समंदर के लुटेरे

लोनली प्लॅनेट's picture
लोनली प्लॅनेट in जनातलं, मनातलं
23 Jul 2016 - 4:28 pm

समुद्री लुटेरे म्हटले कि सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ते मानवाची कवटी असलेले काळे निशाण, तो एक डोळा निकामी झालेला जहाजाचा कप्तान व त्यांनी लुटलेला खजिना.
1
इतिहासात नोंद झालेली सर्वात पहिली समुद्री लुटीची घटना इ स पूर्व १४ व्या शतकात घडली, समुद्री चाच्यांनी त्या वेळेस भरभराटीस आलेल्या एजियन व मेडिटेरिअन व्यापाऱ्यांची जहाजे लुटली. समुद्री चाचे फक्त सोन्याचांदी चा खजिना लुटत असत असं नव्हे, खरा खजिना तर जहाजावर असलेले अन्नधान्य,पाणी,दारू,शस्त्रे,कपडे,व इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू होत्या. काबीज केलेल्या जहाजावरील खलाश्यांना ते त्यांनी विरोध केला तर मारून टाकत असत व त्यांनी शरणागती पत्करली तर सोडून देत असत. १६ व्या व १७ व्या शतकात युरोप,मेडिटेरिअन,चीन,जपान,आफ्रिका,दक्षिण पूर्व आशिया,व कॅरेबियन अशा सर्वच भागात समुद्री चाच्यांचा उपद्रव होता. आफ्रिकेत मादागास्कर बेट हे १००० चाच्यांचे आश्रयस्थान होते. जगात जेथे जेथे खाडी व आखाताचा भूभाग आहे तेथे चाचेगिरी जास्त प्रमाणात चालायची, कारण या भागात जहाजांचा मार्ग हा निश्चित असायचा त्यामुळे जहाजे लुटणे सोपे जायचे. चीन मध्ये तर ४०० जहाजे व ५०,००० चाच्यांची फौज होती त्यांचा दरारा एवढा होता कि त्यांच्याकडून होणाऱ्या लूटीला कंटाळून तेथील शासकांना या चाच्यांबरोबर करार करावा लागला होता त्यानुसार चाच्यांना नियमित रसद पुरवण्यात येत होती.
2
परंतु सर्वात प्रभावी चाचेगिरी चालली ती वेस्ट इंडिज बेटांभोवती कॅरेबियन च्या समुद्रावर. इ स १४९२ मध्ये कोलंबस ने अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवल्यानंतर नव्या जगाचा व तेथील संपत्तीचा शोध घेण्यासाठी युरोपिअन लोकांनी आपली जहाजे तिकडे वळवली. त्यांचा मार्ग हा कॅरेबियन बेटांमधूनच जात होता व हा त्यांचा एक तळ देखील होता. ही बेटे त्यावेळी युरोपिअन व्यापाराचा व वसाहतींचा केंद्रबिंदू बनली होती. स्पॅनिश आक्रमकांनी अमेरिका खंडावर स्वारी करून तेथे नांदत असलेल्या संस्कृती नष्ट केल्या व त्यांचा सोन्या चांदीचा प्रचंड खजिना लुटून नेला ही सोन्याचांदीनी भरलेली जहाजे कॅरेबियन बेटांमधूनच युरोपकडे जात असत.

समुद्री चाचे हे आधी व्यापारी जहाजांचे खलाशीच होते, काही तर अगदी कॅप्टन च्या हुद्द्यावर होते. परंतु त्या काळी अशा समुद्र सफरी अतिशय जोखिमेच्या असत कित्येक दिवस किनारा दिसायचा नाही, काही खलाशांना वेड लागे व कित्येक खलाशी बंड करत. कित्येक खलाशांना शिक्षा म्हणून एखाद्या निर्जन बेटावर सोडून देण्यात येत असे. हेच खलाशी नंतर समुद्री लुटेरे बनले. युरोपमधून येणारी जहाजे जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन येत असत चाच्यांनी तो लुटायला सुरुवात केली. आणि इ स १६०० मध्ये कॅरेबियन मध्ये चाचेगिरी ला सुरुवात झाली. हे चाचेगिरी साठी अत्यंत योग्य ठिकाण होते. पोर्ट रॉयल,टॉर्टुगा,हैती, व बहामा ही चाच्यांना लपण्यासाठी अतिशय योग्य ठिकाणे होती. त्या भागात अनेक नैसर्गिक गुहा आहेत.
3
अमेरिका खंडातून लुटलेला खजिना घेऊन स्पॅनिश जहाजे युरोपकडे जात असत, तेंव्हा चाचे या जहाजांवर हल्ला करून तो सोन्याचांदीनी भरलेला खजिना लुटत. स्पॅनिश वसाहतींमध्ये चाच्यांची अतिशय दहशत होती. काही लुटींमध्ये त्यांना फ्रेंचांचा पाठिंबा असायचा, चाचे फ्रेंचांच्या आदेशाखाली काम करायचे अशा प्रकारच्या लूटीला 'Privateering' म्हणतात.
4
इ स १७१६-१८२६ हा काळ कॅरेबियन मध्ये समुद्री चाच्यांसाठी सुवर्णयुग होते या काळात चाचेगिरीत प्रचंड वाढ झाली. २४०० पेक्षा जास्त चाचे या भागात सक्रिय होते. व्यापार रक्तरंजित बनला होता,ही मंडळी अतिशय क्रूर असत,काही चाचे तर शरण आलेल्या खलाशांना देखील जिवंत सोडत नसत. हजारो खलाशी मारले जात होते. त्या काळात समुद्र सफरी अतिशय भयानक असत, वादळे येत, जहाजे खडकावर आपटून फुटत, रोगराई पसरे, खलाशांना वेड लागे व ते बंड करत, खजिन्यांनी भरलेली जहाजे वादळामुळे समुद्रतळाशी जात. आणि हे कमी होते कि काय त्यात या खुंकार चाचे मंडळींचा ताप, यामुळे ब्रिटिश,स्पॅनिश,फ्रेंच सरकारे मेटाकुटीला आली होती. यावर उपाय म्हणून प्रवासाचे नवीन मार्ग शोधले जात होते परंतु हे चाचे जहाजाचा पाठलाग करत तिकडेही जायचे. व्यापारी जहाजाकड़े लढण्यासाठी खलाशांचे पुरेसे संख्याबळ नसायचे. आता तर चाच्यांनी आफ्रिकेतून गुलामांना घेऊन येत असलेल्या जहाजांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा नवीनच प्रकार सुरु केला. त्या गुलामांपैकी जी काही दणकट मंडळी होती त्यांना चाच्यांनी आपल्यामध्ये सामील करून घेतले.
5
या लूटीला कंटाळून रॉयल नेव्ही ने या चाच्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली,त्यांनी युरोपमधून मोठ्या प्रमाणात सैन्य बोलावून चाच्यांची धरपकड सुरु केली. किमान ४००-६०० चाच्यांना देहदंडाची शिक्षा दिली गेली. यानंतर मात्र त्यांच्या अधोगतीस सुरुवात झाली.
चाचेगिरी चे ही काही नियम होते, त्यांना गणवेश असायचा, तो गलिच्छ असायचा हा भाग वेगळा. जहाजावर धुम्रपास मनाई असायची तसेच लूटीला निघण्याच्या वेळेस कोण काय करायचे हे ठरलेले असायचे. लूटीला जाण्यास महिलांना मनाई असायची. बंड करणाऱ्यास शिक्षा व्हायची, त्याला एखाद्या निर्जन बेटावर मरण्यासाठी सोडून दिले जायचे. लुटीचा माल विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवला जायचा त्याची समप्रमाणात वाटणी व्हायची. त्यांनी लुटलेला खजिन्यांपैकी अजून कितीतरी खजिना गुप्त ठिकाणी दडवून ठेवलेला आहे. अमेरिकेत फ्लोरिडाच्या किनारयावर अजूनही सोन्याचांदीची नाणी सापडतात. आंतरराष्ट्रीय समुद्रात बुडालेल्या जहाजावर कोणाचीच मालकी नसते त्यामुळे खजिना शोधण्यावर मर्यादा येतात तरी काही धाडसी मंडळी हा उद्योग करतात.
5
' it is more fun to be a pirate than to join the navy' हा स्टिव्ह जॉब्स चा विचार तेंव्हाच या खलाशांनी अमलात आणला होता.
काही कुप्रसिद्ध चाचे
ब्लॅक बर्ड (१६८०-१७१८)

हा सगळ्यात यशस्वी मानला जातो सगळीकडे त्याची दहशत होती. त्याच्याकडे ४ जहाजे व ३०० चाच्यांचे सैन्य होते. hms 'scaroberg' हे त्या काळी प्रसिद्ध असलेले जहाज त्याने लुटले, तो दोन्ही हातात तलवार घेऊन लढायचा, ४० पेक्षा जास्त जहाजे त्याने लुटली,अनेक खलाश्याना कैद करून नंतर त्यांची हत्या केली. रॉयल नेव्ही बरोबर झालेल्या युद्धात तो मारला गेला नेव्ही ने त्याचे शीर कापून त्याच्याच जहाजावर लटकावून दिले इतर चाच्यांना इशारा म्हणून.

ब्लॅक बार्ट (१६८०-१७१८)

बार्थेलो रॉबर्ट (ब्लॅक बार्ट) हा आधी एका व्यापारी जहाजाचा कप्तान होता, तो अतिशय धाडसी साहसी होता व उत्कृष्ट नेव्हिगेटर होता. एकदा त्याच्या जहाजावर हॉवेल डेव्हिस नावाच्या चाचाने हल्ला केला व त्याने बार्थेलो ला त्याचे नेव्हिगेशन मधील कौशल्य पाहून आपल्यासोबत घेतले. नंतर तो पायरेट बनला, त्याने ४०० जहाजे लुटली हा एक विक्रम आहे. रॉयल नेव्ही बरोबर झालेल्या युद्धात तो मारला गेला.

हेनरी (१६५३-१७२३)

हा जगातील सर्वात श्रीमंत पायरेट होता, त्याने अरबी समुद्रात लुटलेल्या जहाजापैकी एक जहाज भारतीय होते व त्यावर अगणित संपत्ती होती. तो लुटीसाठी समुद्रात अतिशय दूरदूर जायचा, त्याला सोन्याचांदीच्या हव्यास होता. असाच एकदा खजिन्याच्या शोधात गेला असता कुठे गडप झाला कुणालाच पत्ता लागला नाही. व त्याने लुटलेल्या खजिन्याचा सुद्धा काहीच मागमूस लागला नाही.

फ्रँकॉईस ओलोनाइस(१६३५-१६६८)

7

हा आधी एक गरीब माणूस होता अमेरिकेत तो शेतावर काम करायचा. गरिबीला कंटाळून त्याने चोऱ्या करायला सुरुवात केली आपल्यासारख्याच लोकांना घेऊन नंतर तो पायरेट बनला. त्याने अनेक जहाजे लुटली, त्याने व्हेनेझुएला मधील मारकाईबो शहरावर हल्ला करून त्यावेळचे २ लाख डॉलर लुटले. तो अतिशय रक्तपिपासू होता,त्याच्या हाती सापडलेला एकही खलाशी जिवंत राहायचा नाही. जेंव्हा तो रॉयल नेव्ही च्या हाताला लागला तेंव्हा त्यांनी त्याला दूर समुद्रात एका खडकावर सोडून दिले.

सोमाली चाचे

सोमालिया हा एक असा देश आहे जिथे १९९२ पासून कोणाचेही सरकार नाही वा कसलीही व्यवस्था नाही, कोणताही व्यापार नाही इतर देशांशी कसलेही संबंध नाहीत. दुष्काळ तर पाचवीलाच पुजलेला. राजधानी मोगादिशु सोडली तर इतर संपूर्ण देशावर अल-शबाब या दहशतवादी संघटनेचे राज्य. अशा परिस्थितीत तेथील लोकांनी जगायचे कसे,मासेमारी त्यांचा प्रमुख व्यवसाय परंतु आंतरराष्ट्रीय समुद्रात बड्या कंपन्यांची जहाजे येतात आणि प्रचंड प्रमाणात मासेमारी करतात आणि यांच्यासाठी काहीच मासे उरत नाही. मग त्यांनी अतिशय धाडसी व्यवसाय सुरु केला - चाचेगिरी- दुसरा पर्यायच नव्हता.
8
सोमालियन पायरसी चा नकाशा पाहून अंदाज येतो कि एका छोट्याश्या होडीत बसून ही मंडळी समुद्रात किती दूरपर्यंत जात होती.

चाचेगिरी यांना कोणताही अनुभव नव्हता १४-१५ वर्षाची मुले सुद्धा पायरेट बनली. हे एका छोट्याशा बोटीत बसून दूर समुद्रात जात व जहाजावर हल्ले करत व त्याचे अपहरण करून खंडणी मागत. ते जहाजावरचा माल लुटत नसत, खलाशांचे अपहरण करून त्यांना वेठीस धरून ठेवत. पोर्ट फी देण्यासाठी जहाजावर असलेले हजारो डॉलर्स ते लुटत.१९९५ पासून अरबी समुद्रात हा एक मोठा प्रश्न बनला. एडन चे आखात व मराक्का च्या खाडीत असे हल्ले वारंवार होऊ लागले कारण हा भागात जहाजांचा मार्ग निश्चित होता व वाहतुकीचे प्रमाण ही जास्त असल्यामुळे जहाजांचा वेग कमी ठेवावा लागतो. याचा फायदा सोमाली चाच्यांना होतो. या चाच्यांचा फायदा काही व्यापारी कंपन्यांनी घेतला, ते चाच्यांना पैसे देऊन प्रतिस्पर्धी कंपनीच्या जहाजाचे अपहरण करवून घेत जेणेकरून यांचा माल बाजारात आधी पोहोचावा व दुसऱ्या कंपनीचे नुकसान व्हावे. हे चाचे तेल व गॅस घेऊन जाणाऱ्या जहाजांचेही अपहरण करत, ही जहाजे १०-११ मजली इमारतीएवढी उंच असतात तरीही चाचे त्यावर हल्ला करत.
9
1

आंतरराष्ट्रीय मेरीटाईम ब्युरो ने १९९५ पासून या भागातील चाचेगिरी ची नोंद ठेवली आहे, २००६ मध्ये २३९ जहाजावर हल्ले झाले व २४५ खलाशांची अपहरण झाले यापैकी १५ हल्ल्यांमध्ये खलाशी मारले गेले. २००७ मध्ये २६३ हल्ले झाले २००९ मध्ये ३०९ हल्ले झाले व ११४ जहाजांचे अपहरण करण्यात आले २०१० मध्ये तर १७६ जहाजांचे अपहरण करण्यात आले.

नंतर मात्र अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युरोपियन देशांनी तसेच भारताने केलेल्या कारवाई मुले अरबी समुद्रातील चाचेगिरी चे प्रमाण ९५% कमी झाले आहे.
1

इतिहासभूगोललेख

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

23 Jul 2016 - 5:05 pm | महासंग्राम

बढिया लेख .... अजून विस्तृत माहिती येऊ द्या

चाचा जॅक स्पॅरो (शाखा ओंकारेश्वर मंदिर)

लोनली प्लॅनेट's picture

25 Aug 2016 - 10:42 pm | लोनली प्लॅनेट

सोमालियन चाचेगिरी च्या एका सत्य घटनेवर आधारित एक जबरदस्त सिनेमा कॅप्टन फिलिप्स

मुक्त विहारि's picture

23 Jul 2016 - 5:20 pm | मुक्त विहारि

अजून माहिती हवी होती.

संजय पाटिल's picture

23 Jul 2016 - 5:31 pm | संजय पाटिल

रोचक..
अजून सवीस्तर येउदे..

माझा आधीचा प्रतिसाद प्रकाशित झाला नाही. तेव्हा परत लिहितो.

लेख किंचित त्रोटक वाटला याच्याशी सहमत. पण चांगला आहे. रोचक विषय आहे. सोमालियन चाचेगिरीला आळा घालण्यात भारतीय नौदलाने सर्वात जास्त परिणामकारक कामगिरी बजावली आहे. याबद्दलही अजून माहिती वाचायला आवडली असती. सतराव्या शतकात आफ्रिकन हबशी चाचांचा उपद्रव फारच वाढला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी गलबते पाठवू्न त्या भागातून हबशांना पकडून आणून सज्जड शिक्षा केली होती. त्याबद्दल अजून विस्तृत माहिती मिळवून येथे द्यावी ही विनंती.

लोनली प्लॅनेट's picture

23 Jul 2016 - 7:59 pm | लोनली प्लॅनेट

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आफ्रिकन चाचे हबशी होते व शिवाजी महाराजांनी त्यांचा बंदोबस्त केला हे वाचुन अतिशय आश्चर्य वाटत आहे
त्यांच्याबद्दल माहिती मिळवावी लागेल

माझ्या माहितीप्रमाणे एड्न्च्या बाजारात महाराष्ट्रातून पळविलेल्या स्त्रीयान्ची विक्री व्हायची. ती थाम्बावी म्ह्णुन महाराजानी सैनिक पाठवून अफ्रिकन चाच्याना कैद केले व त्याना वासोटा किल्ल्यावर ठेवले. नन्तर पुढे त्याना सोडले. मात्र एकदा वासोट्याची हवा खालेल्या ह्या चाच्याना परत महाराष्ट्राकडे डोळा वर करून बघायचे धाडस झाले नाही.

हबशी म्हणजे हबसाणातून आलेले. हबसाण हे आफ्रिकेतल्या अ‍ॅबिसिनियाचं शिवकालीन स्थानिक नाव.
ह्या हबशी लोकांनाच सिद्दी म्हणत. ह्यांचा जहाजाचा कप्तान हा सैय्यद जमातीचा असल्याने कदाचित सिद्दी हे नाव मिळाले असेल.
शिवाजी महाराजांनी कोकण किनार्‍यावर स्थायिक झालेल्या हबशांचा बंदोबस्त केलाच होता पण अ‍ॅबिसिबियातून इथे येऊन चाचेगिरी करुन परत हबसाणात प़ळून जाणार्‍या चाच्यांची जहाजेही पकडली होती. अर्थात ह्यावर अधिक बॅट्याच सांगू शकेल.

बाकी लेख खूप आवडला.

जव्हेरगंज's picture

23 Jul 2016 - 6:08 pm | जव्हेरगंज

त्रोटक पण रोचक!!

ट्रेझर आयलंड कादंबरी व वॉटर वर्ल्ड सिनेमा
दोन्ही झर्रक्कन डोळ्यासमोर तरळुन गेले
जबरदस्त लेख सुंदर चित्रांनी अजुन सुरेख झाला.
फारच आवडला
तुमचा आयडी पण मस्तय लोनली प्लॅनेट.

लोनली प्लॅनेट's picture

23 Jul 2016 - 8:02 pm | लोनली प्लॅनेट

प्रतिसादाबद्दल धन्यवाद
या विषयावर अजून लिहावे लागेल

लालगरूड's picture

23 Jul 2016 - 6:52 pm | लालगरूड

समुद्री लुटेरे म्हटले कि सर्वात पहिले
डोळ्यासमोर येतो तो कॅप्टन जॅक स्पॅरो..... हल्ली दिसत नाही मिपावर त्यांचा वंशज.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2016 - 7:03 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर रोचक माहिती ! अजून जास्त माहिती वाचायला आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2016 - 7:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन, आवडले. अजून लिहा.

-दिलीप बिरुटे

साधा मुलगा's picture

24 Jul 2016 - 10:10 am | साधा मुलगा

लेख आवडला!
तुम्ही नमूद केलेल्या प्रत्येक काळ आणि व्यक्तिरेखेवर एक छान लेख होऊन एक चांगली लेखमाला होऊ शकते.
या लेखमालेला पुढील "मोसाद" होण्याचे potential आहे.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

साधा मुलगा's picture

24 Jul 2016 - 10:10 am | साधा मुलगा

लेख आवडला!
तुम्ही नमूद केलेल्या प्रत्येक काळ आणि व्यक्तिरेखेवर एक छान लेख होऊन एक चांगली लेखमाला होऊ शकते.
या लेखमालेला पुढील "मोसाद" होण्याचे potential आहे.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

संत घोडेकर's picture

24 Jul 2016 - 10:25 am | संत घोडेकर

+१

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2016 - 1:59 pm | टवाळ कार्टा

+११११११११११११११११११११११

कपिलमुनी's picture

25 Jul 2016 - 5:45 pm | कपिलमुनी

म्हणजे हे पण बॅन होणार का ??

मराठमोळा's picture

25 Jul 2016 - 9:29 am | मराठमोळा

आवडला पण वरील प्रतिक्रियांप्रमाणेच म्हणतो की आणखी वाचायला आवडले असते. मागे कुणीतरी भुताळी जहाजांबाबत लिहिले होते.. तेही फार आवडले होते. असं काही वाचलं की फिक्शन प्रत्यक्षात उतरल्यासारखं वाटतं आणी उत्सुकता वाढते. :)

गणामास्तर's picture

25 Jul 2016 - 9:44 am | गणामास्तर

चाचेगिरीचा उत्तम आढावा. युद्धकथा, गुप्तहेरांच्या कथा आणि अशा काही अनवट विषयांवरील माहिती वाचताना कितीही वाचले तरी ते कमीच वाटू लागते.
चाचेगिरीचे वेगवेगळे काळ त्यानुसार बदलत गेलेल्या लुटमारीच्या पद्धती, वाढत गेलेला तंत्रज्ञानाचा वापर अशा गोष्टी एकत्र करून अजून एक भाग लिहिता आला तर बघ. बाकी लेखन छान.

राजाभाउ's picture

25 Jul 2016 - 1:47 pm | राजाभाउ

रोचक माहिती. फोटु पण भारी आहेत, या विषयावर आजुन वाचयला आवडेल.

रच्याकान या समुद्री लुटारुंना "चाचा" का म्हणतात ? काय व्युत्पती आहे या शब्दाची ?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

25 Jul 2016 - 5:23 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मस्त माहीती व फोटो तर कमाल,पहीला फोटो क्लासच आहे.विस्तृत लेखाबद्दल धन्यवाद ,चांग्ली माहीती मिळाली.

निर्धार's picture

25 Jul 2016 - 10:11 pm | निर्धार

अशा फार रोचक विषयावर अजुन जास्त माहिती येऊ द्या की राव.
बाकी लेख फारच आवडला हे वेगळे सांगणे न लगे.

अमेरिकन त्रिशंकू's picture

26 Jul 2016 - 2:12 am | अमेरिकन त्रिशंकू

समुद्री लुटेरे म्हटले कि सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ते मानवाची कवटी असलेले काळे निशाण, तो एक डोळा निकामी झालेला जहाजाचा कप्तान

pirates did not wear eye patches to cover a missing eye or an eye that was wounded in battle, but in fact, an eye patch was more likely to be used to condition the eye so the pirate could fight in the dark.

जव्हेरगंज's picture

26 Aug 2016 - 2:02 pm | जव्हेरगंज

an eye patch was more likely to be used to condition the eye so the pirate could fight in the dark.

मरठित कुणी सांगेल काय, हे काय लिहिलय!

सिरुसेरि's picture

26 Aug 2016 - 1:56 pm | सिरुसेरि

रोचक लेख . लाँग जॉन सिल्वर , जिम हॉकिन्स डोळ्यासमोर आले .