शुभ्रक्रांती

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
12 Mar 2017 - 8:03 pm

“शुभ्रक्रांतीच्या रूपाने कृष्णवर्णियांच्या जिवनात नवीन सूर्य उगवलाय. मला आठवतोय तो दिवस जेव्हा गोऱ्यांनी आपल्यावर वांशिक हल्ला केला होता. पण यावेळी आपण संघटीत होतो. एकूणएक गोऱ्याला चिरडून टाकलं आपण, नामोनिशान मिटवून टाकलं त्यांचं या भूमीवरून. जॉनसारखे अनुयायी मिळाले म्हणून हे शक्य झालं.”

“शुभ्रक्रांती जिंदाबाद, जॉन स्मिथ जिंदाबाद” अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.

मध्यरात्रीच्या सुमारास थकलाभागला जॉन घरी आला. हॉटेलमधून आणलेलं जेवण त्याने ताटात वाढलं. शुभ्रक्रांती ध्वजांच्या ढिगाऱ्यांतून मार्ग काढत तो अडगळीच्या खोलीत आला. अंधुक उजेडात अंगाचं मुटकुळं करून ती बसलेली होती. त्याने तिचा थरथरणारा हात हातात घेतला,
“घाबरू नकोस, मी तुला काहीच होऊ देणार नाही.”

अन ती गोरीपान तरूणी खुदकन हसली.
-------------------------------------------------

कथाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अॅस्ट्रोनाट विनय's picture

12 Mar 2017 - 8:04 pm | अॅस्ट्रोनाट विनय

स्पर्धेतील चित्रावर आधारित असली तरी स्पर्धेकरीता न पाठवलेली ही शशक आहे.
बऱ्याच दिवसांपासून कथानक डोक्यात होतं. स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर टाकणार होतो पण निकालाला भरपूर उशीर होत असल्यामुळे धीर धरवला नाही.

बादवे ही शशक कशी वाटली जरूर सांगावं.

पिलीयन रायडर's picture

12 Mar 2017 - 8:08 pm | पिलीयन रायडर

छान आहे. आवडली.

तो हस्तांदोलनाचा फोटो आहे त्यासाठी ना?

एस's picture

12 Mar 2017 - 8:11 pm | एस

छान आहे कथा.

जव्हेरगंज's picture

12 Mar 2017 - 8:47 pm | जव्हेरगंज

शशक म्हणून चांगलीये!

पण पंच पोकळ निघाला.

ज्योति अळवणी's picture

12 Mar 2017 - 11:41 pm | ज्योति अळवणी

आवडली. मस्त लिहिली आहे