जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 10:10 am

चार शब्दांचा सहारा होत नाही
तेवढ्यावरती गुजारा होत नाही

खूप काही लागते जगण्यास येथे
प्रेम काही ऊनवारा होत नाही

गगनचुंबी हे तुझे आहे शहर पण
चांदतार्यांचा नजारा होत नाही

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन
रोज आताशा इशारा होत नाही

टाळले मजला बरे केलेस तूही
(दु:ख दु:खावर उतारा होत नाही)

मी मनाला शिस्त आहे लावलेली
फारसा आता पसारा होत नाही

डॉ.सुनील अहिरराव

gajhalgazalमराठी गझलगझल

प्रतिक्रिया

रातराणी's picture

23 Dec 2015 - 10:21 am | रातराणी

मस्त! आवडली!

तुमच्या कविता आवडतात.

चांदणे संदीप's picture

23 Dec 2015 - 10:28 am | चांदणे संदीप

सुरेख गजल! एकेक शेर असा वजनदार, अर्थपूर्ण!
क्या बात है! दिलखुश!

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन
रोज आताशा इशारा होत नाही

___/\___ कहर!

Sandy

अत्रुप्त आत्मा's picture

23 Dec 2015 - 10:45 am | अत्रुप्त आत्मा

@सुरेख गजल! एकेक शेर असा वजनदार, अर्थपूर्ण!
क्या बात है! दिलखुश! :- +१ ह्येच बोलायलो. खटक्यावर बोट!

प्रचेतस's picture

23 Dec 2015 - 10:29 am | प्रचेतस

सुंदर.

अनुप ढेरे's picture

23 Dec 2015 - 11:22 am | अनुप ढेरे

मस्तं!

बोका-ए-आझम's picture

23 Dec 2015 - 11:49 am | बोका-ए-आझम

नारायण सुर्व्यांच्या माझे विद्यापीठ या कवितेतील भाकरीच्या चंद्राची आठवण झाली.

शिवाय का कोण जाणे, उगीचच थोडी "कैसी चली है अब के हवा तेरे शहेरमें" या गझलमधल्या केवळ मूडची आठवणही झाली.

संदीप डांगे's picture

23 Dec 2015 - 12:19 pm | संदीप डांगे

दोघांशी सहमत....

बस वजन... वजन.... वजन.... !!!

चार शब्दांनीच येथे तो गुजारा होत नाही
चार शब्दांचाच येथे तो सहारा होत नाही

खूप काही लागते रे नुसत्या जगण्यास येथे
प्रेम हा नुसता इथे तो ऊनवारा होत नाही

गगनचुंबी शहर तुझे आहे येथे पसरले पण
चांद आणि चादण्यांचा तो नजारा होत नाही

जिंदगी नुसतीच येथे लुकलुके दूरातुनि
रोजचा आव्हानभरला तो इशारा होत नाही

मी मनाला शिकस्तीने शिस्त आहे लावली
फारसा माझा आताशा तो पसारा होत नाही

निनाव's picture

23 Dec 2015 - 6:48 pm | निनाव

जब्बर्दस्त सुन्दर .. खूप आवड्ली.

DEADPOOL's picture

23 Dec 2015 - 7:01 pm | DEADPOOL

अत्यंत सुंदर!

सुमीत भातखंडे's picture

23 Dec 2015 - 7:11 pm | सुमीत भातखंडे

सुंदर गझल

एक एकटा एकटाच's picture

23 Dec 2015 - 9:16 pm | एक एकटा एकटाच

Class!!!!!!!!!!!!

कविता१९७८'s picture

24 Dec 2015 - 7:27 am | कविता१९७८

मस्तच

@रातराणी, गवि, चंदने संदीप,संदीप डांगे ,सॅंडी,आत्मबंध,प्रचेतस,कविता १९७८,अनुप ढेरे, deadpool,बोका ए आझम
सुमीत भातखंडे,निनाव,एक एकटा एकटाच
सर्व मित्रांचे मनापासून आभार !

यशोधरा's picture

26 Dec 2015 - 1:09 pm | यशोधरा

गगनचुंबी हे तुझे आहे शहर पण
चांदतार्‍यांचा नजारा होत नाही

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन
रोज आताशा इशारा होत नाही

नावातकायआहे's picture

26 Dec 2015 - 1:28 pm | नावातकायआहे

मी मनाला शिस्त आहे लावलेली
फारसा आता पसारा होत नाही.....

मी मनाला शिकस्तीने शिस्त आहे लावली
फारसा माझा आताशा तो पसारा होत नाही

डॉ नि गवि ...दंडवत!

पद्मावति's picture

26 Dec 2015 - 4:01 pm | पद्मावति

मस्तं! आवडली.

चाणक्य's picture

27 Dec 2015 - 2:51 pm | चाणक्य

.