"नाही" चा महिमा!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
17 Feb 2016 - 5:23 pm

विश्वासघात त्याचाच केला जातो जो विश्वास ठेवतो. म्हणून जास्त आणि पटकन कुणावर विश्वास ठेवत जाऊ नका. इमोशनल ब्लॅकमेल त्यालाच केले जाते जो इमोशनल असतो. म्हणून आजच्या जगात जास्त इमोशनल राहून चालत नाही. भिडस्त राहून सुद्धा चालत नाही. नाहीतर भिडस्त माणसाचा सर्वात प्रथम बळी जातो. तुम्ही दाबले जाल तर दुनिया तुम्हाला आणखी दाबेल. आजकालच्या जगात जो सगळ्यांचा मनाचा विचार करतो त्याच्या मनाचा विचार कुणीच करत नाही. जो सगळ्यांच्या स्वभावाला सांभाळून घेतो, त्याच्या स्वभावाला मात्र कुणीच सांभाळताना दिसत नाही. अशा व्यक्तीला दुखवणे आपला हक्कच आहे असे लोक मानतात कारण अशा व्यक्तीला गृहीत धरले जाते. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला खूश ठेवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही मात्र नेहमी नाखूष राहाल कारण सगळ्यांना खूश ठेवूनही शेवटी त्यापैकी कुणी तुम्हाला चांगले म्हणेलच याची शाश्वती देता येत नाही. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत. तसा तुम्ही प्रयत्न करण्या आधी हे तर तपासा की तो प्रत्येक जण तुमच्या अपेक्षेला कितपत किंमत देत आहे? किंवा तुमच्याही काहीतरी अपेक्षा असतील हा तरी विचार समोरचा करतोय का? हे तरी तपासा! तसेच प्रत्येक व्यक्तीच्या सगळ्याच अपेक्षा सुदधा तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत. करूही नका! नाहीतर ९ अपेक्षा पूर्ण केल्या आणि १० वी अपेक्षा पूर्ण नाही केली तर आधी केलेल्या ९ चांगल्या कामांवर पाणी फेरले जाते आणि एक अपेक्षा पूर्ण केली नाही म्हणून तुमची बदनामी होते. तुम्हीच नेहमी सगळ्यांचे ऐकून घेता? तुमचे मात्र कुणीही ऐकून घेत नाही? तर मग तुम्ही सुद्धा ऐकून घेणे थांबवा कारण संवाद किंवा वाद किंवा चर्चा आपण त्यालाच म्हणतो ज्यात सगळ्यांना समान बोलण्याचा हक्क आणि संधी मिळते. पूर्ण चर्चेत फक्त एकच जण बोलत राहिला तर त्याला विचार लादणे असे म्हणता येईल. हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू असताना तुमच्याकडून फक्त कर्तव्याची अपेक्षा केली जात असेल आणि तुमचा हक्क हिरावून घेतला जात असेल तर असे कर्तव्य करून काहीही उपयोग नाही. अपेक्षा, मनाचा विचार करणे, स्वभाव सांभाळणे, हक्क, कर्तव्य, संवाद, वाद, विश्वास या सगळ्या गोष्टी एकतर्फी नसतात. जर त्या एकतर्फी झाल्या तर तो सपशेल अन्याय ठरतो आणि त्याला काहीही अर्थ राहात नाही. त्यामुळे वेळोवेळी "नाही" म्हणायला शिका. आपण जर कुणालाच कशासाठीच नाही म्हणू शकत नसलो तर नियती सुद्धा आपल्याला "नाही" म्हणेल, आपल्यावर हसेल आणि आपल्यावर प्रसन्न न होता नाराज होऊन निघून जाईल. इतरांना नाही म्हणायला शिकताना इतरांकडून आलेले "नाही" सुद्धा स्वीकारायला शिका. या सगळ्या गोष्टी जश्या नातेसंबंधात लागू होतात तशाच त्या समाजात मित्र, शेजारी, ओळखीचे लोक यांचेशी वागताना तसेच काही प्रमाणात आपल्या ऑफिसबाबत, काम करतांना सुद्धा थोड्या फार प्रमाणात आणि फरकाने लागू होतात.

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

होबासराव's picture

17 Feb 2016 - 7:33 pm | होबासराव

ढॅण टॅ ढॅण...णिसो इज बॅक अगेन्...

नाखु's picture

18 Feb 2016 - 8:59 am | नाखु

प्रेरणा : प्रकाश महाभृंगराज तेलाची जुनी (रेडीओवरील) जाहीरात.

मिपा वाचक : अहो सा सं वैतागलो या कुरापती-बिनबुडाच्या धाग्यांना !!! आगपाखडीने अगदी डोके उठलय काय करू ?
सा.सं.: अरे तुम्ही जीवनामृत किंवा निसो सार किंवा गेलाबाजार अकु बोधासत्व का घेत नाही ! डोके हलके होईल आणि एक्मेकांच्या उरावर बसणार्या प्रतिसादांची भीती नाही.

मिपा वाचक : अरे वा चांगला उपाय सांगीतला,आजच त्या धाग्यांना भेट देतो आणि कटकटीतून मुक्त होतो.

लक्ष्यात ठेवा

"जीवनामृत,अकु बोधासत्व आणि निसो सार !!
पळवी चिखल धाग्यांचा क्षीण-क्षोभ फार !!

सोमवार ते रवीवार फक्त जीवनामृत,अकु बोधामृत आणि निसो सार ... ण टॅ ढॅण..टॅण्ण्टॅण डिंग डॉम्ग..टॅण्ण्टॅण डिंग डॉम्ग

आनन्दा's picture

17 Feb 2016 - 7:38 pm | आनन्दा

माझी बायको मला बडबडत असल्यासारखे वाटले..

सनईचौघडा's picture

18 Feb 2016 - 10:07 am | सनईचौघडा

मी पहिल्यांदा वाचले तेव्हा बडवत असल्यासारखे असे वाचले.

सतिश गावडे's picture

22 Feb 2016 - 10:56 pm | सतिश गावडे

=))

मदनबाण's picture

18 Feb 2016 - 7:04 am | मदनबाण

नाही..........................

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

अत्रुप्त आत्मा's picture

18 Feb 2016 - 10:17 am | अत्रुप्त आत्मा

खिक्क!

gogglya's picture

19 Feb 2016 - 3:13 pm | gogglya

ECE बल्ब लाना...

निमिष सोनार's picture

22 Feb 2016 - 4:22 pm | निमिष सोनार

काही ठराविक लोक माझे धागे आवडत नाही असे एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे माझा धागा आला की आवर्जून वाचतात आणि प्रतिसाद सुद्धा देत राहतात आणि त्यांचा स्वत:चा वेळ वाया घालवतात आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचून माझाही वेळ फुकट जातो.

ते धागे फक्त माझे आहेत म्हणून त्रास होतो की धागे आवडत नाहीत म्हणून त्रास होतो ते मला माहित नाही पण धागे आवडत नसतानाही, त्यावर क्लिक करून ते वाचायची तसदी तरी का बरे घेतात तुम्ही लोक?
वाचायचेच नाही ना! संपले!

असे तर नाही ना, की मुद्दाम ठरवून "णीसो" च्या लेखांना वाईट प्रतिसाद देऊन देऊन ज्या नवीन लोकाना माझे धागे वाचायची इच्छा होईल किंवा आवडत असतील त्यांना सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया वाचून माझे धागे वाचण्याची इच्छा होऊ नये!

तुम्ही टीका जरूर करा पण लेखात काय लिहिले आहे त्या अनुषंगाने करा, कोण "नाही" म्हणतंय?

शेवटी हा लेखच "नाही" च्या महिमेवर आहे...
किंवा माझे धागे लोकांनी वाचूच नये असे वाटते ठराविक लोकांना?

तुम्ही माझ्या लेखाला कंटाळून "नाहीच वाचायचे" असे ठरवा आणि सोडून द्या की!

टीप: आतापर्यंत या लेखाची ७८४ वाचने झाली आहेत.

सतिश गावडे's picture

22 Feb 2016 - 10:57 pm | सतिश गावडे

काही ठराविक लोक माझे धागे आवडत नाही असे एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे माझा धागा आला की आवर्जून वाचतात आणि प्रतिसाद सुद्धा देत राहतात आणि त्यांचा स्वत:चा वेळ वाया घालवतात आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचून माझाही वेळ फुकट जातो.

त्यांना वेळ वाया घालवायचाच असतो. :)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Feb 2016 - 11:33 am | अत्रुप्त आत्मा

@आतापर्यंत या लेखाची ७८४ वाचने झाली आहेत.>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-forum/popcorn.gif

उपयोजक's picture

12 Oct 2016 - 9:38 pm | उपयोजक

काय मिळतं अशी चेष्टा करुन काय माहित?

आदिजोशी's picture

22 Feb 2016 - 7:27 pm | आदिजोशी

तुम्ही मोकळेपणे तुमचे विचार, योग्य शब्दांत जगापुढे मांडताय हीच एक मोठी अचीव्हमेंट आहे. प्रतिसाद आले, नाही आले, विरोध करणारे आले, तरी तुम्ही खचून जाऊ नका. लेख वाचल्यावर त्यावर विचार केला जातोच.
बेस्ट ऑफ लक.

गौरी लेले's picture

22 Feb 2016 - 7:43 pm | गौरी लेले

खुपच मनमोकळे लेखन निमिष !

लिहित रहा :)

निमिष सोनार's picture

12 Oct 2016 - 6:03 pm | निमिष सोनार

.

आनंद कांबीकर's picture

22 Feb 2016 - 8:50 pm | आनंद कांबीकर

टिप- ९१४ वाचने झाली आहेत

शाम भागवत's picture

22 Feb 2016 - 9:04 pm | शाम भागवत

जेव्हा नाही म्हणायचे असते तेव्हा चूकून सुध्दा हो म्हणू नये.

सतिश गावडे's picture

22 Feb 2016 - 11:01 pm | सतिश गावडे

जरा परिच्छेद वगैरे पाडा की राव. वाचायला बरं पडतं.

मराठीत स्व-मदत प्रकारातील लेखकांची जरा कमतरताच आहे. ही उणिव तुम्ही नक्की भरून काढाल असे वाटते. प्रकाशकांना तुमचे लेखन वाचायला द्या. कदाचित त्यांना त्यानंतर रॉबिन शर्माची पुस्तकं मराठीत भाषांतरीत करावी लागणार नाहीत.

नाखु's picture

23 Feb 2016 - 11:46 am | नाखु

"वाचाल तर वाचाल" या नावाची मालीका लेखक मजकुरांनी लिहावी, अशी मी तमाम वाचकांतर्फे विनंती करतो.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2016 - 11:59 am | अत्रुप्त आत्मा

=))
ढणाजी आणी णाखून काकांशी शमत! =))

सतिश पाटील's picture

23 Feb 2016 - 11:41 am | सतिश पाटील

मी १०८८ वा वाचक...

आशु जोग's picture

19 Sep 2016 - 8:14 pm | आशु जोग

क्वांटिटी आणि क्वालिटी में बहोत फर्क होता है निमेस भाई

आदूबाळ's picture

19 Sep 2016 - 8:20 pm | आदूबाळ

निसो सर आहेत कुठे सध्या?

निमिष सोनार's picture

12 Oct 2016 - 6:04 pm | निमिष सोनार

:-)

नीलमोहर's picture

12 Oct 2016 - 9:46 pm | नीलमोहर

लोकांचं काय, ते पायीही चालू देत नाहीत अन घोड्यावरही बसू देत नाहीत.

सिरुसेरि's picture

13 Oct 2016 - 12:19 pm | सिरुसेरि

ऐकावे जनाचे , करावे लिहावे मनाचे . पुलेशु .

गिरिजा देशपांडे's picture

13 Oct 2016 - 12:45 pm | गिरिजा देशपांडे

छान लिहिलंय, आवडलं आणि पटलंही.

>>>>>>त्यामुळे वेळोवेळी "नाही" म्हणायला शिका

असेच वेळोवेळी बायका नाही म्हणतात आणी नवरे मंडळींची पंचाईत करतात (ह. घ्या )