सर्व प्रथम मी चुकीच्या जागी लेख टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व.
एक अतिशय महत्वाची माहिती हवी आहे.
आज अचानक हापिसातून अमेरिकेला जाशील का जून मध्ये अशी विचारणा झाली आहे. pittsburg ला जायचे आहे ५ महिन्यासाठी. तर काही माहिती हवी आहे.
१) pittsburg मध्ये ५ महिन्यासाठी भाड्याने घर मिळते का? का युके सारखा ६ महिन्याचा नियम आहे.
तसेच माझ्याकडे सोशल सिक्यूरीटी नंबर नसल्याने गेल्या गेल्या घर मिळेल का? त्याच्याशिवाय तिथे पानही हलत नाही असे ऐकले आहे.
२) family साठी (मी, पत्नी आणी मुलगा) 2bhk घेणे नियमाप्रमाणे बंधनकारक आहे का? की 1bhk मध्ये राहणे चालते ?
३) एकंदरीत खर्च किती होईल महिना राहण्याचा घर भाडे धरून ?
४) आणी अर्थातच शेवटचा महत्वाचा प्रश्न कसे आहे pittsburg; फिरायला, मजा मारायला?
कृपया लवकर माहिती द्यावी. मला उद्या माझा निर्णय सांगायचा आहे. इथे जी माहिती मिळेल त्यावरून मला निर्णय घेणे सोपे जाईल.
धन्यवाद ...
प्रतिक्रिया
5 May 2016 - 1:24 am | राघवेंद्र
https://pittsburgh.craigslist.org/search/apa इथे घरभाडे बद्दल माहिती मिळेल. एखादा call केला कि कळेल ६ महिन्यासाठी मिळेल की नाही, १ BHK चालेल का नाही कळेल.
https://www.svtemple.org/Home.aspx हे मंदिर छान आहे तसेच कार असेल तर बरेच काही ५-६ तासाच्या drive वर बघण्यासारखे आहे.
जून - सप्टेंबर उन्हाळा असेल त्यामुळे कार लगेच चालवायला घ्या.
अमेरिका वारीच्या शुभेच्छा !!!
5 May 2016 - 3:28 am | अर्धवटराव
फॅमिलीसोबत जाणार म्हणताहात म्हणजे मुलाच्या शाळेची वगैरे सध्या काळजी नसावी. अगदी ठरवुन ५ महिन्यांसाठी जाणार असाल तर एखाद्या एक्स्टेण्डेड स्टे हॉटेलमधे पण पाहु शकता. कदाचीत घरभाड्यापेक्षा ते स्वस्त पडेल. किंबहुना अनिश्चितता असेल तर सुरुवतीला एकटेच येउन १-२ महिन्यांनी फॅमिली बोलवा. तोपर्यंत घर शोधता येईल व बाकी खर्चाचा अंदाज येईल, वाहन घेता येईल. एंजोय.
5 May 2016 - 4:39 am | सखी
या धाग्यावर बरीच उत्तरे मिळतील.
या प्रतिसादात अपार्टमेंटची माहीती मिळेल.
एन्जॉय!
5 May 2016 - 8:21 am | रमेश आठवले
तेथील मराठी मंडळ
वर दुवा दिला आहे. त्यांच्याशी संपर्क साधता येतो.
5 May 2016 - 8:33 am | रमेश आठवले
www.mmpgh.org
6 May 2016 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे
https://www.airbnb.com या संस्थळावर अनेक पर्याय सापडतील.
8 May 2016 - 11:46 pm | बटाटा१
मी पुर्वी pittsburgh ला रहीलो असल्याने थोडी माहीती देउ शकतो. तुमचे office डाउन टाउन ला असेल तर Carriage Park Apartments खुप सोईचे आहे. डाउन टाउन साठी बससेवा सुध्दा आहे. India grocery stores अगदी जवळ आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खुप भारतीय या community मधे रहातात आणि मराठी ग्रुप पण आहे.
जर तुमचे ऑफिस मुन टाऊनशिप ला असेल तर मात्र Carriage Park लांब पडेल.
Pittsburgh छान शहर आहे आणि फिरण्याची खुप ठिकाणे आहेत.