नोटा व्हाईट...दारु वाईट.....

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
12 Nov 2016 - 7:40 pm

दि. ८ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ८.४५
मन्याचा व्हाटसपवर मेसेज
५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या.
मी: गप्पे कडू. फोटोशॉप आहे ते.
.
अर्ध्या तासात ५० मेसेज. वेगवेगळ्या चॅनेलचे.
च्यायला एवढे फोटोशॉप कोण करणार नाही.
खिशात पाहिले. ५०० च्या ४ आणि हजारची एक आहे फक्त.
रात्री तर काही करता येणार नाही नोटाबाबत आपल्याला.
जाउ द्या, जे सगळ्यांचे होईल ते आपले पण.
जास्त विचार करण्यात अर्थ नाही.
.
रात्री कन्फर्म मिळाली बातमी.
वाचून निवांत झोपलो विचार न करता.
.
दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.००
पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी.
आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट. सेकंड मल्ल्या.
.
रस्त्यातून येताना पाहिले.
बँकासमोर जत्रा भरलीय.
गर्दीशी आपली सख्त नफरत.
मुदत पण आहे भरपूर.
बघता येईल नंतर.
.
लहान मूल कसे उठता बसता "आई मला भूक लागली" करते तसे व्यावसायिकांना उधारीबाबत करावे लागते.
टोचत राहिल्याशिवाय मिळत नाही.
आज परगावचा चक्क फोन. पाठव रे रिसिट घेऊन. देतो पेमेंट.
नेहमी अर्धे चेकने अर्धे कॅश देणारा भाद्दर शुअर ५०० चा गट्ठा देणार.
अजून असेच तीन चार कॉल.
देऊ दे. सीए दोस्त म्हणलाय. घे बिनधास्त. लगेच बँकेत भर मात्र.
.
माझ्या हपिसात कामाला चक्क ईश्वर आहे. म्हणजे नावच त्याचे ईश्वर.
ईश्वर निघालाय. त्याला प्रवासाला द्यायला सुट्टे नाहीत माझ्याकडे.
इकडून तिकडून करुन जेमतेम दिलेत.
.
दुपारी चहा प्यायचे वांदे. ४०० चे पेट्रोल भरले.
१०० वापस मिळाले.
दिवसभर नेमका कामाचा लोड. डोकं फिरण्याइतपत कामे.
नवीन कामे अ‍ॅडव्हान्ससहीत येताहेत. मज्जाय.
त्या खुशीत उगीच मेसेज एंजॉय केले. एकही फॉर्वर्ड नाही केला.
रात्र होऊ लागली तसे डोके जाम होतंय.
ईश्वर वसूलीला गेला तिकडं इलेक्षन चालु आहेत. त्याची वेगळीच चिंता
संध्याकाळी आला बंडले घेऊन.
रुमालात गुंडाळून बॅगेत ठेवले लॅपटॉपच्या.
त्याला सोडले घरी.
.
अक्काबाई का आठवू नये.
शकीलला फोन केला.
"शकल्या ९० पायजे बे, आणि..."
"या मालक, माहीती आहे पुढचे. देतो उरलेले चिल्लर"
.
बारमध्ये प्रत्येक टेबलावर तीच चर्चा.
सायराबानूची गाणी बघत बघत नाईन्टीची क्वार्टर झाली.
एक मोट्ठी देऊन देऊन, शंभराच्या थोड्या घेऊन बाईक हलवली.
.
पुढचे मला आठवत नाही.
मी घरी कसा आलो. दीड कीमीवर तर बार. मोकळाय रस्ता.
मी घरातल्या खुर्चीवर आहे. कधी बसलो येऊन?
बॅग आहे जागेवर. रुमाल उघडा पडलाय बॅगवर.
पैसे?
नाहीत बॅगेत. आक्क्खी उलटी पालटी केली.
कपड्याच्या खिशात?
कुठला होता बाबा ड्रेस?
सगळे चेक केले. नाहीत.
जॅकेटात? नाहीत.
वॅलेटात?
एवढे बसणे शक्यच नाही.
तरी गायब सगळे.
.
मधल्या एक दोन तासभरासहीत पैसे गायब आहेत.
ज्यात बांधले तो रुमाल आहे. पैसे नाहीत.
आकडा मोट्ठाय. दुनिया फिरली घप्पकन.
सध्या तर एवढा फटका खायची ताकद नाही.
नोटा जरी बंद झाल्यात तरी त्या भरता येणार आहेत आप्ल्याला.
आपल्या कामाचे पैसे आहेत ते. पण आता आपल्यापाशी नाहीत.
.
घर तर आतून प्रॉपरली बंद आहे.
बाल्कनी बंद आहे.
बाहेर गेटला कुलूप लावलंय
गाडी नेहमीप्रमाणे सेंटरस्टँडला लावलेली आहे.
मी घरी येऊन शूज कधी काढले?
अंगावरचे कपडे कसे बदलले गेलेत?
च्यायला.. भुताटकीच.
.
काय केले दीडेक तासात मी?
डोके दुखायले. काही आठवेना.
फोन बंद आहे. कसा काय?
लास्ट कॉल....शकील.
.
दि. १० नोव्हेंबर २०१६ वेळ रात्री. १२.४५
"शकील, भाई. एक प्रॉब्लेम झालाय यार"
"बोला की मालक, आत्ता जेवायलो बघा. अजून पाहिजे का?"
"नाय बे. माझे बंडल पडलेय का हॉटेलात बघतो का जरा."
अर्ध्या तासाने शकीलचा नकार. "नाही ओ इथे काही."
"बघ यार, मोट्ठी अमाउंट आहे माझ्यासाठी."
"नाही ओ, तरी सकाळी परत चेक करतो"
.
काय म्हणू?
दारुच्या नशेत पडले पैसे.
इतके?
लैच फालतूपणा झाला.
औकात नाही धंदा करायची राव.
इतक्या वर्षात एक नवा रुपया हरवला नाही आपल्याकडून.
इतका मोट्ठा आकडा. चक्क हरवले.
मिळणे शक्य नाहीच म्हणा.
लै प्लान्स बदलावे लागतील.
एवढा मोठा बफर नाही आपला.
.
परत बाईक काढली. १० च्या स्पीडने तीन चकरा झाल्या त्या रोडवर.
काही मागमूस नाहीये. रस्ता नेहमीप्रमाणेच सुना.
डोकं आता हळूहळू रिकामं होतंय.
.
पूर्ण ब्लँक आता मेंदू.
शांत बसणे एकमेव पर्याय.
रिवाइंड होतंय बहुधा.
हळूच आठवतेय दार उघडताना हेलमेट पडल्याचं.
मग काय केलं मी?
तिथेच शूज काढले.
आत आलो, लाईट लावली.
बॅग कशी ठेवली?
अर्रर्रर्र...
नोटा ठेवलेला रुमाल काढलेला मीच बाहेर.
नोटा कुठे ठेवल्या?
तीन चार विस्कळीत गट्ठे होते.
सीडीएमला भरावे लागतील म्हणून सरळ करुन ठेवायला पाहिजेत.
पेपरच्या गट्ठ्याखाली आपण तर ठेवले.
.
आहेत का तिथे?
हो. जसे ठेवले तसेच.
शकल्याला मेसेज केला. सापडले रे भावा. सॉरी त्रास दिला रात्री.
शकल्या म्हणला ओके साह्यबा.
.
मुद्दा काय....दारु वाईट.
कामाच्या टायमात तर लैच वाईट.
आधी प्यायचोच की.
एकाच वेळी इतके नसायचे पैसे खिशात.
आधी कधी इतकी चढलेली आठवत नाही.
आजच कस्काय?
टेन्शन.. टेन्शन....बाकी काय नाय.
ह्यापुढे मापात.
खिशात जबाबदारी घेऊन तर नाहीच आता.
पिऊ वाटलीच तर गप्प घरी घेऊन येणे.
दरवाजा लावून पिणे.
सकाळी शांतपणे कामाला लागणे.
.
बाकी काही म्हणा...
मोदीकाका हुशार.
शिस्तीत वाजवली गेम.
यंदा लोन इंटरेस्ट कमी झाला,
प्रोसेस इझी झाली तरी बरंय.
काय नाय, निदान चेक आणि कार्डं बाळगायची सवय लागली तरी बरंय.
.
हवीय कुणाला कॅश ढिगभर नोटात?
.
(शुध्दीवर असताना लिहिलेली सत्यकथा)

अर्थकारणअर्थव्यवहारप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

12 Nov 2016 - 7:53 pm | यशोधरा

हं.

अन्नू's picture

12 Nov 2016 - 7:55 pm | अन्नू

शिर्षक वाचून वाटलं दारु भेटली नाही की काय ;)
नंतर वाटलं पैसे हरवले की काय
निम्म्याच्या पुढे वाचून जरा स्टन्न झालो
मग शेवट वाचून हुश्श झालं.
अच्छा.. असं झालं होतं तर सगळं!

तात्पर्य: दारु लै वाईट्ट ;) =)) =))

सतिश गावडे's picture

12 Nov 2016 - 8:00 pm | सतिश गावडे

दारुसारख्या गोष्टीचे उदात्तीकरण आवडले नाही. तूर्तास इतकेच. बाकीचे अमितला बसल्यावर बोलू.

प्रचेतस's picture

13 Nov 2016 - 12:30 pm | प्रचेतस

हे अमित कुठे आहे म्हणे?

सतिश गावडे's picture

13 Nov 2016 - 4:03 pm | सतिश गावडे

सिंहगड रोडवर. हिंगणे चौकात. स्वारगेटकडून संतोष हॉलचा आधीचा सिग्नल.

नाखु's picture

14 Nov 2016 - 11:06 am | नाखु

का चौकश्या करतेत तेच कळेना, तो काय गड आहे का (देखणी) लेणी ?

बाकी लेख भारी है ! या निमित्ताने उधारी वसूल झाली पुणे मनपा सारखी तर आनंदच आहे.

बाकी "अच्छे दिन आले का? " त्यांनी हा लेख वाचावाच.

चौथा कोनाडा's picture

14 Nov 2016 - 1:35 pm | चौथा कोनाडा

हा .... हा ...... हा !

निमित्ताने उधारी वसूल झाली पुणे मनपा सारखी तर आनंदच आहे.

हा .... हा ...... हा !

चांदणे संदीप's picture

12 Nov 2016 - 8:05 pm | चांदणे संदीप

लिव्हलय व्हाईट... सस्पेन्स वाईट्ट!!

Sandy

जव्हेरगंज's picture

12 Nov 2016 - 8:05 pm | जव्हेरगंज

डेंजर !

वैट शॉक देते दारु.. असो!

आदूबाळ's picture

12 Nov 2016 - 8:57 pm | आदूबाळ

:) क्याश बाळगायचं टेन्शन!

अवांतर (गावडेसरांसाठी): अमितचं जेवणही चांगलं असतं.

किसन शिंदे's picture

13 Nov 2016 - 11:00 am | किसन शिंदे

कमी घे बे जरा आणि जरा जास्त लिही. =))

संजय पाटिल's picture

13 Nov 2016 - 12:02 pm | संजय पाटिल

स्टोरी भारीच..
पण-

दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.००
पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी.
आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट. सेकंड मल्ल्या.
.
रस्त्यातून येताना पाहिले.
बँकासमोर जत्रा भरलीय.
गर्दीशी आपली सख्त नफरत.
मुदत पण आहे भरपूर.
बघता येईल नंतर.

... ९ ला ब्यँका बंद होत्या ना? का दिवस नीट आठवत नाहिये?

अन्नू's picture

13 Nov 2016 - 12:23 pm | अन्नू

९ ला ब्यँका बंद होत्या ना? का दिवस नीट आठवत नाहिये?
=)) =))
सही पकडे है ;)

नाइंटी शुड भी अपर लिमिट. सबसे बड़ा रपैय्या।

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2016 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा

, ह्ही ह्ही ही!

संदीप डांगे's picture

13 Nov 2016 - 3:35 pm | संदीप डांगे

काळजी घ्या शेठ, 30 डिसेंबर नंतर खूप काम वाढणार आहे, तब्येत राखा!

झेन's picture

13 Nov 2016 - 4:16 pm | झेन

मस्तच लिवलय. "लहान मूल कसे उठता बसता "आई मला भूक लागली" करते तसे व्यावसायिकांना उधारीबाबत करावे लागते.
टोचत राहिल्याशिवाय मिळत नाही" हे झकासच. ......... .... ... न पिता सुध्दा कधीकधीअसल्या अनुभवातून गेलेला झेन.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Nov 2016 - 5:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या तुला दोस्तीची आण, डोक्यात विचार असताना एक थेंबही घ्यायची नाही. Whenever u drink u drink to make merry not to counterbalance ur anxiety, and not at all professional anxiety. इतके लक्षात ठेव. बाकी टेबलावर बसून बोलू :)

महासंग्राम's picture

14 Nov 2016 - 10:17 am | महासंग्राम

बाप्पू मले बी बोलोजा चकणा खायला.लैच आवडते आपल्याले चकणा. सगळं कसं आंदो असतं.

बाकी, अभ्या सेठ आपके बारे में क्या लिखणा. जबरदस्त लिवलंय लगा !!!. अल-खराब अगदी.

झेन's picture

13 Nov 2016 - 5:40 pm | झेन

ज्जे बात "Whenever u drink u drink to make merry not to counterbalance ur anxiety, and not at all professional anxiety." असं अधिकारानी सांगणारा दोस्त सगळ्यांना मिळो.

तुषार काळभोर's picture

13 Nov 2016 - 6:19 pm | तुषार काळभोर

ह्यापुढे मापात.
खिशात जबाबदारी घेऊन तर नाहीच आता.
पिऊ वाटलीच तर गप्प घरी घेऊन येणे.
दरवाजा लावून पिणे.
सकाळी शांतपणे कामाला लागणे.

याच्यासाठी लौ यू!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2016 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगलं लिहिलाय.... होत असं कधी कधी.

-,दिलीप बिरुटे

जयू कर्णिक's picture

14 Nov 2016 - 10:04 am | जयू कर्णिक

छान. उस्फूर्तपणा भावला.

चौथा कोनाडा's picture

14 Nov 2016 - 1:04 pm | चौथा कोनाडा

थरकांप उडवणारा जिवंत अस्सल अनुभव !
एक एका वाक्या बरोबर मी ही थरारुन उठत होतो.

अभ्यासेठ +१०००००

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Nov 2016 - 2:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अभ्या लगा, लैच अवलादी हायीस तू..

वरुण मोहिते's picture

15 Nov 2016 - 7:21 pm | वरुण मोहिते

चांगला लिहिलंय ..होताय ऐसा. नेहमीच भान ठेवावं लागत म्हणून. एकदा तर मी फोर्ट वि.टी ला गाडी कुठे पार्क केली हेच आठवत नव्हतं. बराच वेळ झाला आठवेना .कारण त्यानंतर आम्ही १० ठिकाणी फिरलेलो दुसऱ्या गाडीने .नशिबाने मित्राकडे राहणार होतो वरळीला रात्री कधीतरी आठवलं मग सकाळी उठून घेतली गाडी . बाकी वर सोन्याबापूंचा सल्ला नेहमीच कामाला आहे सगळ्यांना .