शतजन्म शोधिताना.....

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
24 Jan 2017 - 5:07 pm

ठरवून मुलुख सारा,भिजवून परतलो मी
कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी |
अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी
मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी ||

बेरंग या जगाला, रंगून टाकताना
रुधीरार्त आर्त माझे हलकेच सांडताना |
तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना
मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना ||

न्हावून घे बरे तू ,आसुसल्या सुखाने
दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने?
कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे
हे देह संचिताचे,भेदून लखलखावे ||

येशील का जगी तू,बनुनी पुन्हा धरा ती
मी मूक (कि मुक्त )मेघ नभीचा,बरसेल बेहीसाबी |
सोसून वेड सारे,रुजूदे पुन्हा मलाही
समजू नकोस काटा,मी पुष्प ते गुलाबी ||

रुजुनि तुझ्या ऊराशी,इकवार जन्म घ्यावा
हर याक्ष-प्रश्निकाला,जगुनी जवाब द्यावा |
ते मूक प्रेम माझे,स्पर्शून सांगताना
देईन साथ तुजला,शतजन्म शोधिताना.... ||

व्यथा कधी न कळली हि कथा असे कोणाची?
"नभ-आर्त धरित्रीची" वा "प्रेम-प्रेमिकांची" |
मज पामरे बळेची इतुकेच फक्त झाले
ते दिव्य प्रेम त्यांचे, मी शब्दबद्ध केले ||
-मुकुंद.

कविताप्रेमकाव्यभाषाशब्दक्रीडासाहित्यिक

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2017 - 9:36 pm | अत्रुप्त आत्मा

सुंदर!

कवि मानव's picture

27 Jan 2017 - 4:10 pm | कवि मानव

मला आवडली !!

कवि मानव's picture

27 Jan 2017 - 4:12 pm | कवि मानव

एक उत्सुकता आहे.... कशावर आहे हि कविता ?

पराग देशमुख's picture

27 Jan 2017 - 7:30 pm | पराग देशमुख

माझ्या एका मित्त्रासोबत अस घडल आहे, अस म्हटल्यावर जो अर्थ निघतो त्यावरच ... ;)

पैसा's picture

27 Jan 2017 - 7:54 pm | पैसा

कविता आवडली

हतोळकरांचा प्रसाद's picture

28 Jan 2017 - 11:30 am | हतोळकरांचा प्रसाद

छान! आवडली कविता!

पराग देशमुख's picture

28 Jan 2017 - 7:54 pm | पराग देशमुख

धन्यवाद...!!! आत्मबंध,कवि मानव, पैसा आणि हतोळकरांचा प्रसाद...धन्यवाद
कवितेचं शीर्षक एका महाकवीच्या लिखाणातून उसण घेतलेलं आहे त्यामुळे कोणाला आवडेल कि नाही अशी धाकधूक होती
आता हायस वाटतंय.

मदनबाण's picture

28 Jan 2017 - 7:56 pm | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Humma Song... ;) – OK Jaanu

शार्दुल_हातोळकर's picture

28 Jan 2017 - 9:37 pm | शार्दुल_हातोळकर

छानच आहे!!

यशोधरा's picture

29 Jan 2017 - 1:11 pm | यशोधरा

आवडली .

पराग देशमुख's picture

1 Feb 2017 - 1:10 pm | पराग देशमुख

मदनबाण, शार्दुल_हातोळकर, यशोधरा प्रतिक्रियांसाठी आभार

विशाल कुलकर्णी's picture

2 Feb 2017 - 11:50 am | विशाल कुलकर्णी

आवडेशच...

(माफ करा पण जरा लांबल्यासारखी वाटली.) पुलेशु !