Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आपला अभिजित on Sat, 09/13/2008 - 19:39
  • Log in or register to post comments
  • 32233 views

प्रतिक्रिया

Submitted by धोंडोपंत on Sat, 09/13/2008 - 19:50

Permalink

ढुंगणाखाल

ढुंगणाखाली आरी आणि चांभार पोरांक मारी धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 09/13/2008 - 20:06

Permalink

मस्त आहे

मस्त आहे धागा! माझी आतेआजी अस्सल कोकणी म्हणी वापरायची, काही म्हणी लिहायलाही ऑकवर्ड वाटेल! मनाने जितकी प्रेमळ, तितकीच तिची जीभ कोकणी वळणाची होती, आणि ती वापरत असलेल्या म्हणी जरा अति अस्स्ल! त्यातल्या त्यात सोज्वळ म्हण आठवली की लिहिते! :D तिचे एक नेहमीचे वाक्य होते, एखाद्याच्या चांगल्या दिवसांत सगळेच कसे सहाय्यकारी होतात अन् वाईट दिवसांत कोणीच आसपास फिरकत देखील नाही, हे सांगताना ती म्हणत असे, "रंगलेल्या ओठांचे मुके घेऊक राजापासून खोतापर्यंत सगळेच धावतत.." ही म्हण नव्हे, पण असेच आठवले म्हणून लिहिले..
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Sat, 09/13/2008 - 20:18

Permalink

मु. पो.

मु. पो. बोंबीलवाडी मधे वापररलेली एक म्हण... "घरची करते देवा देवा, अन बाहेरचीला चोळी शिवा"
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 09/14/2008 - 10:15

In reply to मु. पो. by अनामिक

Permalink

:)

"घरची करते देवा देवा, अन बाहेरचीला चोळी शिवा" ही म्हण क्लासच आहे. कोकणातलीच आहे. आमच्या सिंधुदुर्गात हमखास वापरतात... :) दादा गातो अन् *वडा ऐकतो! कामे थकली सारी अन् अडकित्त्यात सुपारी! :) (सर्व कामे तशीच टाकून नुसतं पायावर पाय टाकून बसणार्‍याकरता ही म्हण आमच्या देवगडात वापरतात!) :) आपला, तात्या देवगडकर.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 09/16/2008 - 14:18

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

अशाच काही म्हणी

माझ्या आजोबांच्या तोंडातील काही म्हणी. १. उठत नाही तर ओढून किती लांब करायचे.(अर्थ: एखाद्याला मनातूनच काम करायची ईच्छा नसेल तर त्याला किती भरीस पाडायचे) २. खाऊन खग्रास हागून सत्यानाश.(याचा अर्थ नेमका काय ते माहीत नाही) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Tue, 09/16/2008 - 22:16

In reply to अशाच काही म्हणी by llपुण्याचे पेशवेll

Permalink

खाऊन खग्रास हागून सत्यानाश.(याचा अर्थ नेमका काय ते माहीत नाही)

अरे माझ्या आवडीची म्हण आहे! म्हणजे, खा-खा खायचं नि मैल्याच्या टाक्या भरायच्या. म्हणजे थोडक्यात, खायला काळ नि भुईला भार. निरुद्योगी लोकांबद्दल ती वापरतात. उपयोग काय अशा निरर्थक आयुष्याचा?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 09/17/2008 - 17:01

In reply to खाऊन खग्रास हागून सत्यानाश.(याचा अर्थ नेमका काय ते माहीत नाही) by आपला अभिजित

Permalink

नाही.

नाही अभिजित, खग्रास म्हणजे संपूर्ण. (ख= आकाश, ग्रास = ग्रासणे. आकाशालाही ग्रासून टाकणारे. म्हणजेच 'संपूर्ण' कुठलाही अंश न उरणारे) म्हणजे अन्न खाऊन संपूर्ण संपविले आणि हगून त्याचा सत्यानाश केला. अर्थात अंगी लागले नाही. म्हणजे एखादी गोष्ट नुसतीच संपविली पण ते संपविणे सत्कारणी लागले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on गुरुवार, 09/18/2008 - 19:22

In reply to नाही. by प्रभाकर पेठकर

Permalink

`खग्रास'चं

स्पष्टीकरण मी केलं नाही. पण अर्थ तोच होता ना? खा-खा खायचं आणि त्याचा उपयोग काही करायचा नाही, हाच मथितार्थ आहे ना! पण तुम्ही अधिक योग्य स्पष्ट केलं. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 09/13/2008 - 20:23

Permalink

चींधी

http://vipravani.wordpress.com/ ढुंगणावर नाही चींधी आणि ह्याना हवी सोन्याची बिंदी वि.प्र.
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Sat, 09/13/2008 - 20:26

Permalink

कढी

"गां* धुवून कढी नि उरलेल्याची वडी' ही म्हण माझे आजोबा एका शेजाऱ्यांबाबत नेहमी वापरायचे. म्हणजे कंजूषपणाचा कळस. मला ही म्हण प्रचंड आवडायची, आवडते.
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Sat, 09/13/2008 - 21:45

Permalink

आमच्या वाडीत

आमच्या वाडीत म्हणतात "घेण ना देण आन कंदील लावुन येण" ते नाना चेंगट करतय बघा असं. (अवांतर नाना ह घ्या) - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sun, 09/14/2008 - 17:25

In reply to आमच्या वाडीत by गणा मास्तर

Permalink

अव गणा

अव गणा मास्तर नानाच लागतोय ना तुम्हाला? मग ? 'निरीचा घाम चिरीला' विसरु नका नाना
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत on Sat, 09/13/2008 - 21:59

Permalink

घरचं झालं

घरचं झालं थोडं आणि व्याह्यांनि धाडलं घोडं !
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sat, 09/13/2008 - 22:00

Permalink

चोरून

चोरून भाकरी दिली तर बोंबलून तूप मागणं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 09/13/2008 - 22:08

Permalink

ह्या काही

ह्या काही आज्जीच्या आठवलेल्या म्हणी - प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो... चाय थय न्याय केला तुला, झाला माका बारीक नळी, चेपून भरी (खादाड माणसाच्या आहाराचं वर्णन ) फिरुन गेलो गाव, आणि काणेकराचा नाव जोवेरी पैसा तोवेरी बैसा दमास मान आणि शक्तीस भोजन स्वगतः हुश्श! आठवल्या साध्या म्हणी!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 09/14/2008 - 11:19

In reply to ह्या काही by यशोधरा

Permalink

अर्थ?

यशोधरा, प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो... चाय थय न्याय या दोन्हींचा अर्थ नाही कळला, सांगाल का? (शहरी) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 09/14/2008 - 18:15

In reply to अर्थ? by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आदिती,मी

आदिती, मी प्रयत्न करते. प्रीतीचो मोगो, कढीयेच्या निमतान माझ्याकडे ये गो... ह्या म्हणीचा नेमका अर्थ आता आठवत नाही; पण, प्रीतीचो मोगो म्हणजे आवडती व्यक्ती, तिच्याशी घसट वाढवायला काहीतरी निमित्त (कढी मागायच निमित्त करुन ये) असं काहीतरी असाव... चाय थय न्याय चाय म्हणजे चहा. जिथे, ज्याच्याकडून चहा मिळेल, त्याच्या बाजूने न्याय दिला जाईल - ज्या व्यक्तीकडून फायदा, तिला झुकत माप.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 09/14/2008 - 19:30

In reply to आदिती,मी by यशोधरा

Permalink

चाय थय

चाय थय न्याय म्हणजे सरशी तिथे पारशीच की! धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Mon, 09/15/2008 - 21:56

In reply to चाय थय by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

"चाय थय

"चाय थय न्याय म्हणजे सरशी तिथे पारशीच की" सरशि तिथे पारशिचा अर्थ थोडा वेगळा आहे अस वाटत.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 09/15/2008 - 11:04

In reply to ह्या काही by यशोधरा

Permalink

फिरुन गेलो

फिरुन गेलो गाव, आणि काणेकराचा नाव =)) ही आणखी एक म्हण आपले ठेवायचे झाकुन आणि दुसर्‍याचे बघायचे वाकुन पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by केशवराव on Sat, 09/13/2008 - 22:17

Permalink

ह्या घ्या आणखी . . . .!

१] ' मी नाय त्यातली , म्हणे कडी लाव आतली ' २] 'दोन पैशांचा गुळ आणला, *ड फुटेस्तो खाल्ला , उरलेला गाईला घातला ' ३] 'नाजूक जागी दूखणे ,आणि जावई डॉक्टर.'
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 09/13/2008 - 22:37

Permalink

माझी शिवामूठ घ्या.

एका गोवेकरीण आज्जीकडून ऐकलेली कोकणी म्हण... मीठ लाया माका खाया......आता ह्याचा अर्थ विसरलो. अजून एक खास म्हण ऐकलेय गावाकडली.... लाखाशिवाय बात नाही आणि भजाशिवाय खात नाही....ही म्हण बढाईखोर माणसासाठी वापरतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत on Sun, 09/14/2008 - 00:01

Permalink

अजून काही

१. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, २. मुकीला धरली, हाक ना बोंब!
  • Log in or register to post comments

Submitted by रवि on Sun, 09/14/2008 - 00:39

Permalink

सध्या दोन ......

१) ईळं माळं घरी आन दिवा लावुन दळन करी २) रेडिओ विकुन मसाला आनाला (मसाला म्हनजे सेल ) रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on Sun, 09/14/2008 - 07:04

Permalink

अजून एक

१---अंगात नाही करणी नि मला म्हणा तरणी
  • Log in or register to post comments

Submitted by राहूल on Sun, 09/14/2008 - 08:10

Permalink

अजून

१. सरकारी काम, आन् धा वर्सं थांब. २. आपलंच घर, हागून भर.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sun, 09/14/2008 - 08:35

Permalink

म्हण

शेंबूड आपल्या नाकाला अन ज्ञान शिकवी लोकाला... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/14/2008 - 08:51

Permalink

रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी

१.आपण शेण खायचं नि दुसर्‍याचं तोंड हुंगायचं २.बुगड्या गेल्या अन् भोके राहिली.
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Sun, 09/14/2008 - 08:51

Permalink

रिकामा

रिकामा सुतार, कुल्ले ताशी आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
  • Log in or register to post comments

Submitted by भास्कर केन्डे on गुरुवार, 09/18/2008 - 22:04

In reply to रिकामा by धोंडोपंत

Permalink

आणखी एक सुतार

रिकामा सुतार काय करतो बायकोच्या *र्‍या तासतो (तासणे - वाकसीने छिलने... वाकस-आडव्या पात्याची कुर्‍हाड)
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Sun, 09/14/2008 - 08:52

Permalink

आगासली ती

आगासली ती मागासली अन पाठसून इली ती गर्वार रवली आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sun, 09/14/2008 - 08:59

Permalink

तदमाताय

खडुस लोकांनी काढलेल्या म्हणी वाटतायत. :-) म्हणजे बहुसंख्य म्हणी ह्या फक्त दुसर्‍याची "काढायची" / नावेच ठेवायची म्हणून केल्यासारख्या वाटत आहेत. असो मजा येते आहे. यातल्या किती म्हणी "विशिष्ट भागातील लोकांनीच" बनवल्या असतील बरे :?
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर on Sun, 09/14/2008 - 11:13

Permalink

आणखी काही

१. कुनाला कशाचं तर गाढवाला बुडख्याचं... (पहा - चित्रपट - दोघात तिसरा, आता सगळं विसरा) २. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं बघायचं वाकून.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 09/14/2008 - 11:14

In reply to आणखी काही by पुष्कर

Permalink

स्वतःचं

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं बघायचं वाकून. क्लास! :) आपला, (नसती झेंगटं वाकुन वाकुन बघणारा!) तात्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिप्रा on Sun, 09/14/2008 - 11:19

Permalink

ढवळ्याशेज

ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला वाण नाहि पण गुण लागला.. पुणेरि म्हण : वाण नाहि पण घाण लागली करुन करुन भागली अन देवपुजेला लागली... लाज नाही मना अन कोणी काहि म्हणा... लोका सांगे ब्रम्ह ज्ञान स्वतः कोरडा पाषाण.. जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 09/14/2008 - 11:33

Permalink

चनं

http://vipravani.wordpress.com/ कोंबडीने खाल्ल चनं आणि हगल वाटानं अगदी रोज येणारा॑ अनुभव विनायक
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 09/14/2008 - 15:24

Permalink

काही म्हणी....

नाकपुडी एवढ घर आणि म्हणे किर्तन कर... हौशीने केला वर, त्याला दिवसा खोकला अन रात्री ज्वर... सतरा नेसली लुगडे तरी भागाबाईचे कुल्ले उघडे..
  • Log in or register to post comments

Submitted by वेलदोडा on Sun, 09/14/2008 - 15:28

Permalink

तिन तिगाडा

तिन तिगाडा काम बिघाडा
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sun, 09/14/2008 - 17:03

Permalink

हाताला

हाताला झाला माज, आन ढुंगनाला आली खाज... भादव्यातल कुत्र आन पाट्लाचा पुत्र... *डीला पहिजे गाडी, गहान पड्ली माडी.. खांद्यावर घेत्ला, कानात *तला... बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी..
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Sun, 09/14/2008 - 18:49

Permalink

बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी..

बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी.. ही काही म्हण नाही बरं का शैलेंद्र साहेब! बाकीच्या छान आहेत. `उंटाच्या **चा मुका घेणं' ही म्हण कम वाक्प्रचार मला भयंकर आवडतो. `बाजारात तुरी नि भट भटणीला मारी' ही पण भारी आहे. `**णाखाली आरी नि चांभार पोरं मारी' ही म्हण पण तशीच आहे, पण तिचा अर्थ खूपच वेगळा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Sun, 09/14/2008 - 19:15

Permalink

बीडकडल्या म्हणी:-

१.आलं मनाला तर ग्येलं शेनाला, नाय तर टोपलं टाकुन बसलं उनाला. (लहरी माणसाबद्दल) २. जेवायला आदि, झोपायला मदी अन कामाला कदि मंदी. (संधीसाधु,आळशी माण्साबद्दल) ३. वावरात न्हाइ झाड अन म्हने येरंडाला आलाय पाड. (खोटारडे पनची हद्द दाखवण्यासाठी.) ४.करुन ग्येला सारा गाव अन दप्तरी लागलं येड्याचं नाव. (एकाचं खापर दुसर्‍यावर.) ५. नया मुल्ला ;अल्ला अल्ला. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Mon, 09/15/2008 - 10:20

In reply to बीडकडल्या म्हणी:- by मन

Permalink

जेवायला आदि, झोपायला मदी अन कामाला कदि मंदी.

जेवायला आदि, झोपायला मदी अन कामाला कदि मंदी. ही म्हण जबरा आहे. मला पण आवडायची, आवडते. आलं मनाला तर ग्येलं शेनाला, नाय तर टोपलं टाकुन बसलं उनाला. वावरात न्हाइ झाड अन म्हने येरंडाला आलाय पाड. या म्हणी पहिल्यांदाच ऐकल्या. भन्नाट आहेत!
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sun, 09/14/2008 - 21:57

Permalink

"बायको

"बायको जाता माहेरी , काम करे पितांबरी.. ही काही म्हण नाही बरं का शैलेंद्र साहेब!" हे जाहिरातितील वाक्य आहे, पण आमचे काहि मित्र ते म्हणीसारखे वापरतात, अर्थ तुम्ही समजुन घ्या...
  • Log in or register to post comments

Submitted by डोमकावळा on Mon, 09/15/2008 - 10:59

Permalink

छान

छान धागा... यापुर्वी एक असाच धागा इथे पहायला मिळेल आयडिया केली आणि *डीत गेली ह्त्यार भारी तर गिर्‍हाइक दारी ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Mon, 09/15/2008 - 11:12

Permalink

मुकाट आपल काम करा की राव!

पाणी टाक सांगीतलं की पाणी टाकावं, लोंबतय काय म्हणून विचारू नाही. हगत्या लाज कां बघत्या लाज?
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Mon, 09/15/2008 - 22:22

In reply to मुकाट आपल काम करा की राव! by अरुण मनोहर

Permalink

अशीच एक

अशीच एक म्हण आई म्हणायची.. पाय धू म्हटलं की पाय धुवायचे, साखळ्या कितीच्या विचारायचं नाहि! :)
  • Log in or register to post comments

Submitted by भास्कर केन्डे on गुरुवार, 09/18/2008 - 22:08

In reply to मुकाट आपल काम करा की राव! by अरुण मनोहर

Permalink

हगणार्‍यानं न्हाई तर बगनार्‍यानं लाजावं

हगणार्‍यानं न्हाई तर बगनार्‍यानं लाजावं
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Mon, 09/15/2008 - 12:45

Permalink

आणिक ५

* आपल्या गावात बळी अन दुसर्‍याच्या गावात गाढवं वळी. * खाली मुंडी अन पाताळ धुन्डी * अर्थ करी अनर्थ * घरात नाही दाणा अन मला बाजीराव म्हणा * जेणु काम तेणु थाय, बिजा करे सो गोता खाय
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 09/16/2008 - 21:13

In reply to आणिक ५ by अभिरत भिरभि-या

Permalink

आमचं इंन्व्हेंशन

* बडी बडी बाते, अन् वडापाव खाते.... * मनी ना घ्यानी ... आलं कानी -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Mon, 09/15/2008 - 17:05

Permalink

* आपल्या गावात बळी अन दुसर्‍याच्या गावात गाढवं वळी.

* आपल्या गावात बळी अन दुसर्‍याच्या गावात गाढवं वळी. हे भारी आहे! =))
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com