नमस्कार,
येत्या १ ते २ महिन्यात मी शेती विकत घ्यायचे आणि तिथेच रहायचे ठरवत आहे.आमच्या अर्धांगिनीने, चिपळूण जवळ शेत जमीन बघीतली आहे.
एखादा मिपाकर कुठे अडला तर त्याला मार्ग दाखवायला आणि त्याला मनापासून मदत करायला मिपाकर तयार असतात, ह्याचा स्वानुभव आहे.
सध्या त्वरीत हवी असणारी मदत म्हणजे....
१. शेतात पाणी कुठे मिळेल?, ते शोधून देणारा पाणक्या.
२. डिझेल पंप विकत घ्यायला आणि तो बसवायला साधारण किती खर्च येतो?
आपलाच मुवि.
प्रतिक्रिया
18 Apr 2016 - 7:20 am | रेवती
अभिनंदन मुवि!
सुरंगीताईंची लेखमालिका आहे यावर.
18 Apr 2016 - 9:14 am | मुक्त विहारि
पण....
आमच्या पेक्षा, आमची सौ. ह्या अभिनंदनास जास्त पात्र आहे.
18 Apr 2016 - 8:28 am | जेपी
सर्वप्रथम अभिनंदन..
काहि प्रश्न- शेतात बोअरवेल घेणार का विहीर??
डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ??
शेततळ्याचा पर्याय जमेल का??
बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.!:-)
18 Apr 2016 - 8:48 am | मुक्त विहारि
"शेतात बोअरवेल घेणार का विहीर??" ======>
पाणी जर १०-१२ फूट खोल असेल तर विहीर आणि त्यापेक्षा जास्त खोल असेल तर बोअरवेल, असा विचार आहे ..... पण एकाच विचाराला चिकटून राहणार नाही, परिस्थितीनुरुप विचार बदलू शकतो.
"डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ??" ======>
होय. आणि सरकारी महामानवांच्या पाया पडण्याची माझी मानसीक तयारी नाही.....
"शेततळ्याचा पर्याय जमेल का??" =====>
शेततळ्याला माय-बाप सरकार सबसीडी देत असल्याने, तो पण पर्याय कागदावर मांडला आहे.....पण सरकारी महामानव काय-काय करामती करतील ते सांगता येत नसल्याने आणि उगाच स्वतःचे पैसे आणि वेळ नाहक गमावण्यापेक्षा, स्वतःचा डिझेल पंप वापरणे, सध्या तरी योग्य वाटत आहे.
अभिनंदना बद्दल मला धन्यवाद न देता, आमच्या अर्धांगिनीला दिल्यास उत्तम.
ती खंबीरपणे (आर्थिक आणि मानसीक पाठबळ घेवून) मागे उभी असल्यानेच धाडस करत आहे.
18 Apr 2016 - 9:56 am | जेपी
आता उत्तरे-
१)
अ) पाणक्या बद्दल माहिती स्थानीक लोक चांगल्याप्रकारे सांगु शकतील.
ब) माझ्या अल्प स्वानुभवावर थोड आधारित.." जागेच्या ईशान्य दिशेला पाणी भेटु शकत.."अर्थात हे माझ्या वैयक्तीक अनुभवावर आधारीत आहे..सारासार विचार करुन या पर्यायाचा विचार करावा.
२)डिझेल पंप १५,०००/- पासुन ८०,०००/- च्या रेंज मधे उपलब्ध आहेत.
याचा उपयोग साठवलेले पाणी उपसण्यासाठी होऊ शकतो.बोअरवेल साठी डिझेल पंप उपलब्ध आहेत का ?हे मला ठावुक नाही.
(डिझेल पंप हे केरोसीन्,पेट्रोल या पर्यासोबत पण मिळतात.)
अवांतर = शेततळ्याचा पर्याय चाचपुन पहावा.अनुदान न घेता (बोअरवेलच्या खर्चात) शेततळे निर्माण
करता येते.याचा दुहेरी फायदा घेता येईल,पाणी साठव्ण आणी मासेपालन( जमल्यास).
=====>>> पुनश्च ..दोघांचेही अभिनंदन आणी शुभेच्छा !!
18 Apr 2016 - 8:35 am | सुनील
शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच.
भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही? किती एकर जागा घेताय? शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे?
अर्थात, शेतीचा थेट अनुभव नसल्याने दोन्ही प्रश्नांना पास.
शुभेच्छा.
अवांतर - जगाचा मध्य आता डोंबोलीहून चिपळूणास सरकणार तर?
18 Apr 2016 - 9:12 am | मुक्त विहारि
"अवांतर - जगाचा मध्य आता डोंबोलीहून चिपळूणास सरकणार तर?"
खिदळणारी स्मायली...
19 Apr 2016 - 7:04 am | मुक्त विहारि
शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच. =========>
तसा बराच अभ्यास कागदोपत्री आणि प्रत्य्क्ष शेतकर्यांना (अल्पभूधारक ते शेकडो एकरी शेती व्यावसायिक) भेटून आणि जमल्यास त्यांच्या घरी राहून केला आहे.
कुठलेही ज्ञान कधीच परीपुर्ण नसते आणि शेती कधीच साचेबंद पणे करता येत नाही, असे सगळ्याच शेतकर्यांचे मत पडले.
आणि अज्जुन एक म्हणजे शेती ही प्रात्यक्षिकपणेच केली जाते. कागदोपत्री सोपी (फायदेशीर) वाटणारी आर्थिक गणिते अवघड पण होवू शकतात आणि कागदोपत्री कठीण (तोट्यातील) वाटणारी आर्थिक गणिते खरेदारांची पसंती बदलल्याने फायदेशीर पण ठरू शकतात.
===================================================
भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही?======>
भातशेती सध्या तरी अजिबात करणार नाही. पुढील १-२ वर्षे नौकर विरहित वृक्ष लागवड करणार असल्याने आणि कोकणातील नौकरांचा अजिबात अनुभव नसल्याने, भात शेती किंवा नांगरणी, खूरपणी,तोडणी,तोडणी इ. नौकराधारिक पिके पुढील २ वर्षे तरी करणार नाही.
=======================================
किती एकर जागा घेताय?
२५ एकर. २५ एकर ही माझी कौटुंबिक गरज आहे.
प्रत्येक कुटुंबाची जागेची गरज वेगळी-वेगळी असते.
===========================================
शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे?============>
आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कायद्याप्रमाणे, ज्याच्या नावावर आधी शेती आहे (मग ती इतर कुठल्याही राज्यातील का असेना,) तोच महाराष्ट्रात शेती विकत घेवू शकतो.
====================================================
18 Apr 2016 - 9:16 am | सतिश गावडे
मुविकाका आणि काकूंचे अभिनंदन.
निर्णय खुपच धाडसी आहे. मात्र तुम्ही पार पडाल यात शंका नाही. तुमच्या शेतीस अनेकानेक शुभेच्छा !!!
18 Apr 2016 - 9:22 am | बोका-ए-आझम
डोंबिवली सोडताय की काय? चिपळूणचा पत्ता द्यालच.
18 Apr 2016 - 10:20 am | पिंगू
मुविकाकूंचे अभिनंदन. शेती कुठे घेणार आहात?
18 Apr 2016 - 10:21 am | प्रचेतस
दोघांचेही हार्दिक अभिनंदन.
आपल्या उपक्रमाला उदंड यश लाभो ही सदिच्छा.
18 Apr 2016 - 11:42 am | मोदक
+१११
18 Apr 2016 - 2:00 pm | शलभ
+११११११
18 Apr 2016 - 10:45 am | प्रमोद देर्देकर
मुवि आणि वहिनींचे अभिनंदन आणि उपक्रमाला शुभेच्छा!
18 Apr 2016 - 5:02 pm | टवाळ कार्टा
+११११११
18 Apr 2016 - 10:47 am | पैसा
मुवि आणि सौ. मुवि दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा! शक्य ती मदत नक्कीच करू.
18 Apr 2016 - 10:52 am | गॅरी शोमन
आपला उपक्रम धाडसी आहेच. वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा.
कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे.
खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी.
19 Apr 2016 - 7:15 am | मुक्त विहारि
वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही.======>
वडीलोपार्जीत शेती नाही.
इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा======>
मी स्वतःच शेतावर जावून राहणार असल्याने आणि स्वतःच ती लागवडी खाली आणणार असल्याने, माझी शेती ही गुंतवणूक ह्या प्रकारात मोडत नाही.
==================================
"कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे."=======>
तसेच करणार आहे.
=========================
"खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी."=====>
एकलव्य आणि द्रोणाचार्य ह्यांचे जे नाते आहे तेच आमचे आणि श्री.पाळेकर ह्यांचे.
आमच्या गुरुंचे काही ज्ञान कण इथे द्यायला हरकत नसावी.....
झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १ ====>
https://www.youtube.com/watch?v=GuKR_dOioGU
18 Apr 2016 - 11:03 am | नाखु
मला या क्षेत्रात यायचे झाले तर कुणाला विचारायचे हा प्रश्न सुटला.
अभिनंदन आणि हो कोकण सुखनिवास (रिसॉर्ट ) बांधणार असाल तर नाव "मुवीज मिपाकट्टाघर" असे नाव देणे.
शेतीस्वप्नाळू नाखु
19 Apr 2016 - 7:16 am | मुक्त विहारि
आमच्या घराला "मुवीज मिपाकट्टाघर" हेच नांव ठेवीन म्हणतो.
18 Apr 2016 - 12:01 pm | देशपांडे विनायक
अभिनंदन दोघांचे !!
५० वर्षापूर्वी माझा मित्र college शिक्षण सोडून पालशेत ला गेला
वडिलांना शेती करण्यास मदत करण्यासाठी
तो गेल्यानंतर सात आठ महिन्यांनी
त्याला न कळवता तिथे जाण्याचा आचरटपणा मी दोन सोबत्यासह केला
आचरटपणा म्हणण्याचे कारण आम्हाला पालशेत कोठे आहे माहित नव्हते
कोणती एस्टी पकडली पाहिजे ते माहित नव्हते
स्वारगेट एस्टी stand ला दुपारी जाऊन माहिती घेतली आणि संध्याकाळच्या सातला रवाना झालो
सकाळी आठ नऊ ला एका टपरीजवळ कंडक्टर ने उतरण्यास सांगितले
बाजूला एका खांबावर पोस्टाची लाल पेटी होती त्यामुळे इथे गाव आहे याचा भरवसा आला
त्याच पालशेत ला तीन महिन्यापूर्वी आम्ही तेच तीन मित्र आणखी दोन मित्रासह सहकुटुंब
टेम्पो traveller बसने गेलो
आमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून त्याचा मुलगा त्याची alto घेऊन चिपळूणला आला होता
गेल्या ५० वर्षात झालेली सुधारणा दिसत होती
college सोडून शेती करणारा मित्र मागे राहिला आहे असे कोणत्याच बाबतीत वाटत नव्हते
पालशेत मध्ये फिरताना मनात विचार आला
आठवणी पुसत जाणे म्हणजे प्रगती अशी प्रगतीची व्याख्या करावी काय ?
पालशेत मला ओळखू येत नव्हते . खर तर मी पालशेत ला आलो आहे याची खात्री फक्त मित्राच्या दर्शनाने झाली
मूवी चिपळूण जवळील ज्या गावात तुम्ही शेती घेतली त्या गावाचे फोटो घेऊन ठेवा
माहिती लिहून ठेवा
तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्या
५० वर्षांनी ते सारे पाहणारे तुमचे सुहृद तुमचे ऋणी राहतील
माझ्या आठवणीतून बरेच काही पुसले गेले आहे जे आठवणे फार फार आनंददायी झाले असते माझ्याकरता !! ५० वर्षापूर्वी पालशेत मध्ये मित्रासह काढलेले सात आठ दिवस त्यातील प्रत्येक क्षणासह आठवावेत अस वाटतंय !! पण मानवी record वर काळाचा परिणाम अपरिहार्य आहे ना !
18 Apr 2016 - 12:11 pm | अजया
श्री व सौ मुवींचे धाडसी निर्णयाबद्दल अभिनंदन.
या निर्णयापर्यंत कसे आलात एकदा जरुर लिहा.
19 Apr 2016 - 7:21 am | मुक्त विहारि
शेतीत जरा स्थिर स्थावर झालो की, नक्कीच लिहीन.
गेली २०-२२ वर्षे शेतीचाच अभ्यास करत असल्याने, शेती ह्या विषयाबद्दल १-२% (जेमतेम एक ते २ टक्केच) माहिती आहे. ती इथे नक्कीच सांगीन.
पुस्तकी ज्ञान कणांचे व्यावहारिक यशापयश पचवून झाले, की लिहितो.
18 Apr 2016 - 3:03 pm | सविता००१
सुरेख निर्णय.
मनीषाताई आणि मुवि, हार्दिक अभिनंदन आणि उदंड शुभेच्छा!
18 Apr 2016 - 3:29 pm | चंद्रनील मुल्हेरकर
किमान पाच एकर शेत असेल तर विकत घ्या,अल्पभुधारक शेतकर्याला उत्पन्न कमी व कुटाणा जास्त असतो.डीझेल एंजिन वापरन्याचा वेडगळपणा करु नका खर्चात पडाल,त्याऐवजी वीज कनेक्शन घ्या, २५० फुटाची दोन बोअर मारा व त्याला मोटर बसवा काम होऊन जाईल.ज्याला सुरवातीला शेती करायला देणार असाल तो विश्वासू असेल असे बघा,खेड्यातील बेणी थुका लावायला कुणाला ऐकत नाहीत.भात या पिका बरोबरच आणखी काय पिकवता येईल याचा विचार करा.तुम्हाला व काकुंना शुभेच्छा.
( शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर)
19 Apr 2016 - 7:24 am | मुक्त विहारि
(शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर)
एक विनंती आहे,
तुमच्या अनुभवाबद्दल जरूर लिहा.
पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा, ह्या म्हणी प्रमाणे, ते इतर मिपाकरांना पण उपयोगी ठरतील.
18 Apr 2016 - 3:30 pm | उगा काहितरीच
चाकोरीबद्ध पीक घेऊ नका. काहीतरी वेगळे पीक घ्या . जसेकी कुठली कुठली औषधी , कोरफड, साग असे ! भरपूर कंपन्या अशा आहेत की तुम्हाला पेरणी करण्यापासून मदत करतात. व तुमचा माल विकत घेतात. वेळात वेळ काढून कृषी विद्यापीठाला भेट द्या . अगदी सविस्तर माहिती अगदी फुकट मिळेल. थोडक्यात पीक पेरण्याअगोदरच विकले गेले पाहिजे. शेती शेतकऱ्यांच्या सारखी न करता व्यावसायिकासारखी करा. ताळेबंद व्यवस्थित मेंटेन ठेवा. अर्थात आपला उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून नाही अशीच शक्यता विचारात घेतली आहे.
मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
(सगळ्यात महत्त्वाचे :- जम बसल्यावर मिपाकरांसाठी शेतात एक ट्रीप आयोजीत करा. ;-) )
18 Apr 2016 - 3:35 pm | नूतन सावंत
मुवि आणि मनीषा अभिनंदन.
खूप गोष्टी बोललो आहोत.पण बाकीच्यानाही माहिती घेता येतील अशा गोष्टी.
१.जागेची पहाणी करताना जागेत या दिवसात हिरवळ दिसते का ते पहा.हमखास तिथे पाणी असलेच पाहिजे.
२.औदुबराचे झाड त्या जागेत असेल तर त्याच्या खाली
हमखास पाणी असतेच.
पाणी मिळाल्यावर पुढची बाब म्हणजे पाईपलाईन व स्प्रिंकलरसाठी सातबारा महिलेच्या नावी असेल तर ९०% सबसिडी आणि पुरुषाच्या नावे असेल तर सत्तर% सबसिडी शासनाकडून मिळते.
४.कोकणात पाणी शोधून देणारा माणूस पाणाड्या म्हणून ओळखला जातो.पाणक्या म्हणजे पाणी भरणारा गडी.
५.पाणाड्या शोधायला रत्नागिरीकर मदत करू शकतील.मीही चौकशी करीत आहे.
६.एक अनाहिता चिपळूणपासून रत्नागिरीच्या दिशेने २५ कि.मी.वर रहातात,त्यांना व्यनि केला आहे.त्यांचे ऊत्तर आले की.व्यनि करेन.
18 Apr 2016 - 3:37 pm | आदूबाळ
मुवि - अभिनंदन आणि शुभेच्छा!
18 Apr 2016 - 3:45 pm | सुनिल पाटकर
जिल्हापरिषद व पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी येथे सातबारा उता-यासह संपर्क साधा.भरपूर योजना आहेत.सरकारी अनुदान मिळते आपले पैसे वाचतात..आधिक माहिती हवी असल्यास देतो.
18 Apr 2016 - 3:49 pm | नूतन सावंत
द्या की.हवातर वेगळा धागा काढा,सविस्तर माहितीसाठी.
18 Apr 2016 - 4:01 pm | नाखु
+१११११
18 Apr 2016 - 4:04 pm | कपिलमुनी
अभिनंदन आणि शुभेच्छा!
18 Apr 2016 - 4:06 pm | समीरसूर
मुविसाहेब, अभिनंदन!
आपले त्रिवार अभिनंदन! काहीतरी वेगळा विचार करून, नीट योजना आखून आणि कष्टाची तयारी ठेवून धाडसाने टाकलेले पाऊल दमदार यश आणि समाधान देते. आपल्याला खूप शुभेच्छा! आपणाला अगदी हमखास यश मिळणार ही सर्व मिपाकरांना १००% खात्री आहे.
18 Apr 2016 - 4:39 pm | मराठी कथालेखक
अभिनंदन आणि शुभेच्छा.
बाकी मदत /सल्ला देवू न शकणारा अज्ञानी मक :)
18 Apr 2016 - 5:54 pm | मदनबाण
मुविना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डिबिरी डि... ;) :- Genius
18 Apr 2016 - 6:04 pm | भंकस बाबा
साधारण 12 वर्षापुर्वी मी देखिल शेतीच्या ध्यासाने मुंबईतील नोकरी सोडून गावात शेतीसंदर्भात नोकरी पकडली होती . तेथील काही अनुभव इथे टाकतो.
गावातील लोक शहरी लोकांना पैशाची खाण समजतात त्यामुळे मजूरी, इतर सामान, कच्चा माल इत्यादिचा दर नेहमी जास्तच लावतात. आपण एकदा का पायंडा पाडलात की मग तेच घेऊन बसतात .
उसनवारि या लोकाकडून शक्यतो करु नका, म्हणजे यांना पैसे उसने देऊ नका. वसूली करताना जाम त्रास होतो.
चिपळुनला जाताय मग जमिनीचा मगदुर बघुन पीक घ्या. मी कर्जत भागात होतो, तिथे स्थानिकांच्या नादी लागून हळद शेतात लावली होती. कोकणात पाऊस तुडुंब पडतो व् हळदीला पाणी निचरा व्हायला लागते. पहिला एक पावसाळा शेती करु नका किंवा पारंपारिक म्हणजे भातशेती करा ,यात तुमचे फ़क्त मुद्ल येईल पण पिक घेतल्यामुळे शेत तणमुक्त राहील. भाताच्या काडाला पण पैसे असतात, गावातील लोक हे फुकट मागतात.
विजेचा पंप बघा, डिझेलचा पंप आतबटयाचा व्यवहार ठरेल. कारण तो सतत चालु रहाणे गरजेचे असते. थोड़ा वेळ पडून राहिला तर मेन्टेन्सचा खर्च बराच निघतो. शिवाय कुपनलिका घेतलित तर विजेचा सबमरिसिबल पंप लागेल. डिझेल पंप इथे कुचकामि ठरेल .
कर्जत भागात भातपिक घेतल्यावर असलेल्या ओलात कडधान्य पीक जसे हरभरा, तुर, मूग घ्यायची प्रथा आहे. हा पर्याय वापरु शकता, हो पण त्यासाठी वाण गावठी पाहिजे, संकरित किंवा हायब्रीड वापरलात तर पाणी व् खते दोन्ही द्यावे लागेल. या पिकात देखिल फायदा जास्त होत नाही पण घरची कडधान्याची सोय होते व् जमींन सुपीक राहते.
18 Apr 2016 - 6:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
मुवि आणि वहिनींचे हार्दीक अभिनंदन !
वेगळ्या वाटेवरील आपल्या उपक्रमाला उदंड यश लाभो ही सदिच्छा !!
एकदा का बाग बहरली की तेथे मिपाकट्टा भरवा हे तुम्हाला सांगायला नकोच :)
18 Apr 2016 - 6:29 pm | भीमाईचा पिपळ्या.
जमीन घेताना २ हे. पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर दोघांच्या नावावर वेगवेगळे खरेदी करा. जेणेकरून दोघे अल्पभूधारक मधे जातील. दोघांच्या वेगवेगळ्या खरेद्या करूनही अल्पभूधारक मधे बसत नसाल तर सौ मुवि ना अल्पभूधारक करा.
जमिन खरेदी करायच्या आधी बोजा गहाणवट बक्षीस पत्र इतर हक्क नाही ना ते खात्री करा. अर्थात त्याबाबत सुरंगीतै कडून डिट्टेल माहीती मिळेल.
पाणी खा त्रीशीर असेल तर सध्या भांडवली खर्चामूळे कमी क्षेत्र कधीही चांगले. बाकी डिटेल घरि गेल्यावर लिहतो.
19 Apr 2016 - 7:22 am | रेवती
मुवि, मुलांची शेती ही लेखमाला लिहिल्यानंतर प्रत्यक्षातील शेतीबद्दलही येवोत ही आशा. आपणा उभयतांना शुभेच्छा!