माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - ७

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
1 Jun 2016 - 11:25 pm

भाग सातवा -

आज सकाळी हाइड पार्क मध्ये गेले. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे या पार्कला बरेच प्रवेशद्वार आहेत. आज ठरवलं वेगळा रस्ता explor करूया. या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेले आणि समोर मस्त तळे आणि कारंजी. तिथून निघावसा वाटत नव्हतं पण पुढेही जायचं होतं म्हणून थोडा क्लिक्क्लिकाट करून पुढे आले आणि पुढे येउन पाहते तर अजून एक सुंदर तळं. तळ्यात सीगल पक्षी, खूप सारे हंस होते आणि त्या तळ्याच्या बाजूने चालायला रस्ता होता. तिथे एक फेरी मारून परत निघाले. इथे बरीचशी लोकं या पक्ष्यांना खायला घालायला येतात.

आज मी जाणार होते किंग क्रॉस स्टेशन बघायला. हे स्टेशन पण बघण्यासारखं आहे आणि दुसरी गोष्ट मी Harry Potter या सिनेमाची खूप चाहती आहे. या सिनेमाचे चित्रीकरण या स्टेशन वर झाले आहे. आणि इथे त्यांनी या चित्रपटातील एका प्लाटफॉर्म चे मोडेल ठेवलेले आहे त्या प्लाटफॉर्म चे नाव म्हणजे ९ ३/४. हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल आणि हे मी तुम्हाला सांगायला गेले तर हा भाग खूप लांबेल. तर हे मोडेल पाहून झाल्यावर मी किंग क्रॉस च्या नवीन आणि जुन्या स्टेशन वर फेरफटका मारून आले. आणि हो आपल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचं पण चित्रीकरण झालं आहे इथे. या स्टेशन वरून national rails सुद्धा जातात त्यामुळे त्या ट्रेन्स कशा असतात हेही पहायला मिळालं. नवीन स्टेशन पेक्षा मला जुने स्टेशन च अधिक आवडले


किंग क्रॉस ट्युब स्टेशन


किंग क्रॉस ट्युब स्टेशन - (नवीन )

इथून पुढे मी जाणार होते Tower Bridge पहायला. इथे जाण्यासाठी तुम्हाला लंडन ब्रिज स्टेशन ला उतरून जाता येतं. इथे स्टेशन मधून उतरून बाहेर कुठे कसं जायचं याच्या खुणा दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे मला बाहेर आधी Tower of london ची खूण दिसली म्हणून मी त्या दिशेने गेले. बाहेरून खूपच छान दिसतो हा Tower of London. पुढच्या विकांताला आम्ही Tower of London आतून पाहणार होतो कारण त्याला तिकीट आहे. त्यामुळे त्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या भागात देईन. बाहेरून पाहिला Tower of London आणि फोटो काढले. थोडं पुढे चालून गेल्यावर थेम्स नदी आणि त्यावर दिमाखदारपणे उभा असलेला Tower Bridge. मी २ मिनिटं तिथेच उभी होते पहात. मग लक्ष्यात आलं की आपल्याला अजूनही पुढे जाऊन पहायचं. Tower Bridge आतून पाहता येतो पण त्यालाही तिकीट आहे म्हणून तिथेही जाणारच होतो पुढच्या आठवड्यात त्यामुळे त्याबद्दल सविस्तर लिहीन. मनसोक्त फोटो काढून घेतले. मी आत्ता पुलाच्या एका बाजूला उभी होते. पूल ओलांडून पलिकडच्या बाजुनेसुद्धा चालत जाऊन पूल बघितला. आता मला पुलाच्या वर जायचं होतं त्यासाठी रस्ता ओलांडायचा होता. इथे मला एक छान अनुभव नमूद करावासा वाटतोय तो असा की इथे लंडन मध्ये पादचार्यांना प्राधान्य दिले जाते. जिथे सिग्नल नाही आहे तिथे तुम्हाला रस्ता ओलांडायचा असेल तर कार मध्ये बसलेला माणूस प्राधान्य हे रस्ता ओलांडणार्यालाच देतो. आणि मागची वाहने सुद्धा थांबून राहतात कोणीही हॉर्न वाजवत राहत नाही. आपण पूर्णपणे रस्ता ओलांडल्यावरच ते वाहन पुढे जाते. खरच खूप शिकण्यासारखा आहे नै !! आता मी पुलावर होते वरून थेम्स नदी , tower of london आणि आजूबाजूच्या इमारती खूपच मस्त दिसत होतं. मी पूर्ण ब्रिज चालून पलीकडच्या बाजूला गेले. आणि चालत चालत लंडन ब्रिज स्टेशन वर पोहोचले. अशाप्रकारे Tower Bridge ला माझी एक प्रदक्षिणाच झाली म्हणायची. कारण मी एका बाजूने फिरायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूने लंडन ब्रिज स्टेशन वर परत आले.

इथून पुढे मी जाणार होते सेंट पॉल्स कथेड्रल हे चर्च पाहायला. इथे जाण्यासाठी सेंट पॉल्स या ट्युब स्टेशन वर उतरावं लागतं. तिथून चालत जायला ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. काय सुंदर आहे हे चर्च. चर्च पहायची वेळ संपत आली होती त्यामुळे आतून पाहता नाही आलं त्यामुळे बाहेरून पाहिलं, फोटो काढले. आता थोडा पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती त्यामुळे मी घरी जायला निघाले. अशाप्रकारे आजच्या दिवसाची भटकंती संपली.

सेंट पॉल्स कथेड्रल

टीप - Tower Bridge आणि tower of london चे फोटो नंतरच्या भागामध्ये टाकेन जेंव्हा त्याचे सविस्तर वर्णन लिहीन.

क्रमश:

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2016 - 12:05 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे लंडनची भटकंती.

फोटो मस्त आहेत. आडव्या (लॅंडस्केप) फोटोंची रुंदी ६६० ठेवल्यास ते मिपाच्या उजव्या कॉलमवरील मजकूरावर जाणार नाही व पूर्णपणे दिसू शकतील.

फोटू व वर्णन आवडले. हॅरी पॉटरचा प्लॅटफॉर्म आवडला कारण त्या सिनेमातील तेवढेच पाहिले आहे. भव्य स्टेशने छान दिसतायत.

प्रचेतस's picture

2 Jun 2016 - 6:54 am | प्रचेतस

छान लिहिलंय. लंडनला जायलाच हवं एकदा.

मुक्त विहारि's picture

2 Jun 2016 - 7:23 am | मुक्त विहारि

बाद्वे,

तुम्ही पण हॅरी पॉटरचे फॅन का?

संजय पाटिल's picture

2 Jun 2016 - 11:35 am | संजय पाटिल

छान वर्णन..

उल्का's picture

2 Jun 2016 - 12:05 pm | उल्का

सगळे फोटो छान आहेत. हंसाचा तर अप्रतिम!

जगप्रवासी's picture

2 Jun 2016 - 3:13 pm | जगप्रवासी

मस्त सफर चालू आहे, पुढचा भाग लवकर येऊ द्या

मेघना मन्दार's picture

3 Jun 2016 - 9:44 am | मेघना मन्दार

सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद :)