`म्हणी' मॅटर्स!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in काथ्याकूट
13 Sep 2008 - 7:39 pm
गाभा: 

बोलण्यात अनेकदा म्हणींचा वापर आपण करत असतो. लिहितानाही करतो. त्यांचा अर्थ काही वेळा आपल्याला पूर्णपणे कळलेला असतो, काही वेळा फक्त म्हण माहीत असते. म्हण ही अतिशय कमी आणि चपखल शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. म्हण ही त्या-त्या भागाचं वैशिष्ट्यही असते. आमच्या कोकणात अनेक वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आहेत. हा धागा सुरू करतोय, आपल्याला माहिती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आणि त्यांचा अर्थ सागण्यासाठी.
उदा. 1. "वाघ पडला बावी, केल्डं गां* दावी' अशी एक म्हण कोकणात प्रचलित आहे. "बाव' म्हणजे विहीर. केल्डं म्हणजे लाल तोंडाचं माकड. ते कोकणात हमखास पाहायला मिळतं. वाघ विहिरीत पडला, की माकड सुद्धा त्याला वाकुल्या दाखवतं, असा त्याचा अर्थ. किती समर्पक आहे ना म्हण? आपण अगदी रोजच्या व्यवहारात, समाजात हीच विदारक स्थिती पाहत असतो.
2. "ज्यासाठी लुगडं, ते सगळं उघडं' अशी पण एक म्हण आहे. म्हणजे जो उद्देश आहे, तो साध्य न होता बाकीच फापटपसारा मांडला जाणे.
3. "दिवस गेला रेटारेटी नि चांदण्यात कापूस काती' ही म्हणही अनेकदा ऐकलेली. म्हणजे दिवस फुकट गेला आणि कापूस कातायला रात्रीचा मुहूर्त लागला. अर्थात, जेव्हा हातात वेळ असतो, तेव्हा काम करायचं नाही आणि मग धावपळ करायची. आपलंही बरेचदा असंच होतं ना?

तुम्हाला माहित आहेत अशा काही चपखल, मार्मिक म्हणी? पण वेगळ्या हव्यात हं! अगदी "आग रामेश्‍वरी नि बंब सोमेश्‍वरी' एवढ्या सुपरिचित नकोत.
-----------------

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

13 Sep 2008 - 7:50 pm | धोंडोपंत

ढुंगणाखाली आरी आणि चांभार पोरांक मारी

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

यशोधरा's picture

13 Sep 2008 - 8:06 pm | यशोधरा

मस्त आहे धागा!

माझी आतेआजी अस्सल कोकणी म्हणी वापरायची, काही म्हणी लिहायलाही ऑकवर्ड वाटेल! मनाने जितकी प्रेमळ, तितकीच तिची जीभ कोकणी वळणाची होती, आणि ती वापरत असलेल्या म्हणी जरा अति अस्स्ल! त्यातल्या त्यात सोज्वळ म्हण आठवली की लिहिते! :D

तिचे एक नेहमीचे वाक्य होते, एखाद्याच्या चांगल्या दिवसांत सगळेच कसे सहाय्यकारी होतात अन् वाईट दिवसांत कोणीच आसपास फिरकत देखील नाही, हे सांगताना ती म्हणत असे, "रंगलेल्या ओठांचे मुके घेऊक राजापासून खोतापर्यंत सगळेच धावतत.." ही म्हण नव्हे, पण असेच आठवले म्हणून लिहिले..

अनामिक's picture

13 Sep 2008 - 8:18 pm | अनामिक

मु. पो. बोंबीलवाडी मधे वापररलेली एक म्हण...

"घरची करते देवा देवा, अन बाहेरचीला चोळी शिवा"

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 10:15 am | विसोबा खेचर

"घरची करते देवा देवा, अन बाहेरचीला चोळी शिवा"

ही म्हण क्लासच आहे. कोकणातलीच आहे. आमच्या सिंधुदुर्गात हमखास वापरतात... :)

दादा गातो अन् *वडा ऐकतो!

कामे थकली सारी अन् अडकित्त्यात सुपारी! :)

(सर्व कामे तशीच टाकून नुसतं पायावर पाय टाकून बसणार्‍याकरता ही म्हण आमच्या देवगडात वापरतात!) :)

आपला,
तात्या देवगडकर.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Sep 2008 - 2:18 pm | llपुण्याचे पेशवेll

माझ्या आजोबांच्या तोंडातील काही म्हणी.

१. उठत नाही तर ओढून किती लांब करायचे.(अर्थ: एखाद्याला मनातूनच काम करायची ईच्छा नसेल तर त्याला किती भरीस पाडायचे)
२. खाऊन खग्रास हागून सत्यानाश.(याचा अर्थ नेमका काय ते माहीत नाही)

पुण्याचे पेशवे

अरे माझ्या आवडीची म्हण आहे!
म्हणजे, खा-खा खायचं नि मैल्याच्या टाक्या भरायच्या. म्हणजे थोडक्यात, खायला काळ नि भुईला भार. निरुद्योगी लोकांबद्दल ती वापरतात.
उपयोग काय अशा निरर्थक आयुष्याचा?

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2008 - 5:01 pm | प्रभाकर पेठकर

नाही अभिजित,

खग्रास म्हणजे संपूर्ण. (ख= आकाश, ग्रास = ग्रासणे. आकाशालाही ग्रासून टाकणारे. म्हणजेच 'संपूर्ण' कुठलाही अंश न उरणारे)
म्हणजे अन्न खाऊन संपूर्ण संपविले आणि हगून त्याचा सत्यानाश केला. अर्थात अंगी लागले नाही. म्हणजे एखादी गोष्ट नुसतीच संपविली पण ते संपविणे सत्कारणी लागले नाही.

आपला अभिजित's picture

18 Sep 2008 - 7:22 pm | आपला अभिजित

स्पष्टीकरण मी केलं नाही. पण अर्थ तोच होता ना? खा-खा खायचं आणि त्याचा उपयोग काही करायचा नाही, हाच मथितार्थ आहे ना!

पण तुम्ही अधिक योग्य स्पष्ट केलं. धन्यवाद!

विनायक प्रभू's picture

13 Sep 2008 - 8:23 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
ढुंगणावर नाही चींधी आणि ह्याना हवी सोन्याची बिंदी
वि.प्र.

आपला अभिजित's picture

13 Sep 2008 - 8:26 pm | आपला अभिजित

"गां* धुवून कढी नि उरलेल्याची वडी' ही म्हण माझे आजोबा एका शेजाऱ्यांबाबत नेहमी वापरायचे. म्हणजे कंजूषपणाचा कळस. मला ही म्हण प्रचंड आवडायची, आवडते.

गणा मास्तर's picture

13 Sep 2008 - 9:45 pm | गणा मास्तर

आमच्या वाडीत म्हणतात "घेण ना देण आन कंदील लावुन येण"
ते नाना चेंगट करतय बघा असं.
(अवांतर नाना ह घ्या)

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

अवलिया's picture

14 Sep 2008 - 5:25 pm | अवलिया

अव गणा मास्तर
नानाच लागतोय ना तुम्हाला? मग ?

'निरीचा घाम चिरीला' विसरु नका

नाना

अभिजीत's picture

13 Sep 2008 - 9:59 pm | अभिजीत

घरचं झालं थोडं आणि व्याह्यांनि धाडलं घोडं !

प्राजु's picture

13 Sep 2008 - 10:00 pm | प्राजु

चोरून भाकरी दिली तर बोंबलून तूप मागणं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

13 Sep 2008 - 10:08 pm | यशोधरा

ह्या काही आज्जीच्या आठवलेल्या म्हणी -

प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो...
चाय थय न्याय
केला तुला, झाला माका
बारीक नळी, चेपून भरी (खादाड माणसाच्या आहाराचं वर्णन )
फिरुन गेलो गाव, आणि काणेकराचा नाव
जोवेरी पैसा तोवेरी बैसा
दमास मान आणि शक्तीस भोजन

स्वगतः हुश्श! आठवल्या साध्या म्हणी!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 11:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

यशोधरा,

प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो...
चाय थय न्याय

या दोन्हींचा अर्थ नाही कळला, सांगाल का?

(शहरी) अदिती

यशोधरा's picture

14 Sep 2008 - 6:15 pm | यशोधरा

आदिती,

मी प्रयत्न करते.

प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो...

ह्या म्हणीचा नेमका अर्थ आता आठवत नाही; पण, प्रीतीचो मोगो म्हणजे आवडती व्यक्ती, तिच्याशी घसट वाढवायला काहीतरी निमित्त (कढी मागायच निमित्त करुन ये) असं काहीतरी असाव...

चाय थय न्याय

चाय म्हणजे चहा. जिथे, ज्याच्याकडून चहा मिळेल, त्याच्या बाजूने न्याय दिला जाईल - ज्या व्यक्तीकडून फायदा, तिला झुकत माप.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 7:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चाय थय न्याय म्हणजे सरशी तिथे पारशीच की!

धन्यवाद! :-)

शैलेन्द्र's picture

15 Sep 2008 - 9:56 pm | शैलेन्द्र

"चाय थय न्याय म्हणजे सरशी तिथे पारशीच की"

सरशि तिथे पारशिचा अर्थ थोडा वेगळा आहे अस वाटत.

विजुभाऊ's picture

15 Sep 2008 - 11:04 am | विजुभाऊ

फिरुन गेलो गाव, आणि काणेकराचा नाव
=))
ही आणखी एक म्हण
आपले ठेवायचे झाकुन आणि दुसर्‍याचे बघायचे वाकुन
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

केशवराव's picture

13 Sep 2008 - 10:17 pm | केशवराव

१] ' मी नाय त्यातली , म्हणे कडी लाव आतली '
२] 'दोन पैशांचा गुळ आणला, *ड फुटेस्तो खाल्ला , उरलेला गाईला घातला '
३] 'नाजूक जागी दूखणे ,आणि जावई डॉक्टर.'

प्रमोद देव's picture

13 Sep 2008 - 10:37 pm | प्रमोद देव

एका गोवेकरीण आज्जीकडून ऐकलेली कोकणी म्हण...
मीठ लाया माका खाया......आता ह्याचा अर्थ विसरलो.

अजून एक खास म्हण ऐकलेय गावाकडली....
लाखाशिवाय बात नाही आणि भजाशिवाय खात नाही....ही म्हण बढाईखोर माणसासाठी वापरतात.

अभिजीत's picture

14 Sep 2008 - 12:01 am | अभिजीत

१. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली,
२. मुकीला धरली, हाक ना बोंब!

रवि's picture

14 Sep 2008 - 12:39 am | रवि

१) ईळं माळं घरी आन दिवा लावुन दळन करी

२) रेडिओ विकुन मसाला आनाला (मसाला म्हनजे सेल )

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

वैशाली हसमनीस's picture

14 Sep 2008 - 7:04 am | वैशाली हसमनीस

१---अंगात नाही करणी नि मला म्हणा तरणी

राहूल's picture

14 Sep 2008 - 8:10 am | राहूल

१. सरकारी काम, आन् धा वर्सं थांब.
२. आपलंच घर, हागून भर.

घाटावरचे भट's picture

14 Sep 2008 - 8:35 am | घाटावरचे भट

शेंबूड आपल्या नाकाला अन ज्ञान शिकवी लोकाला...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2008 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१.आपण शेण खायचं नि दुसर्‍याचं तोंड हुंगायचं

२.बुगड्या गेल्या अन् भोके राहिली.

धोंडोपंत's picture

14 Sep 2008 - 8:51 am | धोंडोपंत

रिकामा सुतार, कुल्ले ताशी

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

भास्कर केन्डे's picture

18 Sep 2008 - 10:04 pm | भास्कर केन्डे

रिकामा सुतार काय करतो
बायकोच्या *र्‍या तासतो

(तासणे - वाकसीने छिलने... वाकस-आडव्या पात्याची कुर्‍हाड)

धोंडोपंत's picture

14 Sep 2008 - 8:52 am | धोंडोपंत

आगासली ती मागासली अन पाठसून इली ती गर्वार रवली

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||

सहज's picture

14 Sep 2008 - 8:59 am | सहज

खडुस लोकांनी काढलेल्या म्हणी वाटतायत. :-) म्हणजे बहुसंख्य म्हणी ह्या फक्त दुसर्‍याची "काढायची" / नावेच ठेवायची म्हणून केल्यासारख्या वाटत आहेत.

असो मजा येते आहे.

यातल्या किती म्हणी "विशिष्ट भागातील लोकांनीच" बनवल्या असतील बरे :?

पुष्कर's picture

14 Sep 2008 - 11:13 am | पुष्कर

१. कुनाला कशाचं तर गाढवाला बुडख्याचं... (पहा - चित्रपट - दोघात तिसरा, आता सगळं विसरा)

२. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं बघायचं वाकून.

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 11:14 am | विसोबा खेचर

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं बघायचं वाकून.

क्लास! :)

आपला,
(नसती झेंगटं वाकुन वाकुन बघणारा!) तात्या.

:)

शिप्रा's picture

14 Sep 2008 - 11:19 am | शिप्रा

ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला वाण नाहि पण गुण लागला..
पुणेरि म्हण : वाण नाहि पण घाण लागली

करुन करुन भागली अन देवपुजेला लागली...

लाज नाही मना अन कोणी काहि म्हणा...
लोका सांगे ब्रम्ह ज्ञान स्वतः कोरडा पाषाण..

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

विनायक प्रभू's picture

14 Sep 2008 - 11:33 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
कोंबडीने खाल्ल चनं आणि हगल वाटानं
अगदी रोज येणारा॑ अनुभव
विनायक

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2008 - 3:24 pm | प्रभाकर पेठकर

नाकपुडी एवढ घर आणि म्हणे किर्तन कर...

हौशीने केला वर, त्याला दिवसा खोकला अन रात्री ज्वर...

सतरा नेसली लुगडे तरी भागाबाईचे कुल्ले उघडे..

वेलदोडा's picture

14 Sep 2008 - 3:28 pm | वेलदोडा

तिन तिगाडा काम बिघाडा

शैलेन्द्र's picture

14 Sep 2008 - 5:03 pm | शैलेन्द्र

हाताला झाला माज, आन ढुंगनाला आली खाज...

भादव्यातल कुत्र आन पाट्लाचा पुत्र...

*डीला पहिजे गाडी, गहान पड्ली माडी..

खांद्यावर घेत्ला, कानात *तला...

बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी..

बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी..

ही काही म्हण नाही बरं का शैलेंद्र साहेब!
बाकीच्या छान आहेत.

`उंटाच्या **चा मुका घेणं' ही म्हण कम वाक्प्रचार मला भयंकर आवडतो.

`बाजारात तुरी नि भट भटणीला मारी' ही पण भारी आहे.
`**णाखाली आरी नि चांभार पोरं मारी' ही म्हण पण तशीच आहे, पण तिचा अर्थ खूपच वेगळा आहे.

मन's picture

14 Sep 2008 - 7:15 pm | मन

१.आलं मनाला तर ग्येलं शेनाला, नाय तर टोपलं टाकुन बसलं उनाला.
(लहरी माणसाबद्दल)
२. जेवायला आदि, झोपायला मदी अन कामाला कदि मंदी.
(संधीसाधु,आळशी माण्साबद्दल)
३. वावरात न्हाइ झाड अन म्हने येरंडाला आलाय पाड.
(खोटारडे पनची हद्द दाखवण्यासाठी.)
४.करुन ग्येला सारा गाव अन दप्तरी लागलं येड्याचं नाव.
(एकाचं खापर दुसर्‍यावर.)
५. नया मुल्ला ;अल्ला अल्ला.

आपलाच,
मनोबा

जेवायला आदि, झोपायला मदी अन कामाला कदि मंदी.
ही म्हण जबरा आहे. मला पण आवडायची, आवडते.

आलं मनाला तर ग्येलं शेनाला, नाय तर टोपलं टाकुन बसलं उनाला.
वावरात न्हाइ झाड अन म्हने येरंडाला आलाय पाड.

या म्हणी पहिल्यांदाच ऐकल्या. भन्नाट आहेत!

शैलेन्द्र's picture

14 Sep 2008 - 9:57 pm | शैलेन्द्र

"बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी..

ही काही म्हण नाही बरं का शैलेंद्र साहेब!"

हे जाहिरातितील वाक्य आहे, पण आमचे काहि मित्र ते म्हणीसारखे वापरतात, अर्थ तुम्ही समजुन घ्या...

डोमकावळा's picture

15 Sep 2008 - 10:59 am | डोमकावळा

छान धागा...
यापुर्वी एक असाच धागा इथे पहायला मिळेल

आयडिया केली आणि *डीत गेली
ह्त्यार भारी तर गिर्‍हाइक दारी

ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

अरुण मनोहर's picture

15 Sep 2008 - 11:12 am | अरुण मनोहर

पाणी टाक सांगीतलं की पाणी टाकावं, लोंबतय काय म्हणून विचारू नाही.

हगत्या लाज कां बघत्या लाज?

भाग्यश्री's picture

15 Sep 2008 - 10:22 pm | भाग्यश्री

अशीच एक म्हण आई म्हणायची..

पाय धू म्हटलं की पाय धुवायचे, साखळ्या कितीच्या विचारायचं नाहि! :)

हगणार्‍यानं न्हाई तर बगनार्‍यानं लाजावं

अभिरत भिरभि-या's picture

15 Sep 2008 - 12:45 pm | अभिरत भिरभि-या

* आपल्या गावात बळी अन दुसर्‍याच्या गावात गाढवं वळी.
* खाली मुंडी अन पाताळ धुन्डी
* अर्थ करी अनर्थ
* घरात नाही दाणा अन मला बाजीराव म्हणा
* जेणु काम तेणु थाय, बिजा करे सो गोता खाय

टारझन's picture

16 Sep 2008 - 9:13 pm | टारझन

* बडी बडी बाते, अन् वडापाव खाते....
* मनी ना घ्यानी ... आलं कानी

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

* आपल्या गावात बळी अन दुसर्‍याच्या गावात गाढवं वळी.

हे भारी आहे! =))

ऋचा's picture

15 Sep 2008 - 5:16 pm | ऋचा

लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना तेथे येती रोगी ना ना.
मोठे *ले जग भुले.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मनस्वी's picture

15 Sep 2008 - 5:19 pm | मनस्वी

-- मला पहा अन् फुलं वहा.
-- खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा.
-- नावडतीचं मीठ आळणी आणि आवडतीचा शें*ड गोड.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आजानुकर्ण's picture

15 Sep 2008 - 5:34 pm | आजानुकर्ण

जबरा म्हणी

आपला,
(हसरा) आजानुकर्ण

नंदन's picture

15 Sep 2008 - 5:45 pm | नंदन

१. गिरी गिरी गाच केला, मनात इला ताच केला
- काही झाले तरी आपले म्हणणे खरे करणे.

२. नकाय नकाय सून वाइन चाटी
- वाइन म्हणजे उखळासारखे घरात पुरलेले भांडे. आधी काही नको म्हणणारी सूनबाई मग मात्र भांडं चाटूनपुसून लख्ख करते.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 6:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

२. नकाय नकाय सून वाइन चाटी
- वाइन म्हणजे उखळासारखे घरात पुरलेले भांडे. आधी काही नको म्हणणारी सूनबाई मग मात्र भांडं चाटूनपुसून लख्ख करते.

वारुणीचं भांडं का? ;-)

नंदन's picture

15 Sep 2008 - 7:08 pm | नंदन

मग नकाय नकाय टून वाइन चाटी असा बदल करावा लागेल. (आमचा 'कंट्री' विनोद हो ;))

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 12:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... तुमचा कंट्री विनोद! :-D

यशोधरा's picture

15 Sep 2008 - 7:04 pm | यशोधरा

>>>नकाय नकाय सून वाइन चाटी

नंदन, मी ही म्हण लिहूक ईसारलाय! अशीही आसा,

नकाय नकाय, आणि पायलेचा खाय!

राहूल's picture

15 Sep 2008 - 7:13 pm | राहूल

- कशात काय अन् फाटक्यात पाय
- खुळ्याची चावडी अन् मीराबाईची मशीद (शंकर पाटलांच्या 'नाटक' या कथेतून)

आजानुकर्ण's picture

15 Sep 2008 - 7:28 pm | आजानुकर्ण

एक तंगडी आणि शंभर घोंगडी!

आपला,
(वादळाने लाईट गेल्यावर कुडकुडणारा) आजानुकर्ण

आपला तो मोबाईल दुसय्राचा तो पेजर..

घाटावरचे भट's picture

16 Sep 2008 - 5:19 am | घाटावरचे भट

हौसेचा पूर आणि हगायचा सुकाळ...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मनीषा's picture

16 Sep 2008 - 10:48 am | मनीषा

दगडा पेक्षा वीट मऊ
गाढवा पुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता
गाढवाला गुळाची चव काय
आवा चालली पंढररपुरा, वेशी पासून आली माघारा
पळसाला पाने तीनच
भित्या पाठी ब्र्ह्म्हराक्षस
लोका सांगे ब्र्ह्म्हज्ञान, आपण कोरडे पाषाण
दुरुन डोंगर साजरे
आडाण्याचा अडला गाडा, अन गावची वेस पाडा
अडला हरी, गाढवाचे पाय धरी
आधी होता वाघ्या, मग झाला वाघोबा-------त्याचा येळ्कोट राहीना , मूळ स्वभाव जाई ना
बाजारात तुरी, भट भटणीला मारी

मिसंदीप's picture

16 Sep 2008 - 11:17 am | मिसंदीप

मुंगीच्या मुतीला महापुर.
(तोडक्यात अर्थ -- म्हणजे एखादी गोष्ट चढवुन सांगणे)

प्रभाकर पेठकर's picture

16 Sep 2008 - 1:44 pm | प्रभाकर पेठकर

मुंगीला मुताचा पुर....

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2008 - 2:05 pm | बिपिन कार्यकर्ते

अजून काही...

०१. पादा, पण नांदा...
०२. निर्लज्जाच्या ढुंगणावर घातला पाला, तर तो म्हणतोय "गार लागतंय, आणखीन घाला"

बिपिन.

धमाल मुलगा's picture

16 Sep 2008 - 2:44 pm | धमाल मुलगा

माझ्या पणजीकडून ऐकलेली म्हणः
"आपलीच मोरी अन् मुतायची चोरी"

आणि आमच्या एका वयस्कर मित्राकडून ऐकलेली:
"हैस तरुन तोवर घे करुन"

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 5:13 pm | विसोबा खेचर

"हैस तरुन तोवर घे करुन"

मस्त! :)

आपला,
(तरून!) तात्या.

चतुरंग's picture

16 Sep 2008 - 8:46 pm | चतुरंग

'तरुन' शब्दावरती काय जबरा श्लेष झालाय! ;)

चतुरंग

नाखु's picture

16 Sep 2008 - 4:37 pm | नाखु

१.सरकारि कामाबाबत...
संडास मालकाचा रुबाब भंग्याचा.
२.सवलति मागणर्या स..
फुकट्चे खाई त्याला स्वस्त महाग काई ?

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

अनिरुध्द's picture

16 Sep 2008 - 6:33 pm | अनिरुध्द

१. भित्या पाठी ब्रम्ह राक्षस
२. हातच्या काकणाला आरसा कशाला
३. आयजीच्या जीवावर बायजी उधार
४. काखेत कळसा गावाला वळसा
५. बैल गेला झोपा केला
६. नावाजलेला गुरव आणि देवळातच *गला
७. नको नको आनि पायलीचं चाखो
८. आपलीच मांडी चोरटी नि दुस-याला म्हणते कार्टी
९. भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा
१०. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी.
११. भिका-याला ओकारी

डॉ.प्रसाद दाढे's picture

16 Sep 2008 - 9:26 pm | डॉ.प्रसाद दाढे

घरात नाही दाणा अन मला बाजीराव म्हणा
स॑लग्न म्हणः
'पेट मे॑ नहि॑ दाना पर हगनेका दीवाना !'
आमच्या माणदेशातली फेमस म्हणः
'वाळूत मुतल॑ फेस ना पाणी'

बहीणाबाईंच्या काही म्हणी...

शिदोळाले आला राग, मले म्हणा फन्या नाग (शिदोळ -- गांडूळ )

कर्‍याले गेली नवस, आज निघाली आवस

अभिज्ञ's picture

16 Sep 2008 - 9:54 pm | अभिज्ञ

ढवळ्यासंगे बांधला पवळ्या,वाण नाहि पण ढवळ्याच लागला. ;)

अभिज्ञ.

धमाल मुलगा's picture

17 Sep 2008 - 11:19 am | धमाल मुलगा

=))

खत्तर्रन्नाक्क!!!!!

मिसंदीप's picture

17 Sep 2008 - 10:59 am | मिसंदीप

निर्लज्जाच्या ढुंगणावर घातला पाला, तर तो म्हणतोय "गार लागतंय, आणखीन घाला"
जबरदस्त =))

श्रीयुत संतोष जोशी's picture

17 Sep 2008 - 12:06 pm | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
१) असतील शिते तर नाचतील भूते.
२) आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
३) अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

निसर्ग's picture

17 Sep 2008 - 4:50 pm | निसर्ग

आयजीच्या जीवावर बायजी उधार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार

--दुस~याच्या वस्तूवर मालकी हक्क दाखवणे.

" DON'T AIM THE TARGET...
....JUST ACHIVE IT "

सुचेल तसं's picture

17 Sep 2008 - 8:35 pm | सुचेल तसं

१) चार आण्याची कोंबडी आणि आठ आण्याचा मसाला.

२) काम ना धाम अन अंगाला घाम

३) जावयाचं पोर हरामखोर

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

लक्ष्मीकान्त's picture

18 Sep 2008 - 10:29 pm | लक्ष्मीकान्त

आपापाचा माल गपापा
भरवश्याच्या म्हशीला टोणगा
ना मामु से नकटा मामु कभीभी अच्चा,

केशवराव's picture

19 Sep 2008 - 7:20 pm | केशवराव

गाढवासमोर वाचली गिता. . . वाचणाराच गाढव होता !

गणा मास्तर's picture

19 Sep 2008 - 9:28 pm | गणा मास्तर

१.फ्री तिथ मी
२. फुकट तिथ आपट
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

नाटक्या's picture

20 Sep 2008 - 4:03 am | नाटक्या

म्हणायची..

हल्याच्या *डीला फोड झाला आणि चाटून चाटून मोठा केला..

- नाटक्या..

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2008 - 12:17 pm | प्रभाकर पेठकर

गुजराथीतही अशीच म्हण आहे.
'शेठनी गांडमां फुली थयी, ने पंपाळीने मोटी थयी.'

वृषाली's picture

20 Sep 2008 - 4:27 pm | वृषाली

पाहुणा गेला अन चहा केला

म्हशी मेल्या, चारा संपला अन हाती घोटाळा आला

मंत्र्याचे बिऱ्हाड दौऱ्यावर

आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज

गाढवापुढे वाचली गीता, वाचणाराच गाढव होता

काय द्या नी बोला

भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलांपाशी

घरोघरी फॅशनेबल पोरी

मरावे परी व्हीडिओकॅसेटरूपी उरावे

रिकामा मंत्री फीतींना कात्र्या लावी

निवडणूक सरो आणि मतदार मरो

कशात काय आणि खड्ड्यात पाय

वृषाली

निसर्ग's picture

22 Sep 2008 - 3:57 pm | निसर्ग

उघड्या जवळ नागडं गेलं अन थंडीन काकडून मेलं

" DON'T AIM THE TARGET...
....JUST ACHIVE IT "

आपला अभिजित's picture

22 Sep 2008 - 5:16 pm | आपला अभिजित

पादा पण नांदा!

ही पण एक भन्नाट!

पारिजातक's picture

22 Sep 2008 - 5:56 pm | पारिजातक

धू म्हटल की धुवयाच खाली काय लोम्बत ते नाही विचारायच !

खिशात नाही आणा अणि म्हणे मला बाजीराव म्हणा !

पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!