घर गळतंय माझं
तस ते नेहमीच गळत
पण पाऊस आला कि
उडतात छतावरच्या
दोन चार काड्या
अन पाऊस येतो
आत येतो जोराचा
घर गळतंय माझं
थेंबाच शहर झालाय
पाण्याने तुंबलंय
वाट पाहतेय निचरा होण्याची
छताला भोक आहेच
पण जमिनीला करतेय
निचरेल ... आपोआप
घर गळतंय माझं
दोन्ही हातांनी
मी छत संभाळतेय
पण त्याचाही कंटाळा आलाय
आकाशाला चिटकवून
ठेवायचा प्रयन्त चाललाय
घर गळतंय माझं
वसंताच्या सकाळी
ग्रीष्मच्या दुपारी
पावसाच्या रात्रीही
पौर्णिमेच्या चांदण्यांनी
अमावासेच्या अंधारानी
घर गळतंय माझं
तुझ्या हसण्याने
तुझ्या रागाने
तुझ्या हळवेपणाने
तुझ्या तिरस्कारांनी
तुझ्या जाण्याने
घर गळतंय माझं
घर गळतंय माझं
- अबोली
प्रतिक्रिया
24 Dec 2016 - 10:22 pm | एस
कविता आवडली. छत पेलायचा कंटाळा आला म्हणून आकाशाला ते चिकटवून ठेवायची कल्पना भारी आहे! दैनंदिन संघर्षात कधीकधी फारच कंटाळा आला की आपलं ओझं तात्पुरतं कुणी घेईन का असं मनाला वाटून जातंच.
25 Dec 2016 - 11:28 am | प्राची अश्विनी
फारच छान कविता!!
27 Dec 2016 - 3:56 pm | नूतन सावंत
Kavita surekh aahe ,aawadli.
29 Dec 2016 - 6:26 pm | अबोली२१५
धन्यवाद सुरंगी ताई...
27 Dec 2016 - 3:56 pm | नूतन सावंत
27 Dec 2016 - 4:07 pm | तिमा
कविता आवडली, त्यातून ठिबकणारी वेदना पोचली.
28 Dec 2016 - 12:06 pm | खेडूत
आवडली कविता-.
28 Dec 2016 - 12:46 pm | रुपी
छान कविता.. आवडली!
28 Dec 2016 - 12:53 pm | पियुशा
आवडली :)
28 Dec 2016 - 1:04 pm | हतोळकरांचा प्रसाद
छान आहे कविता!
28 Dec 2016 - 1:16 pm | अत्रुप्त आत्मा
वाह!
29 Dec 2016 - 6:52 pm | पैसा
सुंदर कविता