पोश्टरबॉइज -२

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
2 May 2016 - 12:47 am

जेवणंखाणं उरकून २ तास झाले. प्रेस बंद करायची वेळ आली तरी नेत्यांचा पत्ता नाही. कार्यकर्त्यांचे फोनवर फोन चालू होते. कंटाळून आता उरलेल्या कामाला उद्या या असे सांगून पीसी बंद केला आणि निघालो. दरवाजातच स्कॉर्पिओला अडलो. पांढर्‍या लिननच्या ताग्यात गुंडाळलेले आणि सोन्याने मढलेले एक वजनदार प्रकरण बॅकसीटवरुन उतरत होते. पांढर्‍याच लेदरच्या चपला आणि हातातले राडो. जडावलेले डोळे आणी इंग्लिश प्लस सेंटचा उग्र वास. गप्प गाडी परत लावली आणि येऊन पीसी चालू केला. झालेल्या कामाचा आढावा सरलोकांनी नेहमीच्या सफाइने दिला.
"हे बग, नाळ मुंजाळे येयाचं जल्दी. नाईटला पोस्टर पायजे. आता निग"
इतका हुकूम मिळाला की परत आवरुन निघेपर्यंत नेते आणि कार्यकर्त्यांची नाईट कुठे याची सुश्राव्य चर्चा ऐकायला मिळाली.
.........................................
सकाळी सकाळी प्रेसमध्ये माझ्या आधी कार्यकर्ते हजर. आज जरा संख्या वाढलेली. माझ्या मागून तिन्ही बाजूने तिन्ही भाषांमधून सूचनांचा भडीमार चालू झाला. पोस्टरवरच्या फोटोत साहेबांना त्यांची स्कॉर्पिओ दिसायला हवी होती. साहेबांच्या पोराचे म्हणजे व्हिलनचे फोटोत कपडे आणि शरीर फारच सुरकुतलेले दिसत होते. हिरॉइनच्या अंगावरचे कपडे त्या पोजला शोभत नव्हते (हे साहेबांचे स्पेशल मत) हिरोचा पोलिस ड्रेस ओघळलेला आणि बहुरुप्याची कळा दाखवणारा होता. व्हिलनचे सोबती नुसते हातात बंदुका घेतल्याची अ‍ॅक्शन करुन उभे होते. कॉमेडिअनचे फोटो त्यातल्या त्यात सरस होते.
शेवटी मदतीला येणार इंटरनेटच हो. विष्णुवर्धनच्या कुठल्याश्या पिक्चरमधली डॅशिंगपणे चालत येणारी कानडी इन्स्पेक्टरची पोज हिरोच्या तोंडाला बसवण्यात आली. राहुल देवची पिळदार बॉडी व्हिलनने उधार घेतली. वजनी डान्सर मुमैतखानच्या अदावर थिरकली. हिरोईनचे कपडे मात्र स्वतः साहेबानी दिलेल्या फोटोनुसार सुधारण्यात आले. लेआउटात उरलेल्या बाजूला मिळतील तसे इतर कलाकार कोंबण्यात आले. पोस्टरच्या दोन्ही बाजूला हिरो आणि व्हिलन पेटलेल्या जाळाच्या पार्श्वभूमीवर चालत येत होते. रोहित शेट्टीने उडवलेल्या गाड्याच्या पार्श्वभूमीवर स्कॉर्पिओ आपली ४७४७ नंबर दिमाखात दाखवत होती. डिस्को लाईटसच्या प्रकाशात डान्सर चमकत होती. इतक्या सगळ्या गोंधळात नाटकाचे नाव कुठेय अन त्यातला संसार कुठेय हा प्रश्न मात्र विचारायचा राहिलाच.
पोस्टर आता ८० टक्के पूर्ण भरत आलेले. खालची बाजू सौजन्याची. अर्थात देणगीदारांची. देणगीच्या आ़कड्यानुसार क्रम लावित १०-१२ महांतेश, ७-८ श्रीशैल आणि बरेचसे गौडा लावले गेले. अगदी खालच्या पट्टीत नाटकाची वेळ, स्थळ आणि प्रेसलाईन टाकली आणि प्रुफ रिडिंगला देईपर्यंत संध्याकाळ झाली. इतक्या सहवासात बराचश्या कार्यकर्त्यांना फोटोशॉपचे चमत्कार पाहून माझ्या मोठेपणाची खात्री पटलेली. नाटकाला अवश्य या, साहेब सगळी सोय करतील असा आग्रह वारंवार झाला. डिझाइन प्रिंटिंगला गेले आणि मी ह्या कानडी व्यापातून जरा मोकळा झालो.
.....................................
दोन आठ्वड्यानी हा विषय डोक्यातून पूर्ण विसरलेला. मालकानेच आठवण करुन दिली. "अरे ते नाटकाला तुला बोलावलेय बघ. रात्री असतंय. मज्जा असती फुल्ल. इथले काम संपवून जाउन या उद्या"
शेतात रस्ता की रस्त्यात शेत असा ५० कीमी प्रवास करीत आम्ही चौघे रात्री १० च्या सुमाराला गावात पोहोचलो. गावची यात्रा असल्याने झगमगाट सगळीकडेच दिसत होता. साहेबांच्या लॉजवर खाण्यापिण्यांची जय्यत तयारी होती. जावयाचा होणार नाही इतका पाहुणचार सोसून नाटकाच्या ठिकाणी पोहोचलो. अगणित स्पीकर कन्नड भाषेतली गाणी बोंबलत होते. आम्हीच केलेले पोस्टर गावभर लावलेले दिसत होते. नाटकाच्या ठिकाणी खास पाहुण्यांच्या सोफ्यावर जागा मिळून समोरचा गोंधळ पाहत बसलो.
रंगमंचाचे पूजन, दिवाबत्ती, आशिर्वादी आचार्य आणि नेत्यांचे सत्कार वगैरे आटोपून प्रत्यक्ष नाटक सुरु व्हायला तास गेला.
गरीब घरातला हिरो, त्याचे आईबाप आणि इतर गावकरी यांच्या संवादातून काहीही कळत नव्हते. अभिनय वगैरे तर सोडा पाण्यात पावडर कालवून रंगवलेले भयाण चेहरे आणि ओरडून म्हणलेले संवाद हेच नाटक होते. जरासे प्रेक्षक बोअर झाले की कॉमेडिअन येउन काहीतरी विदूषकी चाळे करुन जात होता. तेवढ्याने प्रेक्षकांचे समाधान झाले नाही की डान्सर येऊन हिंदी गाण्यावर ठुमके मारुन बेफाट नाचून जात होती. हिंदी, कन्नड पिक्चरच्या संवादांची उजळणी वारंवार होत होती. एकाचे संवाद चालू असता बाकीचे कलाकारांची गप्प मान खाली घालून उभे राहण्याची पध्दत तर अप्रतिम अशीच होती. स्वतःचे लग्न असल्यासारखे नटलेल्या व्हिलनने डान्सरशी केलेल्या माफक अंगचटीला तुफान शिट्ट्या पडत होत्या. कधीतरी मध्येच रंगमंचावर दोन बुलेट, एक घोडा आणि स्कॉरपिओ पण चक्कर मारुन गेली. आता अजून काय दाखवणारेत ह्या अपेक्षेत असताना क्लायमॅक्स आला. सगळ्या पात्रांच्या उपस्थितीत हिरोने अगदी जंटलमेनपणे व्हिलनला बेड्या चढवल्या. व्हिलनसाहेब बेड्या आणि हिरोला घेउन थाटात एक्झिट करते झाले आणि नाटकाचा धी एंड झालेला आम्हाला समजला.
.....................................
पहाटे कधी घरी अलो आणि झोप लागली हे कळाले पण नाही. रात्रभर कानात अगम्य खडखड होत होती. सकाळी जाग आली ती आमच्या मालकाच्या फोनने.
"आवडले का रे नाटक. पोस्टरचे भारी झालेले आपले काम. ते बघून अजून एक पार्टी आलीय पोस्टर छापायला. ये पटकन"
"आलोच" म्हणत आवरायला सुरुवात केली.
.....................................
(समाप्त)

नाट्यअनुभव

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

2 May 2016 - 12:48 am | जव्हेरगंज

अरे वा!!
आज पहिल्या प्रतिसादाचा मानकरी मी आहे तर!!

गुड गुड

आता वाचतो !!

जव्हेरगंज's picture

2 May 2016 - 12:55 am | जव्हेरगंज

च्यायला फुल फॉर्मात !
ते पोस्टर बघायची उत्सुकता लागून राहिली राव !!

तुषार काळभोर's picture

2 May 2016 - 11:53 am | तुषार काळभोर

ते पोस्टर बघायची उत्सुकता लागून राहिली राव !!
डेमीमध्ये एव्ह्ढं सगळं कसं बसवलं ते पाहाय्चंय

मी-सौरभ's picture

2 May 2016 - 12:54 am | मी-सौरभ
मी-सौरभ's picture

2 May 2016 - 12:54 am | मी-सौरभ

एकदमच छान लिहून सोडलं की वो

हकु's picture

2 May 2016 - 12:56 am | हकु

छान!!!

तर्राट जोकर's picture

2 May 2016 - 12:57 am | तर्राट जोकर

बेंण्चवर... तुफान लका.

हे काय एवड्यात संपवलंस. भांग पाडता पाडता हेअरफॉल झाला काय?

अभ्या..'s picture

2 May 2016 - 1:00 am | अभ्या..

सैराटने झालय डोस्कं. विस्कटलेल्या डोस्क्याचा थोडे दिवस भांग नाही पडणार. :(

तर्राट जोकर's picture

2 May 2016 - 1:01 am | तर्राट जोकर

चालतंय. कलाकाराचं मन है, सैराट न झालं तर म्येलं समजावं.... :(

हा भाग म्हणजे एकदमच उरकल्यासारखा वाटला.

वैभव जाधव's picture

2 May 2016 - 3:04 am | वैभव जाधव

चांगलं झालंय पण नुसती देखणी बॉडी आलिया गा. आत्मा हरिवलाय.
शो मस्ट गो ऑन असं आमाला सांगताय ना आरटिष-ट?
मन जागं असलं की लै घोळ हुत्यात. चालायचं पण. लिहित राहावा.

खटपट्या's picture

2 May 2016 - 5:57 am | खटपट्या

वा मस्त !! पोस्टर बघता आलं असतं तर लय मजा आली असती...

सतिश गावडे's picture

2 May 2016 - 6:39 am | सतिश गावडे

पहिल्या भागाची मजा नाही. घाईत उरकल्यासारखे वाटत आहे.

नाखु's picture

2 May 2016 - 8:08 am | नाखु

उगा पाट्या टाकून बोळावणी केलीय. हा तो अभ्या नाय.

बॅट्या-वप्या कुणी अभ्याचा आय्डी हॅक केलाय का बघा जरा.

लढतर फेम नाखु

असंका's picture

2 May 2016 - 7:02 am | असंका

चांगलंय दादा. पहिल्या भागापेक्षा वेगळा इफेक्ट आलाय.

धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

2 May 2016 - 7:28 am | चांदणे संदीप

अभ्यादादा, तुमची सुक्क्याला दादा, आणि पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची श्टाईल लैच्च आवडते आपल्याला! तीच इथे मोकळ्या हाताने भरभरून आलेली आहे.

असंच एक नाटक आम्ही मराठीत केलं होत तर त्येच कुणा कळ्ळे इल्ले म्हणून आता मल्टीलिंग्वल करावं म्हण्तो म्हणजे सगळाच दोष आपल्यावर यायला नको! =)) मगं, कन्नड डॉयलॉक लिहून देणार ना?

Sandy

चौकटराजा's picture

2 May 2016 - 9:16 am | चौकटराजा

मला फोटू शाप बर्‍यापैकी माहित असल्याने जमवाजमवीची मजा लूटू शकलो. बाकी ती ले आउटमधे होणारी आर्टिस्टची पंचाईत ही दाद देण्या सारखीय ! पांढर्या लिननच्या ताग्यात गुंडाळलेली मगरूरी .... जणू आताच काही घेउन आलेल्ला ..
वर्ण्॑न मस्त. आर्र्र्र कानाला आयफोन र्‍हायला की !

प्रचेतस's picture

2 May 2016 - 9:37 am | प्रचेतस

लै भारी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 May 2016 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार

मजा आली दोन्ही भाग वाचताना.
पोष्टर प्रतेक्ष बघायची गरज नाही इतके सुरेख आणि डिटेल वर्णन केले आहे त्याचे.
पैजारबुवा,

एस's picture

2 May 2016 - 10:01 am | एस

भारीच आहे!

शाम भागवत's picture

2 May 2016 - 10:23 am | शाम भागवत

.

विवेक ठाकूर's picture

2 May 2016 - 11:25 am | विवेक ठाकूर

छाने स्टोरी.

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 11:31 am | अत्रुप्त आत्मा

सुपर्बच.!

संजय पाटिल's picture

2 May 2016 - 11:41 am | संजय पाटिल

छान!!
पण एव्हड्यात स्माप्त? अजुन पायजे व्हती राव...

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा

+१

स्पा's picture

2 May 2016 - 11:44 am | स्पा

जे ब्बात मजा आली.

थोडा हात आखडता घेतलास

कव्हर ड्राईव्हला सुरुवात करताना व्हीव्हीएस आणि संपवताना द्रविड असं काहीसं झालंय.

नाव आडनाव's picture

2 May 2016 - 11:55 am | नाव आडनाव

:)

टवाळ कार्टा's picture

2 May 2016 - 11:56 am | टवाळ कार्टा

नै जम्या

बाबा योगिराज's picture

2 May 2016 - 11:58 am | बाबा योगिराज

लै भारी

तात्या's picture

2 May 2016 - 12:58 pm | तात्या

अभ्या.. , व्यावसायिक कराराचा , गोपनियतेचा भंग होणार नसेल तर ते पोश्टर इथे चिकटवता येईल का?

अभ्या..'s picture

2 May 2016 - 1:15 pm | अभ्या..

अहो तात्या हे काम करताना डिझाइनर म्हणून नोकरीला होतो.
आता नाही राह्यली ती नोकरी आणि ते पोस्टरपण. एखाद्या गाववाल्याकडूनच मिळवावे लागल.

गुगल करा की साहेब.. मिळून जाईल एखादे पोष्टर. :)

लेख नेहमीप्रमाणे झकास..!!

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2016 - 1:10 pm | अत्रुप्त आत्मा

+१

जगप्रवासी's picture

2 May 2016 - 4:00 pm | जगप्रवासी

वाचून त्या पोस्टर बद्दल खूप उत्सुकता लागून राहिली आहे, शक्य असेल तर पोस्टरच अडकवा ना राव...

सस्नेह's picture

2 May 2016 - 4:04 pm | सस्नेह

पोस्टर जितके रंगतदार झाले तितके नाटक काही नाही झाले, तर !

थोडं बैजवार चाललं असतं.

विजय पुरोहित's picture

2 May 2016 - 7:49 pm | विजय पुरोहित

अभ्याभौ... छान आहे पण जरा खुलासेवार पेश्शल अभ्याच्या पंचेससहित पाहिजे होतं.

सुरवंट's picture

2 May 2016 - 10:40 pm | सुरवंट

टमराळं

एक एकटा एकटाच's picture

3 May 2016 - 6:23 am | एक एकटा एकटाच

हा हा हा

मुक्त विहारि's picture

3 May 2016 - 8:53 am | मुक्त विहारि

आवडले.

हेमंत लाटकर's picture

3 May 2016 - 4:38 pm | हेमंत लाटकर

लंबर २

चौथा कोनाडा's picture

3 May 2016 - 5:21 pm | चौथा कोनाडा

लै भारी ! हा भाग पण मस्तच !

....व्हिलनचे सोबती नुसते हातात बंदुका घेतल्याची अ‍ॅक्शन करुन उभे होते. कॉमेडिअनचे फोटो त्यातल्या त्यात सरस होते.

देणगीच्या आ़कड्यानुसार क्रम लावित १०-१२ महांतेश, ७-८ श्रीशैल आणि बरेचसे गौडा लावले गेले.

पोस्टरचे भारी झालेले आपले काम. ते बघून अजून एक पार्टी आलीय पोस्टर छापायला. ये पटकन"

हे अन इतर काही ! मज्जा आली वाचायला !

पुढील पोस्टरच्या प्रतिक्षेत !

फुटलो राव....

वपाडाव's picture

3 May 2016 - 5:43 pm | वपाडाव

सगा, सुड, नाखु, स्पा, स्पा
सर्वांशी शमत...

खुलला नाही...

अभ्या भाग आवडला बे. खुलला- नै खुलला इ. बद्दल म्हणायचे तर मला तरी आवडला.