भिंतीपल्याड जग असतं...

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
10 Feb 2016 - 3:18 pm

a
छायाचित्र जालावरून साभार

भिंतीपल्याड जग असतं, निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की

पुढे जायचा वसा कधी टाकू नये
ठेच लागली जराशी तर लंगडावं की

आहे त्यातच समाधानी रहावं, पण
इच्छित साध्य करण्या थोडं झगडावं की

घेऊ द्यावा मनालाही निर्णय त्याचा
मनाला जे आवडतं ते, निवडावं की

सदासर्वदा चांगुलपणा अळणी होतो
अधनं मधनं जरा जरासं बिघडावं की

निसटून जातो काळ हातून तरीसुद्धा
जमेल तितकं आपण घट्ट पकडावं की

भिंतीपल्याड जग असतं निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की

- अपूर्व ओक
ब्लॉग दुवा हा

मराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

मयुरMK's picture

10 Feb 2016 - 3:52 pm | मयुरMK

कविता छान
बाकी फोटो ( ब्लॉग वरचा) खूप आवडला

मयुरMK's picture

10 Feb 2016 - 3:52 pm | मयुरMK

कविता छान
बाकी फोटो खूप आवडला

"सदासर्वदा चांगुलपणा अळणी होतो
अधनं मधनं जरा जरासं बिघडावं की"

खर आहे ……

एकप्रवासी's picture

11 Feb 2016 - 1:14 pm | एकप्रवासी

फोटो पण लई भारी…….

वेल्लाभट's picture

11 Feb 2016 - 5:45 pm | वेल्लाभट

धन्यवाद एकप्रवासी आणि मयूर

एक एकटा एकटाच's picture

14 Feb 2016 - 11:13 am | एक एकटा एकटाच

घेऊ द्यावा मनालाही निर्णय त्याचा
मनाला जे आवडतं ते, निवडावं की

हे मनापासून आवडलं

राघव's picture

16 Feb 2016 - 8:14 pm | राघव

चांगलंय रे.. पु.ले.शु.

स्वामी संकेतानंद's picture

16 Feb 2016 - 11:51 pm | स्वामी संकेतानंद

अहा!कविता छान! वृत्तात बांधली असती तर छान गझल झाली असती.

वेल्लाभट's picture

17 Feb 2016 - 7:57 am | वेल्लाभट

धन्यवाद ए ए ए,राघव आणि स्वामी संकेतानंद. पुढच्या वेळी मीटरकडे लक्ष देतो.