ये कौन चित्रकार है ? ... अर्थातच किमयागार निसर्ग

दिपोटी's picture
दिपोटी in कलादालन
22 Sep 2008 - 6:33 pm

विविध रंगात उमललेल्या या फुलांकडे पाहून कॅमेरा हातात नाही घेतला तरच नवल !

Dutch Iris च्या निरनिराळ्या उपजातींची ही फुले वर्षातून जेमतेम २ आठवड्यांसाठी हा असा आपला पिसारा फुलवतात. या फुलाच्या पाकळ्या अतिशय तरल व मुलायम अशा असतात. निसर्गाने केलेली रंगांची ही उधळण डोळ्यांना दिलासा देऊन जाते.

पेश है ...

आपल्या सकारात्मक / टीकात्मक प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत -

- दिपोटी

कलाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

22 Sep 2008 - 6:36 pm | जैनाचं कार्ट (not verified)

वाव !!!!!!

एकदम सुरेख छायाचित्रे... जरा मोठ्या आकारत द्या की वो !
दोन नंबर तर एकदम जबरा........

निळा रंग माझा आवडता रंग... अगदी हाच रंग माझ्या बेडरुमचा पण आहे !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

दिपोटी's picture

22 Sep 2008 - 7:19 pm | दिपोटी

जैनाचं कार्ट,

छायाचित्रे थोडी छोटी आहेत याची कल्पना आहे ... या संस्थळावर नवीन असल्यामुळे अजूनही चाचपडतोय !

छायाचित्र टाकताना Insert/edit image ची कळ दाबल्यावर जी चौकट येते, त्यात छायाचित्राचा आकार विचारला जातो, तो काय द्यावा ? थोडे प्रयत्न करुन पाहिले, पण वर दिलेल्या आकारापेक्षा मोठा आकार दिल्यास चित्र बरेच फाटते (grainy दिसते) ... खरे म्हणजे सर्वच मूळ छायाचित्रांचे resolution बर्‍यापैकी आहे, पण एकतर फ्लिकर वर टाकताना किंवा फ्लिकर वरुन मिपावर टाकताना कुठेतरी आकाराच्या अथवा resolution च्या बाबतीत गफलत होत असावी.

जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास उत्तम.

- दिपोटी

दिपोटी's picture

22 Sep 2008 - 7:16 pm | दिपोटी

काम फत्ते !

- दिपोटी

देवदत्त's picture

22 Sep 2008 - 7:20 pm | देवदत्त

मस्त आहेत चित्रं.
सुंदर एकदम.

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 10:48 pm | विसोबा खेचर

क्या केहेने...!

आपला,
(फुलांचा प्रेमी) तात्या.

यशोधरा's picture

22 Sep 2008 - 10:57 pm | यशोधरा

मस्त फोटो!

भाग्यश्री's picture

22 Sep 2008 - 10:58 pm | भाग्यश्री

काय सुंदर फुलं !! निळं जास्त आवडलं.. अप्रतिम रंग..

मी काढलेला एक फोटो आठवला..

IMG_1075 (2)

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2008 - 11:01 pm | प्रभाकर पेठकर

मस्त आहेत फुलांचे हसरे चेहरे.

थोडी टेक्निकल डिटेल्स द्यावीत. जसे, कुठला कॅमरा, कुठली लेन्स आणि काय सेटींग्ज ठेवली होती.

अभिनंदन.

दिपोटी's picture

23 Sep 2008 - 4:14 am | दिपोटी

पेठकर काका,

तांत्रिक बाबी अशा:

कॅमेरा : निकॉन डी-६०
लेन्स : निकॉन डी-एक्स एएफ-एस निकॉर ५५-२०० मिमि १.४-५.६ जी ईडी व्हीआर
सेटिंग : ऑटो

छायाचित्रे काढल्यानंतर वाटले की पुढील बदल केले असते तर छायाचित्रे जास्त चांगली आली असती : ट्रायपॉड वापरायला हवा होता / ऍपेर्चर कमी ठेवायला हवे होते (ज्यामुळे फोकसिंग ची खोली - ज्याला डेप्थ ऑफ फिल्ड म्हणतात - वाढली असती, जेणेकरुन बॅकग्राउंड / फोरग्राउंड सुध्दा जास्त स्पष्ट होतात) / फोकसिंग सुध्दा मॅन्युअल सेटिंग ठेवून करायला हवे होते. मला वाटते की अशा आऊटडोअर क्लोजअप्स (स्वगत : आता या 'स' चा पाय कसा मोडावा बरे ?) साठी ऑटो सेटिंग पेक्षा ऍपेर्चर-प्रीफर्ड सेटिंग चा जास्त उपयोग होऊ शकेल. असो ... पुढल्या वेळी लक्षात ठेवायला हवे ... ही मारली शेंडीला गाठ.

छायाचित्रणातील तांत्रिक बाबी सांगताना नाईलाजाने इंग्रजीचा वापर करायला लागतो ... क्षमस्व !

प्रतिक्रिया दिलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद !

- दिपोटी

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2008 - 12:52 pm | प्रभाकर पेठकर

ट्रायपॉड वापरायला हवा होता
१/६० च्या खालील कुठल्याही स्पीड साटी ट्रायपॉड वापरावाच.

ऍपेर्चर कमी ठेवायला हवे होते (ज्यामुळे फोकसिंग ची खोली - ज्याला डेप्थ ऑफ फिल्ड म्हणतात - वाढली असती, जेणेकरुन बॅकग्राउंड / फोरग्राउंड सुध्दा जास्त स्पष्ट होतात)
ह्या छायाचित्रांमध्ये फुलांचे महत्व अधिक आहे त्या मुळे बॅकग्राउंड धूसर ठेवल्याने फुलांवर लक्ष अधिक केंद्रित होते. मला वाटते ऍपर्चर योग्य आहे.

फोकसिंग सुध्दा मॅन्युअल सेटिंग ठेवून करायला हवे होते.
त्याने छायाचित्रणाचा आनंद अधिक मिळू शकेल. ऑटो फोकस आणि प्रोग्रॅम्ड मोड मध्ये छायाचित्रकाराकडे श्रेय कमी येते.
(कोन, प्रकाश योजना आणि छायाचित्राची चौकट ह्याचे श्रेय जरूर मिळते).

मला वाटते की अशा आऊटडोअर क्लोजअप्स (स्वगत : आता या 'स' चा पाय कसा मोडावा बरे ?) साठी ऑटो सेटिंग पेक्षा ऍपेर्चर-प्रीफर्ड सेटिंग चा जास्त उपयोग होऊ शकेल.
'क्लोजअप्स्' लिहीण्यासाठी 's' नंतर '.'+'h' टाईप करावे.

माहिती पुरविल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

झकासराव's picture

23 Sep 2008 - 6:44 pm | झकासराव

पेठकर काका,
तुम्हाला फोटोंची रेसिपीदेखील उत्कृष्ट माहिती आहे की :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2008 - 6:48 pm | प्रभाकर पेठकर

मी शिकाऊ उमेदवार आहे.
१० गोष्टीत रस जरूर आहे.

टग्या's picture

22 Sep 2008 - 11:03 pm | टग्या (not verified)

छायाचित्रे सुंदर आहेत.

हल्ली दुर्दैवाने डोक्यात "चित्रकार" या शब्दाचा भलताच, क्रिप्टिक अर्थ डोक्यात बसलाय, त्यामुळे प्रचंड गोची होते! :( सॉरी!!!

टारझन's picture

23 Sep 2008 - 12:36 am | टारझन

काय बे करप्टेड माइंड टग्या.... च्यायला ... सगळी चित्रकला तिकडेच बरे वळती रे ...

उत्तम चित्रकार
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

झकासराव's picture

22 Sep 2008 - 11:02 pm | झकासराव

वॉव!!!!
मस्तच आहेत सगळी फुले :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्राजु's picture

23 Sep 2008 - 5:42 am | प्राजु

खास दिसताहेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

23 Sep 2008 - 6:08 am | शितल

सर्वच फोटो आवडले,
भाग्यश्रीने काढलेला फोटो ही केवळ सुंदर.
:)

अनिल हटेला's picture

23 Sep 2008 - 6:48 am | अनिल हटेला

छान फोटोज आहेत !!

निळ्या रंगाचे जास्त आवडले !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दिपोटी's picture

23 Sep 2008 - 12:36 pm | दिपोटी

मंडळी,

प्रतिक्रियांबद्दल भरपूर धन्यवाद ! खासकरुन आमचे (किंवा खरे म्हणजे 'आमची ') निळुभाऊ फुले बर्‍याच मंडळींच्या पसंतीस उतरल्याचे दिसते ... आनंद आहे !

- दिपोटी

बापु देवकर's picture

23 Sep 2008 - 3:10 pm | बापु देवकर

छान फोटोज आहेत !!

ऋषिकेश's picture

23 Sep 2008 - 4:05 pm | ऋषिकेश

अहाहा!! सुंदर रंग!
मिपावर सध्या वेगवेगळ्या उत्तमोत्तम रंगांची उधळण चालु आहे. जणू काहि रंगोत्सवच :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

रश्मी's picture

23 Sep 2008 - 5:36 pm | रश्मी

सुरेख फोटो आहेत.

रामदास's picture

23 Sep 2008 - 7:19 pm | रामदास

सुंदर आहेत.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.