आयफोन्स वर मराठी वाचण्यासाठी २.१ अपग्रेड आवश्यक आहे

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
21 Sep 2008 - 5:54 am

मोफत फर्मवेयर २.१ टाकण्यासाठी हे करू शकता.
आयट्युन्स मार्फत, आयफोन/पॉड

वर नवीन फर्मवेयर टाकण्यासाठी ऍपल पैसे मागते.
पैसे देऊन २.१ ला अपग्रेड करून घेणे. :)

अथवा
परंतु तुमच्या ओळखीच्यांपैकी कुणाकडे आयट्युन्स मध्ये डाऊनलोड केलेली नवीन २.१ प्रणाली असेल तर तीच तुम्हालाही टाकता येते.

टप्पे

  • नवीन २.१ प्रणाली त्या व्यक्तीच्या आयट्युन्स - संगणका मार्फत टाका. (तुमचा सर्व डाटा जाईल - आधी बॅक अप घ्या!)
  • त्या नंतर फोन तुमच्या संगणकावर जोडा - तो कदाचित ओळखणार नाही.
  • जर सिस्टीमने फोन ओळखला नाही तर आयट्युन्सला तुमचा फोन जुन्या सिस्टीमला 'रि-स्टोअर' करायला सांगा - तो काही काळ घेतो, आणि रि-स्टोअरचा प्रयत्न करतो आणि केले असा संदेश देतो. परंतु फर्मवेयर री-स्टोअर केल्यावरही प्रणाली २.१च राहील!
  • मग आयट्युन्सची नवीन आवृत्ती तुमच्या संगणकावर टाका, आणि त्याला तुमचा आयफोन 'नवीन म्हणून ओळख' करून द्या.
  • तुमचा फोन नवीन २.१ फर्मवेयर वर व्यवस्थित चालू लागेल.

आणि तुम्ही मराठी (तुटक का होईना!!) वाचू शकाल...

-निनाद

तंत्रसल्लामाहिती

प्रतिक्रिया

पिंट्या's picture

21 Sep 2008 - 1:35 pm | पिंट्या

ठांकु बरंका....