वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही
मीलनाची ओढ होती संयमाची रेघही
ओठ नाही त्या गुलाबी दोन होत्या पाकळ्या
चुंबताना होत काटेरी जरासा स्पर्शही
कामिनीचे रूप पाहू दे मला गे सुंदरी
रोखले मी श्वास आणी सोसला आवेगही
तारकांचे गूज सांगे रातराणी गंधुनी
चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चंद्रही
पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला
संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही
- प्राजु
प्रतिक्रिया
26 Sep 2008 - 9:09 pm | स्वाती दिनेश
तारकांचे गूज सांगे रातराणी गंधुनी
चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चांदही
सुंदर ओळी..
तरल कविता,आवडली.
स्वाती
26 Sep 2008 - 9:12 pm | लिखाळ
कविता आवडली.
चांदण्याशी रासक्रीडा खेळला ना चांदही
येथे चंद्रही असे चालेल का? मला मध्येच चांद हा शब्द खटकला.
मला कवितेतले कळत नाही. सूचना योग्य नसेल तर दुर्लक्षावी !
--लिखाळ.
26 Sep 2008 - 9:15 pm | प्राजु
ते चंद्र असंच होतं .. स्वातीताईला वाचून दाखवताना चंद्र च वाचलं.. पण तिथे चांद राहिलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Sep 2008 - 9:16 pm | स्वाती दिनेश
पण मला चांदही खटकलं नाही..चांद मातला मातला.. ह्या गाण्याची आठवण झाली.
स्वाती
26 Sep 2008 - 9:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही चांद आवडलाच होता.
26 Sep 2008 - 9:23 pm | लिखाळ
गंधुनी वाचल्यावर खाली चंद्रही वाचणे बरे वाटते. चांदही मधल्या द वर जोर येत नव्हता म्हणून सुचवले.
-- लिखाळ.
26 Sep 2008 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है !!! सुंदर कविता.
26 Sep 2008 - 9:18 pm | नंदन
कविता आवडली. परस्परविरोधी भावनांचा खेळ सुरेख मांडला आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 Sep 2008 - 11:21 pm | शितल
नंदनच्या मताशी सहमत.
प्राजु कविता आवडली
:)
27 Sep 2008 - 12:43 am | टारझन
परस्परविरोधी भावनांचा खेळ
असेच म्हणतो.मला कविता चक्क समजली. नाय तर हल्ली मी प्लेन टेक्स्ट्ला पण सायफर टेक्स्ट समजुन डिक्रिप्ट करत बसायचो.
----------- फाटलेल्या प्रोजेक्टची रेघ -----------
इश्युंचे थवे होते, सपोर्टची बोंबही
परतायची ओढ होती , कंप्लिशनची डेट ही
बग्ज होता होता करप्टेड बायनरी होता
रनवताना कोर डंप तयार होत होता
प्रॉजेक्टचे स्टेटस पाहू दे रे मला
रोखले मी श्वास आणी सोसला क्लायंटचा आवेगही
क्लायंटची बोंब ऐकु येते भर दुपारी
हॅडलायला सिच्युएशन पी.एम. कोलमडला कुठेही
सर्वररूमचा गारवारा खालुन वर वाहीला
संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही
ओढ आहे युरोपाची पण अनुभवाची झोळी मोकळी
हवेत अजुन डॉलर अन्यथा कुणा वेळ ही हवी ?
ता.क. वरिल कवीतेस कुठलेही वृत्त, तत्व, यमक का काय ते .. काहीही लागु होत नाही
27 Sep 2008 - 12:47 am | प्राजु
धन्य आहे तुझी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Sep 2008 - 4:06 am | धनंजय
सुंदर कडवी.
(माझे मत "चंद्र"च्या बाजूने.)
26 Sep 2008 - 9:19 pm | मानस
पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला
संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही
ह्या ओळी विशेष भावल्या .............. अजुन येऊ देत.
26 Sep 2008 - 11:10 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो. कविता आवडली.
26 Sep 2008 - 9:28 pm | चतुरंग
(चांद चालला असता पण हरकत नाही)
चतुरंग
26 Sep 2008 - 10:09 pm | ऋषिकेश
लय भारी! आवडली!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
26 Sep 2008 - 10:39 pm | प्रियाली
मस्त आहे कविता
हे
वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही
मीलनाची ओढ होती संयमाची रेघही
आणि हे
पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला
संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही
अधिक आवडले.
26 Sep 2008 - 11:45 pm | मनीषा
फारच छान........
सुंदर शब्दरचना आणि कल्पना !
26 Sep 2008 - 11:47 pm | बेसनलाडू
फार फार आवडली.
चांद, चंद्र दोन्ही चालेलसे वाटते.
(आस्वादक)बेसनलाडू
27 Sep 2008 - 1:54 am | जयवी
प्राजु........ एकदम बढिया जमलीये गझल...... मजा आ गया जानेमन :)
वादळांचे श्वास होते भावनांचे मेघ ही
मीलनाची ओढ होती संयमाची रेघही
............. मतला एकदम कातिल ;)
27 Sep 2008 - 4:46 am | प्राजु
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Sep 2008 - 8:01 am | विसोबा खेचर
आयला! आमची प्राजू आजकाल भलतीच मॅच्युअर कवयत्री झालेली आहे बॉ! :)
आम्हाला मिपाच्या मुखपृष्ठावर टाकण्याकरता दिवसेंदिवस उत्तम साहित्य मिळत आहे, हेच खरं! :)
असो,
प्राजू, कविता नि:संशय सुरेख....! जियो...
आपला,
(प्रतिभावान कवयत्री प्राजूचा मित्र!) तात्या.
27 Sep 2008 - 8:09 am | प्राजु
आयला! आमची प्राजू आजकाल भलतीच मॅच्युअर कवयत्री झालेली आहे बॉ!
कवयित्री म्हणायचे आहे बहुतेक तुम्हाला.. ;)
धन्यवाद तात्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Sep 2008 - 8:36 am | सुनील
कविता खूप आवडली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Sep 2008 - 12:44 pm | स्पृहा
क्या बात है!! मस्तच!! :*
लगे रहो!!! :)
27 Sep 2008 - 12:56 pm | मदनबाण
मस्त कविता..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
27 Sep 2008 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर
मस्त आहे कविता.... अभिनंदन.
पण मला एक समजत नाही. एवढे सारे काही पूरक असताना संयम कशासाठी?
27 Sep 2008 - 6:52 pm | सुनील
पण मला एक समजत नाही. एवढे सारे काही पूरक असताना संयम कशासाठी?
मान गये प्रभाकरपंत!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Sep 2008 - 8:24 pm | प्राजु
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Sep 2008 - 8:41 pm | अवलिया
पश्चिमेचा गारवारा का सुगंधी वाहिला
संयमाची तो परिक्षा घेत आहे आजही
या ओळी विशेष आवडल्या