माझ्या आंतर जालीय इ-नामकरण विधीचे इमंत्रण

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in जनातलं, मनातलं
6 Aug 2016 - 3:25 am

नमस्कार,

आमच्या येथे श्री मिपा क्रुपेने..........

बरेच वर्ष मिपावर वाचन मात्र राहिल्यानंतर हळूहळू अंगात लेखकूचा संचार व्हायला लागला आणि मिपाचे सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला. हे म्हणजे काठावर बसून पाण्यात मौजमजा व दंगामस्ती करणाऱ्यांकडे बघून शेवटी भोपळा बांधून पाण्यात उडी घेण्यासारखेच होते. विचार केला, थोडे हात पाय मारून ...... आपलं. ...... कळफलक बडवून तर बघू जमतंय का. आणि काही मदत लागलीच तर तुमच्या सारखे सुहृद मिपाकर आहेतच मदतीला, तरंगायला नक्कीच मदत करतील, किमान बुडू तर देणार नाहीत.

मग निर्णय पक्का झाला.

परंतु तत्पूर्वी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे गरजेचे होते. त्यातील एक म्हणजे सदस्यनाम. स्वतःचे आंतर जालीय नाव स्वतःच ठरवायचे होते, म्हणजे तशी संधी उपलब्ध होती. हि तर माझ्या साठी सुवर्णसंधीच होती. मी त्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे ठरविले कारण माझे नाव ठेवताना मला कुणीही षष्प (जमलय का?) विचारले नव्हते. म्हणजे जे नाव घेऊन मी आयुष्यभर वावरणार त्या मध्ये मला काहीच से नव्हता. जे नाव माझ्यावर थोपवण्यात आले होते ते पुढे आयुष्यभर स्वीकारणे मला भाग होते. नाही म्हणायला काहींना पुढे नाव बदलण्याची संधी असते / मिळते तर काही कायदेशीर रित्या आपले नाव बदलून घेतात परंतु अशी उदाहरणे विरळच.

मग मी काय नाव घ्यावे याचा विचार करण्यास सुरवात केली. या कामी मला दशावतारातील साडे नववा सर्वव्यापी व सर्वज्ञानी यवनी अवतार गोगल देव याची मदत झाली. त्याला नेट पॅक आणि डेटाचा नैवेद्य दाखवल्यावर त्याने माहितीचा खजिना मज समोर रिता केला. अर्थात त्या बदल्यात त्याने माझी इत्यंभूत माहिती गोळा केली हे.वे.सां.न.ल. आणि या माहितीचा तो स्वतःच्या फायद्या साठी वापर करणार याची पूर्ण खात्री होती. परंतु काय करता, अडला आयडी गोगल देवाचे पाय धरी.

तर मी माझ्या स्वतःच्या 'आंजाना' चा (हि लघुरूपाची सवय मिपाचीच बर्का) e-नामकरण विधी या धाग्यावर करण्याचं ठरवलं आहे. तरी सर्वांनी या इमंत्रणाचा इस्वीकार करून इगत्य इण्याचें करावे ही इणंती. हा आंतर जालीय नामकरण विधी असल्या कारणाने २४/७ चा मुहूर्त आहे. आपली या धाग्यावर उपस्थिती जेव्हा असेल तोच मुहूर्त असणार आहे. केवळ वाचनमात्र न राहता पिंकरुपी "कोणी प्रतिसाद द्या कोणी टिपण्णी द्या" e-शुभाशीर्वाद देऊन नवजात मिपाबालके उपक्रुत करावे.

आपण सर्वांची उपस्तिथी प्रार्थनीय आहे. ज्या मिपाकराने या वर्षात किमान एक एकोळी का होईना धागा काढला आहे मग त्याला एक देखील प्रतिसाद नसला तरी चालेल अश्या सर्वांना इमंत्रण देण्यात आले आहे. मिपाकरांचे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गिकरण करण्यात आले आहे. त्या सर्वांनी एक एकटे किंवा कंपू करून धाग्यावर भेट दिले तरी चालेल. आपण सर्वांचे स्वागत आहे,

या व्यतिरिक्त सर्व मिपाकरांचा त्यांच्या मला आवडलेल्या धाग्यांच्या नवा सकट उल्लेख केला आहे. या सगळ्यांची तसेच इतर मिपाकर ज्यांचे नाव नजरचुकीने राहून गेले आहे त्यांची आणि वाचनमात्र असलेल्या मिपाकरांची उपस्तिथी देखील प्रार्थनीय आहे.

आणखी एक गोष्ट, हा माझा पहिलाच धागा ..... म्हंजे ट्यार्पी गोळा करण्याचा शीण प्रयत्न असा आरोप होण्याची शक्यता असून देखील हे सांगावे लागतेय याचे कारण एकच, जे सुज्ञ मिपाकरांनी ओळखले असेलच ...ट्यार्पीतुराणां ण भयम ण लज्जा... असो.

खालील वेगवेगळ्या ग्रुप्स / टोळ्या / कंपू सदस्यांना जाहीर इमंत्रण ....

एके काळचे सक्रिय परंतु आता केवळ वाचनमात्र असलेले धागा'वाच'स्पती
जालीय निवृत्ती घेतलेले, आता उरलो प्रतिसादापुरता असलेले मिपा सदस्य,
घाबरत, बिचकत प्रवेशणारे मुक्तपिठीय नवधागाकर
'पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्या' अशी याचना करत येणारे पहिलटकर मिपार्भकें
नवीन आयडी दिसला की रॅगिंगसाठी हल्लाबोल करीत धावणारे सिझन्ड सिनियर्स
नवीन आयडी आला की त्याची जालीय कुंडली मांडून खफ वरून इ मेल आयडी गाठणारे कुडमुडे मिपाकर

शांत, निरव धाग्यात पिंक टाकून जालीय तरंग बघणारे बकध्यानीय स्थितप्रज्ञ आयडीज
काडी पेटाव शास्त्राचे 'अनू'यायी धागापेटावकर
अजेंडा घेऊन येणारे धागाजेन्डाधारी
पेटलेल्या धाग्याच्या मदतीला येणारे धागाग्निशमन दलाचे सदस्य
खोडसाळ प्रतिसाद लिहिणारे धागाद्यतनयी
आपल्या धाग्यावर प्रतिसाद गोळा करणारे अद्यतनजन्य जन
तुझ्या धागा माझ्या धागा गुंफू पिंकांच्या माळा असणारे कंपू धारक
ट्यार्पी भक्त व जलेबीबाईचे आशिक
दिसला खांब की केला वर पाय असे जालीय श्वान
ताई, माई, बाई आणि बाबा, नाना, काका घेऊन येणारे फ्रती, फुरो, ऊर्ध्व गामी डूआयडीज
अचानक नवा आयडी घेऊन परकाया प्रवेश करणारे मिपाकर
वैयक्तिक हेवेदावे आणि score settling साठीच धाग्यावर येणारे scarecrow आयडीज
खोडसाळपणामुळे व्य. नि. व खव/खफ सुविधा वंचित, बेंच वर बसवलेले बेंचायडी
पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि नवीन आयडी शोधनम या उक्ती वर विश्वास असलेले पुनर्जिवी आयडीज
धाग्या पेक्षा मोठे व जड प्रतिसाद देणारे प्रतिसादांचे महामेरू, सकल कंपूस आधारू असे कंपूबाज
असंख्यावतारी डू, डू-डू, डू-डू-डू आयडीज
डावे, उजवे, डावीकडे झुकलेले उजवे आणि उजवीकडे झुकलेले डावे असे दिशामार्गी विचारवंतायडी

उत्कृष्ट पाकृ देणारे मिपा बल्लव
नवनवीन व फोटोजेनिक पाकृ देणाऱ्या मिपान्नपूर्णा
शेफ de मिपा cuisine असणारे शेफाचार्य
स्वयंपाकघरातील एखाद्या उपकरणाच्याच पाकृ देणारे मिप्फ्रायर

विविध ठिकाणी भेट देऊन धागा पाडणारे भटके धागेकरी
फक्त आणि फक्त परदेशातच टुर करणारे आर एन आय टुरकरी
इकला चालो बॉ असणारे एकांडे तर कळपाने भटकणारे टोळधाडी मिपाकर
एका मागे एक टुरचे धागे पाडणारे एपिसोडी धागारिस्ट

आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ असणारे आणि शहाणे करून सोडावे सकल जन या वर अढळ विश्वास असणारे तथाकथित मिपाज्ज्ञ
अनेकाविध विषयांवर सातत्याने धागे पडणारे जिल्बीकुलोत्पन्न
एकाच विषयाचे निरनिराळे धागे पडणारे एकानुवर्ती
एकमेकांच्या पॅथी वरून हमारीतुमरी वर येणारे पॅथीस्ट आणि त्यांचे एकानुमेव व व्यतिगत अनुभविष्ट पॅसिबो फॉलोवर्स
वादविवादात हार समोर दिसताच संपादक मंडळाकडे धाव घेणारे धागापटू
आयडी व डू आयडीच्या गदारोळात मिपासंन्यासाची धमकी देणारे त्रागेकरी
वादविवादात विचार मांडण्यात पेक्षा लिंक्स ( दुवे ) देणारे लिंकाधीपती
धागे काढून छुपी जाहिरात करणारे धागेरुस्तुम
आंतरजालीय लघुरूपे वापरून मिनी, मायक्रो, नॅनो प्रतिसाद टाकणारे लघुत्तम आयडीज
आपल्या कंपूतील मित्राच्या धाग्यावर प्रतिसादांचा भडीमार करून तया धागाभूमे प्रतिसादो वर्धितोहम असणारे धागादंडाधिपती
अनेकाविध संस्थळावर लीलया संचार करणारे धागाविहारी
तू नाही तो और सही न्यायाने ट्यार्पीसाठी धागा एका संस्थळावरून दुसरीकडे नेणारे सर्वव्यापि
विविध संस्थळांच्या नाडीवर बोट असलेले सर्वज्ञायडी
मिपावर आणि इतर संस्थळावर विविध रूपे घेणारे बहुआयडीरूपी
आयडी वा डूआयडी वा माहित असणारे धागाधर्मी
विविध निष्ठांची मांदियाळी असलेले तत्वनिष्ठ टोळीकर जिरगा-वादी मिपाकर

या खाण्यावर शतदा प्रेम करणारे खादडखाऊ
मिपा पेक्षा मिसळ आणि पाव यातच जास्त विंटरेस्ट घेणारे कट्टेकरी
वेगवेगळ्या ठिकाणच्या फूड जॉइंट्सना भेट देऊन धागे काढणारे फूड जंकी
कोल्हापुरी चांगली का पुणेरी चांगली यावर जाहीर वादविवाद घालणारे मिसळभोक्ते
एकमेकांना कट्टयांची निमंत्रणे देणारे कट्टेमंत्री
कट्टे वृत्तांताची स्पेशालिटी असलेले कट्टेवार्ताहर
कट्टयांसाठी कोसो दूर स्वयंचलित अश्व दौडणारे कट्टेकरी
फटू नसतील तर कट्टा नाकारणारे कट्टेजज्ज
खादाडीचे सुंदर फटू आणि वृत्तांत देणारे इनो विक्री प्रतिनिधी
कार्यालयात खादाडीचे फटू पाहून आणि वृत्तांत वाचून जळजळणारे आभासी कट्टेकरी

रिकामा मिपाकर धाग्याला पिंक लावी असणारे रिकामटेकडे मिपाकर
धागा भलतीकडे वळवून हायजॅक करणारे मिपाजॅकर
उत्खनन करून जुने पुराणे धागे प्रतिसाद देऊन वर काढणारे पुरातत्ववेत्ते मिपाकर
आलेल्या प्रत्येक धाग्यावर प्रतिसादाची पिंक टाकल्या शिवाय चैन न पडणारे जालीय पीण्कतामुल पिंकपती
आपल्या प्रत्येक धाग्याच्या शेवटी क्रमशः लिहून उत्सुकता चाळवणारे सिक्वेली मिपाकर

दूरदेशी राहून मातृभू ची सय येणारे विदेशी मिपाकर
येणाराय येणाराय असे सांगत कधी न येणारे एनआरआय मिपाकर
परदेशी राहून भारतीय संस्कृतीच्या नावाने गळे काढणारे आणि here or to go च्या संभ्रमात अडकलेले भाभाभा (भारतसे भागे भारतीय ) मिपाकर
भारतात राहणारे परंतु मी चुकून भारतात जन्मलो (पूर्व जन्मीचे पाप, दुसरे काय?) यावर दृढ विश्वास असणारे आर एन आय (रेसिडेंट नॉन इंडियन् ) निवासी अभारतीय मिपाकर
र ला ट जोडून छंद, वृत्त, यमक इति आदी फाट्यावर मारणारे नवमिपाकवी
नवीन धागा अथवा कविता आल्या आल्या विडंबन पात्र घेऊन धावणारे स्मश्रुकर मिपायडीज
एकोळी, द्विओती, तीनोळी किंवा चारोळी धागे काढून मिपा वरील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करणारे माहितीसंकलक धागेकरी
एखाद्या धाग्यावर पॉपकॉर्न्स + चणेफुटाणे & चखणा + पेय्य घेऊन वरच्या फांदीवर बसून धाग्यावरची धुमश्चक्री मजेत बघणारे डोमायडी
प्रतिसादांमध्ये emoji, emoticons, ३D स्टिकर्स घेऊन येणारे मिपोजी
लवकरच धागा घेऊन येतोय येतोय अशी जाहिरात करणारे मात्र कधीच न येणारे टीझरायडीज
अशा टीझरायडींच्या मागे धाग्यासाठी भुणभुण लावणारे भुणभुणायडीज
धाग्याच्या विषयाकडे लक्ष देण्या ऐवजी फक्त व्याक्रणाकडेच व्यक्रोक्तीने बघणारे मिपाणिनी
फक्त साहित्य, काव्य, शास्त्र, वेद, पुराणे इति आदी विषयांवर गहण चर्चा करणारे अभिजनायडी
आणि फक्त ग्रामीण विषयांवर गावरान व बोली भाषेत लिहिणारे बहुजनायडी
सुपारी घेऊन धागा चालवणारे मि(सु)पारी धागा बूस्टर

नव आयडींना सांभाळून घेणारे, प्रोत्साहन देणारे चिअर लीडर आयडी
नव आयडींच्या चुका दाखवून दुरुस्त करणारे मिपा-द-रिपेअरर
नव आयडींना विविध मार्गदर्शन करणारे जालीय तांत्रिक मिपाकर
यासगळ्या भाऊगर्दीत शांत, समंजस, समतोल लिखाण व प्रतिसाद देणारे सभ्य मिपाकर (द्विरुक्ती बद्दल क्षमस्व)

यासर्व खिचडीची मोट बांधून आपल्या फावल्या वेळात मिपाचा गाडा हाकणारे सरपंच व संपादक मंडळ

तसेच

खालील मिपाकरांना अगत्याचे इमंत्रण .........

सुट्लेल्या पोटाचे उत्सवी आनंद मोरे, विरहाचं लोंचं ते रुसण्याचा लोच्यावाल्या bhagyashri sati ......, घोस्ट हंटर DEADPOOL, तुळशीबागेत हरवलेले Dinesh Satpute, सुखाची भेट टाळणारे drsunilahirrao, खडकाळ jsjendra, illusionist Hrushikesh Marathe, डिजिटल हमाल IT hamal, हनुमान उडी वाले Jack_Bauer, स्पेस जंकी Keanu, एयर फ्रायर Kedar Dixit, बाऊमकुखंनी Mrunalini, मकाजी-कोंडाजी-माधवजी नाशिक चिवडा, ट्यार्पी चे शिलेदार Nile, साकेश्वरी पराग पुरंदरे, अठरा विसे गुणकारी Pearl, BRM नाईट रायडर sagarpdy, गण्या राम्या ची B CET Sanjay Kokare, Sanjay TU-Wach Sanjay Uwach, डॉल्बी पिंजराकर shawshanky, ध्रमकीपंथ sश्रिकान्त, कोऱ्या पाटीचे vcdatrange, stillbirth Vidyadhar1974, स्वच्छ भारतीय अँन्ड्रोमेडा, पिसारी फ्लोरेंस अजया, केस रंगारी अत्रन्गि पाउस, रामप्पा अद्द्या, आधारकार्डाचा आधार अनन्न्या, स्वयंसिद्धा अनाहिता, अनाहूत सल्ला, सुसंवादी अनिकेत एस जोशी, देवदास अनिरुद्ध प्रभू, चिजाळलेला अनुप कुलकर्णी, अश्शी सासू अन्नू, हुच्चभ्रू अन्या दातार, सैराटी नजर अपरिचित मी, ब्रोकरी तार अभिजीत अवलिया, ताडोबाचा वाघोबा अभिदेश, ड्वोरॅकी अभिनव, भूकेला अभिषेक पांचाळ, पोष्टर बॉय अभ्या, पोशाखी अमृता_जोशी, दे टाळी अमोल केळकर, कांहीही ह अरुण मनोहर, स्वप्नधुंद अर्धवट, कबड्डीपटू अल्पिनिस्ते, बेधुंद अविनाश लोंढे, बोकीब्र अविनाशकुलकर्णी, अव्यक्त mediclaim, पॉम पॉम चलती अश्विनी वैद्य, मोल्टन चॉकलेटी असंका, सुरवरपुजित अस्वस्थामा, आंबट चिंच आर्ची, बांडुंगचा आकाश खोत, रिसर्चि ...... आगाऊ म्हादया, शिकाम्बा-मशाम्बा आतिवास, धर्मामिटर आत्मबंध, - (वॉ. द. फ.) आदिजोशी, आयड्याबाज आनंद कांबीकर, अडला हरी .... आनंद घारे, (याऽऽऽहूनंदी) मघई तांबूल चिकित्सक आनंदी गोपाळ, कर्मविपाकी आनन्दा, लय भारी ! आशु जोग, डच गुलाब इशा१२३, रोझेटा स्टोन (उगा) काहितरीच, नूगा मसाजर उडन खटोला, चेन्नईकर उमेश पाटील, हायकू उल्का, बेळ्ळी ऊध्दव गावंडे, ओव्हरहेडेड ए ए वाघमारे, १ १टा १टाच एक एकटा एकटाच, जगण शिकणारा एकप्रवासी, सुलताना १कुलता १ डॉन, 'स्थितप्रज्ञ' एस, डाइनमो कंजूस, अगुंबे कबीरा, शिकारी कल्पतरू, टी.सी. कविता१९७८, हॅचबॅकी सेकंड हॅण्ड काकासाहेब केंजळे, ..दा आणि खा.. कानडाऊ योगेशु, मेसो मायानी किलमाऊस्की, बहुरूपी किसन शिंदे, HARRY HARLOW कुमारकौस्तुभ, कौ शिकलेले लै हुशार कौशिक लेले, केजरूके गुलाम क्लिंटन, वाघोबा खटपट्या, तर्राट खटासि खट, पौंड्रक खामुं-पाधुं, तीर्थजननी खुशि, जालीय फेरीवाला खेडूत, टुकारघोडे! गंगाधर मुटे, बाबा गनुश गणपा, Rs. २५१ गऊपा, (जीव गुंतला)रे गणेशा, दा विमान कोड आणि वक्षखिंडीचा लढवय्या गवि, सायलेंट ऑबझव्हर गॅरी शोमन, ढोरवाडीचा घाटी फ्लेमिंगो, कुक्कुट शर्विलक चलत मुसाफिर, कासेची लंगोटी चांदणे संदीप, ...बेभान... चाणक्य, को जागर्ती ! चाफा, भांगी फ्लॉरेन्स नाईटिंगेल चिगो, 'शातो द होल्कार' चित्रगुप्त, इंग्लिश विन्ग्लीश ! चिनार, शोकांतिक चेसुगु, चतुर बोलू की घोडा वोलू चौरा, कळसुबाईचा जगप्रवासी, इब्न बतूत जयंत कुलकर्णी, "येडाय का तु?" जव्हेरगंज, डार्विनच्या माकडांचा जहीर सय्यद, तों.पा.सु का ? जागु, नावडती जानु, एक खेळिया जे.पी.मॉर्गन, मिपास्तोत्रजनक जेपी, प्युअरसोतम - ला - देस्पांद ज्ञानव, चार अंग वस्रे असलेले ज्ञानोबाचे पैजार, लिइरि...लग्न...डिवोर्स ज्योति अलवनि, अर्रे पांडुब्बा .. टका, आधुनिक सिंदबाद डॉ सुहास म्हात्रे, स्क्वेअर फुट तर्राट जोकर, मिस्टर प्रामाणिक तिमा, मुंबई गर्ल ! तुमचा अभिषेक, उडता करण दिनु गवळी, चिंतू तूर दिनेश५७, कुssssफ्लिssssयेवाला दिपक.कुवेत, सामानाच्या पिशवीची सखू धन्या, तापवतोय रिक्षावाला ! धर्मराजमुटके, जिल्बिकंडशमनमठ्ठाझलकार नाखु, लाईफलोंग ब्याचलर निशांत_खाडे, विदेशी चिट्टा नीलमोहर, चूत्झस्पा पगला गजोधर, डाव्या शेपटीचा विचारजंत परा, विस्तवदुरडी पश्मीना पालीचा खंडोबा, दीक्षितांच्या बाईचा दणका पिंपातला उंदीर, पॉपकॉर्न क्विन! पिलीयन रायडर, व्हिपलॅश आणि कट्यार पिशी अबोली, सोनीबाई घी पुणे मुंग्रापं, नर्मदामैय्याकी देन पैसा तै, मर्कट फोटोग्राफर प्रचेतस, यज्ञकर्मी पेठकर काका, नोटे वरचा गणपती प्रमोद देर्देकर, ईक्विटी बीटकॉईन प्रसाद भागवत, नैतिक मास्तरांची लावणी प्रा.डॉ., आजींची इच्छा प्राची अश्विनी, औट घटकेचा पिझ्झा..प्राजु, फेसबुकी आवसमला फुंटी, दा मिपा कोडं बहुगुणी, A.K.का बंदा बाबा पाटील, बिर्याणीस्तोत्र रचयिता अगस्ती बट्टमन - पुणकदेशस्थ प्रौढमिरजकर सदाशिविस्तानी ब्याटमन भौ, मोसादी स्केअरक्रो बोका-ए-आझम, अवलिया कर्णपिशाच्च मंदार कात्रे, अनबॉक्सिंग चिनम्मा-चिलकम्मा मदनबाण, वर्मन फ़्राऊ. मधुरा देशपांडे, गुरु ग्यानी परिमळ मनमेघ, सायबर कॅफेतलं सुंबरान मकाले, इशकजादा अवधूत मांत्रिक, तुका कुल्यार जांय....माधुरी विनायक, उपयुक्त अडगळ पंखा मामलेदाराचा, मिपा Ode प्रेमकोष मारवा, C कॅटेगरी पोपशात्री मार्कस ऑरेलियस, मार्गस्थं सायकलस्वार मार्गी, जोलीची मार्मिक जालीय कुंडलीकर गोडसे, रम्भा - शुक संवादाचा माहितगार, बिअरशॉपचा बेवडा ५० फक्त, इग्नोरू नका राया ३_१४ विक्षिप्त अदिती, बिन डिग्रीचा बिलिनिअर हेमंत लाटकर, ४७ थंड डोक्यांचा हुप्प्या, लास वेगसची काजूकतली हृषिकेश पांडकर, धांगडधिंग्याची शिक्षा सुधागड हकु, सा. सं. चा जिलबीवाला स्वामी संकेतानंद, हेलो हॅन्सऽऽऽम पॉपॉय स्वीट टॉकर, डिंकेल्सब्युलची रॅटॅटूई स्वाती दिनेश, आर्क्टीकची छावणी स्पार्टाकस, Abandoned स्पा, कोल्हापुरी हिसकावाली हाणा! मारा!! ठेचा!!! British lady स्पंदना, टोप्टिगिनच्या अकादमीचा रुमाल सोन्याबापु, सवा डॉलरचा हुच्च बोका सूड, मनमोर मतवाली सुरन्गी, कट्टा वजनाचा - समुद्र पूर्वेचा "सु + बोध + खरे", ठष्ट सेल्फी सुधीर वैद्य, चांदण्यातील रेटारेटीला अलविदा सुधीर काळे, ओरिगामीची टॅक्सिडर्मी सुधांशुनूलकर, लाल जनीकेचा सुज्ञ लोलक, मन्या आणि डावक्याचा शागिर्द सिरिसेरु, गांजाडी जिझिया च शांतीदेवी, सावजीची सातारी चिमीचांगी चंपाकळी सानिकास्वप्निल, साध्या मुलाची टिवटिव, जय जय्य सहेबां समर्थ शुसश्रीके, माझी प्रिया माझी मैत्रेण सर्वसाक्षी, सैराट सायकॅमोर समीरसूर, प्रेमरतनची सैराट कार्टी समीर hgl, अंकोरवटचा समर्पक पेरू, बाटली चखाना आणि चादर सतीश गावडे, नथ्थुरामचा धर्मगंड संदीप ताम्हनकर, एका स्कॉर्पियोचे मिड-ब्रेन अॅटक्टीवेशन संदीप डांगे, नागोबुढा उपवर तरुण श्रीरंग_जोशी, १ अलिबाबा आणि ४० निधर्मांध श्रीगुरुजी, लिव श्रीकृष्ण सामंता लिव्ह, ऑब्जेक्षन माय ज्युरी शेंडेनक्षत्र, उद्वाहकाने उधगमंडलमला शान्तिप्रिय, सनी लिओनी आणि महर्षींची नाडी शशिकांत ओक, एबीएस एक्सेलवाला वेल्लाभट, अमलतासच्या बिल्ली मौसीचे षड्यंत्र विवेकपटाईत, मा फलेशु विठाचन विवेक ठाकूर, फ्लर्ट मी नॉट जोजीमोजी विनायक प्रभू, लिझ्झी आय लव्ह यू........विजुभाऊ, वीट आणणार्याव काकूंचे हे विटेकर, -व्हिस्की टँगो फॉक्सट्रॉट धमाल मुलगा, ( सौंदर्य प्रेमी) तम्मा टार्याआ, अत्रुप्तबाबा स्मायली वाले

पुन्हा एकदा वरील सर्व मिपाकरांना माझ्या नामकरण विधीच्या धाग्याला भेट देऊन पिंक रुपी e-शुभाशीर्वाद नवजात मिपा बालके द्यावेत हि आग्रहाची इणंती करणेत येत आहे.

ढिसक्लेमर : मी डू आयडी नसून वरिजनल आयडी आहे याची नोंद घ्यावी तरी धाग्यांवरून इ-मेल आयडी गाठायचा प्रयत्न क्रू नये किंवा ००७ च्या रोल मध्ये शिरून माय नेम इज बॉण्ड, धागा बॉण्ड च्या स्टाईलने नसत्या उचापती क्रू नये, तात्काळ M ( संपादक मंडळी) कडून दट्ट्या लावणेत येईल.

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

उडन खटोला's picture

6 Aug 2016 - 4:14 am | उडन खटोला

अभ्यास चांगला पण अपुरा आहे. काही ठोशिव आणि ठाशीव नावं राहिली आहेत जिसका भूगतान आपको करना ही पडेगा!
नाव ठेवून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

नाव ठेवायला आत्या येतेय तोपर्यंत ट्याह्याँ चालू द्या.

बब्बो काय अभ्यास काय अभ्यास, -/\- माझ नाव न्य ह्यात ज्जा कट्टी :(

अभ्या..'s picture

6 Aug 2016 - 11:34 am | अभ्या..

तू, तुझा प्रिंसदादा, तुझा परश्या नाही दिसले तवाच कॅटेगरी कळली आयडीची.
नवीन आयडीत जुन्या दुश्मन्या आणि जुन्या फ्रेंडलिस्ट कशाला बरे इम्पोर्ट कराव्यात?

पियुशा's picture

6 Aug 2016 - 11:36 am | पियुशा

कनचा आयडी ? ? ? ? माझा एकुअलता एक आय डी आहे मिपावर आजतागाय्त , क्या समझे भाउ :)

अभ्या..'s picture

6 Aug 2016 - 11:38 am | अभ्या..

माझे माय, तुला कुणी बोल लावनां ग.
नीट वाचती का प्रतिसाद.

मला अजुन पण नाही कळला तुझा प्रतिसाद , म्हणजे परशा प्रिन्स माझा डु आय दी आहे अस म्हनायच का तुला?
मी आता उपोषनालाच बसनारे ,एक पण दू आयडी दिला नय मला अजुन बाकिच्याना कसे देअतात सर्खे सार्खे ये जुलुम हे अन्याव हे :प्प

बस बाय बस, खाऊन पिऊन उपोषण कर.
ए हिला कोणतरी लिंबूपाणी नावाचा आयडी द्या रे.

पियुशा's picture

6 Aug 2016 - 12:44 pm | पियुशा

छी...... अस्सा आय डी नकोच मजला , बादवे आपले किती आहेत ;)

अभ्या..'s picture

6 Aug 2016 - 12:58 pm | अभ्या..

एकच आयडी एकच बायडी

लीना कनाटा's picture

8 Aug 2016 - 8:36 am | लीना कनाटा

म्हणजे मिपा मधला एक पत्नी एक बाणी श्रीराम च कि तू अभ्या..

नाखु's picture

6 Aug 2016 - 11:49 am | नाखु

एक पा कॄ टाकावी ही या ठिकाणी मी विनंती करतो.

अखिल मिपा जालीय ऊपोषण आणि जालीय संन्यास घेता काय ,घेतला काय, घेणार काय संघटना.

अश्याच नाम साधर्म्याची ची एक संघटना आहे पण त्यांचे नावात काय चे ऐवजी कधी असा शब्दबदल आहे याची नोंद घ्यावी.

नाखु खुलासावार

लीना कनाटा's picture

7 Aug 2016 - 4:18 am | लीना कनाटा

तू, तुझा प्रिंसदादा, तुझा परश्या नाही दिसले

हे अर्ची, प्रिंसदादा, परश्या कोण आहेत?

अगं मिपाची ' मंजुळें ' जरा इस्कटून सांगशील का?

पियुशा's picture

7 Aug 2016 - 3:51 pm | पियुशा

अगं मिपाची ' मंजुळें ' जरा इस्कटून सांगशील का?
नाय कट्ट्टी...... आहे आपली बोलु नका बै १२ महिने ,तुमच्या कनाटा वरुन मला कसाटा आइसक्रिम खायची तिव्र इच्छा झालिय ( पळते आता )

उडन खटोला's picture

7 Aug 2016 - 4:47 pm | उडन खटोला

कधीपासून होतंय असं???
सध्या घशाची infections सुरु आहेत बरं. सांभाळून.

पियुशा's picture

7 Aug 2016 - 5:59 pm | पियुशा

ओक्के काका;)

अच्छा! असे कनेक्शन आहे तर ;)
घुग-या कुठे आहेत?

पैसा's picture

6 Aug 2016 - 12:32 pm | पैसा

लोकांची कनेक्शन कसली बघताय, आपली सांभाळा.

सालस's picture

6 Aug 2016 - 12:45 pm | सालस

कनेक्शन - एक सांभाळणे
आमच्या दीर्घ कादंब्रीची नोंदणी सुरु आहे.जरुर लाभ घ्या.
आपला जालीय काका
सालस

अजया's picture

6 Aug 2016 - 12:49 pm | अजया

:)

पैसा's picture

6 Aug 2016 - 1:02 pm | पैसा

आमचे ब्रॉडबँड कनेक्शन बंद असताना हे प्रतिसाद कोण देतोय. माझा डु आयडी सुद्धा हॅक झाला. जालसंन्यास घेतलेला बरा. :(

लीना कनाटा's picture

7 Aug 2016 - 4:07 am | लीना कनाटा

आवं अजया तै, मोदी सरकारच्या राज्यात डाळी किती म्हाग झाल्याती तवा तुरीच्या घुगऱ्या ठिवल्या न्हायती आन तशीबी आजकाल डाळीत लै खडी निघत्याती, एकांद्याचा दात बीत पडायचा कि वो घुगऱ्या खाताना ....... तुमाला मातूर बरंच हाय म्हणायचं कि तस्स झालं तर :)

मुक्त विहारि's picture

6 Aug 2016 - 7:28 am | मुक्त विहारि

अभ्यास जोरदार केलेला दिसतोय.

स्रुजा's picture

6 Aug 2016 - 7:40 am | स्रुजा

कुणाचे डु आयडी म्हणायचे तुम्ही? पहिले २ परिच्छेद चांगला आव आणलात नवीन आयडीचा मग गेलात की हो वळणावर.. आडवळणी मिपाकर तेवढे राहिले बघा निमंत्रणात ;)

हे बालक साधारण नव्हे.....

पाय पाळणा तोडून बाहेर आलेत...ही ही ही...

अभ्या..'s picture

6 Aug 2016 - 8:52 am | अभ्या..

योगभ्रष्ट जीव आहे. पूर्वजन्माचे संचित दिसते हो.

नाखु's picture

6 Aug 2016 - 8:55 am | नाखु

साध्या पाळण्यातले नसून या

आहे.

p

निरिक्षक नाखु

लीना कनाटा's picture

7 Aug 2016 - 8:41 pm | लीना कनाटा

नाखुकाका,

व्वा, छान आयडिया दिलीत कि.....

त्या जत्रेच्या गर्दीत नव मिपा बालकाची आणि त्याच्या पालकांची ताटातूट होते. मग नाखु काका काकू त्या बालकाचा (इथे बालक किंवा बालिका असे ज्याच्या त्याच्या इच्छे प्रमाणे कल्पावे) सांभाळ करतात. पुढे कर्मधर्मसंयोगाने एका धाग्यावर बालकाची आणि ट्यार्पी व जलेबीबाई या त्याच्या मूळ मिपीय पालकांची भेट होते. तेव्हा ते बालक डू आयडी घेण्यास किंवा आयपी ऍड्रेस बदलण्यास बाणेदारपणे नकार देऊन नाखु काका व काकूं बरोबर राहाण्याचा निर्णय घेते इत्यादी इत्यादी .....

एक मस्त जिलेबीच काय इमृती देखील पाडता येईल पुढे मागे.

आणि कपूरांच्या केकताताई तर ' क्यून्की मिपा सदस्य भी कभी बालक था ' अशी सिरिअलचं पाडतील :)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Aug 2016 - 9:05 am | अत्रुप्त आत्मा

@हे बालक साधारण नव्हे.....

पाय पाळणा तोडून बाहेर आलेत...ही ही ही...››› +++१११

अट्यंटिक शमत हाय!

संदीप डांगे's picture

6 Aug 2016 - 8:59 am | संदीप डांगे

माझं नाव शोधून देणारास एक मस्तानी...

लालगरूड's picture

6 Aug 2016 - 9:06 am | लालगरूड

एका
स्कॉर्पियोचे मिड-ब्रेन अॅटक्टीवेशन संदीप डांगे, ;-)

आनन्दा's picture

6 Aug 2016 - 9:30 am | आनन्दा

मी पण एक आंबा देईन म्हणतो.

लालगरूड's picture

6 Aug 2016 - 9:05 am | लालगरूड

मी दोन वर्षे जुना असून मला एवढे आयडी माहित नाही... नक्कीच हा छूप जुना आयडी आहे

लीना कनाटा's picture

6 Aug 2016 - 11:47 pm | लीना कनाटा

कारण अभ्यास....... लीना म्हणे.......

टवाळ कार्टा's picture

6 Aug 2016 - 9:24 am | टवाळ कार्टा

=))

तुम्ही इत्ता मुक्त विहार किलाय मिपावर सगळ्यास्नी वळखताय.
इ-नाव्हाने काइ क्रुती करन्हार?

तुम्ही कुठल्या बॅचचं म्हणायच ?

तिमा's picture

6 Aug 2016 - 10:07 am | तिमा

प्रामाणिकपणे सांगायचं तर, 'साठी' च्या वेळेस बारसं उरकण्याचा बेत दिसतोय.
आता मात्र, मिपावासीयांना 'आम्ही तुमचं बारसं जेवलोय' असं म्हणता येईल.

लीना कनाटा's picture

7 Aug 2016 - 3:29 am | लीना कनाटा

" तिम्मा शेठ, या मिपा लीलेत तुझ्यावर मोठे दायित्व सोपवले आहे. तेव्हा शारीरिक वय आणि जालीय वय यांची तुलना करण्याची चूक पुन्हा करू नकोस. "

देवा, क्षमा असावी. चुकून मिष्टेक झाली. इथून पुढे मी या मिपा लीलेत माझ्यावर सोपवण्यात आलेल्या दायित्वाचे नेहमी स्मरण ठेवीन.

( * )

* येथे किंचितसे स्मित करून, किंचितशी मान लववून, डावा हात किंचितसा वाकवून स्वीकार करण्यात आला आहे असे कल्पावे.

लीना कनाटा's picture

7 Aug 2016 - 10:01 pm | लीना कनाटा

* येथे किंचितसे स्मित करून, किंचितशी मान लववून, डावा हात किंचितसा वाकवून क्षमा याचनेचा स्वीकार करण्यात आला आहे असे वाचावे.

चंपाबाई's picture

6 Aug 2016 - 10:38 am | चंपाबाई

छान

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Aug 2016 - 10:41 am | ज्ञानोबाचे पैजार

काय अब्यास काय अब्यास
मारुतीरायाची आठवण झाली. तो पण लाहानपणीच सुर्याला पकडायला गेला होता.
पैजारबुवा,

चतुरंग's picture

6 Aug 2016 - 11:10 am | चतुरंग

तो पण लाहानपणीच सुर्याला पकडायला गेला होता.

या पैजारमाऊलीच्या षटकाराने स्व.दादा कोंडक्यांचे 'अंजनीच्या सुता' हे फेमस गाणं आठवलं त्यात 'बालपणी गेलासी तू सूर्याला धराया' ही ओळ आहे..सादर आहे
https://youtu.be/X0BFbnAXu-U

(अंजनीसुतप्रेमी)रंगा

रातराणी's picture

6 Aug 2016 - 11:01 am | रातराणी

काय चिकाटी! काय अभ्यास!

महासंग्राम's picture

6 Aug 2016 - 11:09 am | महासंग्राम

मी डू आयडी नसून वरिजनल आयडी आहे याची नोंद घ्यावी पुरावा काय ???

पुणेकर भामटा's picture

6 Aug 2016 - 11:55 am | पुणेकर भामटा

आम्हाला आवताण न्हाय, डवाळे पाणावले :'(

चांदणे संदीप's picture

6 Aug 2016 - 12:10 pm | चांदणे संदीप

काय हो नवनामधारकमिपायडी.....आमच्या कासेची लंगोटीच दिसली का फक्त??

बाकी, कहर लेख आहे हा! "काहीही हं" चा कोटीवा घात! ;)

Sandy

चतुरंग's picture

6 Aug 2016 - 12:18 pm | चतुरंग

या 'घातात' कोटी आहे का? ;)

घात आकड्याच्या वर लिहितात तर त्याला अप घात का म्हणत नाहीत? ;)

चतुरंग's picture

6 Aug 2016 - 12:30 pm | चतुरंग

मार्कांचा अपघात करुन घ्यायची इच्छा असली तर जरुर म्हणू शकता!;)

नाखु's picture

6 Aug 2016 - 12:36 pm | नाखु

दुसर्याच्या (अ)पायात आला तर त्याला घातपात असे म्हणतात असे ऐकून आहे.

विखि's picture

6 Aug 2016 - 2:08 pm | विखि

मारुती च्या शेपटीवानी

हे सगळे काय व कशाबद्दल आहे ते कळले की मग नक्की येऊ.

पैसा's picture

6 Aug 2016 - 3:17 pm | पैसा

तुमच्या id मध्ये दुसरा शब्द नाटकाशी संबंधित आहे का? :)

लीना कनाटा's picture

6 Aug 2016 - 10:56 pm | लीना कनाटा

नाटकांशी संबंध ? छे छे अगदी नाटकायण .... आपलं ..... बादरायण देखील संबंध नाही.

सिरुसेरि's picture

6 Aug 2016 - 3:21 pm | सिरुसेरि

मजेदार इमंत्रण पत्रिका . तरी ती "आमच्या आत्याच्या लग्नाला / बारशाला नक्की यायचं हं - बाल इमंत्रक - चि. चिंटु , चि. पिंटु ,कु. चिंगी आणी कु. मिंगी " हि ओळ राहिली .

हरकाम्या's picture

6 Aug 2016 - 4:26 pm | हरकाम्या

हा एवढा खटटोप कशासाठी चाललाय हेच कळत नाही. आपले सन्स्थळ " नीट " चालावे आणि दीर्घायु ठरो.

आमंत्रण लै आवडलं पण आमच नाव नसल्यानं आणलेला आहेर घेऊन परत जातेय :( :(

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

6 Aug 2016 - 4:37 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

आमचं येवढं लांबडं नाव असताना ,आमचे नाव नाही हे ब्रोब्र केले नाही,पुन्हा अशी चूक क्रु नये.

जव्हेरगंज's picture

6 Aug 2016 - 6:53 pm | जव्हेरगंज

=))

पिशी अबोली's picture

6 Aug 2016 - 6:57 pm | पिशी अबोली

हैला.. आमचंबी नाव हाय की..

चला, मिपावरच्या एकातरी लिष्टीत नाव आलं याबद्दल आपण खुश. डुआय नसून वरिजिनल आयडी आहोत हे भासवण्यासाठी काही भाषाशास्त्रीय मदत लागल्यास सांगा बरं का लीनाकाका/आजोबा/मावशी/आत्या/भाऊ/अक्का.

कौशी's picture

6 Aug 2016 - 8:27 pm | कौशी

आम्हाला पण निमंत्रण नाही,.....

सोंड्या's picture

6 Aug 2016 - 9:09 pm | सोंड्या

"स्वतःचे आंतर जालीय नाव स्वतःच ठरवायचे होते, म्हणजे तशी संधी उपलब्ध होती. हि तर माझ्या साठी सुवर्णसंधीच होती. मी त्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे ठरविले कारण माझे नाव ठेवताना मला कुणीही षष्प (जमलय का?) विचारले नव्हते.">> जलमल्या जलमल्या मिपाबालकाला शष्प बद्दल माहिती झाला.
देवा रे घोर कल्युग.

तर मित्रांनो, आता आपले अध्यक्ष श्री.बिरुटे सरांना विनंती करतो की, कु.लिना कनाटा यांच पुस्पगुच्च देऊन स्वागत कराव आणी कार्यक्रमाची सुत्र हाती घ्यावी.
-
नवलेखकाला दे प्रोत्साहाण समिती.

संदीप डांगे's picture

6 Aug 2016 - 11:22 pm | संदीप डांगे

दे मार समिती वाटते आहे;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2016 - 7:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लीना कटाका यांचं मिपावर मन:पूर्वक स्वागत. आपलं एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. भविष्यकाळात आपल्याकड़ून उत्तम लेखन होईल (तसं कै वाटत नै) मिपाकरांचे काही क्षण आनंदात जातील असं कार्य आपल्याकड़ून घडो, आपणास शुभेच्छा देतो, माझे स्वागत पर दोन शब्द संपवतो.

अवांतर : लीना कनाटा हा ब्रांड नव्या बाटलीत जूनं औषध आहे, असं निरीक्षण नोंदवतो. :)

-दिलीप बिरुटे

आनन्दिता's picture

7 Aug 2016 - 9:12 am | आनन्दिता

खरा शब्द पुस्पगुच्च असा आहे हे निरिक्षणास आणुन देते आणि माझे दोन शब्द संपवते.

जय हिंद जय महाराष्ट्र , जय मिपा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2016 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढच्या वेळी न चुकता लिहिन हं ! मैत्री दिनाच्या शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

गामा पैलवान's picture

7 Aug 2016 - 12:13 pm | गामा पैलवान

प्राडॉ,

आमच्या शाळेतली कार्टी हा शब्द ऐकल्यावर लगेच पुच्छगुच्छ अशी दुरुस्ती करायची. मास्तर असूनही तुम्हाला या शब्दाचं खरं रूप ठाऊक नाही हे पाहून अंमळ खेद वाटला. ;-)

आ.न.,
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2016 - 12:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ठीक आहे, पुढल्या वेळी पुच्छगुच्छ. लिहीन. =))

-दिलीप बिरुटे

आदूबाळ's picture

7 Aug 2016 - 12:59 pm | आदूबाळ

=))

पुच्छगुच्छ! लोळलो हसून!

अजया's picture

7 Aug 2016 - 5:22 pm | अजया

अगागा =)))

उडन खटोला's picture

7 Aug 2016 - 8:45 pm | उडन खटोला

आ न गामा पै,
अभ्यास वाढवा.
बाकी पुच्छगुच्छ हा शब्द प्रयोग बरा आहे.

गामा पैलवान's picture

7 Aug 2016 - 11:31 pm | गामा पैलवान

उख,

अभ्यास वाढवायची आवश्यकता नाहीये हो! त्या अलंकारास वटाश्वत्थवल्कोक्ती अशी (गापैनिर्मित) संज्ञा आहे. सुलभ मराठीत त्यास वडाची साल पिंपळाला लावणे म्हणतात. ;-)

आ.न.,
-गा.पै.

चतुरंग's picture

7 Aug 2016 - 11:05 pm | चतुरंग

पुच्छगुच्छ! हा आमच्या शाळेत सुद्धा फेमस होता शब्द...

एस's picture

6 Aug 2016 - 10:17 pm | एस

आमच्या येथे श्री मिपा क्रुपेने..........

बरीचशी ओळखीची वाटतेय ही ओळ. पूर्वी प्रतिसाद झाला होता. आता धागा झाला. छान प्रगती आहे. असो. धाग्यामध्ये माझ्याही सर्वात आवडत्या धाग्याचा उल्लेख केलात, याबद्दल धन्यवाद.

कपिलमुनी's picture

7 Aug 2016 - 12:22 am | कपिलमुनी

यंदा मोहिनी अवतार आहे तर..

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Aug 2016 - 12:53 am | माम्लेदारचा पन्खा
खटपट्या's picture

7 Aug 2016 - 1:12 am | खटपट्या

ओके वळख जाहली. आता जीलब्या पाडा दोन चार...

राजेश घासकडवी's picture

7 Aug 2016 - 4:38 am | राजेश घासकडवी

माझं नाव घ्यायला विसरलात, पण इतका अभ्यास करून इतका लांबलचक लेख लिहिल्यामुळे तुम्हाला क्षमा केलेली आहे.

लीना नाव वाचून आतिवासचं सविता होतं तसं नाव अनिल असावं असं वाटलं. मात्र कनाटा उलटं केलं तर अतनक अातनक, आतानक, आतानाक, आतनाक, अतनाक, अटनक, आटनक, आटानक, आटानाक... अतणक, आतणक, आताणक... अटणक, आटनक... वगैरे प्रचंड वेगवेगळी कॉंबिनेशनं भंडावायला लागली.

लीना कनाटा's picture

7 Aug 2016 - 6:28 am | लीना कनाटा

अर्रर्र गुर्जी तुमचा ' विश्वाचे आर्त माझ्या किबोर्डी प्रकटले ' धागा होता कि या वर्षीचा. कसा काय मिसला कोणास ठाऊक.
सवारी बर्का आणि माफ केल्या बद्दल ठांकु.

Nevertheless, तुम्ही नवजात मिपा बालके शुभाशीर्वाद द्यायला आलात या बद्दल आभार.

बाकी माझ्या साध्या, सरळ नावाची फोड करणारे तुम्ही मिपाचे शेरलॉक होम्स कि काय न कळे......

संदीप डांगे's picture

7 Aug 2016 - 11:25 am | संदीप डांगे

ज्यांना हा कोंणी जुना आयडी आहे असे वाटते ते सरळ सांगत का नई कोण आहे ते ???

गामा पैलवान's picture

7 Aug 2016 - 12:18 pm | गामा पैलवान

ओ लीनाबाई,

माझं नाव विसरलांत. आता तुमच्या बारशाला येण्यासाठी मला तोतायानाम घ्यायला हवं. बरं ते जाउदे. कनाटा हे नाटकाचं वर्णविपर्यस्त रूप आहे का? तुमचं नाव लीना नाटका असं धरावं का? तुम्ही बाईचं नाव धारण केलेले पुरूष आहात का? असे बरेच प्रश्न उमटले.

आ.न.,
-गा.पै.

लीना कनाटा's picture

8 Aug 2016 - 8:03 am | लीना कनाटा

माई मोड ऑन

अरे पैगामा, किती प्रश्न विचारशील? तुम्ही पुरुष आहात का? स्त्री आहात का? काय अन काय....
आपण जेंडर न्युट्रल असूच शकत नाही का असा ह्यांचा प्रश्न .....

माई मोड ऑफ

गामाजी, तोतया नाम घेऊन का होईना नवजात मिपा बालकाला शुभाशीर्वाद दिले याबद्दल आभार.

उडन खटोला's picture

7 Aug 2016 - 1:33 pm | उडन खटोला

हा माझा ड्यु आयडी नाही. धन्यवाद. ;)

नूतन सावंत's picture

7 Aug 2016 - 6:06 pm | नूतन सावंत

मिपावय लहान असून लैच अब्यास केलेला दिसतोय,दु आयडी नाही हे बोबलून सांगायची काय आवश्यकता आहे म्हणते मी.

ऋतुराज चित्रे's picture

8 Aug 2016 - 12:08 pm | ऋतुराज चित्रे

हुषार आहे हा नवा आयडी. जवळपास २०० मिपाकरांना अगत्याचे इमंत्रण देउन किमान २०० प्रतिसाद नक्की केले.

पेशवा भट's picture

8 Aug 2016 - 12:08 pm | पेशवा भट

पण ज्याने कोणी तुला " ए लीना , चल ना" " असं म्हंटलं तो आयडी कसा तुला आठवला नाही? एवढ्यातच विरसलीस?

हे येरागबाळ्याचं काम नव्हं!! मुरलेला गडी दिसतोय!!

प्रसाद गोडबोले's picture

8 Aug 2016 - 5:31 pm | प्रसाद गोडबोले

C कॅटेगरी पोपशात्री मार्कस ऑरेलियस

वाह वाह , इतक्या ओपनली आम्हाला कोणत्याही बाईंनी सांगितले नव्हते की त्याही आम्हाला C कॅटेगरी मधे पकडतात !
वाह मजा आली ! दिल गार्डन गार्डन हो गया!

(तुम्ही जर DEFG कॅटेगरी मध्ये नसाल तर ....) लीनाबाई , वाड्यावर या !!