माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - २

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
29 Apr 2016 - 1:39 pm

भाग पहिला भाग दुसरा -

आणि अखेर तो दिवस आला ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते २३ January २०१६. सगळी तयारी झाली होती. हिवाळ्यामध्ये UK फिरायला जाणार असाल तर भरपूर गरम कपडे न्यावे लागतात. आणि हो तिथे लेयर्स मध्ये कपडे घातले म्हणजे एकावर एक ३/४ कपडे घालायचे आणि सगळ्यात वरचा लेयर म्हणजे तुमचं जाकीट किंवा स्वेटर. हे सगळं घातल्यावर मग तुम्ही आरामात फिरू शकता. आमचा तिथे राहायचा प्रश्न नव्हता कारण नवऱ्याला कंपनी कडून सर्विस अपार्ट्मेण्ट मिळणार होतं तिथे राहणार होतो आम्ही. सगळी तयारी झाली होती आणि आता फक्त घरून निघायचीच वाट बघत होतो. घरापासून विमानतळ जवळ असल्याने पोहोचायला खूप वेळ नाही लागला. विमानतळावर आल्यावर सगळे सोपस्कार पार पाडले. चेक इन आणि सुरक्षा तपासणी झाली आणि विमानात जाऊन बसलो एकदाचे. खूप एक्साइटेड होते मी!! कधी एकदा विमान उड्डाण घेतय आणि कधी एकदा आम्ही लंडन ला पोहोचतोय असं झालं होतं मला.

तिथल्या वेळेनुसार सकाळी पावणे ७ वाजता आम्ही Heathrow विमानतळावर पोहोचलो. Immigration आणि सुरक्षा तपासणीतून बाहेर आलो सामान घेतलं आणि बाहेर यायला निघालो. बाहेर मस्त थंडी आणि रिमझिम पावसाने आमचं स्वागत केलं . हवामान खूप च छान होतं. आम्ही Taxi बुक केली होती त्याप्रमाणे ती वेळेत आली आणि आम्ही विमानतळाच्या बाहेर पडलो. सकाळची वेळ असल्याने तसा रस्त्याला traffic नव्हता त्यामुळे सुसाट चालली होती गाडी. आजूबाजूची टुमदार घरं, मोठ्ठी झाडे, लॉन्स, बागा बघत छान चाललो होतो. लंडनच्या मध्यवर्ती भागात Lancaster Gate म्हणून एक स्टेशन आहे त्या भागात आमचं सर्विस अपार्ट्मेण्ट होतं तिथे आम्ही राहणार होतो.आम्हालातिथे पोहोचायला आम्हाला साधारण ४५ मिनिटे लागली. आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा साधारण सकाळचे ९ वाजले असतील आणि आम्हाला अपार्ट्मेण्ट १२ वाजता मिळणार होतं. आता समोर प्रश्न होता कि काय करायचं मग त्यांच्या locker रूम मध्ये सामान टाकलं जरा फ्रेश झालो आणि निघालो भटकायला. आम्ही जिथे राहत होतो तिथून Hyde पार्क २ मिनिटांच्या अंतरावर होतं. Hyde पार्क हे लंडन मधील सगळ्यात मोठं पार्क आणि ४ रॉयल पार्क्स पैकी एक आहे. ६०० एकरांमध्ये वसलेलं हे पार्क अत्यंत सुंदर आहे. तर ही सगळ्यात मोठ्ठी बाग बघायला आम्ही निघालो.

January महिना असल्यामुळे थंडी खूप होती आणि जोडीला बोचरा वारा. एकावर एक असे ३ लेयर्स घालून सुद्धा मला खूप थंडी वाजत होती. आमच्या पूर्ण वास्तव्यात आम्हाला हवामानाने सुद्धा चांगली साथ दिली. January महिना म्हणजे खूप थंडी असते पण आम्हाला बऱ्यापैकी चांगलं हवामान मिळालं सगळीकडे फिरताना.

Lancaster Gate स्टेशन च्या बाहेरच Hyde पार्क प्रवेशद्वार आहे. बागेमध्ये गेल्यावर सगळीकडे फक्त हिरवळ आणि झाडं. डोळ्यांना इतकं छान वाटत होतं न ते पाहून. जिथे नजर जाईल तिथे हिरवळ. रस्तेसुद्धा खूप सुंदर आहेत आत. हे पार्क म्हणजे खर्या अर्थाने रॉयल म्हणावं लागेल इतकं सुंदर आहे सायकस्वारांसाठी वेगळी लेन आणि विशेष म्हणजे बागेतून ४ चाकी दुचाकी सुद्धा जात होत्या. सकाळची वेळ असल्याने बरेच लोकं चालायला, पळायला, सायकल चालवायला आले होते. आणि हो लोकं त्यांची कुत्री पण फिरवत होते. तिथे एक अत्यंत कौतुकास्पद गोष्ट पहायला मिळाली ती अशी कि लोकं त्यांच्या पेट्स ची विष्ठा स्वतः गोळा करत होते आणि घेऊन जात होते जेणेकरून बागेमध्ये घाण नको. ती गोळा करण्यासाठी काहीतरी वेगळं Potty scoop म्हणून साधन सगळ्यांच्या हातात दिसलं. बाग स्वच्छ रहावी हाच उद्देश पण छान वाटलं असं करतात ते पाहून. हे वेगळं कधी न पाहिलेलं म्हणून नमूद करावसं वाटलं. Hyde पार्क मधून फिरत फिरत आम्ही Marble Arch म्हणून एक जागा आहे तिथे पोहोचलो. इथे बर्याच सिनेमांचा चित्रीकरण झालं आहे. संपूर्ण संगमरवरामध्ये कमानीसारखी इमारत बांधली आहे. या Marble arch च्या वर जाता येतं आणि वरून Hyde पार्क आणि आजूबाजूचा परिसर दिसतो. Marble Arch हे ट्युब स्टेशन आहे व तिथून बाहेर पडल्यावर लगेचच हि जागा समोर दिसते. तिथे आजूबाजूला मस्त फुलांचे ताटवे, कारंजी बघायला मिळाली. सगळीकडे भरपूर फोटो काढले आणि पुढे निघलो.

आमच्याकडे पुष्कळ वेळ होता आणि बाहेर वातावरण पण मस्त थंड होतं त्यामुळे आम्ही अजून पुढे चालत जायचं ठरवलं. आता आम्ही Bond Street वर होतो. Marble Arch च्या पुढचं स्टेशन म्हणजे Bond street आणि त्याच्यापुढे Oxford Circus. या स्टेशन वरून बाहेर पडलं की Oxford Street वर फिरता येतं. Marble Arch स्टेशन पासूनच जी मोठ्ठी मोठ्ठी दुकानं सुरु होतात ती अगदी Oxford Circus पर्यंत. Oxford street म्हणजे खरेदीसाठी उपलब्ध असलेलं लंडन मधील सगळ्यात चांगलं ठिकाण. इथे आलात म्हणजे तुमच्या खिशाला कात्री लागलीच म्हणून समजा!! काय मिळत नाही इथे? सगळं मिळतं. लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते मोठ्यांच्या गाड्या, सौंदर्य प्रसाधने, कपडे सगळा काही. पण सगळं अत्यंत महाग. विकत घ्यायची हिम्मत च नाही व्हायची. आणि तसही खरेदीपेक्षा मला जास्तीत जास्त फिरण्यात रस होता. आमचं मस्त विंडो शोप्पिंग चाललं होतं. चालत चालत पूर्ण Oxford street फिरून झाला. Oxford circus स्टेशन पर्यंत गेलो. इथल्या स्टेशन्स मध्ये तसं कमी अंतर आहे असं वाटलं मला त्यामुळे इतकं चालून सुद्धा पाय दुखले नाहीत.Lancaster gate स्टेशन पासून आम्ही ३ स्टेशन्स चालत आलो होतो. पहिलाच दिवस होता तिथला त्यामुळे जरा जास्तच उत्साह वाटत होता पण आता पोटात कावळे ओरडायला लागले होते आणि इतकं चालून चालून भूक लागली होती. खूप शोधल्यानंतर आम्हाला एक Subway दिसलं, तिथे खाऊन घेतलं आणि निघालो. Marble Arch स्टेशनच्या बाहेर Sainsburys नावाचं एक नावाचं दुकान आहे. सुपर मार्केट सारखं. या दुकानाच्या बऱ्याच चेन्स आहेत लंडन मध्ये. तिथे जाऊन थोडं खायचं सामान म्हणजे दूध, बिस्कीट, ब्रेड असं घेऊन निघालो .

आम्हाला चालत तसं २ किमी जायचं होतं. ट्युब चा पास काढला नसल्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी चालतच फिरलो. चालत फिरण्यात सुद्धा वेगळीच मज्जा असते नै का? आणि हो महत्वाचं सांगायचं म्हणजे लंडन मध्ये फिरायचं म्हणजे तुम्हाला भरपूर चालण्याची तयारी पहिजे. सगळ्या गोष्टी या चालत फिरून बघण्यासारख्याच आहेत. थंड हवामानामुळे जास्तं चालायला काही वाटतही नाही. आणि हो त्यानिमित्ताने व्यायाम सुद्धा होतो. अगदी अवांतर म्हणजे तिथून आल्यावर इतकं चालल्यामुळे माझं वजन सुद्धा कमी झालं ;) हं तर आम्ही आलो चालत चालत रूम वर. आल्या आल्या आधी चहा घेतला गरमागरम, फ्रेश झालो आणि जरा आराम केला.

थोडावेळ आराम झाल्यावर संध्याकाळी पुन्हा बाहेर पडलो. नवऱ्याच ऑफिस paddington म्हणून एक स्टेशन आहे तिथे आहे ते बघायला चाललो होतो. Paddington स्टेशन सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. या स्टेशन वरून बऱ्याच ठिकाणी जाता येतं. लंडन च्या बाहेर कुठे जायचं असेल तर तिथे जाणाऱ्या National Railway सुद्धा इथून जातात. खरतरं हे स्टेशन आणि मंदारचं ऑफिस खूप जवळ होतं आम्ही जिथे रहात होतो तिथपासून, पण नीट माहिती नसल्यामुळे पहिल्याच दिवशी रस्ता चुकलो. चालता चालता मध्ये एक आज्जीबाई भेटल्या त्यांनी योग्य रस्ता दाखवला आणि आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो. इथले लोकसुद्धा एकंदरीत नम्र आणि मदत करणारे वाटले. तिथे पोहोचल्यावर नवऱ्याच ऑफिस पाहिलं आणि निघालो.

Paddington मध्ये Little Venice म्हणून एक जागा आहे. खूप सुंदर आहे ही जागा. युरोप मधील Venice नाही पाहिलं पण paddington च Little Venice पाहिलं. सगळीकडे मस्त पाणी आणि पाण्याच्या दोन्ही बाजूला हाउस बोट्स. कॅनॉलच्या दोन्ही बाजूला मस्त झाडं आणि मधे छोटे छोटे पूल. एकदम युरोपात आले कि काय असच वाटलं ;)

January महिना असल्यामुळे अंधार लौकर पडतो तिथे. साधारण ८:३० वाजले असतील आम्हाला घरी यायला. आज खूप चालणं झालं होतं आणि प्रवास झाल्यामुळे दमलो होतो त्यामुळे रूम वर परत आल्यावर घरून आणलेले पराठे खाल्ले आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी मला आराम होता पण नवऱ्याला ऑफिसला जायचं होतं म्हणून लौकर उठावं लागणार होतं. इतकं दमलो होतो त्यामुळे जागा नवीन असली तरीही झोप कधी लागली कळलंच नाही :)

फोटो - फोटोचे एकत्रीकरण केले नाहीये अजून त्यामुळे फोटो मी जमेल तसं वेगळ्या धाग्यामध्ये टाकेन.

क्रमश :

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

29 Apr 2016 - 2:57 pm | पद्मावति

खूप छान लिहिताय.
दोन्ही भाग वाचले. मस्तं. पु.भा.प्र.

अभ्या..'s picture

29 Apr 2016 - 3:07 pm | अभ्या..

कसलं भारी

संजय पाटिल's picture

29 Apr 2016 - 3:20 pm | संजय पाटिल

वाचतोय...
फोटोच बघा जरा लवकर.

उत्साहाने केलेली भटकंती आवडली. पुभाप्र!

सच्चिदानंद's picture

29 Apr 2016 - 3:32 pm | सच्चिदानंद

जरा जास्तच शाळकरी बाळबोध नाही का वाटत हो.
कोणी टिकाच करायची नाही असे ठरवले असेल तर असो पण लिहिणार्‍यास हे सांगायला हवंच की.

"भाग पहिला -

मिसळपाव वर हा माझा पहिलाच लेखनाचा प्रयत्न, त्यामुळे लेखनातल्या चुका सांभाळून घ्या मिपाकरांनो !!"

लेखिकेने हे एकदा स्पष्ट केल्याने, अनावश्यक टीका कशाला?

सच्चिदानंद's picture

29 Apr 2016 - 8:12 pm | सच्चिदानंद

अनावश्यक टीका कशाला?

सुधारणेस मदत होणार असेल तर टिका अनावश्यक कशी ? आणि मग हेच सूत्र इतर गरिब नवलेखकांना का लावले जात नाही हो.

सच्चिदानंद's picture

29 Apr 2016 - 8:12 pm | सच्चिदानंद

अनावश्यक टीका कशाला?

सुधारणेस मदत होणार असेल तर टिका अनावश्यक कशी ? आणि मग हेच सूत्र इतर गरिब नवलेखकांना का लावले जात नाही हो.

लेखिकेने स्वतःची लेखन मर्यादा आधीच स्प्ष्ट केल्याने, उगाच तिच्या लेखनशैली बाबत, टीका करणे योग्य न्हवे, असे माझे मत.

"सुधारणेस मदत होणार असेल तर टिका अनावश्यक कशी?"

लेखिकेने मला माझी लेखनशैली सुधारायला मदत करा, अशी विनंती केली आहे का? त्यांनी जर अशी विनंती केली असती तर गोष्ट निराळी होती.

"आणि मग हेच सूत्र इतर गरिब नवलेखकांना का लावले जात नाही हो."

नुकत्याच प्रकाशित झालेल्या "माझी ज्यूरी ड्युटी" किंवा "पहिली फ्लाइट . . . . . . जरा हटके" ह्या लेखांबाबत पण आपले हेच मत आहे का?

लेखात जर दम असेल तर खरा मिपाकर नव्या-जुन्याचा भेद-भाव करत नाही.

पण लेखक किंवा लेखिका ते सर्वज्ञानी आहेत आणि त्यांनाच सगळे समजते, असा आव आणत असतील मात्र त्यांचे जरा कठीणच असते.

मेघना मन्दार's picture

2 May 2016 - 10:48 pm | मेघना मन्दार

सच्चिदानंद दादा तुम्हाला वाटला असेलही माझा लेख बाळबोध किंवा शाळकरी. पण अहो मला जे मनापासून वाटलाय हि ट्रीप अनुभवताना ते मी ह्यात नमूद केलं आहे. आणि खरं म्हणजे मी काही हाडाची लेखिका वगैरे नाही हो. शिकत आहे हळू हळू. तुमच्यासारखे लोक आणि मिपावरचे अनुभवी लेखक असतील मार्गदर्शन करायला तर अजून चांगलं लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन :)

अजया's picture

29 Apr 2016 - 3:51 pm | अजया

वाचतेय.पुभाप्र

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 5:36 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

उल्का's picture

29 Apr 2016 - 5:42 pm | उल्का

पुभाप्र.

उगा काहितरीच's picture

29 Apr 2016 - 7:24 pm | उगा काहितरीच

मस्त... पहिल्यांदाच जाणाऱ्या व्यक्तीच्या लिहील्यामुळे विशेष आवडत आहे.

विद्यार्थी's picture

29 Apr 2016 - 7:39 pm | विद्यार्थी

लंडनच्या आठवणी जाग्या झाल्या या लेखाने, उत्तम लिखाण. पुढील भागाची प्रतीक्षा आहे.

आदूबाळ's picture

29 Apr 2016 - 8:07 pm | आदूबाळ

वाचतोय!

वाचतेय. खूप चालण्याची तयारी हवी याच्याशी सहमत.