मोफत फर्मवेयर २.१ टाकण्यासाठी हे करू शकता.
आयट्युन्स मार्फत, आयफोन/पॉड
वर नवीन फर्मवेयर टाकण्यासाठी ऍपल पैसे मागते.
पैसे देऊन २.१ ला अपग्रेड करून घेणे. :)
अथवा
परंतु तुमच्या ओळखीच्यांपैकी कुणाकडे आयट्युन्स मध्ये डाऊनलोड केलेली नवीन २.१ प्रणाली असेल तर तीच तुम्हालाही टाकता येते.
टप्पे
- नवीन २.१ प्रणाली त्या व्यक्तीच्या आयट्युन्स - संगणका मार्फत टाका. (तुमचा सर्व डाटा जाईल - आधी बॅक अप घ्या!)
- त्या नंतर फोन तुमच्या संगणकावर जोडा - तो कदाचित ओळखणार नाही.
- जर सिस्टीमने फोन ओळखला नाही तर आयट्युन्सला तुमचा फोन जुन्या सिस्टीमला 'रि-स्टोअर' करायला सांगा - तो काही काळ घेतो, आणि रि-स्टोअरचा प्रयत्न करतो आणि केले असा संदेश देतो. परंतु फर्मवेयर री-स्टोअर केल्यावरही प्रणाली २.१च राहील!
- मग आयट्युन्सची नवीन आवृत्ती तुमच्या संगणकावर टाका, आणि त्याला तुमचा आयफोन 'नवीन म्हणून ओळख' करून द्या.
- तुमचा फोन नवीन २.१ फर्मवेयर वर व्यवस्थित चालू लागेल.
आणि तुम्ही मराठी (तुटक का होईना!!) वाचू शकाल...
-निनाद
प्रतिक्रिया
21 Sep 2008 - 1:35 pm | पिंट्या
ठांकु बरंका....