एक होतं आटपाट नगर. त्यात होता एक शिंपी. त्यानं नुकताच बापाचा व्यवसाय सांभाळला होता.आणी हळुहळु शिंपी काम सुरु केलं होतं.
जीवन त्याचं कसं छान चाललं होतं. नवनवीन,वेगवेगळे कपडे तो शिवत होता. आणि चरितार्थही व्यवस्थित चालत होता.
पण एवढ्यात झालं काय की त्याला टोचली एक सुइ. त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुइ.
झालं . तो भडकला.एवढिशी सुइ, वाकड्यात जातेच कशी?
त्यानं दरडावलं सुइला..झापलं मस्त धरुन.
पण सुइ म्हणली "मी तर पडले सरळ-सोट्.बोलुन चालुन एक सरळ्-टोकदार सुइ. मी कशाला जाउ वाकड्यात?
तुम्ही शिवता तिथं पोचणं, टाके मारणं इतकच तर माझं काम."
पण शिंपी काही ऐकेना. त्यानं ठरवलं "देउ हिला हाकलुन. घेउ दुसरी एखादी मस्त एक छानशी, आज्ञाधारक बाहेरुन."
तसा त्यानं दिलं तिला काढुन्,आणि तडक गेला सुयांच्या राणीला भेटायला सुयांच्या राज्यात.
राणीनं त्याचं छानसं आगत्-स्वागत केलं. येण्याचं कारण विचारलं.
तसं त्यानं आधिच्या सुइची तक्रार केली; तिच्या राज्यातल्या एखाद्या नवीन कामसु सुइची मागणी केली.
राणी सुज्ञ होती. ती मनाशीच हसली. आधिच्या सुइला तिनं ठेउन घेतलं दुसर्या कामासाठी. आणि दुसरी आणखी एक
नावाजलेली सुइ दिली पाठवुन शिंप्यासोबत.
शिंपी झाला कामावर रुजु, नवीन,दुसर्या सुइसोबत्. मस्त छान जीवन्-क्रम सुरु झाला त्याचा.
रोज नवीन कपडें नवीन रचना,डिझाइन्स. आता त्याचं आणखी कौतुक होउ लागलं.
आधिच्या सुइ पेक्षा हिनं जवळ जवळ दुप्पट दिवस,दोनेक वर्ष काम केलं होतं.
त्याचा सराव दुप्पट झाला होता.
काही दिवस नीट गेले. पण छट.....
ही सुइ सुद्धा टोचलिच एक दिवस.त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुइ.
झालं . तो भडकला.एवढिशी सुइ, वाकड्यात जातेच कशी?
त्यानं दरडावलं सुइला..झापलं मस्त धरुन.
सुइनं काही बोलायच्या आतच त्यानं ह्या सुइला सुद्धा काढुन टाकायचं ठरवलं.
तसा त्यानं दिलं तिला काढुन्,आणि तडक गेला सुयांच्या राणीला भेटायला सुयांच्या राज्यात.
जाताना त्याला एक वाटलं "चला एक बरं झालं. निदान हिनं पहिल्या सुइ पेक्षा जरा चांगलच काम केलय.
थोडे जास्त दिवस आहे ती. तिचं स्किल बरं होतं पहिलीपेक्षा."
राणीनं त्याचं पुन्हा छानसं आगत्-स्वागत केलं. येण्याचं कारण विचारलं.
तसं त्यानं दुसर्या सुइची तक्रार केली; तिच्या राज्यातल्या एखाद्या नवीन अधिक कामसु सुइची मागणी केली.
राणी सुज्ञ होती. ती मनाशीच हसली. दुसर्या सुइला तिनं ठेउन घेतलं दुसर्या कामासाठी. आणि तिसरी आणखी एक
नावाजलेली सुइ दिली पाठवुन शिंप्यासोबत.
शिंपी झाला कामावर रुजु, नवीन सुइसोबत.तिसर्या सुइ सोबत. मस्त छान जीवन-क्रम सुरु झाला त्याचा.
रोज नवीन कपडें नवीन रचना,डिझाइन्स. आता त्याचं आणखी कौतुक होउ लागलं.
पहिल्या सुइ पेक्षा हिनं जवळ जवळ दिवस तिप्पट दिवस,तीनेक वर्ष काम केलं होतं.
काही दिवस नीट गेले.
त्याचा एकुण सराव पाचेक वर्षांचा झाला होता.
पण छट.....
ही सुइ सुद्धा टोचलिच एक दिवस.त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुइ.
झालं . तो भडकला.एवढिशी सुइ, वाकड्यात जातेच कशी?
त्यानं दरडावलं सुइला..झापलं मस्त धरुन.
सुइनं काही बोलायच्या आतच त्यानं ह्या,तिसर्या सुइला सुद्धा काढुन टाकायचं ठरवलं.
तसा त्यानं दिलं तिला काढुन्,आणि तडक गेला सुयांच्या राणीला भेटायला सुयांच्या राज्यात.
जाताना त्याला एक वाटलं "चला एक बरं झालं. निदान हिनं दुसर्या सुइ पेक्षा जरा चांगलच काम केलय.
थोडे जास्त दिवस आहे ती. तिचं स्किल बरं होतं दुसरीपेक्षा."
पुन्हा तोच प्रकार.
राणेनं ह्यावेळेस थोडासा गंभीर चेहरा केला.पण त्याला दिली आणखी एक नवी सुइ. चौथी सुइ.
पुन्हा एकदा छान काम सुरु. अधिक नवीन दिझाइन्स. अधिक सुबक शिवण.
ह्या सुइनं तर चक्क अगदि सुरुवातीला जी सुइ होती तिच्या चौपट दिवस, चारेक वर्ष काम केलं होतं.
सारं कसं छान झालं होतं.
त्याचा एकुण सराव नउ-एक वर्ष झाला होता.
शिंप्यानं खुश होउन सुयांच्या राणीला धन्यवाद म्हणण्यासाठी पत्र लिहिलं.
आणि दर वेळेस नवीन सुइचं स्किल अधिकाधिक जे वाढतय त्याबद्दल आभार व्यक्त केले.
जसं जसं काळ जात होता, तसं तसं त्या शिंप्याच्या मते त्या सुयांचं स्किल सुधारत होतं.
स्वतःच्या सुया हाताळाण्याबद्दल त्याला अफाट अभिमान वाटत होता.
प्रचंड खुश होता तो स्वतःच्या हाताळणीबद्दल.
सुयांची वागणुक सुधारतिये याबद्दल त्याला खुपच छान वाटत होतं.
प्रतिक्रिया
16 Sep 2008 - 11:10 pm | रामदास
बोधकथा वाटली.
बोधकथाच आहे ना?
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
17 Sep 2008 - 12:56 am | बापु देवकर
नक्कि काय आहे..?
17 Sep 2008 - 1:00 am | विसोबा खेचर
बोधकथा आवडली! :)
आपला,
(शिकाऊ शिंपी) तात्या.
17 Sep 2008 - 7:42 am | फटू
तुम्ही नक्कीच आय टी मध्ये आहात... म्हणजे बघा...
एक एम एन सी कंपनी असते. या कंपनीत एक सिनियर बंदा प्रोजेक्ट मॅनेजर बनतो. नव्याचे नऊ दिवस संपतात आणि तो आपल्या रिसोर्स बद्दल तक्रार करू लागतो. मग तो रिसोर्स मॅनेजर कडे जातो. रिसोर्स बदलून घेतो... पुन्हा नव्याचे नऊ दिवस संपतात आणि...
बाकी बोधकथा छान जमली आहे !!!
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
17 Sep 2008 - 8:33 am | हर्षद आनंदी
सुईनी कितीहि चांगले काम केले तरी कौतुक शिंप्याचे....आणि वर सुई टोचली म्हणुन माज...
स्वगत : हम्म..... दही आम्ही घुसळणार आणि मॅनेजर लोणी खाणार
मनोबा, आय टी मध्ये असा नाहीतर आणिकुठे, तोंड्पुजेपणा जमला तर प्रगती, नाहीतर हकालपट्टी !!
(सुईचे काम चोख बजावणारा) आय टी हमाल
17 Sep 2008 - 11:16 am | झकासराव
मस्त आहे कथा :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
17 Sep 2008 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गोष्ट छान आहे, पण त्याचं गाईडपण मिळेल का हो मनोबा?
(अंमळ ढ) अदिती