मला आवडलेला शायर- राहत इंदोरी

सुंड्या's picture
सुंड्या in जनातलं, मनातलं
28 Jul 2016 - 12:03 am

रात्रीचा एक वाजला होता दिल्लीच्या जीयासराय मधील अष्टशीला निवासाच्या २ऱ्या तळावरील चवथ्या रूममध्ये मी, माझा रूम पार्टनर संतोष, आणि दोन ‘शेजारी’- बाजूचे ‘प्रधानजी’ आणि वरच्या रूममधला संदीप असे तिघे चकाट्या पिटत होतो (संतोष फक्त ऐकायचा).प्रधानजींनी संदीपची काहीतरी चिमटी काढली आणि संदीपने सहज उत्स्फूर्त आवाजात हे म्हणन सुरु केलं-

उसकी कत्थई आंखो मे है जंतर-मंतर सब,
चाकू-वाकू छुरीया-वूरीया खंजर-वंजर सब

जबसे तुम रुठी हो मुझसे रुठे रुठे से राहते है,
तकिया-वकीया चादर-वादर बिस्तर-विस्तर सब

मै कब डूबुंगा फिक्र किया करते है,
कश्ती-वश्ती, दर्या-वर्या लंगर-वंगर सब...

“वा वाह!!.....गजब” -मी
“जियो क्या बात है!”-प्रधानजी
भुवया उडवत संदीप जग जिंकल्याप्रमाणे खुश होत आमच्याकडे तिरप्या नजरेनं बघत-
“बस कुछ दिनो पेहलेही लिखी है”
“अर्रे वाह मजा आ गया, बहुत ही बढीया लिखा है”- मी अतिशय प्रभवित झालो होतो.
“सच मे बहुत हुनर है तुम मे....बहुत आगे जाओगे...इस सदी के श्रेष्ठ कावियो मे तुम्हारी गिनती होगी.....”- प्रधानजी
पुन्हा काही आह-वाह होत ती मैफिल संपन्न झाली, पण माझं मन मात्र त्या ‘कत्थई डोळ्या’तंन बाहेर नाही निघालं.
दोन दिवसांनी प्रधानजींना मी त्या कविते बद्दल विचारलं तेव्हा प्रधानजी काहीसे खेकसत-
“अर्रे काहे का कवी और काहे की कविता !.....इधर उधार से ढांप के लाता है वो..और अपनी बताकर सुनता है...आदत ही है उसकी...असली कविता तो किसी राहत इंदौरी की है”
“राहत इंदौरी!?...और ये आप को पता था?” कपाळावर आठ्या आणि डोळे बारीक करत मी म्हणालो.
“और नाही तो क्या?...आप भी ना..” पुढील अर्धे वाक्य न बोलता प्रधानजींच्या चेहऱ्यावरील भावांनी पूर्ण केले. मला माझ्या अज्ञानाची जाणीव करून देऊन ते दिव्यध्यान प्रधानजी पाताळात निघून गेले (जिना उतरून खाली चहा पिण्यासाठी गेले). त्याच संध्याकाळी ‘संदीपची डायरी’ उचलून आणली (त्याला न सांगता). बरच काही लिहून होते पण ते न वाचता फक्त ‘राहत’ वाचू लागलो मनाला स्पर्श करून जाणारी शायरी वाचण्याचा आनंद काही वेगळाच. गालिबची शायरी वाचली होती तेव्हा थोडी समजली थोडी समजावून घेतली, ‘बशीर बद्र’चे ‘कल्चर यकसा’ वाचले होते ते समजण्यास सहज वाटले, आता राहत इंदोरी वाचत होतो समजत होतो, जवळ जवळ डोळ्यांसमोर गझल ‘घडून’ राहिली होती-

दोस्ती जब किसी से की जाये,
दुष्मनो की भी राय ली जाये

इसी सोच मे हु डूबा हुआ,
यह नदी कैसे पार की जाये

मनातील भावना गझल मधे व्यक्त करतांना शायर फक्त स्वतःचीच भावना व्यक्त करत नाही तर ती भावना कधी ना कधी कुठे ना कुठे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनानुभवातील एक असते, बहुधा ज्यांनी ती अनुभवली असेल त्यांना त्या शेर/गझल चा भाव अधिक जवळचा वाटतो. कधी गझल मधला एखादा शेर सहजच आपल्याला आपल्या भवतालच्या परिस्थितीची जाणीव करून देतो-

अंधेरे चारों तरफ सांय-सांय करने लगे
चिराग हाथ उठाकर दुआए करने लगे,

तरक्की कर गए बीमारियों के सौदागर
ये सब मरीज है जो अब दवाए करने लगे,

झुलस रहे है यहा छांव बाटने वाले
वो धूप है कि शजर इलतिजाए करने लगे,
(शजर- वृक्ष)

राहतजींची सध्या सोप्या भाषेतली रचना वाचतांना माहित होते की रोजच्या बोलचालीतल्या वाक्यांमधेही गझल असते, फक्त त्या वाक्यांना व्यवस्थित मांडावे लागते.-

लोग हर मोड पे रुक-रुक के संभलते क्यो है,
इतना डरते है तो फिर घर से निकलते क्यो है

मोड होता है जवानी का संभलने के लिए,
और सब लोग यही आके फिसलते क्यो है

-सांभाळूनच चालावं लागतं नाही तर अपघात व्हायची शक्यता असते आणि तरुण वयात ‘अपघात’ होतात, प्रेमभंग होतो, मनातल्या काही इच्छा अपूर्णच राहून जातात. कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरल्या जात नाही जणू काही शेतातली पाखरं, कितीही उडवा परत पिकांवर येऊन बसतात.-

अजनबी ख्वाहिशे सीने मे दबा भी न सकू
ऐसे जिद्दी है परिंदे के उडा भी न सकू

फूक डालुंगा किसी रोज ये दिल की दुनिया
ये तेरे खत तो नही है के जला भी न सकू

इक न इक रोज कही ढ़ूँढ ही लुंगा तुझको
ठोकरे जहर नही है के मै खा भी न सकू

कुणी प्रेमभंगामुळे इतकं निराश होतं की स्वतःच अस्तित्व मातीमोल समजू लागतं, जीवनाला वेगळाच आकार देऊ लागतं-

अपने होने का हम इस तरह पता देते थे
खाक मुट्ठी मे उठाते थे, उडा देते थे

अब मेरे हाल पे शर्मिंदा हुये है वो बुजुर्ग
जो मुझे फूलने-फलने की दुआ देते थे.

कुणी घर-गाव, आप्त-मित्र सगळं सोडून स्वतःची नवीन ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतात पण एखाद्या कातरवेळी जुन्या कटू-गोड आठवणी परत ‘पिकांवर’ येतात-

शहरो-शहरो गाव का आंगन याद आया
झूठे दोस्त और सच्चा दुश्मन याद आया

पीली पीली फसले देख के खेतो मे
अपने घर का खाली बरतन याद आया

गिरजा में इक मोम की मरियम रखी थी
मां की गोद मे गुजरा बचपन याद आया

देख के रंगमहल की रंगीन दीवारे
मुझको अपना सूना आंगन याद आया

-हे कुठेतरी मनाला सलतच राहते पण जगरहाटी चालतच राहते, एका क्षणासाठी का होईना मन स्व:गत प्रश्न करतं -

ये जिन्दगी सवाल थी जवाब मांगने लगे
फरिश्ते आ के ख्वाब मे हिसाब मांगने लगे

दिखाई जाने क्या दिया है जुगनुओ को ख्वाब मे
खुली है जबसे आंख आफताब मांगने लगे

-जर प्रेम खरं असले की या प्रश्नांना मनाच्या हळव्या कोपऱ्यातून उत्तरेही येतात-

हरेक चहरे को जख्मो का आइना न कहो
ये जिन्दगी तो है रहमत इसे सजा न कहो

न जाने कौन सी मजबूरियो का कैदी हो
वो साथ छोड गया है तो बेवफा न कहो

ये और बात के दुशमन हुआ है आज मगर
वो मेरा दोस्त था कल तक उसे बुरा न कहो

-तरीही आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत नाही ही वेदना काही केल्या जात नाही, मग मन स्वत:ला समजवण्यासाठी नशिबाला दोष देतं-

पेशानियो पे लिखे मुकद्दर नही मिले
दस्तार कहा मिलेगे जहा सर नहीं मिले
(पेशानी-कपाळ, दस्तार- डोक्यावरची पगडी)

परदेस जा रहे हो तो सब देखते चलो,
मुमकिन है वापस आओ तो ये घर नही मिले

- जातांना जे सोडून गेलो होतो तेच ‘घर’ पुन्हा भेटत नाही, कितीहीदा परत आलो तरी ‘त्याच’ घरात परत येता येत नाही, प्रत्येक वेळेस काहींना काही बदल झालेला असतो...घर सुटले की सुरु होतो एक प्रवास, न संपणारा, स्थलांतर करीत राहणाऱ्या ‘जोग्या’ सारखी अवस्था-

तू शब्दो का दास रे जोगी
तेरा कहा विश्वास रे जोगी

इक दिन विष का प्याला पी जा
फिर न लगेगी प्यास रे जोगी

ये सांसो का का बन्दी जीवन
किसको आया रास रे जोगी

विधवा हो गई सारी नगरी
कौन चला वनवास रे जोगी

पुर आयी थी मन की नदिया
बह गए सारे एहसास रे जोगी

इक पल के सुख की क्या कीमत
दुख है बारह मास रे जोगी

बस्ती पीछा कब छोडेगी
लाख धरे सन्यास रे जोगी

-कितीही सोडण्याचा प्रयत्न केला तरी वस्तीचा मोह सुटत नाही, पण प्रवासही टळत नाही,....हातात येणारं सोडून पावले समोर चालतात, मन मागच्या वस्तीची आठवण धरून डोळे नवीन वस्तीच्या खाणाखुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतात. ....प्रवास होतच राहतो....सगळं धरून........सगळं सोडून..........

०००
अखेर मिपाच्या भटकंती सदराला शोभतील अश्या राहतजींच्या गझल मधले दोन शेर-
सफर की हद है वहा तक कि कुछ निशान रहे
चले चलो के जहा तक ये आसमान रहे

ये क्या के उठाये कदम और आ गई मंजिल,
मजा तो जब है के पैरो मे कुछ थकान रहे.
०००
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(या धाग्यात दिलेले सगळे ‘शेर/काव्य’ राहत इंदोरी यांचे आहे, ते जसे आठवले तसे लिहण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा एक 'आस्वादात्मक लेख’ असून या धाग्याचा हेतू ‘राहत इंदोरी’ यांच्या लिखाणाचे 'रसग्रहण' एवढाच आहे.)
----------------------------------------------------------------------------------------

गझलआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

28 Jul 2016 - 1:27 am | पद्मावति

आहा!!! सुरेख लिहलंय. लेख खूप आवडला.

चाणक्य's picture

28 Jul 2016 - 1:44 am | चाणक्य

ईंदोरी गजब लिहीतात. त्यांच्या तोंडून गजल ऎकणं हा पण एक अनुभवच असतो. पण कधी कधी अहं ची बाधा झाल्यासारखे वागतात. तेव्हा नाही आवडत.

उडन खटोला's picture

28 Jul 2016 - 3:05 am | उडन खटोला

असेच म्हणतो.
मनस्वी किंवा कलंदर माणूस वाटतो.

पिशी अबोली's picture

28 Jul 2016 - 11:36 am | पिशी अबोली

फार आवडलंय.
पहिलंवालं तर अतिशयच.

जगप्रवासी's picture

28 Jul 2016 - 12:28 pm | जगप्रवासी

तुमच्यामुळे आम्हाला इतक्या छान गझल वाचायला भेटल्या म्हणून तुमचे खूप धन्यवाद.

प्रचंड भारी दिसतोय प्रकार. वाह .. क्या बात..

आता आणखी शोधून वाचणे आले.

महासंग्राम's picture

29 Jul 2016 - 9:22 am | महासंग्राम

https://rekhta.org/poets/rahat-indori?lang=Hi

गवि हे घ्या .

लेख आवडला.

जयन्त बा शिम्पि's picture

28 Jul 2016 - 1:49 pm | जयन्त बा शिम्पि

छान लिहिले आहे. राहत इंदोरी यांना मुशायर्‍यामध्ये गातांना मी ही पाहिले आहे , त्यात ते हातवारे, अंगविक्षेप फारच जास्त प्रमाणात करतात, त्यामुळे त्यांना गातांना पहाण्यापेक्षा , तुमच्या सारख्यांनी लिहिलेले,त्यांची शायरी वाचणेच अधिक चांगले.याच प्रमाणे आपण " वसीम बरेली " व " डॉ. नवाज देवबंदी " यांची ही शायरी वाचावी / पहावी. एक झलकः-
वसीम बरेली
" जरा सा कतरा कहीं आज अगर उभरता है, समंदरों के ही लहजेमें बात करता है !
खुली छतों के दिये कब के बुझ गये होते, कोई तो है जो हवाओं के पर कतरता है !
शराफतों की यहां कोई अहमियत ही नहीं, किसी का कुछ ना बिगाडो,तो कोन डरता है !
जमीं की कैसी वकालत हो, फिर नही चलती, जब आसमाँसे कोई फैसला आता है !
तुम आ गये हो तो फिर चांदनी सी बातें हो, जमीं पर चांद कहाँ रोज रोज आता है !"
आणखी एक
" उसुलोंपे जहाँ आँच आये , टकराना जरुरी है, जो जिन्दा हो तो फिर जिन्दा नजर आना जरुरी है !
नई उम्रोंके खुद-मुख्तरियोंको कोन समझाए, कहाँ से बचके चलना है,कहाँ जाना जरुरी है !
थके हारे परिन्दे जब बसेरे के लिये लोटे, सलिकेमंद शाखाओंका लचकना जरुरी है !
बहोत बेबाक आँखोमें ताल्लुक टिक नही पाता, मुहब्बत में कशिश रखने को शर्माना जरुरी है !
सलिका ही नही शायद उसे महसूस करनेका, जो कहता है,खुदा है तो नजर आना जरुरी है !
मेरे होंटोपे अपनी प्यास रख दो ओर फिर सोचो, के इस के बाद भी ,दुनिया में कुछ पाना जरुरी है ! "
डॉ. नवाज देवबंदी
" वो अपने घरके दरिंचोसें झाँकता है, ताल्लुकात अब भी है,मगर आना-जाना कम है !
तुम्हारी सुरत इतनी उदास क्यों है मियाँ, तुम्हारे घरसे तो मस्जिद का फासला कम है ! .........."
किंवा
" फाँखोने तसवीर बना दी आँखोमें , गोल हो कोई चीज , तो रोटी लगती है !
उसके पाँवकी एडी, चोटी लगती है, माँ के पाँव के नीचे ,जन्नत छोटी लगती है !........"
जब बिकनेको निकलो तो दाम अक्सर कम हो जाते है,
ना बिकनेका इरादा हो तो , किमत ओर भी बढ जाती है ! ......."
शोधा म्हणजे अजुनही खुप काही छान छान सापडेल.

चांदणे संदीप's picture

28 Jul 2016 - 1:51 pm | चांदणे संदीप

बहुत खूब!

Sandy

आदूबाळ's picture

28 Jul 2016 - 1:55 pm | आदूबाळ

वाह!

वेल्लाभट's picture

28 Jul 2016 - 2:20 pm | वेल्लाभट

भाऊ राहत इंदोरींच्या कलामांपेक्षा तुमचं लिखाण भावलं खरं सांगतो.
राहत इंदोरी ग्रेटच शायर आहेत. वादच नाही. पण तुम्ही ज्या खुबीने त्यांच्या विश्वातला प्रवास घडवलात ना, तो का़बिल-ए-तारीफ़ आहे. खलास.

एक्सलंट

रातराणी's picture

28 Jul 2016 - 8:39 pm | रातराणी

लेख आवडला.

प्राची अश्विनी's picture

28 Jul 2016 - 10:49 pm | प्राची अश्विनी

फारच सुंदर!

सुंड्या's picture

29 Jul 2016 - 1:06 am | सुंड्या

माननीय- पद्मावति, चाणक्य, उडन खटोला, पिशी अबोली, जगप्रवासी, गवि, मुक्त विहारि, जयन्त बा शिम्पि, चांदणे संदीप, आदूबाळ, वेल्लाभट, रातराणी आणि प्राची अश्विनी आपल्या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. 'आभार' या साठी की इथे 'मिपावर' मी जे काही लिहित आहे त्याची 'पावर मी' तुमचे इथले लेख वाचूनच घेत असतो. तुम्ही सगळे लिहित रहा, मराठीची गोडवा वाढवत रहा.

@चाणक्य आणि उख- जाऊ दे हो भौ स्वभाव असतो एखाद्याचा..आपण त्यांच्या शायरीचा आनंद घेऊ.
@गवि- ते कविताकोश वर सापडतील.
@मुवि- समजण्यापेक्षा 'तुम्हाला' आवडला हे महत्वाचे.
@'जयंत' दा- सूचना अमलात आणण्याचा प्रयत्न करतो.
@वेल्लाभट-भौ या 'एक्सलं'ट ला कारणीभूत तुम्हीही आहात.

माझे लेखन सुधारण्यासाठी जे काही असेल- सूचना/टीका/शुद्धलेखन/मार्गदर्शन इ. ते वेळोवेळी परखडपणे व्यक्त करावे अशी सर्व मिपाकरांना विनंती.

उडन खटोला's picture

29 Jul 2016 - 1:57 am | उडन खटोला

पुढचं लिहा. इथे कुणी तुम्हाला आरती ओवाळायला येणार नाही. पुढचे लेख लिहा.

दिलपे दस्तक आयी.... कौन है???
आप तो अन्दर हो, बाहर कौन है???

असले कातिल शेर राहत इन्दौरी चे आहेत. कधीतरी बघायला पण मजा येते.

आजचे पळपुटे कुमार बिस्वास 'तेव्हा' 'कोई दिवाना कहता है' म्हणतात तेव्हा खरंच गोड वाटतात.
अनामिका अंबर सारखी एखादी छान गोंडस बालिका एखादी कविता सादर करते, एखादा वाकख्या विक्खी ऊक्खू तोंडात दात नसलेला म्हातारा शायर आपल्या उम्र ला न शोभणारे शेर पेश करतो...
येऊ दे कि असलं काही! आभार कसले मानता? घंट्याचे?

अप्रतिम लिहिलंय.पहिला शेर तर खासच.लिहित रहा भाऊ.

महासंग्राम's picture

29 Jul 2016 - 9:32 am | महासंग्राम

एक आदत सी बन गई है तू,
और आडात कभी जाती नही,

तू किसी रेल सी गुजरती है,
मै किसी पूल सा थरथराता हूं

यासारखे सोप्या शब्दांत भावना मांडणारे आणि गझल हिंदी मध्ये लोकप्रिय करणारे

दुष्यन्त कुमार

हे सुद्धा माझ्या अत्यंत आवडत्या शायरांपैकी एक.

पैसा's picture

29 Jul 2016 - 12:04 pm | पैसा

सुंदर ओळख!

चौथा कोनाडा's picture

29 Jul 2016 - 12:23 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख !
खूपच सुंदर ओळख करुन दिलीत या शायराची !

लेखनाची शैली भावली. असेच लिहित रहा.
पुढिल लेखाच्या प्रतिक्षेत !

वेल्लाभट's picture

29 Jul 2016 - 12:25 pm | वेल्लाभट

इन्तज़ामात नये सिरे से संभाले जाए
जितने कमज़र्फ़ है महफ़िल से निकाले जाए

मेरा घर आग की लपटोमें छुपा है लेकिन
जब मजा है तेरे आंगन में उजाले जाए

ग़म सलामत है तो पीतेही रहेंगे लेकिन
पहले मैखाने की हालत संभाले जाए

खाली वक़्तो में कही बैठ के रो ले यारो
फुरसते है तो समंदरही खंगाले जाए

ख़ाक मे यूं न मिला ज़ब्त की तौहीन न कर
ये वो आसू है जो दुनिया को बहा ले जाए

हम भी प्यासे है ये एहसास तो हो साक़ी को
खाली शीशेही हवाओ में उछाले जाए

आओ शहर में नए दोस्त बनाए राहत
आस्तीनमें चलो सांप ही पाले जाए

कमाल लिखाण!

नाखु's picture

29 Jul 2016 - 2:21 pm | नाखु

आणि हा एक 'आस्वादात्मक लेख’ असून या धाग्याचा हेतू ‘राहत इंदोरी’ यांच्या लिखाणाचे 'रसग्रहण' एवढाच आहे

खरेच हे नाव माहीत नव्हते आणि शायरीच्या फार वाटेला (अगदी नाहीच म्हटले तरी चालेल) गेलो नाही पण रोजच्या वापरातल्या शब्दांतून जी गझल घडविली त्याला तोड नाही.

लोग हर मोड पे रुक-रुक के संभलते क्यो है,
इतना डरते है तो फिर घर से निकलते क्यो है

आणि जोगी अगदी लाजवाब.

वाखू साठविली आहे अजून पोतडीतून येऊद्या...

आरपार संसारीजोगी नाखु

एस's picture

29 Jul 2016 - 3:31 pm | एस

फारच छान लिहिलंय.

@उडन खटोला-भौ ज्याचे क्रेडीट त्याला जावे हा आमचा शिरस्ता आहे, त्यामुळे मी मिपाकारांचा 'आभारी' राहिलच. मिपावर मराठी वाचनाचा आनंद देणे/घेणे ही एकच इच्छा म्हणून येथे वावर आहे, 'आरती'ची अपेक्षा माझ्या सारख्या 'अडीच अक्षरी' अस्तित्वाला परवडणारी नाही. आपल्या आज्ञेनुसार जसं जमेल तसं लिहण्याचा प्रयत्न करेन लोभ असावा-आ.न.सुंड्या.
@अजयाताई- धन्यवाद. 'मोती' त्यांचेच आहेत मी फक्त 'धाग्यात' माळले.
@मंदार भालेराव- मस्त, वाचतो लवकरच 'दुष्यंत कुमार' यांना.
@पैसाताई-धन्यवाद.
@चौथा कोनाडा-धन्यवाद.जसं जमेल तसं लिहण्याचा प्रयत्न करतोय.
@वेल्लाभट-शानदार जबरदस्त!!
@नाखु-हो आमचाही मानाचा मुजरा राहतजींना.भटक्या जोग्याच्या पोतडीत'संसारजोग्याने'ही काही टाकावे म्हणतो.
@एस-धन्यवाद हो भौ.

उडन खटोला's picture

31 Jul 2016 - 1:33 am | उडन खटोला

भाई मेहफिल बनवतो आणि पुन्हा हा संपलं बरंका, आता चला थँक्यू वेरी मच म्हणून गाद्या गुंडाळायला घेता, बरं दिसतं का??? चिडचिड होणार की. बघा पटत असलं तर.

मजा येते एक धागा लिहीला होता मागे "दुष्यंत" वर पण तो मलाच बंडल वाटल्याने सोडुन दिलेला.
आता एक निदा फाजली वर ट्राय करतो.

सुंड्या's picture

31 Jul 2016 - 10:25 pm | सुंड्या

@उडन खटोला- नाssही उचलत बाबा गादी. साजेसा 'विषय' मिळाला आहे. उसंत मिळताच लिहितो आणि सादर करतो...आता खुश?
@मारवा-निदा फाझली मस्त आहेत. करा ट्राय आणि द्या वाचन मेजवानी.

उडन खटोला's picture

1 Aug 2016 - 1:47 am | उडन खटोला

लै शाब्बास!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Aug 2016 - 3:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

फारच छान लिहीलय मजा आला.