चांदोबा बाबत परत एकदा

गिड्डे's picture
गिड्डे in जनातलं, मनातलं
2 Sep 2016 - 3:25 pm

नमस्ते मित्रांनो
मी काही दिवसापुर्वी सर्व चांदोबा माझ्याकडे आहेत म्हणून एक पोस्ट टाकली होती . टाकताना असे वाटले की कोण वाचणार आणि कोण आजकाल वाचतो
पण मित्रांनो सुरेख प्रतिसाद मिळाला भरपूर जणानी तर मला वैयक्तिक मेसेजेस केले. कौतुक केले की तुम्ही हा ठेवा जपून ठेवलाय म्हणून
आनंद वाटला आणि जुने लहानपणीचे दिवस आठवले काय क्रेज होती त्यावेळेस असे साहित्य वाचनाची कॉमिक्स म्हणा चंपक चांदोबा आणि इतरही भरपूर भा रा भागवताचे फास्टर फेणे तर पर्वणीच असायची माझ्या मित्राकडे एक एरावत हत्ती आणि इंद्र हे पुस्तक होते त्याच्या मी किती मागे लागलो होतो की मला एकदा दे वाचायला मी तुला लगेच परत देइन पण त्याने ते दिले नाही मी आतापर्यंत त्याला कधी विषय निघाला तर म्हणतो साल्या मला तु पुस्तक दिले नाहीस बरका अजुन तो हसतो
पण मित्रांनो आजकालची मुले पाहीली तर त्याना एकतर इंग्रजी माध्यामातील असल्याने मराठी पुस्तकेच वाचता येत नाही मुळात पुस्तक वाचनाची गोडीच नसते त्यांच्यात
आइ वडीलच लावत नाहीत म्हणा ना
इथे पोस्ट केल्यानंतर काही जणानी असे म्हणले की तुम्ही काय तुमच्या कडील पुस्तकांची जाहिरात करताय काय मला त्याना असे सांगायचे आहे की मला फक्त एकच वाटायचे की आपल्याप्रमाणे कोणा कोणाला चांदोबा इ माहीत आहे
खरेतर मुळात चांगल्या वाचकाची सुरवात ही त्यांच्या लहानपणापासूनच सुरु होतेपण आज काल पूर्वीसारखे कसदार बालसाहित्यच निर्माण होत नाही असेल तर ते वाचकापर्यंत पोहचतच नाही यासाठी काहीतरी करायला हवे
असे वाटत नाहीका

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

जयन्त बा शिम्पि's picture

8 Sep 2016 - 8:12 am | जयन्त बा शिम्पि

मिपा वर " बाल विभाग " सुरु करुन त्यावर तुम्हीच कथांचे अनुवाद टाका, म्हणजे मी सुद्धा चांदोबातील अनुवादीत कथा
टाकीन. माझ्याकडे सुद्धा काही मोजके अंक आहेत .

मी पण अनुवादित बाल कथा टाकीन :)

यालाच जोडून एक पुरवणी प्रश्न (लोकसभेप्रमाणे) विचारावा वाटतो की मराठी आंतरजालाचे बालसाहित्यात कितपत योगदान आहे? नसेल तर ते वाढविण्यासाठी संस्थळे काय उपक्रम राबवत आहेत?

आदूबाळ's picture

8 Sep 2016 - 6:30 pm | आदूबाळ

हे एक मला माहीत आहे:

http://aisiakshare.com/brbind

अभ्या..'s picture

10 Sep 2016 - 12:32 pm | अभ्या..

लिंकवर गेलो आणी वरच्या बाजूलाच पॉर्न ओके प्लीज दिसले. ;)

बालसाहित्याबद्दल पटकन लक्षात येईल असे काही दिसले नाही.

मायबोली ह्या संस्थळावर लहान मुलांसाठी छोटे छोटे उपक्रम घेतले जातात, परंतु मुद्दाम बालसाहित्याविषयी काही उपक्रम सातत्याने राबवले आहेत असे कोठेही दिसले नाही.

अशी परिस्थिती आहे का?

धर्मराजमुटके's picture

10 Sep 2016 - 10:08 pm | धर्मराजमुटके

मुळात मराठी आंतरजालावर वावरणार्‍यांची तसेच फेस्बुकीय आणि व्हॉट्सपीय बोधामृत पाजणार्‍या आणि ते श्रद्धेने पिणार्‍यांची संख्या अजून प्रचंड मोठी आहे. ही जनता बुद्धीने बाल्यावस्थेतच आहेत त्यामुळे शारीरीक नव्हे पण मानसिक बालबुद्धीवाल्यांसाठी नक्कीच काही करावं अशी परिस्थिती आहे.

सिरुसेरि's picture

10 Sep 2016 - 11:53 am | सिरुसेरि

चांदोबा म्हणले की भल्लुककेतु , पद्मपाद हि पात्रे आणी काशांचा किल्ला अशा कथा आठवतात .

१. बालसाहित्य म्हणजे कोणता वयोगट घ्यायचा?
२. या वयोगटातील मुलांनी इंटरनेट पाहणं ही जोखीम आहे असं साधारणपणे मत आहे, कारण मुलं बालसाहित्य पाहता पाहता इतरही अनेक त्यांच्यासाठी नसलेल्या गोष्टी पाहू शकतील. त्याचं काय?
३. इंटरनेट म्हणजे प्रामुख्याने मोबाईल, टॅब आणि काँप्युटरवर. मुलांच्या डोळ्यांना त्रास होणारच. त्याचं काय?
४. मुलं खेळत नाहीत अशी तक्रार पालक करतात. इंटरनेटवर बालसाहित्य देऊन आपण त्यांच्या न खेळण्याला अजून खतपाणी घालतोय असं मला वाटतं. काय म्हणता?

मुलांनी इंटरनेट पाहत बसायला हवे असे नाही. समजा, लहान मुलांसाठी चांगल्या कथव, शात्रीय माहिती वगैरे काही साहित्यब्नेट्वरुन प्रसारीत होत असेल तर प्रिंट देऊ शकतो की वाचायला. हो, पुस्तके आहेत हे ठाऊकच आहे, पण हे पुरवणी समजूयात. चांगल्या माहितीपर डॉक्यूमेंटरीज वगैरे पहायला उपयोग करु घेऊ शकतो नेटचा. नेट म्हटले तर सुविधा आहे, म्हटले तर व्यसन. कसे वापरु त्यावर अवलंबून.

प्रत्यक्षात असं होईल असं वाटत नाही.

नाही, नॉट रिअली. हे करु शकतो बर्‍यापैकी सहजपणे, निदान काहीजण तरी. मात्र ह्या अ‍ॅक्टीव्हीटीज लहान मुलां'सोबत' पालकांना कराव्या लागतात ,इतकंच :) म्हणजे दिली आहे डॉक्यु लावून आणि मी चाललेय माझं काम करायला, ऐसा नही जमेगा.