पुढे धकण्याआधी २० सुक्ष्मकथा येथे टिचकी मारावी.
वाचले असल्यास पुढे चालावे.
----------------------------------------------------
१) मला लिहता येत नाही
2)चार तास फुटबॉल खेळलो. दमले बाबा... डोळे
३) "भूतं नसतात रे भावा" मी कसंबसं त्याला समजावलं अन झाडावर झोपायला निघून गेलो
४) मी बेवडा नाहीये काही... ये चकणा दे रे
५) "श्राद्धाचा नैवद्य कुणी खाल्ला!!!"
६) डेली सोप पाहता पाहता ती गायब झाली. हजार भाग संपल्याशिवाय आता ती बाहेर येत नाही
७) आक्रमण, दगा, कत्तल
८) तिच्या स्वप्नांसाठी माझं हसणं विकलं, तिला हसवणं माझं स्वप्न बनलं
९) तुझ्या ड्रिंकमध्ये मी विष मिसळलं होतं............................
शीट, चुकून मीच पिलं की काय??!!
१०) मी बाबांवर खूप प्रेम करते. कालच त्यांच्यासाठी नवीन फ्रीझर आणलाय
११) मुलगी झाली, थँक गॉड
१२) पार्टीत नाचताना त्याला मी शूट केलं. आठवण आली की बघते कधीकधी
१३). "My mother believes in ghosts" I told to stranger in a park. " How funny" he barked & disappearedq
१४). "I saw a ghost, his face was burning" my wife cried. For her satisfaction, I locked the door & turn around- her face started burning.
१५) प्रेम, लग्न...ओह शीट
१६) जन्म, मृत्यू, लग्न
१७) शीट, जोकर सुटला...सॉरी शक्तिमान
१८) एक म्हातारी लहानपणीच मेली
१९) रोबोट खोटं बोलतात अन माणसं खरं.
मी रोबोट आहे
२०) हा दिनेश, माझ्या मित्राची बायको
२१) पंतप्रधानांचं क्लोनसोबत लग्न, रोबोट बाळ दत्तक घेणार
२२) वीरमरण, सती, अनाथ पोर
२३) बातमी: समलिंगी यंत्रमानव विवाह कायदा संमत
२४) DRDO चा गर्भसंस्कार प्रयोग फसला, नाळ तोडून बाळाची आत्महत्या
२५) हुश्श, मारलं एकदाचं त्या भूताला...अरे, मी दिसंत का नाहीये...
२६) आज मंगळावर पाय ठेवला... च्यायला रोज हेच तर करतोय
२७) "आता टाईम मशीन कधीच बनवल्या जाणार नाही" फक्त हे वाक्य ऐकायला तो भविष्यातून आला होता
२८) At 2 a.m. she woke me up & asked for water. I live alone
-------------------------------------------------------
वाचा सुक्ष्मकथांचा एक भन्नाट उपप्रकार: सुक्ष्म गीतकथा
प्रतिक्रिया
18 Jan 2017 - 3:29 pm | मराठी कथालेखक
त्सुनामी आली वाटून आधी घाबरलो होतो, पण आता ओसरलीये सुक्ष्मकथांची लाट
18 Jan 2017 - 4:37 pm | रघुनाथ.केरकर
काळवीटानेच स्वतावर गोळी झाडुन आत्महत्या केली.