एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १०
दहावा भाग - एक्सेलचे उपविश्व - चार्ट्स
मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधे फॉर्म्युले अनेक आहेतच, परंतु त्यासोबत डेटा प्रेझेंट करण्याचे काही रेडीमेड पर्याय यात आहेत. त्यापैकी एक अतिशय लोकप्रिय असा पर्याय म्हणजे ग्राफ किंवा चार्ट. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ऑर्गनाइझ्ड इन्फॉर्मेशन चं महत्व काय हे आपण बघितलं. आता तीच ऑर्गनाइझ्ड इन्फॉर्मेशन म्हणजे डेटा हा एका दृष्टीक्षेपात बघणा-यापर्यंत पोहोचण्यासाठी चार्ट चा हा पर्याय अतिशय प्रभावी ठरतो.
चार्ट म्हणजेच तक्ता. रो आणि कॉलम्स मधे व्यवस्थित मांडलेली माहिती, म्हणजेच डेटा आपण चार्ट मधून कसा मांडायचा ते बघू.
डेटा रेंज - आपल्या माहितीपैकी जितक्या माहितीचा चार्ट बनवायचा असेल तितकी माहिती कीबोर्डच्या (शिफ्ट + अॅरो कीज) किंवा माऊसच्या सहाय्याने सिलेक्ट करावी. या सिलेक्ट केलेल्या माहितीला डेटा रेंज म्हणतात. जितकी माहिती सिलेक्टेड असेल तितक्याच माहितीचा चार्ट बनतो. डेटा सिलेक्ट करताना टोटल असलेली रो/कॉलम सिलेक्ट करू नये.
चार्ट - डेटा सिलेक्ट केल्यावर Alt + N + C या कीज दाबल्यावर चार्टचा मेनू येतो. किंवा माउसने इन्सर्ट टॅब मधे जाऊनही चार्ट चा मेनू उघडता येतो. ही शॉर्टकट की फक्त कॉलम चार्ट साठीची आहे. याशिवाय लाईन चार्ट, पाय चार्ट, बार चार्ट असे अनेक प्रकार आहेत. त्यातही पुढे त्रिमितीय, द्विमितीय असे अनेक पर्याय आहेत. या चार्टची रंगरंगोटी, याची रचना आपल्याला व डेटाला साजेशी करण्यासाठी असंख्य फॉर्मॅटिंग आणि डिझाईन ऑप्शन्स एक्सेल मधे आहेत. त्यांची ओळख सरावानेच होत जाते.
अशीच माहिती तयार करून विविध चार्टचे प्रकार आपण तयार करून बघू शकतो. एक्सेलच्या विशाल विश्वातलं चार्ट्स हे एक उपविश्वच म्हणायला हवं इतके विविध प्रकार त्यात करता येतात. पुढील भागात आपण चार्टच्या डिझाइन व फॉर्मॅटिंगपैकी काही प्रमुख पर्यायांची ओळख करून घेऊ.
प्रतिक्रिया
11 Jul 2016 - 10:09 pm | पैसा
उजळणी करण्यासाठी वाचत आहे.
13 Jul 2016 - 3:14 pm | मोदक
मस्त रे... प्रतिसाद आले नाही तरी चिकाटीने भाग टाकत रहा.
13 Jul 2016 - 3:58 pm | संदिप एस
<<मस्त रे... प्रतिसाद आले नाही तरी चिकाटीने भाग टाकत रहा.>>+१०००
13 Jul 2016 - 5:27 pm | प्रीत-मोहर
मी गेल्या काही दिवसांमधे थोडे दिवस बाहेरगावी असल्याने तर काही दिवस हापिसात बिझल्याने प्रतिक्रिया नाही देउ शकले.
पण बाय डिफॉल्ट सुंदर शिकवताय.
लिहिते रहो!!!