माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -१०

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
13 Jun 2016 - 11:10 pm

भाग दहावा -

आज आम्ही Tower of London आणि Tower Bridge बघायला जाणार होतो. या दोन्ही गोष्टी माझ्या बाहेरून पाहून झाल्या होत्या आता आतून पहायच्या होत्या. दोन्ही गोष्टी पहायला तिकीट आहे. याची सविस्तर माहिती देण्याआधी एक गोष्ट मी सांगू इच्छिते. ही सगळी आकर्षणं बघायला त्यांनी साधारण १० पौंड ते ३५ पौंड पर्यंत तिकीट दर ठेवलेले आहेत. दोघांचे मिळून प्रत्येक वेळी डबल खर्च होत होता. माझ्या नवऱ्याच्या एका मित्राने आम्हाला सांगितलं की लंडन मधील कोणत्याही National रेल चे तिकीट काढ आणि त्या आकर्षणाच्या तिकीट खिडकी वर ते रेल्वे तिकीट दाखव तर तुला एकावर एक तिकीट मोफत मिळेल. त्याप्रमाणे आम्ही National रेल ची कमीत कमी अंतराची २ तिकिटे काढली आणि ती Tower of London तिकीट खिडकी वर दाखवली आणि आम्हाला एकावर एक तिकीट मोफत मिळाली. ही सुविधा लंडन मधील बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होते. फक्त ज्या दिवशी तुम्ही ती जागा बघणार असाल त्याच दिवशीचे तिकीट हवे. ट्युब चे तिकीट चालत नाही किंवा Oyester कार्ड ही चालत नाही तिकीट हे National रेलचेच लागते. या सुविधेमुळे आमचे बरेच पैसे वाचले. तिथल्या शासनाचे खरच कौतुक आहे की त्यांनी अशी सुविधा उपलब्ध केली आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक इथे येतात आणि या सगळ्या गोष्टी पाहू शकतात. वाचकांपैकी कोणी लंडन फिरायला गेले किंवा जाणार असतील तर ते या सुविधेचा फायदा घेऊ शकतील म्हणून हे सर्व इथे लिहिले आहे.

आता सुरुवात करूया Tower of London पासून. Tower of London चे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे कोहिनूर हिरा. आपल्याला कोहिनूर हिरा पहायला मिळणार या कल्पनेनेच इतका आनंद होत होता. हा आतमध्ये खूप च मोठा आहे. भव्य दगडी बांधकाम आपले लक्ष वेधून घेतं.

आतमध्ये गेल्यावर कळत की हा एक भव्य महाल आहे थेम्स नदीकाठी वसलेला. Medieval Palace , White Tower आणि त्यामधील रॉयाल शस्त्रास्त्रे , Tower of Torture , आणि मुख्य आकर्षण म्हणजे The Crown Jwels. ज्यामध्ये कोहिनूर हिरा ठेवलेला आहे. ही सगळी Tower of London ची मुख्य आकर्षण. प्रत्येक जागेमध्ये एक वेगळा इतिहास. खरतरं ही जागा पाहायला अक्खा दिवस पाहिजे होता म्हणजे सगळं नीट बघता आलं असतं आणि सविस्तर माहिती वाचता आली असती पण वेळेअभावी आम्हाला इथे ३ साडे ३ तासच थांबायला मिळालं. Medieval Palace पाहिल्यावर समजतं की जुन्या काळचे राजे कसे राहत होते त्यांच्या जुन्या गोष्टी या palace मध्ये जतन करून ठेवल्या आहेत. Medieval Palace च्या वरून Tower Bridge खूपच सुंदर दिसतो. White Tower जगातील मुख्य ऐतिहासिक इमारतींपैकी एक आहे. इथे Royal Armouries चे प्रदर्शन आहे. असतील नसतील तेवढी सगळी शस्त्रास्त्रे इथे बघायला मिळतील. Tower of Torture मध्ये मात्र जरा उदास व्हायला झालं. जुन्या काळच्या राजांचा इथे अमानुष छळ कशाप्रकारे झाला ते दाखवले आहेत आणि त्याच्या काही प्रतिकृती तयार केल्या आहेत ते पाहून अंगावर काटा आला :( वाईट वाटलं.

Tower Of London मधून दिसणारा Tower Bridge

White Tower

Tower of London ची प्रतिकृती

आता आम्ही आलो The Crown Jwels पहायला. इथे आतमध्ये आल्यावर नम्रपणे एका ब्रिटीश स्त्रीने आम्हाला सांगितलं की फोटो काढायला परवानगी नाही. आम्हाला वाटलं की आता कॅमेरा आणि फोन इथेच ठेवावा लागतोय की काय !!! पण असं काही झालं नाही. आतमध्ये गेल्यावर आधी क्वीन एलिझाबेथ २ च्या Crowing Ceremony ची व्हिडिओ क्लीप दाखवली. ती पाहिल्यावर पुढे बऱ्याच राजे आणि राण्यांचे फोटो आणि पेंटिंग होती त्यावरून कळलं की किती रॉयल आहे हे सगळं. आता आलो आम्ही ज्वेल सेक्शन मध्ये. इथे त्यांचे लोकं उभे होते आणि सगळ्या लोकांवर कडक पहारा होता. या विभागामध्ये काही काचेचे मोठे बॉक्स ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये हे सगळे हिऱ्याचे मुकुट ठेवलेले आहेत. आणि त्याच्या दोन्ही बाजूने सरकता पट्टा आहे त्यावर उभे राहून पहायचं आम्ही ३ वेळा त्या पट्ट्याच्या दोन्ही बाजूने पाहिले. सरकता पट्टा असल्याने तो पटपट पुढे जात होता त्यामुळे नीट पाहता येत नव्हतं म्हणून ३ वेळा गेलो. अक्षरशः डोळे दिपवून टाकणारे हिऱ्यांचे मुकुट. सगळ्या मुकुटांवर हिरे आणि फक्त हिरे. कितीही पाहून मन भरत नव्हतं इतके सुंदर मुकुट आणि हिरे. आणि या बॉक्स मधल्या सगळ्यात शेवटच्या राणीच्या मुकुटावर आहे तो कोहिनूर!! :) पुढे गेल्यावर माहिती कळाली की कोहिनूर हा एका ब्रेसलेट मध्ये होता आधी आणि नंतर तो या मुकुटामध्ये बसवला. ते ब्रेसलेट सुधा तिथे जपून ठेवलेले आहे. हे पाहून झाल्यावर पुढील भागामध्ये सगळी सोन्याची भांडी होती जी राणीच्या crowning ceremony च्या वेळेस वापरली होती. काय तो राजेशाही थाट !! इतकं सुरेख कोरीव काम केलं होतं प्रत्येक भांड्यावर. डोळे दिपून गेले पुन्हा एकदा हे सगळं बघताना. प्रत्येक गोष्टीमध्ये या देशाचा रॉयल थाट दिसतो खरंच !! हे सगळं बघून बाहेर आलो. ओल्मोस्ट सगळ्या गोष्टी पाहून झाल्या होत्या. आता जायचे होते Tower Bridge पहायला.

Tower of London हून थोडं पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूलाच आहे Tower Bridge ब्रीजवरच मध्यभागी तिकीट खिडकी आहे तिथेच ब्रिजच्या वर जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. इथलं तिकीट ९ पौंड आहे. तिकीट काढून झाल्यावर त्यांची एक कर्मचारी आपल्याला लिफ्ट ने वर घेऊन जाते. वर आल्यावर तिने सांगितले आता तुम्ही तुमचे फिरायला मोकळे. हा ब्रिज म्हणजे २ Tower आहेत आणि Tower एका रस्त्याने जोडलेला आहे या रस्त्याचं वैशिष्ठ्य म्हणजे हा रस्ता कुठलेही मोठे जहाज किंवा बोट क्रॉस होणार असेल तर हा रस्ता उघडतो आणि tower च्या टोकांच्या थोडं खाली २ मोठे platform आहेत ज्याने एका Tower मधून दुसऱ्या Tower मध्ये जाता येतं. या platform चे वैशिष्ठ्य म्हणजे या platform वर साधारण ११ मीटर लांबीची काच आहे जिथे उभे राहून आपल्याला खाली थेम्स नदी आणि खालचा रस्ता दिसतो. हा अनुभव खूप छान होता. एवढ्या उंचीवरून काचेतून खाली पाहत होतो आम्ही. इथे पण भरपूर फोटो काढले. लहान मोठी मुलं झोपून फोटो काढत होती , उड्या मारत होती. या काचेच्या platform वरून दोन तीनदा चाललो. ही जागा थेम्स नदीवरून साधारण १३५ ते १४० फूट उंच आहे. इथून लंडन चा जो नजारा दिसतो तो खूप सुंदर दिसतो.

Tower of London वरून दिसणारा नजारा!!

आत्ता आम्ही एका Tower वर होतो आणि हा platform वरून चालत दुसर्या Tower मध्ये आलो. हा platform क्रॉस करताना दोन्ही बाजूला जगातील सगळ्यात मोठ्या ब्रिजेस चे फोटो लावलेले आहेत. दुसऱ्या Tower मध्ये आल्यावर इथे हा ब्रिज कसा बांधला यावर एक छोटीशी फिल्म दाखवतात. इथे ब्रिज च्या जुन्या स्केचेस / रेखाटने ठेवलेली आहेत. या ब्रिजचे बांधकाम सन १८८६ मध्ये सुरु होऊन १८९४ मध्ये पूर्ण झाले. ही फिल्म पाहून झाल्यावर आम्ही जिना उतरून खाली आलो. ब्रिजच्या खाली एक गोडाऊन आहे जिथे जुन्या काळी ब्रिज चा रस्ता उघडण्यासाठी वापरणारी मशिन्स ठेवलेली आहेत जी कोळश्यावर आणि वाफेवर चालत होती. आता सगळं संगणकीकृत झालेलं आहे त्यामुळे ही मशिन्स वापरली जात नाहीत पण जतन करून ठेवली आहेत.

ही मशिन्स पाहून झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. आता पूर्ण अंधार झाला होता. Tower ब्रिज उतरून खाली आलो आणि घरी जायला निघालो. थेम्स च्या दोन्ही बाजूने चालायला रस्ता आहे. आम्ही गूगल map वर जवळचे स्टेशन शोधले आणि चालायला सुरु केली. थोडं पुढे चालत गेल्यावर मागे वळून पाहताना दिव्यांच्या लखलखाटात अप्रतिम सुंदर दिसत होता Tower ब्रिज. बराच वेळे होतो आम्ही तिथे. बरेच फोटो काढले.

आता पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळे नाईलाजाने तिथून निघावं लागलं. जवळच्या स्टेशन वर येउन ट्यूब ने घरी आलो. आजची भटकंती मस्तच झाली होती. आता उत्सुकता होती मादाम तुसाद्स आणि लंडन आय ची :)

क्रमश :

फोटो चा साईझ कमी करायचा प्रयत्न केला पण त्यामुळे फोटो दिसत नाही आहेत तरी माझी संपादकांना विनंती आहे की त्यांनी ते एडीट करावेत. धन्यवाद !!

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

14 Jun 2016 - 12:04 am | पद्मावति

मस्तं!

Jack_Bauer's picture

14 Jun 2016 - 2:07 am | Jack_Bauer

छान वर्णन केले आहे. २२१ b बेकर स्ट्रीट ला गेला होतात का ?

मेघना मन्दार's picture

15 Jun 2016 - 12:26 pm | मेघना मन्दार

ते शेर्लोक होम्स वाचलेल नाही मी त्यामुळे त्यात फार रस नव्हता म्हणून नाही गेले..

अमेरिकन त्रिशंकू's picture

14 Jun 2016 - 4:29 am | अमेरिकन त्रिशंकू

अक्षरशः डोळे दिपवून टाकणारे हिऱ्यांचे मुकुट. सगळ्या मुकुटांवर हिरे आणि फक्त हिरे. कितीही पाहून मन भरत नव्हतं इतके सुंदर मुकुट आणि हिरे. आणि या बॉक्स मधल्या सगळ्यात शेवटच्या राणीच्या मुकुटावर आहे तो कोहिनूर!! :) पुढे गेल्यावर माहिती कळाली की कोहिनूर हा एका ब्रेसलेट मध्ये होता आधी आणि नंतर तो या मुकुटामध्ये बसवला. ते ब्रेसलेट सुधा तिथे जपून ठेवलेले आहे. हे पाहून झाल्यावर पुढील भागामध्ये सगळी सोन्याची भांडी होती जी राणीच्या crowning ceremony च्या वेळेस वापरली होती. काय तो राजेशाही थाट !! इतकं सुरेख कोरीव काम केलं होतं प्रत्येक भांड्यावर. डोळे दिपून गेले पुन्हा एकदा हे सगळं बघताना. प्रत्येक गोष्टीमध्ये या देशाचा रॉयल थाट दिसतो खरंच !!

जगभरच्या वसाहतींमधून तिथल्या लोकांच्या जिवावर पाय आणून चोरलेल्या सगळ्या गोष्टींचं कसलं आलय कौतुक? एक नंबर चोर लोक आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2016 - 5:31 am | डॉ सुहास म्हात्रे

छान चालली आहे भटकंती ! फोटोही सुंदर !

फोटो लेखनाच्या चौकटीत ठेवण्यासाठी त्यांची रुंदी आडव्या (लॅण्ड्स्केप) चित्रांसाठी ६६० किंवा कमी आणि उभ्या (पोर्ट्रेट) चित्रांसाठी ३३० किंवा कमी ठेवा. दरवेळी उंचीची जागा रिकामीच ठेवा, म्हणजे चित्रे प्रमाणशीर राहतील.

खूप छान लिहिलंय. सुंदर फोटो आहेत.

अजया's picture

14 Jun 2016 - 11:36 am | अजया

मस्तच भटकंती.

दुर्गविहारी's picture

15 Jun 2016 - 12:23 pm | दुर्गविहारी

आधीच्या सर्व भागान्च्या लिन्क दिल्या तर सोयीचे होइल. बाकी लेखमाला फारच सुरेख.

मेघना मन्दार's picture

15 Jun 2016 - 12:32 pm | मेघना मन्दार

सर्व प्रतिक्रियांसाठी खूप धन्यवाद :)