✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

`म्हणी' मॅटर्स!

आ
आपला अभिजित यांनी
Sat, 09/13/2008 - 19:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32232 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

लाकडाच्या

ऋचा
Mon, 09/15/2008 - 17:16 नवीन
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना तेथे येती रोगी ना ना. मोठे *ले जग भुले. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

+ ३

मनस्वी
Mon, 09/15/2008 - 17:19 नवीन
-- मला पहा अन् फुलं वहा. -- खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. -- नावडतीचं मीठ आळणी आणि आवडतीचा शें*ड गोड. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

हा हा

आजानुकर्ण
Mon, 09/15/2008 - 17:34 नवीन
जबरा म्हणी आपला, (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

मालवणी

नंदन
Mon, 09/15/2008 - 17:45 नवीन
१. गिरी गिरी गाच केला, मनात इला ताच केला - काही झाले तरी आपले म्हणणे खरे करणे. २. नकाय नकाय सून वाइन चाटी - वाइन म्हणजे उखळासारखे घरात पुरलेले भांडे. आधी काही नको म्हणणारी सूनबाई मग मात्र भांडं चाटूनपुसून लख्ख करते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

२. नकाय

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/15/2008 - 18:53 नवीन
२. नकाय नकाय सून वाइन चाटी - वाइन म्हणजे उखळासारखे घरात पुरलेले भांडे. आधी काही नको म्हणणारी सूनबाई मग मात्र भांडं चाटूनपुसून लख्ख करते. वारुणीचं भांडं का? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

:)

नंदन
Mon, 09/15/2008 - 19:08 नवीन
मग नकाय नकाय टून वाइन चाटी असा बदल करावा लागेल. (आमचा 'कंट्री' विनोद हो ;))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आवडला हो ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/16/2008 - 12:03 नवीन
... तुमचा कंट्री विनोद! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

>>>नकाय नकाय

यशोधरा
Mon, 09/15/2008 - 19:04 नवीन
>>>नकाय नकाय सून वाइन चाटी नंदन, मी ही म्हण लिहूक ईसारलाय! अशीही आसा, नकाय नकाय, आणि पायलेचा खाय!
  • Log in or register to post comments

अजून

राहूल
Mon, 09/15/2008 - 19:13 नवीन
- कशात काय अन् फाटक्यात पाय - खुळ्याची चावडी अन् मीराबाईची मशीद (शंकर पाटलांच्या 'नाटक' या कथेतून)
  • Log in or register to post comments

आमची पण एक

आजानुकर्ण
Mon, 09/15/2008 - 19:28 नवीन
एक तंगडी आणि शंभर घोंगडी! आपला, (वादळाने लाईट गेल्यावर कुडकुडणारा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

आपला तो मोबाईल दुसय्राचा तो पेजर...

बन्ड्या
Tue, 09/16/2008 - 04:54 नवीन
आपला तो मोबाईल दुसय्राचा तो पेजर..
  • Log in or register to post comments

हौसेचा पूर

घाटावरचे भट
Tue, 09/16/2008 - 05:19 नवीन
हौसेचा पूर आणि हगायचा सुकाळ... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

म्हणी ..

मनीषा
Tue, 09/16/2008 - 10:48 नवीन
दगडा पेक्षा वीट मऊ गाढवा पुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता गाढवाला गुळाची चव काय आवा चालली पंढररपुरा, वेशी पासून आली माघारा पळसाला पाने तीनच भित्या पाठी ब्र्ह्म्हराक्षस लोका सांगे ब्र्ह्म्हज्ञान, आपण कोरडे पाषाण दुरुन डोंगर साजरे आडाण्याचा अडला गाडा, अन गावची वेस पाडा अडला हरी, गाढवाचे पाय धरी आधी होता वाघ्या, मग झाला वाघोबा-------त्याचा येळ्कोट राहीना , मूळ स्वभाव जाई ना बाजारात तुरी, भट भटणीला मारी
  • Log in or register to post comments

आणखी एक

मिसंदीप
Tue, 09/16/2008 - 11:17 नवीन
मुंगीच्या मुतीला महापुर. (तोडक्यात अर्थ -- म्हणजे एखादी गोष्ट चढवुन सांगणे)
  • Log in or register to post comments

अशीही म्हण आहे.

प्रभाकर पेठकर
Tue, 09/16/2008 - 13:44 नवीन
मुंगीला मुताचा पुर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसंदीप

अजून

बिपिन कार्यकर्ते
Tue, 09/16/2008 - 14:05 नवीन
अजून काही... ०१. पादा, पण नांदा... ०२. निर्लज्जाच्या ढुंगणावर घातला पाला, तर तो म्हणतोय "गार लागतंय, आणखीन घाला" बिपिन.
  • Log in or register to post comments

माझाही हातभार

धमाल मुलगा
Tue, 09/16/2008 - 14:44 नवीन
माझ्या पणजीकडून ऐकलेली म्हणः "आपलीच मोरी अन् मुतायची चोरी" आणि आमच्या एका वयस्कर मित्राकडून ऐकलेली: "हैस तरुन तोवर घे करुन"
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Tue, 09/16/2008 - 17:13 नवीन
"हैस तरुन तोवर घे करुन" मस्त! :) आपला, (तरून!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मस्त!

चतुरंग
Tue, 09/16/2008 - 20:46 नवीन
'तरुन' शब्दावरती काय जबरा श्लेष झालाय! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आणखी काही...

नाखु
Tue, 09/16/2008 - 16:37 नवीन
१.सरकारि कामाबाबत... संडास मालकाचा रुबाब भंग्याचा. २.सवलति मागणर्या स.. फुकट्चे खाई त्याला स्वस्त महाग काई ? मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments

ह्या घ्या आणखी म्हणी

अनिरुध्द
Tue, 09/16/2008 - 18:33 नवीन
१. भित्या पाठी ब्रम्ह राक्षस २. हातच्या काकणाला आरसा कशाला ३. आयजीच्या जीवावर बायजी उधार ४. काखेत कळसा गावाला वळसा ५. बैल गेला झोपा केला ६. नावाजलेला गुरव आणि देवळातच *गला ७. नको नको आनि पायलीचं चाखो ८. आपलीच मांडी चोरटी नि दुस-याला म्हणते कार्टी ९. भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा १०. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. ११. भिका-याला ओकारी
  • Log in or register to post comments

:)

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 09/16/2008 - 21:26 नवीन
घरात नाही दाणा अन मला बाजीराव म्हणा स॑लग्न म्हणः 'पेट मे॑ नहि॑ दाना पर हगनेका दीवाना !' आमच्या माणदेशातली फेमस म्हणः 'वाळूत मुतल॑ फेस ना पाणी'
  • Log in or register to post comments

बहीणाबाईंच्या काही म्हणी...

बोका
Tue, 09/16/2008 - 21:42 नवीन
बहीणाबाईंच्या काही म्हणी... शिदोळाले आला राग, मले म्हणा फन्या नाग (शिदोळ -- गांडूळ ) कर्‍याले गेली नवस, आज निघाली आवस
  • Log in or register to post comments

आमची कॉलेजातील एक म्हण.

अभिज्ञ
Tue, 09/16/2008 - 21:54 नवीन
ढवळ्यासंगे बांधला पवळ्या,वाण नाहि पण ढवळ्याच लागला. ;) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

अग्गायायायाया.....

धमाल मुलगा
Wed, 09/17/2008 - 11:19 नवीन
=)) खत्तर्रन्नाक्क!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

जबरदस्त

मिसंदीप
Wed, 09/17/2008 - 10:59 नवीन
निर्लज्जाच्या ढुंगणावर घातला पाला, तर तो म्हणतोय "गार लागतंय, आणखीन घाला" जबरदस्त =))
  • Log in or register to post comments

काही नविन

श्रीयुत संतोष जोशी
Wed, 09/17/2008 - 12:06 नवीन
नमस्कार, १) असतील शिते तर नाचतील भूते. २) आले मी नांदायला, मडके नाही रांधायला. ३) अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

आणखी..

निसर्ग
Wed, 09/17/2008 - 16:50 नवीन
आयजीच्या जीवावर बायजी उधार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार --दुस~याच्या वस्तूवर मालकी हक्क दाखवणे. " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "
  • Log in or register to post comments

१) चार

सुचेल तसं
Wed, 09/17/2008 - 20:35 नवीन
१) चार आण्याची कोंबडी आणि आठ आण्याचा मसाला. २) काम ना धाम अन अंगाला घाम ३) जावयाचं पोर हरामखोर Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

आपापाचा

लक्ष्मीकान्त
गुरुवार, 09/18/2008 - 22:29 नवीन
आपापाचा माल गपापा भरवश्याच्या म्हशीला टोणगा ना मामु से नकटा मामु कभीभी अच्चा,
  • Log in or register to post comments

गाढवासमोर . . . . .

केशवराव
Fri, 09/19/2008 - 19:20 नवीन
गाढवासमोर वाचली गिता. . . वाचणाराच गाढव होता !
  • Log in or register to post comments

म्हणी

गणा मास्तर
Fri, 09/19/2008 - 21:28 नवीन
१.फ्री तिथ मी २. फुकट तिथ आपट - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

माझी आजी ..

नाटक्या
Sat, 09/20/2008 - 04:03 नवीन
म्हणायची.. हल्याच्या *डीला फोड झाला आणि चाटून चाटून मोठा केला.. - नाटक्या..
  • Log in or register to post comments

गुजराथी..

प्रभाकर पेठकर
Sat, 09/20/2008 - 12:17 नवीन
गुजराथीतही अशीच म्हण आहे. 'शेठनी गांडमां फुली थयी, ने पंपाळीने मोटी थयी.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

पाहुणा

वृषाली
Sat, 09/20/2008 - 16:27 नवीन
पाहुणा गेला अन चहा केला म्हशी मेल्या, चारा संपला अन हाती घोटाळा आला मंत्र्याचे बिऱ्हाड दौऱ्यावर आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज गाढवापुढे वाचली गीता, वाचणाराच गाढव होता काय द्या नी बोला भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलांपाशी घरोघरी फॅशनेबल पोरी मरावे परी व्हीडिओकॅसेटरूपी उरावे रिकामा मंत्री फीतींना कात्र्या लावी निवडणूक सरो आणि मतदार मरो कशात काय आणि खड्ड्यात पाय वृषाली
  • Log in or register to post comments

उघड्या जवळ ..

निसर्ग
Mon, 09/22/2008 - 15:57 नवीन
उघड्या जवळ नागडं गेलं अन थंडीन काकडून मेलं " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "
  • Log in or register to post comments

पादा पण नांदा!

आपला अभिजित
Mon, 09/22/2008 - 17:16 नवीन
पादा पण नांदा! ही पण एक भन्नाट!
  • Log in or register to post comments

धू म्हटल

पारिजातक
Mon, 09/22/2008 - 17:56 नवीन
धू म्हटल की धुवयाच खाली काय लोम्बत ते नाही विचारायच ! खिशात नाही आणा अणि म्हणे मला बाजीराव म्हणा ! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा