आजच्या दैनिक सकाळ मधे कोणी कोणता आय टी आर अर्थात आयकर रिटर्न फॉर्म भरावा या संबंधी मार्गदर्शन करणारा लेख आला आहे. त्यात आय टी आर १ हा पगारदार वा सेवा निवृत्त यांचे साठी प्रामुख्याने असल्याचे नमूद केले आहे. पण काही
अधिक निकष लागू होत असतील तर आय टी आर १ हा पगारदार व सेवानिवृत्त यानाही भरता येणार नाही असे म्हटले आहे.
त्यात एक अट अशी आहे की अल्प व दीर्घकालीन भांडवली नफा ( घराची खरेदी किंमत व विक्रि किमत यांचे इन्डेक्सेशन केल्यावर) असेल तर आय टी आर १ भरता येणार नाही. मी गेले वर्षी (२०१५-२०१६ ) घर विकल्याने मला १७ लाख रूपये दीर्घकालीन भांडवली नफा झाला परंतू त्यावर भांडवली नफा कर मी न भरता १७ लाखापेक्षा जास्त रक्क्म विशिष्ट बॉन्ड मधे गुंतवून कर टाळला आहे. आता माझी शंका अशी आहे की मी जर गुंतवणूक न करता कर भरणे पसंत केले असते तर मला आय टी आर १ सोडून दुसरा आय टी आर फॉर्म भरावा लागला असता पण मी गुंतवणूक केल्याने आता माझा दीर्घ भांडवली नफ्याशी संवंधच नाही सबब मी आता आय टी आर १ हाच फॉर्म भरू शकतो ना......? इथे कुणाला असा प्रसंग पूर्वी आला का ? त्यावेळी काय केले? किंवा कुणी सी ए चा अभ्यास करत असतील तर त्याना काही माहिती या संबंधात आहे काय ? असल्यास इथे जरूर माहिती द्यावी ही नम्र विनंति.
प्रतिक्रिया
29 May 2016 - 10:54 am | असंका
डिस्क्लेमर १- माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टीस नगण्य आहे.
डिस्क्लेमर २ - कुठलीही जबाबदारी न घेता माझे उत्तर असे-
आपल्याला आय टी आर एक भरता येणार नाही.
दीर्घ कालीन भांडवली नफ्यावर कर लागू नये म्हणून आपण गुंतवणूक केलीत ते बरोबर. त्यामुळे कर वाचू शकतो हेही बरोबर.
पण या दोन्ही गोष्टी (नफा आणि गुंतवणूक) आपल्याला आपल्या रीटर्न मध्ये जाहीर कराव्या लागतील. हे जाहीर करण्यासाठी आय टी आर एक मध्ये जागा दिलेली असेल असे वाटत नाही.
आय टी आर २ भरावा लागेल असे दिलेल्या माहितीवरून दिसत आहे.
29 May 2016 - 1:44 pm | चौकटराजा
आता पुन्हा मी तो लेख वाचला . आपले म्हणणे बरोबर आहेसे वाटते. कारण नफा व गुंतवणूक दोन्ही साठी जागा आय टी आर १ मधे नसण्याचीच शक्यता किंवा नाहीच आहे. आता फक्त २ आंतरजालावरचा नीट वाचून पहातो. धन्यवाद !
29 May 2016 - 2:00 pm | कंजूस
cnbc aawaj 18 ,>> taxguru .शनि सकाळी साडेसात ,नंतर रीपीट करतात.हे सर्व प्रश्न घेतात.
30 May 2016 - 6:39 pm | रघुपती.राज
येथे उत्तर मिलेल
http://www.moneycontrol.com/elite/profile/balwant%20jain-9.html