प्रेम

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
14 Feb 2017 - 12:08 pm

प्रेम म्हणजे साला ,
अंधार झालाय अंधार .
अब्रू वेशींवर टांगलेली नि,
भावनांचा चाललेला व्यापार .

नजर वखवखणारी असूनही येथे,
कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात.
अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी,
नात्यांची बीजे भिकार असतात.

पैशाच चामडं पांघरून इथ ,
वासानेच कोल्हं सोकावत.
संस्कृतीने झाकलेल सार मग,
पेपरातन डोकावत .

माग चालताना पश्चिमेच्या ,
कोवळी उन्हं पोळायला लागतात.
महागड्या सिगरेटच्या ठिणग्या ,
गरीबाची घरं जाळायला लागतात .

प्रेम-बीम काही नाही ,
हि मायबापांच्या अपेक्षांची होळी असते.
पोरं नागवी नाचून मोकळी.अन ,
मायबापांच्या हाती झोळी असते .

आपली कामं नीट न केली कि
हि नसती थेरं सुचू लागतात. अन ,
ऊसाला टाकलेल्या urea ने,
गाजर-गवताला पेरं फुटू लागतात.

....................................................................................................................-मुकुंद

कविता माझीसंस्कृतीकविताप्रेमकाव्यशब्दक्रीडा