्पन्न शक्य तेवढे योग्य वेळेत विकले जाईल याची हमी सरकार ने घेतली पाहिजे.
क्रमश:
17 Mar 2017 - 4:29 pm | मार्मिक गोडसे
संबधीत तलाठ्याने प्रत्यक्ष शेतावर जाउन खात्री करायची असते. परंतू , तलाठी त्याच्या कार्यालयात बसून शेतकर्याने आणलेल्या पिकाच्या नमुन्याची नोंद करतो किंवा मागील नोदी जशाच्या तशा नोंदवतो. खर्या पिकाची नोंद करून घेणे ही शेतकर्याचीही जबाबदारी आहे.
17 Mar 2017 - 3:58 pm | विशुमित
मुद्दा क्र.२: पीक कर्ज आणि इतर कृषी कर्ज
==> शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न भेडसावतो तो म्हणजे खेळते भांडवल.
नोंद केल्या नंतर शेतकऱ्याला पीक कर्ज त्याच्या शेताच्या बांधा वर मिळाले पाहिजे. शब्दशः अर्थ घेऊ नका पण पीक कर्ज त्वरित मिळाले पाहिजे. संपूर्ण शेतकऱ्यांना पीक कर्जाची वाटप झाली आहे की नाही याची संपूर्ण जवाबदारी गावातील संबंधित बँका, कार्यकारी सोसायट्या आणि कृषी- महसूल अधिकाऱ्यांवर सोपवाव्यात. आधार लिंकेड असल्या मुळे त्यांना हे काम सोपे जाईल.
तसे पाहिले तर १२ महिन्या भरले तर पीक कर्जावर ० % व्याजदर आहे आणि १२ महिन्या नंतर हि त्याचा व्याजदर खूप अल्प आहे. या सवलतीचा शेतकऱ्याने फक्त शेतीसाठी वापर करावा.
फंड मॅनॅजमेन्ट कसे करावे याचे प्रशिक्षण गावो गावी सुरु केले तर अति उत्तम.
17 Mar 2017 - 4:53 pm | आदिजोशी
ज्यांनी शेतकर्यांवर ही परिस्थिती आणली तेच आता बोंबा मारतायत कर्ज माफ करा
17 Mar 2017 - 5:10 pm | प्रसाद_१९८२
गेल्या १५ वर्षात जलसिंचनाचे काम व्यवस्थित केले असते तर आज हि वेळ शेतकर्यांवर आली नसती.
कधी-कधी मुख्यमंत्री फडणविस म्हणतात ते बरोबर वाटते, आज जे विरोधक शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी आदळाआपट करत आहेत, ती यांचे बॅंक घोटाळे दडपण्यासाठीच आहेत असे दिसते.
"कर्जमाफी दिल्यानंतर राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधक घेतील का', हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे आव्हांन, एकाही विरोधकांनी आज पर्यंत तरी स्विकारले नाही.
17 Mar 2017 - 6:11 pm | मार्मिक गोडसे
आज जे विरोधक शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी आदळाआपट करत आहेत, ती यांचे बॅंक घोटाळे दडपण्यासाठीच आहेत असे दिसते.
शेतकर्यांना कर्जमाफी दिल्यास विरोधकांचे बँक घोटाळे शोधायला त्रास होईल का?
17 Mar 2017 - 5:27 pm | विशुमित
मुद्दा कर. ३ : ऍग्री डॅशबोर्ड डिजिटल फ्लेक्स
==> शेयर मार्केटच्या धर्तीवर देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निहाय हवामान अंदाज, पिकांचे लागवड क्षेत्र, अंदाजित/चालू उत्पन्न, अंदाजित/चालू दर आणि आयात निर्यात धोरणांमध्ये केलेल्या बदलांची माहिती देणारे ऍग्री डॅशबोर्ड डिजिटल फ्लेक्स गावा गावा मध्ये लावले पाहिजेत. त्याच बरोबर ह्या माहितीची सत्यता काटेकोर पणे हाताळण्यासाठी सेबी सारखे स्वतंत्र महामंडळ स्थापन केले पाहिजे. हे थोडे खर्चिक वाटत असेल. यासाठी सगळे अडते बाजार बंद करून त्यांचा सर्व निधी इकडे वळवावा.
त्याच बरोबर स्वच्छ भारत सेस सारखा कृषी सेस चालू करून खर्चाची पूर्तता करावी.
अशा डिजिटल फ्लेक्स मुळे शेतकऱ्यांना आपापसात चर्चा करून निर्णय घेण्यात उपयुक्त ठरेल. त्याच बरोबर ग्राहकांना ही माहिती उपयुक्त ठरेल.
ह्या वर एक आक्षेप घेऊ शकतो तो म्हणजे ट्रेड सेक्रेटस. त्याबद्दल जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
19 Mar 2017 - 12:48 am | पिजा
.५% चा कृषी कल्याण सेस आणलाय कि सरकारने मागच्या वर्षी.
20 Mar 2017 - 12:21 pm | विशुमित
माहिती बद्दल धन्यवाद...!!
17 Mar 2017 - 5:11 pm | शेवटचा डाव
एक सहा महिन्या पुर्वी कारखान्यात मँनेजमेंट ने प्रत्येक कामगारास 1तास रोज वाढीव काम आहे त्या पगारावर करावे लागेल असा निर्णय घेतला अन फलकावर नोटीस लावली.
कामगार वर्गात कमाली ची नाराजी झाली अन कँटीनमधे जेवणाच्या वेळेत जोरदार चर्चा सुरु झाली जशि मागे मोफत जेवणाचे 1000 रूपये कापले जाणार हि नोटीस लागली तेव्हा चर्चा झाली होती तशी ,अशा चर्चा नेहमिच व्हायची पण साहेब लोकाना काही सांगायला सर्वच भित होते त्याची कारण होती कोणाचे फ्लँटचे हप्ते फेडायचे होते ,कुणावर कुटुंबाची जबाबदारी होती ,आपल ठिक आहेना,आपल काम गेलतर असे विचार करत सगळे .तोच सदा अन दामु कँन्टीन मध्ये आले तोच एकजण "अपल्याला कपडे अन सेफ्टीशुज मिळणारे म्हणे" त्यांची खिल्ली उडवत म्हणाला "बराच समाचार घेतलेला दिसतोय " दुसरा म्हणाला सगळी कँन्टिन हास्यकल्लोळ झाली आन सदा,दामु चा चहरा पडला ,हे हेरुन सखा बोलला "नका मनाला लावुन घेऊ नका साहेब तो बोलनार च"
सदा "नाहिरे मित्रा साहेबाच बोलन नाय टोचत पण हे काही पाँइंट आपल्या सहकार्याना का समजत नाही
1.आपन एक झालोतर आपल कोणीच काही वाकड करु शकत नाही
2.आपल्या कौशल्याची कारखान्याला नितांत गरज आहे पण त्यासाठी आपन
क्रमशः
17 Mar 2017 - 7:21 pm | गामा पैलवान
अप्पा जोगळेकर,
१.
कॉर्पोरेट शेती ही सामान्य शेतकऱ्याचा गळा घोटूनंच अस्तित्वात येणार आहे.तिच्यामुळे स्पर्धेचा बोऱ्या वाजेल.
२.
नेमकं तेच मला नकोय. अंबानीला अधिकाधिक श्रीमंत बनवण्यात मला रस नाही. सुरुवातीला सगळं स्वस्तच मिळणार आहे. नंतर भांडवलदार बरोबर आपली नखं बाहेर काढेल. इथे इंग्लंडमध्ये भांडवलशाहीच्या नावाखाली स्वावलंबी शेतकऱ्याला देशोधडीला लावण्यात आलं. आज इथे शेतकरी आहे, पण जमीन त्याला खंडाने कसावी लागते. असुनी मालक खास घरचा म्हणती कुळ तयाला, परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला.
भारतीय शेतकऱ्याने परत परवशतेत जाऊन पडावं का? उत्तर हो असेल तर इतर नागरिकही पारतंत्र्यापासून दूर नाहीत.
आ.न.,
-गा.पै.
17 Mar 2017 - 7:36 pm | स्वामी संकेतानंद
कॉर्पोरेट शेती नकोच.
24 Mar 2017 - 5:15 pm | llपुण्याचे पेशवेll
>>कॉर्पोरेट शेती ही सामान्य शेतकऱ्याचा गळा घोटूनंच अस्तित्वात येणार आहे.तिच्यामुळे स्पर्धेचा बोऱ्या वाजेल.
हे गृहितक कसे काय आले? एखाद्या अल्पभूधारक शेतकर्याला सांगा तुझी २ एकर वार्षिक १ लाख रुपये भाड्याने ५ वर्षासाठी दे. किती लोक आनंदाने तयार होतील बघा. उगा काहीतरी फिअर माँगरींग? पूर्वी रीटेल मधे पण रीलायन्स सारखे लोक आले तर सामन्य वाण्यांची दुकाने बन्द पडतील असे सांगितले जात होते, पण प्रत्यक्षात उलटे घडताना दिसत आहे.
>>नेमकं तेच मला नकोय. अंबानीला अधिकाधिक श्रीमंत बनवण्यात मला रस नाही.
म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल पण अंबानीने त्याला पैसे देऊन स्वतः ४ पैसे कमावु नयेत असा अट्टहास का आहे?
24 Mar 2017 - 5:33 pm | विशुमित
आयात निर्यात धोरणे नीट होणार नाही तो पर्यंत कोणी कॉर्पोरेट वाला शेती खंडाने घायला तयार होणार नाही.
ती धोरणे नीट केली तर कोणी १ गुंठा पण देणार नाही दुसऱ्याला कसायला.
तूर्तास माझी आहे २ एकर शिल्लक, वार्षिक १ लाख कोणी देत असेल तर द्यायला तयार आहे मी.
17 Mar 2017 - 7:34 pm | हेमंत८२
माझ्या ७/१२ वर ऊस, गहू आणि ज्वारी लिहलेले आहे. >>>> आपण कधी तलाठ्याकडे जाऊन यात बदल करायला सांगितलं का? याचे उत्तर आपणच दिले आहे.. ऊसाप्रमाणे इतर पिकांची सरकार दरबारी संगणीकृत नोंदणी करण्याची जवाबदारी शेतकऱ्यांवर टाकावी जर आपण १४-१५ वर्षे यात लक्ष्य दिले नाही तर कोण शेतकरी अत्ता लक्ष्य देईल असे वाटते.
१-२ वर्ष्यापुर्वी कांदा पीक नुकसान झाले आणि त्याची भरपाई पण मिळाली पण मी असे काही शेतकरी बघितले आहेत त्यांच्या फक्त ७/१२ उताऱ्यावरती नोंद होती म्हणून रस 35000/ मिळाले त्यातील ५ हजार तलाठी आणि ५ हजार ज्यांना पंचनामा केला होता त्याला ( सरपंच वैगैरे) पण त्यांनी प्रत्क्षात गहू पेरला होता. असे जर सरकार वाटतं असेल तर काय करायचे.
पीक कर्ज आणि इतर कृषी कर्ज>> या साठी आपण काही आकडे बघू
२००८ साली ७२००० कोटी रुपयाची कर्जं माफी झाली हे पैसे कोठे गेले तर जिल्हा बँक आणि पतसंस्था त्यावेळी एकतरी शेतकयाने याविरुद्ध आवाज उठवला का याचा तपशील द्या? नाही कारण जो तो फक्त आपले पाहत होता. शेती संभितीत पतपुरवठ्याच्या बाबतीत सध्या गडचिरोली ज़िल्हा नंतर हिंगोली तसेच इतर येतात.
कर्ज १२ महिन्या भरले तर पीक कर्जावर ० % व्याजदर आहे आणि १२ महिन्या नंतर हि त्याचा व्याजदर खूप अल्प आहे>>> तो व्याज दर ६% आहे.
जसे तुम्ही म्हंटले आहे त्याप्रमाणे ९०% शेतकरी इतर व्यसिकाप्रमाणे शेतीतून मिळणारे उत्पनाचा काही भाग पुढील शेती उत्पादन वाढ किंवा इतर कोठे शेती पूरक कामामध्ये खरंच वापरतो का? जो माणूस पिढी दर पिढी शेती करतो त्यापैकी ७०-८०% इकडे लक्ष देत नाहीत आणि जरा दुष्काळ पडला कि कर्ज माफ करा म्हणतात..
ऍग्री डॅशबोर्ड डिजिटल फ्लेक्स>>> सध्या आपणाकडे कोणताही ठिकाणचे बाजार भाव हे ऍग्रोवन या अंकात पाहण्यात येतात ( मी हि जाहिरात करत नाही) तसेच रेडिओ, किंवा सह्याद्री वाहिनीवर पाहायला मिळतात या वरून कोठे काय दर चालू आहे आणि त्यानुसार आपण जा एकत्र येऊन तेथे जाऊन जर विक्री केली तर सगळ्यांना फायदा मिळेल उदा. नाशिकचे saindrya भाजी उत्पादन करणारे मुंबई ला जाऊन भाजी विकतात. हे बाकीचे का करू शकत नाहीत.
नाफेड ने खरेदी बंद केली आहे तर तर ते आपण एकाद्या वेअरहोऊसे मध्ये ठेहून त्यावर कर्ज का घेत नाही जर एवढीच निकड आहे तर.. शेतकरी कोठे चुकतो त्याला वाटेल तेव्हा त्याच्या मालाला त्याला हवा तो दर मिळाला पाहिजे.. कोणताही व्यापाऱ्याचे बघा तो प्रत्येक वेळी फायद्यात नसतो तसे आपण जर पाहाल तर शेतकऱ्याला कर्ज माफी नको आहे पण हे राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी लढत आहे... शेतकयांना करमाफी पेक्षा शेतकराय्चा प्रश्नाचा उदा मराठवाड्याचा पाणी प्रश्न , त्यांच्या मुलांचे शिक्षण, शेती पूरक अवजारांमध्ये सवलत हवी आहे.
हेमंत
एका शेतकयांच्या वारसदार
17 Mar 2017 - 7:41 pm | स्वामी संकेतानंद
पर्फ़ेक्ट
17 Mar 2017 - 7:41 pm | स्वामी संकेतानंद
पर्फ़ेक्ट
17 Mar 2017 - 7:50 pm | स्वामी संकेतानंद
हे प्रत्येक वेळी शक्य नसते. मुळात गोदामच उपलब्ध नसतात अनेकदा. साठवणुकीची समस्या गंभीर आहे अनेक भागांत. आणि लहान शेतकर्याला असे किती कर्ज मिळेल?मग त्यावर परत व्याज! ( मोठ्यांचे सोडा.) त्याची लेवरेज शक्ती नसते फार. घोटाळा इथेच आहे. बाकीचे मुद्दे मान्य.
17 Mar 2017 - 8:19 pm | हेमंत८२
साहेब हे गोदामे व्यापाराच्या माळांनीच भरलेले असतात. बँकमध्ये येणारे ९०% प्रस्ताव हे या बाबतीत व्यापाराचे असतात आणि गोडावून कोणाचे सरकार आणि कॉ-ऑप सोसायटी किंवा एकाद्या व्यापाराच्या मेव्हणे पवण्याचे.. खामगाव वैगैरे ठिकाणी जे गोडावून आहेत त्यात लातूरच्या व्यापाराची तूर पडली आहे.
जर हेच छोटे शेतकरी एकत्र आले तर त्यांनासुद्धा नाबार्ड किंवा महाराष्ट्र राज्य कृषी पानं मंडळ सुद्धा कर्ज देते वर आणि २५% सूट पण देते.
19 Mar 2017 - 12:50 am | पिजा
सगळे बाजार भाव बघण्याचा उत्तम स्रोत : http://www.agmarknet.nic.in/agnew/NationalBEnglish/CommoditywiseDailyRep...
18 Mar 2017 - 2:49 pm | श्रीगुरुजी
राज्यातील सुमारे ३८ लाख ५९ हजार कृषीपंपधारकांपकी ३५ लाख शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही व त्यामुळे थकबाकी १३,२०० कोटी रुपयांवर गेली आहे.
नुसती कर्जमाफी देऊन काय होणार? थकीत वीजबिल माफी पण द्यायला हवी. भविष्यात ही समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून पाहिजे तेवढे कर्ज बिनव्याजी द्यावे व कर्ज देतानाच ते फेडणे आवश्यक नाही असे बँकांनी लेखी आश्वासन द्यावे. त्याचबरोबर पाहिजे तेवढी वीज मोफत द्यावी व २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा. शेतकरी नसलेल्या इतर नागरिकांवर वेगळ्या प्रकारचे कर लावून या रकमेची भरपाई करावी.
18 Mar 2017 - 3:04 pm | श्रीगुरुजी
पूर्वी रस्त्यात जवळपास प्रत्येक चौकात कोपर्यावर एक लोखंडी पेटी, हवेचा पंप घेऊन सायकल दुरूस्तीवाले बसलेले असायचे. पंप वापरून हाताने सायकलच्या चाकात हवा भरून देण, पंक्चर काढणे, ब्रेक घट्ट करणे अशी किरकोळ कामे करून ते चरीतार्थ चालवायचे. कालांतराने रस्त्यांवरून सायकली अदृश्य झाल्या व त्यांच्या बरोबरीने सायकलदुरूस्तीवाले सुद्धा अदृश्य झाले. त्यांचा व्यवसायच नष्ट झाला.
पूर्वी गल्ल्यागल्ल्यातून, मोठ्या रस्त्यांवर सायकल भाड्याने द्यायची दुकाने असायची. सायकलदुरूस्तीच्या कामाबरोबरच सायकली तासाला १-२ रूपये घेऊन भाड्याने देणे, जुन्या सायकली विकत घेऊन दुरूस्त करून गरजूंना विकणे अशी कामे ते करायचे. आता अशा सायकलींची दुकाने आता दुर्मिळ आहेत.
पूर्वीचे छत्री दुरूस्ती करणारे, फरफर्या स्टोव्ह दुरूस्त करणारे, कल्हईवाले इ. चे व्यवसाय कायमस्वरूपी नष्ट झाले. रस्त्यावर बसणारे चांभार सुद्धा आता दुर्मिळ झालेत. कालौघात या सर्वांचे व्यवसायच नष्ट झाले व जगण्याचा आधारच गेला. हातावर पोट असणार्या या सर्वांचे जगण्याचे साधनच काळाने हिरावून घेतले. यांना निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी, महागाई भत्ता, पगारवाढ असे काहीही नव्हते. स्वतःची जागा नसल्याने व भांडवल नसल्याने हे रस्त्यावर बसूनच काम करायचे. यांच्या अंगी दुसरे कोणतेही कलाकौशल्य नसावेच. माझ्या ओळखीचा एक जण एका छोट्या दुकानात शिंप्याचे काम करायचा. दुकान इतके छोटे होते की त्यांच्याकडे ट्रायल रूमच नव्हती. जेमतेम ३ शिवणयंत्रे मावतील एवढीच जागा. रस्तारूंदीत दुकानाचा बराचसा भाग गेल्याने दुकान बंद झाले. या माणसाकडे शिवणकलेपलिकडे दुसरी कला नव्हती. वयाच्या पन्नाशीत त्याला दुसरे काम मिळू शकत नव्हते. कालांतराने समजले की तो एका इमारतीत लिफ्टमॅनचे काम करतो. या सर्वांना प्रचंड सरकारी मदत मिळालेली दिसते कारण यांच्यापैकी कोणी आत्महत्या केल्याचे क्वचितच वाचनात येते.
18 Mar 2017 - 4:03 pm | संदीप डांगे
च्युईंगम....
18 Mar 2017 - 4:39 pm | चौकटराजा
या आत्महत्या फक्त महाराष्ट्रात होतात की भारतात सर्वत्र ?
लघूउद्योजक आत्महत्या का करीत नाहीत ?
सर्वच विकसनशील राष्ट्रात हे हमी भाव प्रकरण चालू आहे का ?
गुगल अर्थ मधे पाहिले तर परदेशात प्रचंड आकाराची शेते का दिसतात ?
कोणते उत्पादन करायचे याचे शेतकरर्याचे स्वातंत्र्यच काढून घेतले तर कांदा एके कांदा उस एके ऊस कापूस एके कापूस हा प्रकार बम्द होऊन देश सुखी होईल काय ?
थेट माल ग्राहकापर्यंत आणलेला शेतकरी माल जरा तरी सवलतीत का विकत नाही ?
18 Mar 2017 - 4:57 pm | अभ्या..
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आपण पिकवलेल्या मालाचा काय भाव लावायचा अन विकायचा ह्याची कोणतीही प्रॉपर अन सार्वत्रिक मेथड नाहीये शेतकरी बांधवाकडे.
मार्ग एकच: शाणे बनणे
18 Mar 2017 - 11:21 pm | श्रीगुरुजी
महाराष्ट्रात सुद्धा सर्वत्र शेतकर्यांच्या आत्महत्या होत नाहीत. कोकण व पश्चिम महाराष्ट्र या भागात शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. शेतकर्यांप्रमाणेच इतर अनेक व्यावसायिक धंद्यात अडचणी सोसत असतात. परंतु धंद्यातील अडचणींमुळे आत्महत्या केल्याची उदाहरणे फारशी नाहीत.
18 Mar 2017 - 5:33 pm | अमर विश्वास
मागच्या वेळच्या कर्ज माफीचा फायदा नक्की कोणाला झाला ते वेगळे सांगायला नको ...
पश्चिम महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांची लाखांची कर्जे माफ झाली (गरज नसतानाही) तर मराठवाड्यात काही हजारात ...
त्यामुळे सरसकट कर्ज माफी नकोच ... प्रत्येक विभागाचा स्वतंत्र विचार करून जेथे गरज असेल तिथे कर्ज माफी द्यावी
18 Mar 2017 - 6:08 pm | संदीप डांगे
कर्जमाफी नाकारण्याच्या मुद्द्यावर सरकार ठाम राहिले तर बरे. आत्ताचे कर्जमाफी प्रकरण फक्त राजकिय खुन्नस आहे फडणवीसांविरुद्ध. त्याला महत्त्व देण्यापेक्षा मूलभूत सोयीसुविधा आणि उपयोगी निर्णयप्रक्रियेकडे वेगाने वाटचाल करत हे राजकारण मोडून काढणे सद्यसरकारने करावे. गेल्या तीन वर्षात शेतकर्यांसाठी दिलासादायक असे ठोस कार्यक्रम पुरेशा प्रमाणात झालेले नाही. जलयुक्त शिवार हा एक छोटासा भाग आहे, तेवढे एक उत्तम केले म्हणून आता पाय पसरुन मस्त ताणून द्यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही.
अर्थात कर्जमाफी झाली तर आत्महत्या थांबतील काय याची हमी मागणारे विधान एक जनतेचा जबाबदार मुख्यमंत्री म्हणून करणे अजिबात योग्य नाही. धरणात मूतू का ह्या अजित पवारांच्या विधानाच्या योग्यतेचं आहे ते..
20 Mar 2017 - 1:59 pm | शलभ
++१
18 Mar 2017 - 7:17 pm | मार्मिक गोडसे
उ. प्रदेशातील शेतीकर्ज माफ करण्याचा बोजा कोण उचलतो ह्याचा निर्णय होइपर्यंत वाट बघू. बहुतेक उ.प्रदेशातील शेतकरी आत्महत्या करत नसावेत.
19 Mar 2017 - 12:04 am | वरुण मोहिते
का काहीच वर्षात मागतात ?? राजकीय असेल तर गेल्या वर्षी का नाही मागितली?. बाकी ह्या त्या उद्योगाशी जोड्या लावायच्या हे अत्यंत चूक आहे . आणि आत्महत्येशी ह्याचा संबंध लावणे हे केविलवाणे आहे . उद्या हवा भरणे कल्हईवाले आत्महत्या का नाही केल्या विचारणे म्हणजे /अहो त्या पैशात धंद्यात इन्व्हेस्टमेंट नसते . शेती करताना बियाणांपासून ,ते फवारणी पर्यंत सर्व गोष्टी पाहाव्या लागतात हो त्यात पैसे जातात ते झालं कि स्वतः धंदा उघडता येत नाही . वाट पाहावी लागते काही महिने . अडत असते ,तरकारी असते ,हमीभाव असतो ,एक ना अनेक गोष्टी .कर्जमाफी देवो अगर न देवो पण इतका त्रास का होतोय सगळ्यांना ???
19 Mar 2017 - 12:30 am | गामा पैलवान
वरुण मोहिते,
पैशाबाबत तुमच्याशी सहमत आहे. शेतमालाच्या भावात सदैव शासकीय हस्तक्षेप चालू असतो. शिंपी वा कल्हईच्या व्यवसायात सरकार नाक खुपसंत नाही.
शेतकऱ्याचं सगळं बरोबर असं मला म्हणायचं नाही. शेतीच्या मूलभूत समस्या पार वेगळ्याच आहेत. इतकंच ठासून सांगायचंय.
आ.न.,
-गा.पै.
20 Mar 2017 - 3:12 pm | श्रीगुरुजी
हवा भरणे, कल्हईवाले इ. उद्योगात स्वतःची गुंतवणूक फारशी नसली तरी त्यांची स्वतःची मालमत्ता जवळपास शून्य असते (म्हणून तर ते रस्त्यावर बसतात) आणि उत्पन्नही अत्यल्प असते. कालौघात त्यांचा व्यवसायच मरण पावल्यानंतर जगण्यासाठी दुसरे काही करणे हे अत्यंत अवघड असते. स्वतःकडे मालमत्ता नाही, भांडवल नाही, तुटपुंजे उत्पन्न देणारा व्यवसायच बंद पडला, राजकीय संघटन नसल्याने त्यांच्या बाजूने आवाज उटविणारे कोणीही नाही, सरकारकडून शून्य नुकसानभरपाई व त्याचबरोबर परिसरातल्या दादांचा व पोलिसांचा त्रास . . . इतक्या वाईट परिस्थितीत सुद्धा त्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही.
20 Mar 2017 - 3:27 pm | नितिन थत्ते
>> इतक्या वाईट परिस्थितीत सुद्धा त्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही.
हे थोडे धाडसी विधान आहे म्हणजे त्यातले कदाचित अधोरेखित शब्दच खरे असू शकतील. आत्महत्या घडल्याच नसतील असे नाही. पण माझ्याजवळ काही माहिती नाही.
20 Mar 2017 - 3:49 pm | मोदक
कांहीच माहिती नसताना बेधडक एखादी शक्यता वर्तवणे हे खरे धाडस आहे.
20 Mar 2017 - 4:07 pm | विशुमित
शेतकरी आत्महत्या करण्याचे अनेक कारणे आहेत. पण महत्वाचं कारण म्हणजे कर्ज फेडू शकत याची अपरिहारता, समाजात लोप पावत चाललेली पत आणि त्याच्यातून आलेलं नैराश्य. वरती अप्पा नी भिकाऱ्यांची उपमा दिलीच आहे शेतकऱ्यांना. तसं ही कर्ज फेडले नाही म्हणून बँक काही त्याचे वाकडी करू शकत नाही याची पूर्ण खात्री असताना सुद्धा शेतकरी आत्महत्या करण्याचा शेवटचे टोक गाठतो. जे निगरगट्ट आहेत ते रुपया ही नाही भरत कर्जाचे. अशांची संख्या बोटावर मोजण्या इतकी असावी.
अगदी आताचे लेटेस्ट उदाहरण माझ्या घर जवळील शेजाऱ्याचे आहे.
बरेच कथित तज्ज्ञ शेतीविषयक सल्ले देतात त्यानुसार त्या शेजाऱ्याने शेती बरोबर स्वतः टोमॅटो विक्रीची कंमिशन एजन्ट गिरी चालू केली. माझ्या शकत वाडीतील इतरांनी सुद्धा त्याला पाठिंबा देत टोमॅटो विक्रीसाठी दिले. सुरवातीच्या काही दिवस व्यवस्थित चालू होते. पण हंगामाच्या शेवटी एका कन्नडी व्यापाऱ्याने त्याला १.५ लाखाला फसवले. त्याची पत चांगली होती त्याने आम्हाला विनंती केली पुढच्या हंगामात पैसे देण्याचे कबूल केले. काही लोकांनी मान्य केले काहींची कुरबुर चालू झाली.
लोकांचे पैसे द्याचे हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. मागच्या ३ आठवड्यापूर्वी त्याने सोसायटीचे कर्ज काढून ४० हजाराची एक गाई घेतली जेणे करून त्याचा घर प्रपंच चालेल आणि उरलेले पैश्यात छोट्या देणेकऱ्यांची कर्जे भागवता येतील. नशिबाने त्याला २०-२२ लिटर दूध देणारी चांगली गाई मिळाली. १० दिवसच झाले होते. गाईने अचानक खाणे पिणे बंद केले आणि तिने २ दिवसातच प्राण सोडला.
आता तो म्हणतोय मी आत्महत्याच करतो. मी तर म्हंटले माझे पैसे नाही दिले तरी चालतील पण तू अशी टोकाची भूमिका घेऊ नकोस. इतरांनी पण त्याला पाठिंबा दिला. पण त्याची मनाची घालमेल कोण कंट्रोल करणार.
20 Mar 2017 - 6:17 pm | अभ्या..
अगदी भरपूर आहेत उदाहरणे. बिल्डर्स, हॉटेलवाल्यांपासून पार रोजंदारी कामगारापर्यंत, अगदी माझ्या प्रिंटिंंग प्रेस लाईनमध्ये काम जमत नाही, पैशाचे गणित जुळले नाही, कर्जबाजारीपणा, संसाराची जबाबदारी पेलेना अशा विविध कारणांनी आत्महत्या केलेली उदाहरणे आहेत.
19 Mar 2017 - 8:48 am | चौकटराजा
मुळात अन्नासाठी लागणारा माल इतर उत्पादित वस्तूंप्रमाणे नाही . मूलभूत फरक असा आहे की त्याची टिकून रहाण्याची क्षमता प्लास्टिक, धातू ई च्या मानाने कमी आहे. सबब त्याच्या पुरवठा फार काल दाबून ठेवता येत नाही. त्यातील अत्यंत नाशवंत मालाचा तर नाहीच नाही. उत्पादन करण्याचे कारखानदारांचे धोरण बाजारातील मागणी यानुसार खूप लवचिक असते. महिन्या महिन्याला मागणीचा अभ्यास करून कारखान्यात धोरण बदलता येते तसे शेतकर्याचे होत नाही त्याला धोरण बदलण्याची संधी वर्षातून फारतर तीनदा येते. त्यावेळी नेमके अतिरिक्त उत्पादन झाले तर भाव उत्पादन खर्चा पेक्षाही कमी ठरू शकतात. अशासाठी मग परदेशी मालाची निर्यात करण्याची मुक्तता त्याला हवी असते. परदेशातून मागणी नसेल तर इथेच त्याला हमीभाव हवा असतो. काही करून स्वाभाविकपणे त्याला कारखानदाराप्रमाणेच नफा कमवायचा आहे. म्हणूनच थेट ग्राहकापर्यंत माल पोचवतानाही शेतकरी साखळी वितरणात येणार्या भावपेक्षा एकही पै कमी करायला तयार नसतो हा अनुभव आहे. यात कारखानदार व शेतकरी यांच्यात फरक असा पडतो तो की प्रतिस्पर्धी कारखानदार कोण्ते उत्पादन किती करत आहे याची अद्ययावत माहिती त्याच्याकडे येत असतेच शिवाय चुकून त्याचे उत्पादन अतिरिक्त झाले तरी ते तुलनात्मक रित्या टिकाउ असल्याने त्याला फारसा फरक पडत नाही. बदलत्या कालात शेतकर्यालाही आपण सुखासीन जिणे जगावे असे वाटणे काही गैर नाही पण त्यानी त्यासाठी मागणी . मालाचा टिकाउपणा ई संदर्भात व्यापक विचार केला पाहिजे व सरकारी हस्तेक्षेप नाकारला पाहिजे. पण मुक्त व्यापारातील तोट्यांच्या अभ्यास करताना शेतीमाल म्हणजे इतर वस्तू नव्हेत याचे भान ठेवून.
19 Mar 2017 - 9:26 am | नितिन थत्ते
बहुतेक वेळेचा अशा धाग्यांचा अनुभव असा आहे की शेती*बाहेरचे लोक काही तरी बोलतात/सुचवतात.
जे शेतीत काम करत असतात ते बहुतांश वेळा "या बाहेरच्यांना शेतीतलं काही कळत नाही" असे म्हणून त्यांच्या सूचना उडवून लावतात. बाहेरच्या लोकांना शेतीतलं कळत नसणार हे तर उघडच आहे. मग त्यांनी सूचना करू नये असे म्हटले तर मग अशा धाग्यांवर चर्चाच संभवत नाही. हा तिढा कसा सोडवावा बरे?
* हे कुठल्याही व्यव्सायाबद्दल लागू आहे.
19 Mar 2017 - 10:06 am | मोदक
तुम्हीच उत्तर दिले आले.
जे शेतीत काम करत असतात ते बहुतांश वेळा "या बाहेरच्यांना शेतीतलं काही कळत नाही" असे म्हणून त्यांच्या सूचना उडवून लावतात.
शेतकर्यांच्या अराजकीय संघटनांमधले राजकारण, शेतकर्यांचे जाणते राजे, शेतकर्यांचे राजकारण-हेवेदावे यात भरडला जातो तो लहान शेतकरीच. हे सुजाण शेतकर्यांना कळेल तेंव्हा कोंडी फुटायला सुरूवात होईल.
तसेच "शेती करा मग बोलुन दाखवा" वगैरे गोष्टी मुद्दे मांडताना ठीक आहेत पण त्याने चर्चा पुढे जात नाही.
20 Mar 2017 - 11:53 am | विशुमित
<<<जे शेतीत काम करत असतात ते बहुतांश वेळा "या बाहेरच्यांना शेतीतलं काही कळत नाही" असे म्हणून त्यांच्या सूचना उडवून लावतात.>>>
-- शेतकरी कोणत्या सूचना धुडकावून लावतो माहिती का.
अव्यवहार्य सेंद्रिय शेती,
पंचगाव्या आणि झीरो बजेट शेती,
सोसायट्यामध्ये येऊन माल विक्री करण्याचे सल्ले वगैरे वगैरे.
त्याच बरोबर त्याला भिकाऱ्यांची उपमा दिली जाते त्यावेळेस त्याच्या कडून आरती ओवाळून घायची अपेक्षा का बरं ठेवत असतील लोक.
शेतकऱ्याला कोणते सल्ले भावले माहिती का-
ठिबक सिंचन जेव्हा त्याचा खर्च आवाक्यात आला,
मल्चिंग पेपरचा वापर,
उसाचे पाचट पेटवून न देता आधुनिक अवजाराने त्याची भुकटी करून जमिनीत गाडणे,
टोमॉटोच्या झाडांना तारा लावणे भरगोस उत्पादन काढणे,
गहू-सोयाबीन-बाजरीची सुधारित पद्धतीने पेरणी करणे,
कोरड वाहू शेतीत एखादं एकर फळ बाग लावणे,
कृषी विज्ञान केंद्रातून जमेल तेवढी माहिती घेणे,
कारखान्याच्या वार्षिक सभेत संचालकांना जाब विचारणे
शेती सहलीं मध्ये वेग वेगळ्या देशांना भेट देणे
आसपासच्या ३-४ राज्याच्या प्रमुख बाजार पेठांच्या व्यापाऱ्यांना प्रत्येक्ष भेटून येऊन लागवडीची माहिती देऊन आपल्या क्षेत्रात आमंत्रित करणे ('टोमॅटो' ला आम्ही करतो हे. जेवणावळी पण घालतो)
या वरील सगळ्या गोष्टी माझ्या सारखा सुशिक्षित शेतकरीच करतो असे नाही, अडाण्यात ला अडाणी शेतकरी सर्व माहिती घेऊन ही कामे करतो.
त्यामुळे शेतकऱ्याला काहीच कळत नाही, याचा भ्रम जे शेती करत नाहीत अशा लोकांनी डोक्यातून काढून टाकावा.
20 Mar 2017 - 1:53 pm | मोदक
(तुमचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादावर असला तरी मूळ विधान नितीन थत्तेचाचांचे आहे.)
20 Mar 2017 - 12:17 pm | विशुमित
<<<शेतकर्यांच्या अराजकीय संघटनांमधले राजकारण, शेतकर्यांचे जाणते राजे, शेतकर्यांचे राजकारण-हेवेदावे यात भरडला जातो तो लहान शेतकरीच.>>>
-- यांच्यामुळे भरडला वगैरे काही नाही. बहुतांशी वेळा शेतकरी संघटना मुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. दूध आणि उसाच्या बाबतीत बऱ्याच वेळा फायदा झाला आहे.
जाणते राजे मुळे शेतकऱ्यांचा काय आणि कसा फायदा झाला आहे ह्या खालील ऍग्रोवन मधील लेख आकडेवारी शकत देत आहे. आकडे वारी खटकत असतील तर त्या मोडून दाखवा. आनंदच होईल. (जाणत्या राजा बाबत आपल्या मनामध्ये पूर्व गृहीत अडी असल्या कारणाने आपले दोघांचे एकमत होणार नाही, हे सोडून द्या)
http://www.agrowon.com/Agrowon/20170131/4998508586890975862.htm
शेतकर्यांचे राजकारण-हेवेदावे आताचे सरकार नाकारणारच कारण आता रामू अण्णा काही उपयोगाचा उरला नाही. त्यांना हक्काचा मतदार मिळाला आहे. रामू अन्नाच्या म्हातारीला आणि गाव पुढाऱ्यांना काही काम नाही.
(विनंती आहे- हा धागा राजकारणात बरबटू नये)
20 Mar 2017 - 1:45 pm | मोदक
तुमच्या विनंतीला मान देऊन एक सुचवतो.
आपण एक काम करूया, तुम्ही या धाग्यावर शेतीसंबंधी इतर मुद्द्यांवर चांगले सकारात्मक प्रतिसाद देत आहात म्हणून माझा वरचा मुद्दा थोडा बाजुला ठेवूया. आत्ता शेतीतील राजकारण या चर्चेला पूर्णविराम देऊ आणि नंतर आपली बाकीची चर्चा झाली की पुन्हा आवश्यकता असेल तर हा मुद्दा पुन्हा चर्चेला घेऊ..
चालेल का..?
20 Mar 2017 - 2:20 pm | विशुमित
हो नक्की चालेल ..!!
20 Mar 2017 - 2:20 pm | विशुमित
हो नक्की चालेल ..!!
22 Mar 2017 - 12:19 pm | सुबोध खरे
ऍग्रोवन मधील लेख आकडेवारीहि बाकी कोणत्याच आकडेवारीही जुळत नाही.
एक कुतूहल ऍग्रोवन चे मालक चालक आणि सर्वेसर्वा कोण आहेत?
नाही म्हणजे या दहा वर्षात इतकी नेत्रदीपक कामगिरी झाल्याचे ऍग्रोवन प्रमाणे दिसते पण महाराष्ट्र "सुजलाम, सुफलाम" झाला असे काही कुठे "मला तरी" दिसले नाही
पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र काही कमी झालेल्या दिसत नाहीत (स्रोत विकी)
म्हणजे जसे news १८ मध्ये अंबानींचे कौतुकच लिहून येते तसे तर नाही ना?
हो म्हणजे मी कागदोपत्री शेतकरी आहे परंतु स्वतः शेती कसत नाही. (पुरुष स्त्रीरोग तज्ञासारखा)
अगोदरच सांगतो आहे.
19 Mar 2017 - 9:36 am | नितिन थत्ते
एकूण बातम्या पाहता असे दिसते की "जास्त उत्पन्न हीच शेतकर्याची डोकेदुखी आहे". ज्याप्रमाणे क्रूड तेलाचे भाव पडू नयेत म्हणून आखाती देश प्रॉडक्शन कंट्रोल वापरतात तसं काही शेतीत गरजेचं आहे.
19 Mar 2017 - 9:57 am | नितिन थत्ते
फेसबुकवर अविनाश कुलकर्णी यांच्या एका पोस्टवर दिलेले प्रतिसाद इथे देत आहे
शेतीमाल नाशवंत असतो हे एक कारण सांगितले जाते. पण तो माल शेतकर्यासाठी नाशिवंत आणि दलालासाठी टिकाऊ असे नसते.
माल ग्राहकाकडे नेणे हाच पर्याय आहे. कारण ग्राहकाला माल ना विकणाऱ्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा एम आर पी च्या 50 टक्के किंमतीला माल विकावा लागतो. दलाल / दलालांची साखळी जे काम करतात - शेतकऱ्याचा माल साठवणे आणि ग्राहकापर्यंत पोचवणे- ते काम शेतकरी करीत नाहीत तोवर असेच चालणार. मधली साखळी शेतकर्यांनी काबीज करणे हा उपाय आहे त्यासाठी शेतकर्यांना कसे एम्पॉवर करता येईल ते पहायला हवे. ते केल्यावरही दलाल केवळ मलिदा खातात ही कन्सेप्ट सोडायला हवी.
अमूलचे उदाहरण येथे योग्य ठरेल. गायीपासून बाजारापर्यंत जवळजवळ संपूर्ण साखळी अमूलच्या करवी शेतकर्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यांना सरकारी मदत खूप मिळते असे म्हटले तरी "लास्ट माइल"- डिस्ट्रिब्युटर-रिटेलर सोडले तर सगळी साखळी अमूलच्या ताब्यात आहे. शिवाय व्हॅल्यू अॅडेड उत्पादने बनवणे हा त्यातला मेजर भाग आहे. चीज, बटर आइसक्रीम यातून मिळणारा नफा अमुलच्या शेतकर्यांनाच मिळतो. मूलभूत पिकांना हे फार लागू होणार नाही हे खरे पण टोमॅटो, केळी, संत्री वगैरे साठी व्हॅल्यू अॅडेड उत्पादने बनवणे शक्य आहे.
ग्राहक म्हणजे त्या उत्पादनाचा प्रत्यक्ष उपभोग घेणारा ग्राहक. अन्यथा दलाल हा शेतकर्याचा ग्राहकच असतो.
वाहनाचा एखादा सुटा भाग बाजारात ज्या किंमतीला मिळतो त्यापेक्षा खूपच कमी किंमतीला (अर्ध्याहून कमी) वाहन उत्पादक कंपनी विकत घेते. कारण कंपनी ही त्या आयटमची एंड कन्झ्यूमर नसते.
मला शेतीतील काहीच कळत नाही हे मान्यच आहे. मी मार्केट कसे चालते हे सांगायचा प्रयत्न केला.
20 Mar 2017 - 11:28 am | विशुमित
नितीन जी,
तुमचा वरील प्रतिसाद खूप आवडला.
अतिरिक्त शेती मालच शेतकऱ्याची डोके दुखी ठरते बहुतेक वेळा. त्यामुळे डिमांड सप्लाय चा लोचा तयार होतो. त्याच बरोबर त्याच्या अनुषंगाने चल परिव्यय (variable कॉस्ट) सुध्या त्याच पटीने वाढतो. शेवटी एवढे कष्ट उपसून, उत्पादन काढून हातामध्ये काहीच उरत नाही.
व्हॅल्यू अॅडेड उत्पादने बनवणे हा खरंच खूप सुरेख पर्याय आहे पण इथे भाग भांडवल, तंत्रज्ञाची माहिती, जागा, वितरण अशा अनेक कंगोरे आहेत. ह्यामध्ये देखील बरीच प्रगती येत्या काळामध्ये पाहायला मिळेल.
व्हॅल्यू अॅडेड उत्पादने बनवणे बद्दल कोणी मार्गदर्शन केले तर नक्कीच पुढच्या वाटचालीला मदत होईल.
20 Mar 2017 - 2:04 pm | नितिन थत्ते
धन्यवाद !!
मिटकॉन नावाची महाराष्ट्र शासनाची एक संस्था काही कोर्सेस चालवते. त्यात काही मार्गदर्शन मिळू शकेल. इथे मी स्पष्ट करू इच्छितो की या कोर्सचा उद्देश व्हॅल्यू अॅडेड प्रॉडक्ट कशी बनवायची हे शिकवण्याचा नसून उद्योजकता विकसित करणे हा आहे. त्यामुळे त्यात त्या व्यवसायाची जुजबी माहिती. थोडेपार प्रात्यक्षिक असा एकूण प्रकार असतो. मुख्य भर उद्योजकता विकसित करणे हा असतो त्यामुळे कोर्सचा बराच भाग हा उद्योजकता म्हणजे काय, उद्योजक होण्यास आवश्यक गुण कोणते, प्रोजेक्ट तयार करणे, अर्थसहाय्य कोठे मिळते वगैरे बाबींंचा मोठा भाग असतो. म्हणजे तुम्ही तंत्रज्ञान शिकण्याचा विचार घेऊन तेथे गेलात तर निराशा होऊ शकते.
मी स्वतः डिहायड्रेशन ऑफ फ्रूट्स अॅण्ड व्हेजिटेबल्स हा कोर्स अॅटेण्ड केला आहे. २००५ मध्ये त्या कोर्सची फी केवळ ३५०० (साडेतीन हजार रुपये) होती. सुमारे पंधरा दिवस रोज सायंकाळी दोन तास असा कोर्स होता. मला डिहायड्रेशनचा व्यवसाय करायचा नव्हता पण माझ्या ओळखीच्या एका संस्थेसाठी मी हा कोर्स घेतला.
इतरहि काही संस्था असू शकतील.
http://www.mitconindia.com/about-us/about-mitcon.html
20 Mar 2017 - 2:24 pm | विशुमित
धन्यवाद..!!
20 Mar 2017 - 9:01 pm | संदीप डांगे
मिटकॉनचा एक कोर्स मीही केलाय, जबरदस्त अनुभव होता. मिटकॉनचे कोर्सेस मी नक्कीच रेकमेन्ड करेन कोणालाही.