रिहॅब चे दिवस भाग ३!!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
हडपसर पर्यंत जेव्हा पोचलो तेव्हा जाग आली घरचे दिसत होते ऍम्ब्युलन्स मधून मला आता. मागे गाडीत होते पण बोलायला शुद्ध नव्हती.काही बोलू शकलो नाही. त्या हॉस्पिटलचे २ लोकं आली हाताला पकडल आणि वर नेलं . घरच्यांनी घाईगडबडीत पॅक केलेली बॅग घेऊनही एक जण मागे येत होता.मला एका रूम मध्ये बसवलं..समोर जमलेले ८-१० लोक..मला पाहायला.कोण नवीन बकरा बनला ह्यात सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो.कोणीतरी जेवायचं ताट आणलं .दोन घास खाऊन मी ताट फेकल.अर्वाच्य शिव्या तर चालूच होत्या डॉक्टरांपासून सगळ्यांना. आज तेच डॉक्टर माझे काही वेळा मार्गदर्शक आहेत रागाच्या भरात आणि अहंकारामुळे आपण खूप चुकत असतो..कळत नाही मला तरी कुठे कळत होतं.
परत वर नेलं ४ मजल्यांच् हॉस्पिटल होत मला नंतर कळलं. त्या रूम मध्ये सी.सी.टी.व्ही होता. ऐकत नव्हतो मी.हाताला साखळी बांधली. झोपवलं परत एक इंजेकशन दिलं.मधेच जाग.आई आजोबा मावशी असं ओरडणं चालू होतं. भास तर खूपच. असा वाटत होतं कि आपण मावशीच्याच बंगल्यावर आलो आहोत.घरच्यांनी मुद्दाम बांधलय मला .त्या दोन दिवसात जो समोर येत होता तो वेगळीच व्यक्ती भासत होता. ज्यांना कधी आयुष्यभर पहिलं नाही असे चहा जेवण देणारे भाऊ वाटत होते बहीण वाटत होते .काहीपण बोलणं चालूच होतं .परत रात्री थोडे डोळे उघडले एक मुलगा समोर झोपलेला होता माझ्याकडे पाहत होता.मेघालय चा होता .पुण्यात आय. टी मध्ये काम .कोणातरी ड्रुग्स च व्यसन लावलं होतं.इथे आलेला (मला हे मागाहून कळलं )तिसरा अजून एक कोणी होता. एकट्याचच त्याच आणि बेड चं युद्ध चालू होतं .त्याला हाताला साखळी बांधलेली होती ती कधीतरी निघेल या आशेने तो खूप धडपड करत होता.खूप घाबरलेलो मी .अश्या ठिकाणी राहूच शकणार नव्हतो.घरच्या बॅगेत काही पुस्तकं होती. वाचायला चालू केली सगळं विसरून.पण एक झालं मी जेव्हा जरा भानावर आलो तसे प्रमुख डॉक्टर आले. खाली चाल बॅग भर तुझी रूम तिथे आहे असं बोले .मी अजून घाबरलो मनात विचार आला कि इथे बेड तरी आहे तिथे काय जमिनीवर झोपवणार कि काय. पण तसं नव्हत .हीच ती रूम जिथे मी काय जेवण आहे म्हणून ताट फेकलेलं.अर्थात काहीच कळत नव्हतं अश्या अवस्थेत. तेव्हा.एक एल सी डी टी .व्ही, ए सी रूम आणि तिघेजण.(नवीन पार्टनर बरका ).प्लस स्वतंत्र पलंग आणि कपाट . चला घरच्यांनी सोय तर चांगली केली होती काही लोकांकडून काळात होतं कि तुमच्यासाठी जिम कॅरम पत्ते हे हि आहेत पण अजून त्या वातावरणात रूळायचा होतं .कारण प्रॉब्लेम असा कि कोणाला नं विचारता मजल्याबाहेरही जायला परवानगी नव्हती दारू सिगरेट तर दूरची गोष्ट .कडेकोट बंदोबस्त.आपण का आलोय काय होणार .कोणाशी कधी बोलू शकू हे सगळेच मुद्दे बाकी होते......
(क्रमशः )
प्रतिक्रिया
वाचतोय. थोडे मोठे भाग टाका ही
अनिल अवचट यांचं 'मुक्तांगण'
what ? and why ?
चांगलं लिहिताय. पुढील
वाचतोय
ओके
तुषार नातूंचं लेखन वाचल्याने
मलाही तंबाखूचे व्यसन होते ,ते
या धाग्यामुळे
वाचतोय. लिहीत राहा.
वाचिंग .. कीप लिखिंग!
वाचतेय.
वाचतोय...
@निओ१