रिहॅब चे दिवस भाग ३!!!

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
25 Sep 2016 - 12:00 am

हडपसर पर्यंत जेव्हा पोचलो तेव्हा जाग आली घरचे दिसत होते ऍम्ब्युलन्स मधून मला आता. मागे गाडीत होते पण बोलायला शुद्ध नव्हती.काही बोलू शकलो नाही. त्या हॉस्पिटलचे २ लोकं आली हाताला पकडल आणि वर नेलं . घरच्यांनी घाईगडबडीत पॅक केलेली बॅग घेऊनही एक जण मागे येत होता.मला एका रूम मध्ये बसवलं..समोर जमलेले ८-१० लोक..मला पाहायला.कोण नवीन बकरा बनला ह्यात सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो.कोणीतरी जेवायचं ताट आणलं .दोन घास खाऊन मी ताट फेकल.अर्वाच्य शिव्या तर चालूच होत्या डॉक्टरांपासून सगळ्यांना. आज तेच डॉक्टर माझे काही वेळा मार्गदर्शक आहेत रागाच्या भरात आणि अहंकारामुळे आपण खूप चुकत असतो..कळत नाही मला तरी कुठे कळत होतं.
परत वर नेलं ४ मजल्यांच् हॉस्पिटल होत मला नंतर कळलं. त्या रूम मध्ये सी.सी.टी.व्ही होता. ऐकत नव्हतो मी.हाताला साखळी बांधली. झोपवलं परत एक इंजेकशन दिलं.मधेच जाग.आई आजोबा मावशी असं ओरडणं चालू होतं. भास तर खूपच. असा वाटत होतं कि आपण मावशीच्याच बंगल्यावर आलो आहोत.घरच्यांनी मुद्दाम बांधलय मला .त्या दोन दिवसात जो समोर येत होता तो वेगळीच व्यक्ती भासत होता. ज्यांना कधी आयुष्यभर पहिलं नाही असे चहा जेवण देणारे भाऊ वाटत होते बहीण वाटत होते .काहीपण बोलणं चालूच होतं .परत रात्री थोडे डोळे उघडले एक मुलगा समोर झोपलेला होता माझ्याकडे पाहत होता.मेघालय चा होता .पुण्यात आय. टी मध्ये काम .कोणातरी ड्रुग्स च व्यसन लावलं होतं.इथे आलेला (मला हे मागाहून कळलं )तिसरा अजून एक कोणी होता. एकट्याचच त्याच आणि बेड चं युद्ध चालू होतं .त्याला हाताला साखळी बांधलेली होती ती कधीतरी निघेल या आशेने तो खूप धडपड करत होता.खूप घाबरलेलो मी .अश्या ठिकाणी राहूच शकणार नव्हतो.घरच्या बॅगेत काही पुस्तकं होती. वाचायला चालू केली सगळं विसरून.पण एक झालं मी जेव्हा जरा भानावर आलो तसे प्रमुख डॉक्टर आले. खाली चाल बॅग भर तुझी रूम तिथे आहे असं बोले .मी अजून घाबरलो मनात विचार आला कि इथे बेड तरी आहे तिथे काय जमिनीवर झोपवणार कि काय. पण तसं नव्हत .हीच ती रूम जिथे मी काय जेवण आहे म्हणून ताट फेकलेलं.अर्थात काहीच कळत नव्हतं अश्या अवस्थेत. तेव्हा.एक एल सी डी टी .व्ही, ए सी रूम आणि तिघेजण.(नवीन पार्टनर बरका ).प्लस स्वतंत्र पलंग आणि कपाट . चला घरच्यांनी सोय तर चांगली केली होती काही लोकांकडून काळात होतं कि तुमच्यासाठी जिम कॅरम पत्ते हे हि आहेत पण अजून त्या वातावरणात रूळायचा होतं .कारण प्रॉब्लेम असा कि कोणाला नं विचारता मजल्याबाहेरही जायला परवानगी नव्हती दारू सिगरेट तर दूरची गोष्ट .कडेकोट बंदोबस्त.आपण का आलोय काय होणार .कोणाशी कधी बोलू शकू हे सगळेच मुद्दे बाकी होते......
(क्रमशः )

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

वाचतोय. थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

विचित्रा's picture

25 Sep 2016 - 10:29 pm | विचित्रा

अनिल अवचट यांचं 'मुक्तांगण' आठवलं.

पुभाप्र

निओ१'s picture

26 Sep 2016 - 10:08 pm | निओ१

what ? and why ?
did you even visited muktangan?

अनुप ढेरे's picture

25 Sep 2016 - 10:38 pm | अनुप ढेरे

चांगलं लिहिताय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

चाणक्य's picture

25 Sep 2016 - 10:46 pm | चाणक्य

.

वरुण मोहिते's picture

26 Sep 2016 - 12:23 am | वरुण मोहिते

एस भाऊ नोटेड.
बाकी विचित्रा ताई मुक्तांगण असो किंवा नातूंचं नशायात्रा ह्यात खूप वेगळी बॅकग्राऊंड आहे. मी सांगतोय त्या मजल्यावर आम्ही एकूण २८ जण होतो पण बाकी हॉस्पिटल अजून वरच्या फ्लोर ला होता. त्याची वेगळी स्टोरी आहे आणि आमच्या फ्लोर ची हि वेगळी .
प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे धन्यवाद !!!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

26 Sep 2016 - 12:41 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

तुषार नातूंचं लेखन वाचल्याने या तुमच्या अनुभव कथनाकडे रोचक म्हणुन पाहत आहे.फक्त विरामचिन्हे योग्य ठीकाणी द्या व शुद्धलेखनाकडे लक्ष द्या..पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

26 Sep 2016 - 12:43 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मलाही तंबाखूचे व्यसन होते ,ते जाणिवपुर्वक सोडले.इथेच एक धागा काढला होता.

नाखु's picture

26 Sep 2016 - 2:20 pm | नाखु

अगओदरचे धागे वाचले.

स्वानुभव असेल तर धैर्याला सलाम आणि जिद्दीने नवीन सुरुवात करणार्या सर्वांना कडक सलाम

सूड's picture

26 Sep 2016 - 4:51 pm | सूड

वाचतोय. लिहीत राहा.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2016 - 8:12 pm | अत्रुप्त आत्मा

वाचिंग .. कीप लिखिंग!

अजया's picture

26 Sep 2016 - 10:51 pm | अजया

वाचतेय.

शिद's picture

26 Sep 2016 - 10:52 pm | शिद

स्वतःचा अनुभव येथे लिहित त्याबद्दल कौतुक.

वर एस ह्यांनी सांगीतल्याप्रमाणे कृपया मोठे भाग टाका.

विचित्रा's picture

28 Sep 2016 - 4:44 pm | विचित्रा

@निओ१
नाही. फक्त वाचलंय. पण अनुभव साधर्म्य सांगणारे वाटले.
@ वरुन जी
मला अशा संस्थां नि त्यांच्या चालकांविषयी आदर वाटतो. नि जिद्दीने व्यसनांच्या मगरमिठीतून सुटणार्या व्यक्तींचं कौतुक