नमस्कार,
आमच्या येथे श्री मिपा क्रुपेने..........
बरेच वर्ष मिपावर वाचन मात्र राहिल्यानंतर हळूहळू अंगात लेखकूचा संचार व्हायला लागला आणि मिपाचे सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला. हे म्हणजे काठावर बसून पाण्यात मौजमजा व दंगामस्ती करणाऱ्यांकडे बघून शेवटी भोपळा बांधून पाण्यात उडी घेण्यासारखेच होते. विचार केला, थोडे हात पाय मारून ...... आपलं. ...... कळफलक बडवून तर बघू जमतंय का. आणि काही मदत लागलीच तर तुमच्या सारखे सुहृद मिपाकर आहेतच मदतीला, तरंगायला नक्कीच मदत करतील, किमान बुडू तर देणार नाहीत.
मग निर्णय पक्का झाला.
परंतु तत्पूर्वी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे गरजेचे होते. त्यातील एक म्हणजे सदस्यनाम. स्वतःचे आंतर जालीय नाव स्वतःच ठरवायचे होते, म्हणजे तशी संधी उपलब्ध होती. हि तर माझ्या साठी सुवर्णसंधीच होती. मी त्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे ठरविले कारण माझे नाव ठेवताना मला कुणीही षष्प (जमलय का?) विचारले नव्हते. म्हणजे जे नाव घेऊन मी आयुष्यभर वावरणार त्या मध्ये मला काहीच से नव्हता. जे नाव माझ्यावर थोपवण्यात आले होते ते पुढे आयुष्यभर स्वीकारणे मला भाग होते. नाही म्हणायला काहींना पुढे नाव बदलण्याची संधी असते / मिळते तर काही कायदेशीर रित्या आपले नाव बदलून घेतात परंतु अशी उदाहरणे विरळच.
मग मी काय नाव घ्यावे याचा विचार करण्यास सुरवात केली. या कामी मला दशावतारातील साडे नववा सर्वव्यापी व सर्वज्ञानी यवनी अवतार गोगल देव याची मदत झाली. त्याला नेट पॅक आणि डेटाचा नैवेद्य दाखवल्यावर त्याने माहितीचा खजिना मज समोर रिता केला. अर्थात त्या बदल्यात त्याने माझी इत्यंभूत माहिती गोळा केली हे.वे.सां.न.ल. आणि या माहितीचा तो स्वतःच्या फायद्या साठी वापर करणार याची पूर्ण खात्री होती. परंतु काय करता, अडला आयडी गोगल देवाचे पाय धरी.
तर मी माझ्या स्वतःच्या 'आंजाना' चा (हि लघुरूपाची सवय मिपाचीच बर्का) e-नामकरण विधी या धाग्यावर करण्याचं ठरवलं आहे. तरी सर्वांनी या इमंत्रणाचा इस्वीकार करून इगत्य इण्याचें करावे ही इणंती. हा आंतर जालीय नामकरण विधी असल्या कारणाने २४/७ चा मुहूर्त आहे. आपली या धाग्यावर उपस्थिती जेव्हा असेल तोच मुहूर्त असणार आहे. केवळ वाचनमात्र न राहता पिंकरुपी "कोणी प्रतिसाद द्या कोणी टिपण्णी द्या" e-शुभाशीर्वाद देऊन नवजात मिपाबालके उपक्रुत करावे.
आपण सर्वांची उपस्तिथी प्रार्थनीय आहे. ज्या मिपाकराने या वर्षात किमान एक एकोळी का होईना धागा काढला आहे मग त्याला एक देखील प्रतिसाद नसला तरी चालेल अश्या सर्वांना इमंत्रण देण्यात आले आहे. मिपाकरांचे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गिकरण करण्यात आले आहे. त्या सर्वांनी एक एकटे किंवा कंपू करून धाग्यावर भेट दिले तरी चालेल. आपण सर्वांचे स्वागत आहे,
या व्यतिरिक्त सर्व मिपाकरांचा त्यांच्या मला आवडलेल्या धाग्यांच्या नवा सकट उल्लेख केला आहे. या सगळ्यांची तसेच इतर मिपाकर ज्यांचे नाव नजरचुकीने राहून गेले आहे त्यांची आणि वाचनमात्र असलेल्या मिपाकरांची उपस्तिथी देखील प्रार्थनीय आहे.
आणखी एक गोष्ट, हा माझा पहिलाच धागा ..... म्हंजे ट्यार्पी गोळा करण्याचा शीण प्रयत्न असा आरोप होण्याची शक्यता असून देखील हे सांगावे लागतेय याचे कारण एकच, जे सुज्ञ मिपाकरांनी ओळखले असेलच ...ट्यार्पीतुराणां ण भयम ण लज्जा... असो.
खालील वेगवेगळ्या ग्रुप्स / टोळ्या / कंपू सदस्यांना जाहीर इमंत्रण ....
एके काळचे सक्रिय परंतु आता केवळ वाचनमात्र असलेले धागा'वाच'स्पती
जालीय निवृत्ती घेतलेले, आता उरलो प्रतिसादापुरता असलेले मिपा सदस्य,
घाबरत, बिचकत प्रवेशणारे मुक्तपिठीय नवधागाकर
'पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्या' अशी याचना करत येणारे पहिलटकर मिपार्भकें
नवीन आयडी दिसला की रॅगिंगसाठी हल्लाबोल करीत धावणारे सिझन्ड सिनियर्स
नवीन आयडी आला की त्याची जालीय कुंडली मांडून खफ वरून इ मेल आयडी गाठणारे कुडमुडे मिपाकर
शांत, निरव धाग्यात पिंक टाकून जालीय तरंग बघणारे बकध्यानीय स्थितप्रज्ञ आयडीज
काडी पेटाव शास्त्राचे 'अनू'यायी धागापेटावकर
अजेंडा घेऊन येणारे धागाजेन्डाधारी
पेटलेल्या धाग्याच्या मदतीला येणारे धागाग्निशमन दलाचे सदस्य
खोडसाळ प्रतिसाद लिहिणारे धागाद्यतनयी
आपल्या धाग्यावर प्रतिसाद गोळा करणारे अद्यतनजन्य जन
तुझ्या धागा माझ्या धागा गुंफू पिंकांच्या माळा असणारे कंपू धारक
ट्यार्पी भक्त व जलेबीबाईचे आशिक
दिसला खांब की केला वर पाय असे जालीय श्वान
ताई, माई, बाई आणि बाबा, नाना, काका घेऊन येणारे फ्रती, फुरो, ऊर्ध्व गामी डूआयडीज
अचानक नवा आयडी घेऊन परकाया प्रवेश करणारे मिपाकर
वैयक्तिक हेवेदावे आणि score settling साठीच धाग्यावर येणारे scarecrow आयडीज
खोडसाळपणामुळे व्य. नि. व खव/खफ सुविधा वंचित, बेंच वर बसवलेले बेंचायडी
पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि नवीन आयडी शोधनम या उक्ती वर विश्वास असलेले पुनर्जिवी आयडीज
धाग्या पेक्षा मोठे व जड प्रतिसाद देणारे प्रतिसादांचे महामेरू, सकल कंपूस आधारू असे कंपूबाज
असंख्यावतारी डू, डू-डू, डू-डू-डू आयडीज
डावे, उजवे, डावीकडे झुकलेले उजवे आणि उजवीकडे झुकलेले डावे असे दिशामार्गी विचारवंतायडी
उत्कृष्ट पाकृ देणारे मिपा बल्लव
नवनवीन व फोटोजेनिक पाकृ देणाऱ्या मिपान्नपूर्णा
शेफ de मिपा cuisine असणारे शेफाचार्य
स्वयंपाकघरातील एखाद्या उपकरणाच्याच पाकृ देणारे मिप्फ्रायर
विविध ठिकाणी भेट देऊन धागा पाडणारे भटके धागेकरी
फक्त आणि फक्त परदेशातच टुर करणारे आर एन आय टुरकरी
इकला चालो बॉ असणारे एकांडे तर कळपाने भटकणारे टोळधाडी मिपाकर
एका मागे एक टुरचे धागे पाडणारे एपिसोडी धागारिस्ट
आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ असणारे आणि शहाणे करून सोडावे सकल जन या वर अढळ विश्वास असणारे तथाकथित मिपाज्ज्ञ
अनेकाविध विषयांवर सातत्याने धागे पडणारे जिल्बीकुलोत्पन्न
एकाच विषयाचे निरनिराळे धागे पडणारे एकानुवर्ती
एकमेकांच्या पॅथी वरून हमारीतुमरी वर येणारे पॅथीस्ट आणि त्यांचे एकानुमेव व व्यतिगत अनुभविष्ट पॅसिबो फॉलोवर्स
वादविवादात हार समोर दिसताच संपादक मंडळाकडे धाव घेणारे धागापटू
आयडी व डू आयडीच्या गदारोळात मिपासंन्यासाची धमकी देणारे त्रागेकरी
वादविवादात विचार मांडण्यात पेक्षा लिंक्स ( दुवे ) देणारे लिंकाधीपती
धागे काढून छुपी जाहिरात करणारे धागेरुस्तुम
आंतरजालीय लघुरूपे वापरून मिनी, मायक्रो, नॅनो प्रतिसाद टाकणारे लघुत्तम आयडीज
आपल्या कंपूतील मित्राच्या धाग्यावर प्रतिसादांचा भडीमार करून तया धागाभूमे प्रतिसादो वर्धितोहम असणारे धागादंडाधिपती
अनेकाविध संस्थळावर लीलया संचार करणारे धागाविहारी
तू नाही तो और सही न्यायाने ट्यार्पीसाठी धागा एका संस्थळावरून दुसरीकडे नेणारे सर्वव्यापि
विविध संस्थळांच्या नाडीवर बोट असलेले सर्वज्ञायडी
मिपावर आणि इतर संस्थळावर विविध रूपे घेणारे बहुआयडीरूपी
आयडी वा डूआयडी वा माहित असणारे धागाधर्मी
विविध निष्ठांची मांदियाळी असलेले तत्वनिष्ठ टोळीकर जिरगा-वादी मिपाकर
या खाण्यावर शतदा प्रेम करणारे खादडखाऊ
मिपा पेक्षा मिसळ आणि पाव यातच जास्त विंटरेस्ट घेणारे कट्टेकरी
वेगवेगळ्या ठिकाणच्या फूड जॉइंट्सना भेट देऊन धागे काढणारे फूड जंकी
कोल्हापुरी चांगली का पुणेरी चांगली यावर जाहीर वादविवाद घालणारे मिसळभोक्ते
एकमेकांना कट्टयांची निमंत्रणे देणारे कट्टेमंत्री
कट्टे वृत्तांताची स्पेशालिटी असलेले कट्टेवार्ताहर
कट्टयांसाठी कोसो दूर स्वयंचलित अश्व दौडणारे कट्टेकरी
फटू नसतील तर कट्टा नाकारणारे कट्टेजज्ज
खादाडीचे सुंदर फटू आणि वृत्तांत देणारे इनो विक्री प्रतिनिधी
कार्यालयात खादाडीचे फटू पाहून आणि वृत्तांत वाचून जळजळणारे आभासी कट्टेकरी
रिकामा मिपाकर धाग्याला पिंक लावी असणारे रिकामटेकडे मिपाकर
धागा भलतीकडे वळवून हायजॅक करणारे मिपाजॅकर
उत्खनन करून जुने पुराणे धागे प्रतिसाद देऊन वर काढणारे पुरातत्ववेत्ते मिपाकर
आलेल्या प्रत्येक धाग्यावर प्रतिसादाची पिंक टाकल्या शिवाय चैन न पडणारे जालीय पीण्कतामुल पिंकपती
आपल्या प्रत्येक धाग्याच्या शेवटी क्रमशः लिहून उत्सुकता चाळवणारे सिक्वेली मिपाकर
दूरदेशी राहून मातृभू ची सय येणारे विदेशी मिपाकर
येणाराय येणाराय असे सांगत कधी न येणारे एनआरआय मिपाकर
परदेशी राहून भारतीय संस्कृतीच्या नावाने गळे काढणारे आणि here or to go च्या संभ्रमात अडकलेले भाभाभा (भारतसे भागे भारतीय ) मिपाकर
भारतात राहणारे परंतु मी चुकून भारतात जन्मलो (पूर्व जन्मीचे पाप, दुसरे काय?) यावर दृढ विश्वास असणारे आर एन आय (रेसिडेंट नॉन इंडियन् ) निवासी अभारतीय मिपाकर
र ला ट जोडून छंद, वृत्त, यमक इति आदी फाट्यावर मारणारे नवमिपाकवी
नवीन धागा अथवा कविता आल्या आल्या विडंबन पात्र घेऊन धावणारे स्मश्रुकर मिपायडीज
एकोळी, द्विओती, तीनोळी किंवा चारोळी धागे काढून मिपा वरील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करणारे माहितीसंकलक धागेकरी
एखाद्या धाग्यावर पॉपकॉर्न्स + चणेफुटाणे & चखणा + पेय्य घेऊन वरच्या फांदीवर बसून धाग्यावरची धुमश्चक्री मजेत बघणारे डोमायडी
प्रतिसादांमध्ये emoji, emoticons, ३D स्टिकर्स घेऊन येणारे मिपोजी
लवकरच धागा घेऊन येतोय येतोय अशी जाहिरात करणारे मात्र कधीच न येणारे टीझरायडीज
अशा टीझरायडींच्या मागे धाग्यासाठी भुणभुण लावणारे भुणभुणायडीज
धाग्याच्या विषयाकडे लक्ष देण्या ऐवजी फक्त व्याक्रणाकडेच व्यक्रोक्तीने बघणारे मिपाणिनी
फक्त साहित्य, काव्य, शास्त्र, वेद, पुराणे इति आदी विषयांवर गहण चर्चा करणारे अभिजनायडी
आणि फक्त ग्रामीण विषयांवर गावरान व बोली भाषेत लिहिणारे बहुजनायडी
सुपारी घेऊन धागा चालवणारे मि(सु)पारी धागा बूस्टर
नव आयडींना सांभाळून घेणारे, प्रोत्साहन देणारे चिअर लीडर आयडी
नव आयडींच्या चुका दाखवून दुरुस्त करणारे मिपा-द-रिपेअरर
नव आयडींना विविध मार्गदर्शन करणारे जालीय तांत्रिक मिपाकर
यासगळ्या भाऊगर्दीत शांत, समंजस, समतोल लिखाण व प्रतिसाद देणारे सभ्य मिपाकर (द्विरुक्ती बद्दल क्षमस्व)
यासर्व खिचडीची मोट बांधून आपल्या फावल्या वेळात मिपाचा गाडा हाकणारे सरपंच व संपादक मंडळ
तसेच
खालील मिपाकरांना अगत्याचे इमंत्रण .........
सुट्लेल्या पोटाचे उत्सवी आनंद मोरे, विरहाचं लोंचं ते रुसण्याचा लोच्यावाल्या bhagyashri sati ......, घोस्ट हंटर DEADPOOL, तुळशीबागेत हरवलेले Dinesh Satpute, सुखाची भेट टाळणारे drsunilahirrao, खडकाळ jsjendra, illusionist Hrushikesh Marathe, डिजिटल हमाल IT hamal, हनुमान उडी वाले Jack_Bauer, स्पेस जंकी Keanu, एयर फ्रायर Kedar Dixit, बाऊमकुखंनी Mrunalini, मकाजी-कोंडाजी-माधवजी नाशिक चिवडा, ट्यार्पी चे शिलेदार Nile, साकेश्वरी पराग पुरंदरे, अठरा विसे गुणकारी Pearl, BRM नाईट रायडर sagarpdy, गण्या राम्या ची B CET Sanjay Kokare, Sanjay TU-Wach Sanjay Uwach, डॉल्बी पिंजराकर shawshanky, ध्रमकीपंथ sश्रिकान्त, कोऱ्या पाटीचे vcdatrange, stillbirth Vidyadhar1974, स्वच्छ भारतीय अँन्ड्रोमेडा, पिसारी फ्लोरेंस अजया, केस रंगारी अत्रन्गि पाउस, रामप्पा अद्द्या, आधारकार्डाचा आधार अनन्न्या, स्वयंसिद्धा अनाहिता, अनाहूत सल्ला, सुसंवादी अनिकेत एस जोशी, देवदास अनिरुद्ध प्रभू, चिजाळलेला अनुप कुलकर्णी, अश्शी सासू अन्नू, हुच्चभ्रू अन्या दातार, सैराटी नजर अपरिचित मी, ब्रोकरी तार अभिजीत अवलिया, ताडोबाचा वाघोबा अभिदेश, ड्वोरॅकी अभिनव, भूकेला अभिषेक पांचाळ, पोष्टर बॉय अभ्या, पोशाखी अमृता_जोशी, दे टाळी अमोल केळकर, कांहीही ह अरुण मनोहर, स्वप्नधुंद अर्धवट, कबड्डीपटू अल्पिनिस्ते, बेधुंद अविनाश लोंढे, बोकीब्र अविनाशकुलकर्णी, अव्यक्त mediclaim, पॉम पॉम चलती अश्विनी वैद्य, मोल्टन चॉकलेटी असंका, सुरवरपुजित अस्वस्थामा, आंबट चिंच आर्ची, बांडुंगचा आकाश खोत, रिसर्चि ...... आगाऊ म्हादया, शिकाम्बा-मशाम्बा आतिवास, धर्मामिटर आत्मबंध, - (वॉ. द. फ.) आदिजोशी, आयड्याबाज आनंद कांबीकर, अडला हरी .... आनंद घारे, (याऽऽऽहूनंदी) मघई तांबूल चिकित्सक आनंदी गोपाळ, कर्मविपाकी आनन्दा, लय भारी ! आशु जोग, डच गुलाब इशा१२३, रोझेटा स्टोन (उगा) काहितरीच, नूगा मसाजर उडन खटोला, चेन्नईकर उमेश पाटील, हायकू उल्का, बेळ्ळी ऊध्दव गावंडे, ओव्हरहेडेड ए ए वाघमारे, १ १टा १टाच एक एकटा एकटाच, जगण शिकणारा एकप्रवासी, सुलताना १कुलता १ डॉन, 'स्थितप्रज्ञ' एस, डाइनमो कंजूस, अगुंबे कबीरा, शिकारी कल्पतरू, टी.सी. कविता१९७८, हॅचबॅकी सेकंड हॅण्ड काकासाहेब केंजळे, ..दा आणि खा.. कानडाऊ योगेशु, मेसो मायानी किलमाऊस्की, बहुरूपी किसन शिंदे, HARRY HARLOW कुमारकौस्तुभ, कौ शिकलेले लै हुशार कौशिक लेले, केजरूके गुलाम क्लिंटन, वाघोबा खटपट्या, तर्राट खटासि खट, पौंड्रक खामुं-पाधुं, तीर्थजननी खुशि, जालीय फेरीवाला खेडूत, टुकारघोडे! गंगाधर मुटे, बाबा गनुश गणपा, Rs. २५१ गऊपा, (जीव गुंतला)रे गणेशा, दा विमान कोड आणि वक्षखिंडीचा लढवय्या गवि, सायलेंट ऑबझव्हर गॅरी शोमन, ढोरवाडीचा घाटी फ्लेमिंगो, कुक्कुट शर्विलक चलत मुसाफिर, कासेची लंगोटी चांदणे संदीप, ...बेभान... चाणक्य, को जागर्ती ! चाफा, भांगी फ्लॉरेन्स नाईटिंगेल चिगो, 'शातो द होल्कार' चित्रगुप्त, इंग्लिश विन्ग्लीश ! चिनार, शोकांतिक चेसुगु, चतुर बोलू की घोडा वोलू चौरा, कळसुबाईचा जगप्रवासी, इब्न बतूत जयंत कुलकर्णी, "येडाय का तु?" जव्हेरगंज, डार्विनच्या माकडांचा जहीर सय्यद, तों.पा.सु का ? जागु, नावडती जानु, एक खेळिया जे.पी.मॉर्गन, मिपास्तोत्रजनक जेपी, प्युअरसोतम - ला - देस्पांद ज्ञानव, चार अंग वस्रे असलेले ज्ञानोबाचे पैजार, लिइरि...लग्न...डिवोर्स ज्योति अलवनि, अर्रे पांडुब्बा .. टका, आधुनिक सिंदबाद डॉ सुहास म्हात्रे, स्क्वेअर फुट तर्राट जोकर, मिस्टर प्रामाणिक तिमा, मुंबई गर्ल ! तुमचा अभिषेक, उडता करण दिनु गवळी, चिंतू तूर दिनेश५७, कुssssफ्लिssssयेवाला दिपक.कुवेत, सामानाच्या पिशवीची सखू धन्या, तापवतोय रिक्षावाला ! धर्मराजमुटके, जिल्बिकंडशमनमठ्ठाझलकार नाखु, लाईफलोंग ब्याचलर निशांत_खाडे, विदेशी चिट्टा नीलमोहर, चूत्झस्पा पगला गजोधर, डाव्या शेपटीचा विचारजंत परा, विस्तवदुरडी पश्मीना पालीचा खंडोबा, दीक्षितांच्या बाईचा दणका पिंपातला उंदीर, पॉपकॉर्न क्विन! पिलीयन रायडर, व्हिपलॅश आणि कट्यार पिशी अबोली, सोनीबाई घी पुणे मुंग्रापं, नर्मदामैय्याकी देन पैसा तै, मर्कट फोटोग्राफर प्रचेतस, यज्ञकर्मी पेठकर काका, नोटे वरचा गणपती प्रमोद देर्देकर, ईक्विटी बीटकॉईन प्रसाद भागवत, नैतिक मास्तरांची लावणी प्रा.डॉ., आजींची इच्छा प्राची अश्विनी, औट घटकेचा पिझ्झा..प्राजु, फेसबुकी आवसमला फुंटी, दा मिपा कोडं बहुगुणी, A.K.का बंदा बाबा पाटील, बिर्याणीस्तोत्र रचयिता अगस्ती बट्टमन - पुणकदेशस्थ प्रौढमिरजकर सदाशिविस्तानी ब्याटमन भौ, मोसादी स्केअरक्रो बोका-ए-आझम, अवलिया कर्णपिशाच्च मंदार कात्रे, अनबॉक्सिंग चिनम्मा-चिलकम्मा मदनबाण, वर्मन फ़्राऊ. मधुरा देशपांडे, गुरु ग्यानी परिमळ मनमेघ, सायबर कॅफेतलं सुंबरान मकाले, इशकजादा अवधूत मांत्रिक, तुका कुल्यार जांय....माधुरी विनायक, उपयुक्त अडगळ पंखा मामलेदाराचा, मिपा Ode प्रेमकोष मारवा, C कॅटेगरी पोपशात्री मार्कस ऑरेलियस, मार्गस्थं सायकलस्वार मार्गी, जोलीची मार्मिक जालीय कुंडलीकर गोडसे, रम्भा - शुक संवादाचा माहितगार, बिअरशॉपचा बेवडा ५० फक्त, इग्नोरू नका राया ३_१४ विक्षिप्त अदिती, बिन डिग्रीचा बिलिनिअर हेमंत लाटकर, ४७ थंड डोक्यांचा हुप्प्या, लास वेगसची काजूकतली हृषिकेश पांडकर, धांगडधिंग्याची शिक्षा सुधागड हकु, सा. सं. चा जिलबीवाला स्वामी संकेतानंद, हेलो हॅन्सऽऽऽम पॉपॉय स्वीट टॉकर, डिंकेल्सब्युलची रॅटॅटूई स्वाती दिनेश, आर्क्टीकची छावणी स्पार्टाकस, Abandoned स्पा, कोल्हापुरी हिसकावाली हाणा! मारा!! ठेचा!!! British lady स्पंदना, टोप्टिगिनच्या अकादमीचा रुमाल सोन्याबापु, सवा डॉलरचा हुच्च बोका सूड, मनमोर मतवाली सुरन्गी, कट्टा वजनाचा - समुद्र पूर्वेचा "सु + बोध + खरे", ठष्ट सेल्फी सुधीर वैद्य, चांदण्यातील रेटारेटीला अलविदा सुधीर काळे, ओरिगामीची टॅक्सिडर्मी सुधांशुनूलकर, लाल जनीकेचा सुज्ञ लोलक, मन्या आणि डावक्याचा शागिर्द सिरिसेरु, गांजाडी जिझिया च शांतीदेवी, सावजीची सातारी चिमीचांगी चंपाकळी सानिकास्वप्निल, साध्या मुलाची टिवटिव, जय जय्य सहेबां समर्थ शुसश्रीके, माझी प्रिया माझी मैत्रेण सर्वसाक्षी, सैराट सायकॅमोर समीरसूर, प्रेमरतनची सैराट कार्टी समीर hgl, अंकोरवटचा समर्पक पेरू, बाटली चखाना आणि चादर सतीश गावडे, नथ्थुरामचा धर्मगंड संदीप ताम्हनकर, एका स्कॉर्पियोचे मिड-ब्रेन अॅटक्टीवेशन संदीप डांगे, नागोबुढा उपवर तरुण श्रीरंग_जोशी, १ अलिबाबा आणि ४० निधर्मांध श्रीगुरुजी, लिव श्रीकृष्ण सामंता लिव्ह, ऑब्जेक्षन माय ज्युरी शेंडेनक्षत्र, उद्वाहकाने उधगमंडलमला शान्तिप्रिय, सनी लिओनी आणि महर्षींची नाडी शशिकांत ओक, एबीएस एक्सेलवाला वेल्लाभट, अमलतासच्या बिल्ली मौसीचे षड्यंत्र विवेकपटाईत, मा फलेशु विठाचन विवेक ठाकूर, फ्लर्ट मी नॉट जोजीमोजी विनायक प्रभू, लिझ्झी आय लव्ह यू........विजुभाऊ, वीट आणणार्याव काकूंचे हे विटेकर, -व्हिस्की टँगो फॉक्सट्रॉट धमाल मुलगा, ( सौंदर्य प्रेमी) तम्मा टार्याआ, अत्रुप्तबाबा स्मायली वाले
पुन्हा एकदा वरील सर्व मिपाकरांना माझ्या नामकरण विधीच्या धाग्याला भेट देऊन पिंक रुपी e-शुभाशीर्वाद नवजात मिपा बालके द्यावेत हि आग्रहाची इणंती करणेत येत आहे.
ढिसक्लेमर : मी डू आयडी नसून वरिजनल आयडी आहे याची नोंद घ्यावी तरी धाग्यांवरून इ-मेल आयडी गाठायचा प्रयत्न क्रू नये किंवा ००७ च्या रोल मध्ये शिरून माय नेम इज बॉण्ड, धागा बॉण्ड च्या स्टाईलने नसत्या उचापती क्रू नये, तात्काळ M ( संपादक मंडळी) कडून दट्ट्या लावणेत येईल.
प्रतिक्रिया
8 Aug 2016 - 6:23 pm | सूड
नक्की काय हवंय तुम्हाला काकाकाकू?
बाकी ते लिनाकनाटा, पिनाकोलाडा सारखं वाटतंय. मोहिनी अवताराच्या शुभेच्छा!!