कळले नाही कोठे चाललो मी..
तुझ्याच दारी जणु भुललो मी..
प्रेमात तुझ्या जरी पडलो परि..
अंतरी तुझ्या पार हरलो मी..
संपले दुवे सारे संपली आशा..
आभाळी कोठे धुंद विरलो मी..
आकांक्षा सार्या गेल्या उडूनी माझ्या..
स्वप्नात फक्त आता उरलो मी..
होतीस तेंव्हा तूच मनाची आस..
अजूनी का तुझ्यात अडलो मी?...