स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
7 Sep 2016 - 3:22 pm

सायकल सायकल या समुहावर चर्चा करताना मोबाईल चार्जींग साठी सायकला जोडून काही उपकरण बनवता येईल का अशी चाचपणी चालली होती.विषय हा प्रकल्प कसा करता येईल यावर फिरू लागल्यावर असे वाटले की यामध्ये तर व्यावसायिक शक्यता आहेत.

हा सुचलेला प्रकल्प विचार असा आहे:

सुमारे २ किंवा ३ सेमी आकाराचे छोटे पंखे हँडप्रेस मशिनवर बनवायचे.
त्याला एक चुंबक असलेली मोटार जोडायची.
हवे ने पंखा फिरला की विज तयार होईल. करंट आपल्या मोबाईलच्या गरजे नुसार रेग्युलेट करायचा.
आणि त्याला एक यु एस बी सॉकेट जोडायचे. हे सगळे एका सिल्ड खोक्यात बसवायचे (पाणी जाऊ नये म्हणून).
आता वार्‍याने उर्जा देणारा मोबाईल चार्जर तयार. हा चार्जर एका क्लिप ने सायकलला जोडायचा.

जे लोक सायकलवर लाँग ट्रिप्स करतात त्यांना या चार्जरची महती लगेच लक्षात येईल!
कारण स्ट्रावा किंवा कोणताही अ‍ॅप जिपिएस वापरून बॅटरी खातो. त्याला अशी चार्जरची जोड दिली तर अधिक काळ मोबाईल चालू राहील.
याला एक सोलार पॅनल जोडता येईल अशीही एक कल्पना सुचवली गेली आहे.

सगळी चर्चा झाली आणि मग असे प्रॉडक्ट आधीच तयारही केले गेले आहे असे कळले.
अर्थातच ही कल्पना कुणालातरी आधी सुचलीच असणार. आणि ते ही ठिक आहे. परंतु आपले स्वतः चे डिझाईन असेल तर अजुनही हे तयार करता येईल मार्केट मध्ये आणता येईल. काहीच नाही झाले तर अलिबाबा या साईट वरून - चिन मधून सुटे भाग मागवायचे आणि येथे जोडून ते विकायचे हे तर अगदीच सहज शक्य आहे. या कल्पनेत कुटिरोद्योग म्हणून काहीसा दम आहे!
भांडवल फार लागणार नाही.
सायकल शिवाय्ही अनेक ठिकाणी याचा उपयोग होऊ शकेल. हे टोपीवर बसवता येईल. मग चालताना चार्जिंग होईल. किंवा खिडकीवर घरी बसवता येईल. विकण्यासाठी इबे किंवा नॅपडिल चा वापर करताच येईल.

कल्पना सुचली तरी हा प्रकल्प मला करायचा नाहीये किंवा करायला जमणार नाहीये. पण कुणाला तरी जमेल.
अशा तुमच्याकडेही कल्पना असतील. प्रत्येक कल्पना आपण प्रत्यक्षात आणूच असे ही नाही.

म्हणून अशी व्यवसाय कल्पना तुमच्याकडे असेल तर ती येथे मांडावी ही विनंती.
यामुळे एक नवीन स्टार्ट अप्सचा डेटाबेस तयार होईल. त्याचा कुणाला तरी उपयोग होईल ही आशा...

समाजजीवनमानतंत्रविचार

प्रतिक्रिया

आयडीया छान आहे .

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 4:37 pm | टवाळ कार्टा

+१११११

रिकामटेकड्याना पंखे फिरवायला बसवले तरी भारताचा निम्मा उर्जेचा प्रश्न मिटेल. ;)
घुमाव पंखा, बजाव डंका

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Sep 2016 - 4:16 pm | llपुण्याचे पेशवेll

सदर पंखा मोटारसायकलवर पण वापरता येईल.

पैसा's picture

7 Sep 2016 - 4:28 pm | पैसा

लहान लहान सोलर चार्जर्स तर मिळतातच. त्याला वार्‍यापासून मिळणार्‍या ऊर्जेची जोड देण्याची आयडिया मस्त!

शुभां म.'s picture

7 Sep 2016 - 4:57 pm | शुभां म.

1. सौर ऊर्जा
आर्थिक परिस्थितीमुळे सर्वानाच सौर ऊर्जेचे पॅनल, सौर तापक आणि सौर दिवे वापरता येत नाही, कारण या सर्वांची किंमत जास्त आहे तसेच मेन्टेनन्सचा पण खर्च असतो , अशा वेळेस किरकोळ स्वरूपात या सौर पॅनल उपलब्ध करून देणे म्हणजे MAHADISOM सारखी पण छोटी कंपनी स्थापन करून ग्राहकांना मासिक भाडे तत्वावर सौर ऊर्जा उपलब्ध करून देणे.
आणि काही कालावधी नंतर हे पॅनल फक्त maintenace तत्त्वावर ग्राहकांना त्याच्या मालकीचे करून देणे.
आता यात खालील फायदे आहेत.
1. सौर ऊर्जेचा वापर वाढेल
2. ग्राहकांना कमी खर्चात पण मासिक भाडे तत्वावर वीज उपलब्ध होईल आणि ठरविक कालावधी नंतर हि उपकरणे त्यांचीच होतील
3.कंपनीला ऊर्जा स्वतः बनवण्याची गरज नाही.
4.वीज चोरी आणि अजून बऱ्याच गोष्टी टाळता येतील
5. ग्राहकांची वीज उपयोग मोजण्याची गरज नाही कारण फक्त पॅनल चा खर्च मासिक भाडयातून घेतला जाणार

आता यात खूप technical मुद्दे पण आहेत जसे
1. ग्राहकांना सौर आणि नेहमीची वीज दोन्ही वापरता आलाय पाहिजे कारण सगळंच काही सौर उर्जे वर चालू शकत नाही
2.पावसाळा किंवा हिवाळा यात सोलर ऊर्जेचा कसा वापर करावा.
3.सोलर ऊर्जा फक्त सौर तापक काही सौर दिवे जास्तीत जास्त फॅन साठी वापरू शकतो अजून इतर जड उपकरणांसाठी याचा वापर होऊ शकतो का ?

सध्या फक्त subsidy तत्त्वावर सौर ऊर्जेची उपकरणे उपलब्ध आहेत ज्यांची किंमत खरंच जास्त आहे, अत्यंत कमी मासिक भाडे ठेवल्यास सामान्य नागरिक या गोष्टींनाच वापर करू शकतो .

आणि अजून बरेच काही....................................................

शुद्ध लेखाच्या खूप चुका असतील त्या बदल क्षमस्व............................................

आर्यन मिसळपाववाला's picture

7 Sep 2016 - 5:57 pm | आर्यन मिसळपाववाला

सध्या फक्त subsidy तत्त्वावर सौर ऊर्जेची उपकरणे उपलब्ध आहेत ज्यांची किंमत खरंच जास्त आहे, अत्यंत कमी मासिक भाडे ठेवल्यास सामान्य नागरिक या गोष्टींनाच वापर करू शकतो .

आर्यन मिसळपाववाला's picture

7 Sep 2016 - 5:59 pm | आर्यन मिसळपाववाला
कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Sep 2016 - 6:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

मला स्वतःची प्रायव्हेट मिलिटरी काँट्रॅकटिंग कंपनी स्थापन करायचा एक कीडा अधून मधून चावत असतो, खास करून, त्याचे स्वरूप किंवा रूपरेषा अर्थातच, कायदेशीर रित्या खूपच किचकट असणार आहे, ह्याची कल्पना आहेच. तरीही हा एक किडा डोक्यात वळवळत असतो बरेचवेळी, ह्या संकल्पनेला मूर्त स्वरूप द्यायला अगदी ही संकल्पना घटनासंमत असेल का नाही इथून विचार करायला लागणार आहे, जर हा बिझनेस चालला तर स्वार्थ अन परमार्थ दोन्ही साधेल अशी आशा आहे.

काही विचार आलेत तसे मांडतो

कंपनीचे स्वरूप :- प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी पुरवीत असलेल्या सेवा (खालीलप्रमाणे) असतील

१. लॉजिस्टिकल सपोर्ट टू फायटिंग फोर्सेस (जर कायदेशीर असले अन घटनेत विहित आर्मी ऍक्ट मध्ये बसत असले तर आणि तरच)

२. प्रायव्हेट सिक्युरिटी काँट्रॅकटिंग, ह्यात खूप गोष्टी येतील उदाहरणार्थ -
अ. व्हीआयपी सिक्युरिटी/ सेलिब्रिटी सिक्युरिटी
ब. औद्योगिक अर्थात इंडस्ट्रियल सिक्युरिटी, ह्यात प्रायव्हेट उद्योगांना म्हणजे प्लांट्सना सुरक्षा पुरवणे, नवीन जागी उद्योग स्थापन करताना मटेरियल अँड लॉजिस्टिक सिक्युरिटी, हाय व्हॅल्यु मटेरिअल्स (ह्यात कंपनीची ट्रेडमार्क सिक्रेट्स ते सेन्सिटिव्ह मटेरियल) सिक्युरिटी असेल, सामाजिक दृष्ट्या संवेदनशील तरीही औद्योगिक दृष्ट्या किमती जागा, वस्तू, व्यक्ती ह्यांची सिक्युरिटी, उदाहरणार्थ छत्तीसगढ मध्ये लोहअयस्कबहुल तरीही नक्सली प्रभाव असणाऱ्या प्रांतात जर एखादी कंपनी पोलाद कारखाना उघडायचा म्हणत असेल तर बघणी करायला जाणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा , त्यांच्या व्हिजिट अगोदर एरिया सॅनिटायझेशन, प्लांट सिक्युरिटी इत्यादी. ट्रेड युनियन वगैरेच्या हालचालीवर नजर ठेवणे

३. गव्हर्नमेंट सब काँट्रॅकटिंग, ह्यात जिथे जिथे रेग्युलर मिलिटरी अन पॅरामिलिटरीला उगाच अडकून पडावे लागते तिथे ठराविक टेंडर रकमेबरहुकूम कामे करणे, उदाहरणार्थ, सर्च अँड रेस्क्यू, नैसर्गिक आपत्तीमध्ये साहाय्यता इत्यादी

ह्युमन रिसोर्स :- आर्मी मधून बॉण्ड संपवून रिटायर्ड अधिकारी, ऑफिस एन्डला पॅराप्लेजिक आर्मी पर्सोनेल, MPSC/UPSC देऊनही क्लीयर न होऊ शकलेले अन साहसी नोकरी करायला तयार युवक, एक्स आयबी/ रॉ अधिकारी, मास कॉमचे विद्यार्थी, पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी, इत्यादी इत्यादी, बाकी नोकरी करायला तयार असलेले कोणीही लोक :) , अर्थात पूर्ण व्हेटिंग करूनच. :)

देवजाणे हे प्रॅक्टिकल आहे का निव्वळ दिवास्वप्न =))

आमची प्रेरणा

पूर्वाश्रमीची ब्लॅकवॉटर कॉर्पोशन

बोका-ए-आझम's picture

7 Sep 2016 - 7:34 pm | बोका-ए-आझम

पण असं private security contract कायदेशीर नसावं. एकतर अमेरिकेप्रमाणे आपल्या देशात कायदेशीररीत्या तुम्ही गन, रिव्हाॅल्व्हर किंवा रायफल ठेवू शकत नाही, जोपर्यंत तुमच्या जिवाला धोका असल्यामुळे ही शस्त्रं बाळगणं आवश्यक आहे हे तुम्ही सरकारला पटवून देत नाही. त्यामुळे अशा non-military personnel च्या strike and defence या दोन्हीही क्षमतांवर मर्यादा येतात. यातून एक तोड म्हणजे तुम्ही ट्रेनिंग अॅकेडमी काढा, जी या military आणि paramilitary संस्थांच्या प्रवेशपरीक्षा देऊ इच्छिणाऱ्या लोकांकडून तिथल्या शारीरिक प्रशिक्षणाची तयारी करुन घेऊ शकेल. A precursor to NDA अशी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Sep 2016 - 8:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

एक म्हणजे अश्या संस्था भक्कम अन भरपूर आहेत बोकभाऊ,दोन म्हणजे मला "स्ट्राईक" कपॅसिटी नकोय, तर फक्त अन फक्त नॉन लिथल डिफेन्स परमिट हवं आहे, मी वरती दिलेले उदाहरण परत घेऊन कन्सेप्ट खुलवतो, म्हणजे बघा समजा मी टाटा स्टीलचे अधिकारी घेऊन जगदलपुर कडे हिंडतो आहे, आणी माझ्यावर नक्सली दसत्याने हल्ला केला, तर मला त्या दसत्याला "engage" करायचे नाहीये, मला फक्त माझं क्लायंटेल सुरक्षित ठेवायचंय अँड इन सच केसेस स्कुटिंग इज द बेस्ट ऑप्शन, मग तिथून निसटायला मला गरजेचे काय आहे??
१. एलेमेंट ऑफ सरप्राईज
२. अतिजलद निर्णयक्षमता असणारा स्टाफ

आता निर्णयक्षमता कशी अन ती इंप्लिमेंट कशी करायची?

१ हल्ला कुठून होतोय ते अचूक जोखणे, त्याच्या विरुद्ध दिशेला अजून एक पार्टी असू शकते ह्याचे भान राखणे, नेमक्या जागी स्मोक बॉम्ब, टियर गॅस फायर करायची क्षमता, किंवा अटॅकपार्टी ला सरप्राईज करणारे बाकी मॅन्यूव्हर्स, इतके करून झाले की ऑफेनसिव्ह ड्रायव्हिंग करून माझे ग्राहक ग्रीनझोन मध्ये परत आणणे, ह्यात मला फायर पॉवरची गरज नाही, तर एव्हेजीव ऍक्सेसरीज महत्वाच्या आहेत, त्यामुळे गन कंट्रोल ऑर नॉट फरक पडू नये, शिवाय प्रत्येक स्टाफला एक पर्सनल व्हेपन फक्त worst case सिनेरियो मध्ये वापरायला issue केली जाईल जिचे राऊंड अन त्याची अकौंटंबिलिटी खूप कडक असेल, अन वापरणाऱ्या अधिकाऱ्यावर (जर) काही न्यायिक केस आली तर तिची अंतर्गत चौकशी टाईमबाऊंड रित्या करून त्या कर्मचाऱ्याला लीगल एड द्यायची का नाही हे ठरवता येईल, किंवा सरळ कॉलर, पॉकेट कॅमेरा दिले जातील जे पूर्ण घटनाक्रम नोंदवुन त्याचे विडिओलॉग्स मेन्टेन करतील.

आईशप्पथ!! काय भारी वाटतंय वाचताना...!!! एकदम चकाचक!!

बेष्ट ऑफ लक हो बापूसाहेब!!

बापू जसे तुम्ही म्हणता तस जरा कीजकट वाटतंय खरं. पण कल्पना नाविन्यपूर्ण आहे. तुम्हाला सिक्युरिटी गार्ड/बाउन्सर पुरवणाऱ्या एजंसी सारखं काहीतरी करावं लागेल. शस्त्रधारी लोकांसाठी एक्ससर्व्हिसमन वगैरे हायर करावे लागतील, पण त्यांना ३०३/रायफल सोडून बाकी शत्रं बाळगण अलावूड आहे का नाही माहित नाही. पण तुमचा मुद्दा महत्वाचा आहे "जिथे जिथे रेग्युलर मिलिटरी अन पॅरामिलिटरीला उगाच अडकून पडावे लागते तिथे ठराविक टेंडर रकमेबरहुकूम कामे करणे". आपल्याकडे अजून ती व्हिजन नाही. बाकी कायदा म्हणाल तर दिल्लीत योग्य जागी असलेल्या वजनदार व्यक्तींशी संपर्क असेल तर कुठल्याही जिम्नॅस्ट पेक्षाही कायदा लवचिक आहे.
असे बरेच पण आहेत जसं कि व्हीआयपी/सेलिब्रिटी पेमेंटच्या बाबतीत कसे असतात माहित नाही.

आता मूळ धाग्यात सुचवल्याप्रमाणे काही वर्ष्यापुर्वी सोलर चार्जर दोघा तिघांनी विकत घेतलेला होता पण चालला नाही. आता तांत्रिक सुधारणा झाल्या असल्यास माहित नाही अन्यथा उत्पादनाचे आयुष्य बॅटरीवरच्या चायनीज खेळण्यासारखे होईल असे वाटते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Sep 2016 - 10:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुम्हाला सिक्युरिटी गार्ड/बाउन्सर पुरवणाऱ्या एजंसी सारखं काहीतरी करावं लागेल.

=)) आयला लायकीच काढली महाराजा!!

बाकी सेलेब्रिटी पेमेंट मध्ये ढिले असण्याची शक्यता रास्त आहे अन मान्यही आहेच :)

काय ठ्ठो करून हसलोय ...सगळी बँक दचकली असेल खालच्या मजल्यावरची!!!

कहर!!

ते लायकी बददलच होतं पण तूमच्या नाय सध्याच्या सिस्टिमच्या. बाकी माझ्या वाक्यरचने मुळे तसं वाटत असेल तर आय माय साँरी बरका

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Sep 2016 - 9:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आम्रविकेमधे प्रायव्हेट मर्सिनरी काँट्रॅक्टर्स आहेतचं ना? त्या धरतीवर भारतामधे सुद्धा अशी सुविधा करता यायला हवी. अर्थात कायदे वगैरेंच्या चौकटिंमधे बसवुनचं. शिवाय ह्या मर्सिनरी कंपनीज नॅशनल आर्मीला डोईजड होणार नाहित एवढ्याचं बेताने.

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 9:27 pm | टवाळ कार्टा

आपल्याइथे अश्या कंपन्या खाजगी गुंड पाळण्यासाठी वापरल्या जातील...सध्ध्या जे अनधिकृतरित्या सुरु आहे ते सगळे कायदेशिररित्या करायची व्यवस्था होउ शकते

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Sep 2016 - 9:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ दादा मर्सिनरीज आणि गावगुंड सारख्या लेव्हलचे नस्तात भौ!! मी म्हणतोय ते मर्सिनरीज काँबॅट एक्स्पर्ट्स असतात, गावठी कट्टा आणि कोयते घेउन फिरत नाहित ते ;)!!. बहुतांश वेळा एक्स वॉर व्हेटरन्स ह्या व्यवसायामधे शिरतात. त्यातही ग्रीन बेरेट्स आणि नेव्ही सील्स चं प्रमाण लक्षणिय आहे त्यात.

मधे डिस्कव्हरी किंवा डिस्कव्हरी टर्बो वरती अमेरिकन प्रायव्हेट्स ह्या नावाने एक डॉक्युमेंट्री पाहण्यात आलेली. काहि शे बिलियन डॉलरींची इंडस्त्री आहे ही अता. खासकरुन ऑईल रिग्स मधे वगैरे ह्यांचं प्रोटेक्शन असतं.

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 9:40 pm | टवाळ कार्टा

बाब्या...हिकडं ये तु पुन्याजवल...इथे शिंव्हगडावरच दारूपार्टी कर्नारे भेटतात...ते पण महाराजांचे नाव घेउन...शान्नव कुली

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 9:43 pm | संदीप डांगे

ओ जरा जपून... कोण्या कुळाच्या कोणत्या भावना दुखातील आजकाल सांगता येत नाही,

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 11:54 pm | टवाळ कार्टा

मी पण शहाण्णव कुळीच आहे ओ, पण तो फालतूपणा/माज करणे जमत नाही

आपल्याकडे थलसेनेमधून जे सैनिक १५ वर्षांच्या सेवेनंतर निव्रुत्त होतात. त्यांची अशी लोकोपयोगी संघटना बांधू शकतो. त्यांचे ट्रेनिंग झालेले असतेच आणि वयही फारसं झालेलं नसतं. यातून त्यांनाही काही पैसे मिळतील. बर्‍याच वेळेला निव्रुत्त सैनिक कुठेतरी सुरक्षा रक्षकाची फुटकळ नोकरी करत असतात ज्यात त्यांना मिळालेल्या ट्रेनिंगचा खूपच कमी वापर केला जातो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Sep 2016 - 10:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी अगदी. ह्याबद्दल डॉक, सोन्याबापु वगैरे अनुभवी मंडळी मस्तं लिहु शकतील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Sep 2016 - 10:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

कदाचित तुम्हाला कन्सेप्ट समजली नाही टकाभाऊ बरोबर

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Sep 2016 - 10:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाही कप्तान साहेब,

मर्सिनरी, हा शब्द खूप नकारात्मक आहे, शब्दशः अर्थ घेतल्यास, अन हा शब्द अमेरिकेतील लिबरल्स ने घासुन गुळगुळीत केलाय "प्रायव्हेट मिलिटरी काँट्रॅकटिंग" वर टीका करताना, अर्थात अमेरिकन मिलिटरी काँट्रॅक्टर्स ने भयाण घोडचुका केल्यात हे ही नमूद करावे लागेलच पण त्या चुका "blunders never to be committed" म्हणून ट्रेनिंगमधेच इंकॉर्पोरेट करता येतील आपल्या कंपनीच्या.

मायला आपण तर नावं ही शोधून ठेवली आहेत =))
=)) =)) =))

१. वज्र कॉर्पोशन
२. गरुड इंटरनॅशनल
३. कवच कॉर्पोशन
४. जटायू प्रोटेकशन

बापू, लोगोचे काम मलाच द्यायचे. लै भारी बनवून देईन
(डायरेक्ट झैरात आहे ही. आधीच सांगतो.)

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Sep 2016 - 11:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

सांगायची गोष्ट नाय बे ती! तू अन डांगे अण्णा (इथे त्यांनी डायरेक इनडायरेक झैरात केली नसली तरी) दोघांना ब्रँड consultant करू! फोडाल तिच्यायला एकमेकांची डोकी विचाराला विचार लढवून अन तुफान लोगो कम टॅगलाईन काढून द्याल त्या मगजमंथनातून

:)

मास्टरमाईन्ड's picture

8 Sep 2016 - 4:41 pm | मास्टरमाईन्ड

हे पण नांव फिट्ट आहे.

पण ही सगळी नावं मुळात आहेतच ना कशा ना कशाला? इथे महालक्ष्मी मंदिरासमोर चोवीस तास एक वज्र ची गाडी उभी असते...बाकी पण नावं ऐकल्यासारखी वाटतायत...

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2016 - 7:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

मग तुम्हीच सुचवा कसे एखादे मस्त नाव!

असंका हेच नाव ठेवा (तिशय संयमी कार्यकर्ते) ;)

असंका's picture

9 Sep 2016 - 12:05 am | असंका

बस का मीच सापडलो काय? अहो ज्यांची मुळ आयडीयेची कल्पना आहे त्यांचंच एवढं सोन्यासारखं नाव असताना इकडं तिकडं बघायची गरजच काय म्हणे? ;)

निनाद's picture

9 Sep 2016 - 7:56 am | निनाद

वाट कसली पाहताय बापुसाहेब?
कल्पना अतिशय योग्य आहे.
प्रकल्प सहज होण्यासारखा आहे.
ऑपरेशनल प्रोसिजर्स तयार आहेत.
मनुष्यबळ उपलब्ध आहे.
सर्व्हिस हवी असणारे लोक आहेत.
सगळे असताना आता फक्त हे सर्व एकत्र आणून सुरुवात करणे हेच बाकी आहे.

कधी करताय?

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 9:00 pm | संदीप डांगे

हायला!! माझा ड्रीम धागा!

असा धागा सुरु करावा असं कित्येक महिन्यापासून मनात होतं, हे पण ढापले ;) =))

येतो परत, भरपूर काही घेऊन, तूर्तास पोच!

निनाद's picture

9 Sep 2016 - 7:57 am | निनाद

असा धागा सुरु करावा असं कित्येक महिन्यापासून मनात होतं, हे पण ढापले ;) =))

धागा तुमचाच समजा साहेब, मी निमित्त मात्र!!

शहरी स्वंयपाकघरात वापरता येण्याजोगे बायोमास स्टोव्ह. ज्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतीलः

१. निर्धूर
२. कमी लाकूडफाटा वापरणारी (दर दिवसामागे २-३ किलो लाकूड).
३. लाकूड जाळल्यानंतरसुद्धा राखेएवजी कोळसा मिळणार.

सध्यातरी समुचितचा संपदा स्टोव्ह घरी वापरायला आणला आहे. त्याच्यावर पद्धतशीर प्रयोग करुन परिणाम नंतर सांगेन.

झेन's picture

8 Sep 2016 - 10:36 pm | झेन

संपदा साठी लाकूड असेल तरच कोळसा वगैरे, आपलं नाही जमलं बाँ संपदा बरोबर

निनाद's picture

9 Sep 2016 - 7:59 am | निनाद

त्याच्यावर पद्धतशीर प्रयोग करुन परिणाम नंतर सांगेन.

जरूर सांगा, वाट पाहू!

माझ्याही डोक्यातले काही कीडे टाकायचा विचार करीनच.

सोन्याबापू म्हणताहेत ते ब्लॅकवॉटर / अ‍ॅकॅडेमी यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सरकारी कॉट्रॅक्ट्स घेऊन अमेरिकेत केलेलं आहेच, भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा वावर वाढतो आहे , शिवाय औद्योगिक सुरक्षा हा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहेच, तेंव्हा कायदेशीररीत्या करता आलं तर मार्केट नक्कीच आहे.

जाता जाता: इथल्या वाचकांमध्ये नव्या कल्पनांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे धाडसी इन्व्हेस्टर्स देखील असतीलच, एखादं शार्क टँक सारखं व्यासपीठही उपलब्ध करून द्यायला हरकत नाही!

निनाद's picture

9 Sep 2016 - 8:01 am | निनाद

कल्पना जोरदार असेल तर ते आपोआपच होईल असे वाटते.
जसे की आपले बापुसाहेब कार्य सुरु करत असतील तर मला त्यात उडी माराविशी वाटते आहे :)

इलेक्ट्रोनिक्स शिकलेल्यांना खूप काही करता येण्यासारखं आहे.चीनमध्ये एक अशिक्षित माणूस भंगारात टाकलेल्या सर्किटांतून काय अफलातून रोबोट बनवतो ते बय्राचदा दाखवतात.एलइडी टिव्हिला ब्लुटुथ नसते त्याला ते युएसबीतून लावायचे उपकरण हवे आहे.ब्लुटुथ स्पिकरातले ब्लुटुथ वापरून.

निनाद's picture

9 Sep 2016 - 8:02 am | निनाद

कल्पकता हेच तर महत्त्वाचे आहे या सगळ्यात!

शुभां म.'s picture

8 Sep 2016 - 10:29 am | शुभां म.

@सोन्याबापु
Maharashtra Ex-Servicemen कॉर्पोरेशन (MESCO) हि माजी सैनिकांसाठी हेच काम करते, त्याची प्रशिक्षण केंद्रे पण आहेत खूप ठिकाणी , त्यांची वेबसाइट तर नाहीये पण पत्ता आहे.

Maharashtra Ex-serviceman Corporation Limited
2nd Floor, Raigad, Opposite National War Memorial, Ghorpadi, Pune, Maharashtra 411001

एखाद्या च्या घरावर खूप वारा असेल तर पत्र्याचा फिरणारा फॅन ,फॅनला पुली बेल्ट किवा डायरेक्ट कपलींगने साध्या चार चाकी गाडीचा आल्टरनेटर जोडायचा ,त्याला अॅटो बॅटरी विथ कटऑफ लाऊन त्या बॅटरीचा उपयोग घरात इनवर्टर सारखा करता येईल. माॅडेल काॅमप्यक्ट व सुटसुटीत असेल तर मस्त. मोफत वीज मिळेल,

निनाद's picture

9 Sep 2016 - 7:53 am | निनाद

आल्टरनेटर जोडण्याची कल्पना झकास आहे.
पंखा आणि आल्टरनेटर यांच्यामध्ये गियर्स घेतले तर वेग वाढून जोरदार वीज मिळेल.

या धाग्याबद्दल निनाद यांचे अभिनंदन !!

सोन्याबापुंची प्रायव्हेट मिलिटरी काँट्रॅकटिंग कंपनी ही संकल्पना सुद्धा व्ययहार्य आहे. सध्या कामा निमित्य इराक सुदान
ह्या देशांमध्ये संपर्क असतो. तिथे अशी सर्विस आम्हाला लागत असते. त्यांच्या काँट्रॅक्टच्या अटी खुप असतात
पण काम ही तितकेच धोकादायक असते. अश्या ठिकाणी बुलेट प्रुफ गाड्यांचा ताफा पुरवणे त्यातुन ये जा करणे अश्या अनेक गोष्टी संमिल्लीत् असतात. आमच्या ईथे टोयोटा लँड क्रुझर तसेच जिएम्सीच्या बुलेटप्रुफ गाड्यांना जास्त मागणी आहे. कामगार नेण्या आणण्यासाठी बुलेटप्रुफ बसगाड्याही असतात. आपल्या देशातील महिंद्रा अ‍ॅड महिंद्रा ही अश्या बुलेटप्रुफ गाड्या बनवते, त्यांचा प्लँट युएईतील रास अल खैमा ईथे आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Sep 2016 - 9:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

बाबौ!! इराक अन सुदान!! सांभाळून हो! इराक लैच वंगाळ असे ऐकले आहे,

रच्याकने, इराकी अन सुदानी अनुभवांवर एक लेखमाला का लिहित नाही तुम्ही? फर्स्ट हँड वाचायला आवडेल, अन ती खरच खूप युनिक असेल असे म्हणतो.

नक्की लिहा ही विनंती

निनाद's picture

9 Sep 2016 - 7:54 am | निनाद

या धाग्याबद्दल निनाद यांचे अभिनंदन !!

धन्यवाद साहेब!

टर्मीनेटर's picture

9 Sep 2016 - 10:03 am | टर्मीनेटर

सायन्स फेस्ट मधील प्रोजेक्ट साठी हि कल्पना छान आहे परंतु व्यावसायिक पातळीवर उत्पादन किंवा अगदी कुटिरोद्योग म्हणून जरी विचार केला तरी अव्यवहार्य ठरेल. आज पॉवर बॅंक्स अगदी वाजवी किमतीत उपलब्ध आहेत त्यामुळे अशा चार्जर ची निर्मिती आणि विक्री ह्यावर खूप मर्यादा येऊ शकतील. आणि स्मार्ट फोन्स च्या बॅटरीज चार्ज करण्या साठी जेवढा करंट लागतो तो २ किंवा ३ सेमी आकाराचे छोटे पंखे व चुंबक असलेली मोटार वापरून (सायकल ला जोडल्यावर) ह्यातून निर्माण होणे कठीण आहे किंवा अगदी झालाच तरी ते चार्जिंग एवढे कूर्म गतीने होईल कि तो पर्यंत तो सायकल चालक आपल्या मुक्कामी पोहचलेला असेल पण ७ किंवा ८ तास सायकल चालवून देखील ४ ते ५ टक्के हि चार्जिंग झाले नसेल.

तशा प्रकारच्या डायनामोने मोबाईलची बॅटरी चार्जिंग करणे अवघडच आहे. सायकलसाठी हब डायनामो मिळतो आणि तो वापरल्यास एकाच वेळेस मोबाईल बॅटरी आणि सायकलचा लाईट दोन्ही चार्ज करणे शक्य आहे.

श्रीकांत बोरवणकर's picture

19 Sep 2016 - 6:15 pm | श्रीकांत बोरवणकर

पूर्वी सायकलच्या फिरणार्‍या टायरला स्पर्श करेल व घर्षणाने फिरेल असा डायनामो लावीत...अजून ही लावत असावेत. त्या डायनामोतून तयार झालेल्या वीजेवर सायकलचा दिवा लागत असे ( तोच तो.... जो नसल्यास पोलीस दंड करीत व अवतीभवती इतका उजेड आहे तर दिवा कशाला हवा ? असे विचारल्यास अवतीभवती इतकी हवा आहे मग तुझ्या सायकलीच्या चाकात कशाला हवी हवा ? असे बोलून मामा चाकातली हवा सोडून देत असे या प्राचीन पी जे मधे ज्याचा उल्लेख येतो तो ) काही हौशी लोक यावर आणखी किरट्या आवाजात वाजणाराबजाज स्कूटर चा हॉर्न ही लावीत. त्या डायनामो वर ही मोबाईल चार्ज करता यावा अशी योजना करता येइल. तर अशा प्रकारचे डायनामोला जोडता येइल असे सर्किट (ज्यावर सध्याचे मोबाईल चार्जर डायरेक्ट लावता येइल ) हे पण एक प्रॉडक्ट होउ शकेल. किंवा डायनामो + दिवा + हॉर्न + चार्जर असे पूर्ण पॅकेज प्रॉडक्ट ही तयार होऊ शकेल . हे कुणी आधीच तयार केलेय का ते मात्र मी पाहील नाहीये.

हब डायनामो वापरुन हे शक्य आहे.