एयर फ्रायर पाककृती - क्रिस्पी चिकन विंग्स

केडी's picture
केडी in पाककृती
26 Jul 2016 - 5:19 pm

Crispy Chicken Wings

एयर फ्रायर पाककृती ह्या शृंखलेतला हा शेवटचा लेख. एयर फ्रायर पाककृती बद्दल माहितीचा दुवा इथे वाचा. ह्या आधी दिलेल्या काही निवडक पाककृती खालील प्रमाणे :-
१. पिझ्झा क्रस्ट कृटॉन्स
२. मसाला मटार
३. भरलेला पापलेट

साहित्य

१/२ किलो चिकन विंग्स (पंखांचे २ तुकडे)
२ ते ३ मोठे चमचे रेड चिल्ली साँस
१/२ कप मैदा
२ चमचे टोमॅटो साँस
४ ते ५ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ ते ३ चमचे व्हिनेगर
२ चमचे कुटलेली काळीमिरी
३ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
१ पाकीट मिक्सड हर्ब्स (पिझ्झा बरोबर आलेलं सीझनिंग)
१ मोठा चमचा बटर
१ चमचा तेल किंवा ऑईल स्प्रे
चवीनुसार मीठ

कृती

चिकन स्वच्छ धुवून विंग्स कोरडे करून घ्या. चिकन ला २ चमचे काश्मिरी मिरची पावडर, १ चमचा मीठ आणि मिक्सड हर्ब्स लावून ठेवून द्या. एका प्लास्टिक च्या पिशवीत(झिपलॉक) मैदा, काळीमिरी पावडर आणि किंचित मीठ घालून ते सगळं नीट एकत्र करून घ्या. चिकन पिशवीत घालून पिशवी चे तोंड बंद करून पिशवी हलवून घ्या. विंग्स ना मैदा लागला पाहिजे.

विंग्स ताटात काढून साधारण २० मिनिटे फ्रिज मध्ये ठेवा.

एयर फ्रायर १८० डिग्री वर ५ मिनिटे प्रि-हिट करून घ्या. विंग्स ला दोन्ही बाजूने ऑईल स्प्रे मारून घ्या. विंग्स एयर फ्रायर मध्ये ठेऊन २५ ते ३० मिनिटे फ्राय करून घ्या अधून मधून बास्केट हलवून घ्या. विंग्स पूर्ण शिजले आहेत की नाही ते तपासून (काट्याने किंवा सुरीने टोचून), मग एयर फ्रायर २०० डिग्री ला सेट करून विंग्स अजून २ ते ३ मिनिटे लावा. ह्याने बाहेरील आवरण कुरकुरीत होईल.

विंग्स होत असे पर्येंत हॉट साँस करून घ्या.

एक पॅन मध्ये १ मोठा चमचा बटर गरम करून घ्या. त्यात बारीक चिरलेला लसूण घालून २ मिनिटे परतून घ्या. आता पॅन मध्ये चिली साँस, टोमॅटो साँस आणि व्हिनेगर घालून एकजीव करा. ह्यात १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घाला. साँस घट्ट होत आला की गॅस बंद करून त्यात चिकन विंग्स घालून व्यवस्थित घोळवून घ्या.

गरम गरम क्रिस्पी हॉट विंग्स सर्व्ह करा!

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

26 Jul 2016 - 5:48 pm | पगला गजोधर

*पण २५० डिग्री से. ला क्रंचीनेस येतो, २०० ला ज्युसीनेस राहतो, असा एक माझा अनुभव

माझ्या एयर फ्रयर ला कमाल तापमान २०० पर्येंतच सेट करता येते आणि विंग्स एकदम क्रिस्पी होतात.

संजय पाटिल's picture

16 Aug 2016 - 6:04 pm | संजय पाटिल

बरोबर. मी सगळे एअर फ्रायर चेक केलेत. ते २०० पर्यंतच असतात. त्यांचा बहुतेक इलेक्ट्रीक ओव्हन असावा..

शलभ's picture

26 Jul 2016 - 11:30 pm | शलभ

खतरनाक..

नूतन सावंत's picture

27 Jul 2016 - 8:12 am | नूतन सावंत

सही

पण आता हे "एयर फ्राय"वाले फारच त्रास देवून राहिले.

तब्बल गेली २ सेकंद बायको मागे लागली आहे, एयर फ्रायर घ्या, म्हणून.

आता घ्यावाच लागणार, असे दिसत आहे.

केडी's picture

27 Jul 2016 - 9:16 am | केडी

थांबता आलं तर थांबा. ऑनलाईन सेल सुरु होतील त्यावर लक्ष ठेवा. नक्की फायदा होईल.

मुक्त विहारि's picture

27 Jul 2016 - 9:34 am | मुक्त विहारि

ओके

संजय पाटिल's picture

16 Aug 2016 - 6:06 pm | संजय पाटिल

पेस्टिज चा २.५ लिटर ४६०० ला होता मी घेतला तेव्हा. करंट किमत जरा चेकवा..

वेदांत's picture

27 Jul 2016 - 10:27 am | वेदांत

मस्त...

लाळ गाळणारी स्माईली...... :)

मस्तच. मी असेच चिकन लॉलिपॉप पण करते. मस्त लागतात एकदम. त्यात मी cornflour, बारीक चिरलेला लसुण, आले, हिरवी मिरची, सोया सॉस, रेड चिली सॉस, अंडे आणि मिठ टाकुन marinate करते. नंतर silver foil ठेवुन त्यावर लॉलिपॉप ठेवुन फ्राय करायचे.

सप्तरंगी's picture

16 Aug 2016 - 4:14 am | सप्तरंगी

आज मी एअर फ्रायर मध्ये चायनीज भेळ करून बघितली, एकदम सही झाली होती. नक्की करून बघा झिरो ऑइल भेळ !

केडी's picture

16 Aug 2016 - 11:00 am | केडी

नूडल्स एयर फ्राय करून घेतले का? पाकृ टाका नक्की.
काल मी मऊ पडलेली गोल भजी मस्त गरम कुरकुरीत करून घेतली. इथे फोटो टाकलाय.

Chinese Bhel
हो, नूडल्स एअरफ्राय करून घेतल्या, आणि मग sauce, भाज्या मिक्स केले , बघा वाटत पण नाही

केडी's picture

16 Aug 2016 - 3:03 pm | केडी

मस्त!

बाबा योगिराज's picture

16 Aug 2016 - 11:05 am | बाबा योगिराज

कातिल, आणि जब्रा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2016 - 11:26 am | डॉ सुहास म्हात्रे

पाकृ एकदम स्लssssssर्प आहे !

पिलीयन रायडर's picture

16 Aug 2016 - 9:04 pm | पिलीयन रायडर

घ्यावा लागणार असं दिसतंय....

चायनीज भेळेचा फोटो टाकायची गरज नव्हती हो.... :(

मराठमोळा's picture

17 Aug 2016 - 3:56 am | मराठमोळा

मस्त मस्त..

रेसेपी आणी फोटो लाजवाब. ती चायनीज भेळ पण मस्त दिस्तेय..
आता एयर फ्रायर घेणे आले. ;)

(एशियन फुडचा फॅन)
मराठमोळा