चित्रा

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
2 Nov 2015 - 9:43 pm

लेकीच पहिलं बाळंतपण! आपल्याच घरी व्हावं म्हणून आईने खूप प्रयत्न केलेले पण लेकीच्या सासरच्यांनी, 'कशाला त्या गावखेड्यात? तित काय येळला सोयी-सुविधा हायेत, का रातीअंधारचं गाडी-घोडा आहे? शिवाय एकली आई आन म्हातारी आज्जी. त्यांच त्यान्ला तरी उरकतयं का ह्ये परपंचाच ऱ्हाटगाडग?' अशा उलटतपासण्या करून बाळंतपण कुठे व्हाव हा विषय संपवून टाकला!

मग नातीने चिमुकले पाऊल सा-यांच्याच जगात ठेवल्यावर लेकीच्या आग्रहाखातर आठ-पंधरा दिवसांसाठी आई गावातल्या वावरातली विळा-खुरपी तिथेच सोडून शहरातल्या इमारतींच्या जंगलात आली. पहिल्यांदाच एकटी आलेली! रस्ते चुकायची भानगड विशेष झाली नाही कारण बसमधून जिथं उतरली तिथ जावई वैतागलेल्या चेह-याने का होईना, घ्यायला आलाच होता. तिथून घरी पोहोचेपर्यंत तीनदा तरी, "तुम्ही रस्त्याच्या ह्या बाजूला बसलायं आन मी चारदा पलीकडन एक-दोन चौक फिरून आलोय", हे जावयाचे बोल तिला ऐकावे लागले. जावयाच्या गाडीवर बसून घराकडे धावत असताना तिची नजर त्याच्या गाडीच्याही पुढे लेक आणि नातीच्या दृश्याकडे धावत होती.

घर आल तस आई नातीला विसरून लेकीच्याच गालावरनं बोटं फिरवून कडाकडा मोडू लागली. मग लेकीने नातीला समोर धरल्यावर तिच्यातल्या आज्जीला आलेलं आनंदाच भरतं डोळ्यांतून पदरावर विसावल! "आग्ग बाय! चित्रावानी दिसती पोरगी!" अस काहीसं गलबलून बोलली.

सासरच्या लोकांना सूनेची आई दिसलीच नव्हती. बाळाच्या धुवून वाळवलेल्या लंगोटांच बोचक खोलीतल्या खाटेवर टाकताना सासू, 'आला व्हय! कधी आला, दिसलाच न्हाय तुम्ही...' असं तुटक, तोंडातल्या तोंडात बोलत दुस-या खोलीत गडप झाली. लेकीच्या हालचाली बाळंतपणामुळे जरा मंदावल्या असल्याने ती स्वस्थ बसलेली होती पण तिची भिरभिर नजर नव-याच्या भाच्यांना, आईसाठी पाणी आणि चहा आणायला सांगण्यासाठी कासावीस झाली होती. आईच्या, 'मला नग चहा, राहूदे ग' च्या पालुपदापुढे तिचा, 'थांब ग, आता चहाचाच टाईम झालाय ग, तिकडं किचनमध्ये करतच असतील, आणतेत ते' असा हट्ट चालू होता.

बाळ अंगावर दूध पित नव्हतं म्हणून बाळासाठी दूध गरम करणे, बाटलीत भरून पाजणे, बाटली उकळत्या पाण्यातून धुणे इत्यादी कामे आपसूकच आईला मिळाली! त्यासाठी तिने घरात जो दिसेल आणि बोलेल त्याच्याकडून स्वयंपाकाच्या गॅसचा धडा गिरवला. बाळाला न्हाऊ-माखू घालून येणा-या जाणा-या पाहुण्यांना दाखवायला तयार करणे ही तिची पुढची जबाबदारी होती.

आठव्या दिवशी बाळाची मोठी आत्या बाळाकडे आली आणि किंचाळलीच, 'असं काय मलूल, मुडदूस झाल्यावनी दिसतय बाळ!' धावाधाव झाली. बाळ आयसीयूमध्ये, लेक आयसीयूबाहेर आणि आई लेकीच्या सासरच्यांमध्ये एकटीच!

चार दिवस झाले तरी बाळ दवाखान्यातून घरी कसं आल नाही अस लेकीच्या सासूकडे विचारताच तिने चांगलाच सूड उगवला. "कशाला आलीस ग भवाने हिथ? माया-लेकी नुस्तं गुलूगुलू बोलत बसायला? आमचं लेकरू तुज्यामुळच गेलं दवाखान्यात!" अशा शब्दांनी उत्तरादाखल तिला बोलणीच मिळाली. जाते म्हणाव तर लेकीने हात धरलेला. कशीबशी बाळ घरी येईपर्यंत थांबली अन बाळासाठी दोनशे रू. लेकीकडे देऊन ती कष्टी झालेली आई गावाच्या एसटीत बसली.

गाव येईपर्यंत डोळ्यातल्या धारा अविरत वाहत चाललेल्या. बाळाला काय झालेल? आपल्याला कुणी सांगितलंही नाही. नीट बघतील ना ती लोकं बाळाला अन् माझ्या लेकीला? काय चुकलं आपल? अशा निरनिराळ्या प्रश्नांनी तिने निरनिराळ्या देवादिकांना भंडावून सोडल. आपल्या गरीबीचा अन मुलीची आई असण्याचा या दोन्ही दुर्दैवाचा पाढा आज पूर्ण झाला असंच तिला मनोमनी वाटत राहीलं. विमनस्क अवस्थेत ती गावात पोचली आणि काही वेळाने गावातल्यांनी लांब शहरातल्या तिच्या लेकीला ती गेल्याचा निरोप कळवला!

तान्ह लेकरू घेऊन लेक आणि तिचा नवरा दोघचं आले. सारे विधी वगैरे झाल्यावर नवरा तान्हुलीला घेऊन लगेच माघारीही फिरला. "शहरातल्या लोकांना असा वेळ घालवून चालत नाही", अस काहीबाही मयतीला जमलेल्या काही सोय-यांना सांगताना आणखी काही सोय-यांनी ऐकलं!

दहाव्याला मंडळी नैवेद्य दाखवून कावळ्याची वाट बघत बसलेली आणि कावळा सा-यांच्या सहनशक्तीचा अंत बघत बसलेला. तिसरा प्रहर चालू झाल्यावर मग काही आठवून लेक अनेक आवंढे गिळत म्हणाली, "चित्राच नाव ठेवते ग आई, पोरीचं!" अचानक कुठूनसा एक कावळा आला नि नैवेद्य चोचीत धरून उडालाही!

कथासाहित्यिकलेख

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2015 - 9:57 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्ही प्रविण दवणे नावाने पण लिहीता का?

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 10:19 pm | चांदणे संदीप

तुमच्या प्रतिसादाचा रोख लक्षात आला!
आताच लिहायला लागलो असल्याने स्वत:ची कुवतही ओळखून आहे. थोड्याफार लिहिण्याच्या अन ब-याच वाचनाच्या अनुभवावरून हे सांगू शकेन की 'प्रविण दवणे' टाईप नक्कीच नाहिये. असेल तर कसे? हे तुम्ही कृपया स्पष्ट करून जरा सांगाल? सुधारणेस वाव आहे हे नक्की!

धन्यवाद!
Sandy

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2015 - 10:25 pm | परिकथेतील राजकुमार

असेल तर कसे? हे तुम्ही कृपया स्पष्ट करून जरा सांगाल?
वाचताना साडेतीन्वेळा ड्वाले पाणावेल.

चांदणे संदीप's picture

2 Nov 2015 - 10:46 pm | चांदणे संदीप

निबुनैंचा, "प्रतिक्रिया तर सहज मिळतात, पण मार्गदर्शन कोणीच करत नाही.." हा प्रतिसाद इतक्या लवकर कामी येईल असे वाटले नव्हते! तसा तो आल्याचे पाहून माझेही ड्वाले पाणावले!

"प्रतिसाद से डर नही लगता साहब...." असे काही म्हणावे वाटतेय.... पण असो!

विक्रान्त कुलकर्णी's picture

3 Nov 2015 - 11:56 am | विक्रान्त कुलकर्णी

आई तुझी आठवण येते...बदाबद्द्द रडु आले....

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 10:49 pm | DEADPOOL

पराशेठ मला असे वाटते की माहेरची साडीचे लेखक हेच असावेत!

वाचताना साडेतीन्वेळा ड्वाले पाणावेल.

साडेबत्तेचाळीस वेळा नाही का ? ;-)

वेलकम बॅक परादादा. बर्‍याच दिवसांनी मिपावर 'ड्वाले पाणावेल' वगैरे पाहून मजा आली.

पद्मावति's picture

2 Nov 2015 - 10:49 pm | पद्मावति

सुरेख जमलीय कथा. खुप आवडली.

निलम बुचडे's picture

2 Nov 2015 - 11:22 pm | निलम बुचडे

चटका लावून जाते एकदम...
कथेचा शेवट खरोखरच भावला.

रातराणी's picture

2 Nov 2015 - 11:28 pm | रातराणी

कथा आवडली!

सॅण्डीबाबा. मस्त जमलीय रे. आवडली

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 12:04 am | चांदणे संदीप

___/\___

यूं कोई खयाल जिंदगीका फलसफा ना होता,
अगर तुम ना होते तो ये खयालभी ना होता!

जव्हेरगंज's picture

2 Nov 2015 - 11:46 pm | जव्हेरगंज

सुरेख लेखन!
कथा आवडली म्हणवत नाही. :-(

प्यारे१'s picture

3 Nov 2015 - 11:11 am | प्यारे१

+१११
बायाच बायाच्या जीवावर उठतेत. उठवळपना निव्वळ. :((

नीलमोहर's picture

3 Nov 2015 - 12:31 pm | नीलमोहर

बायाच बायांच्या शत्रू असण्याबद्दल सहमत..

स्रुजा's picture

3 Nov 2015 - 12:23 am | स्रुजा

आवडली ! आज ही हे असं चालतंच आणि होतंच. :( :(

यशोधरा's picture

3 Nov 2015 - 8:41 am | यशोधरा

Kathashaili aavadali.

कथा आवडली. मला मंटोच्या एका कथेची आठवण झाली.

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 12:26 pm | चांदणे संदीप

हे विकीवरून साभार:

Saadat Hasan Manto; 11 May 1912 – 18 January 1955) was a Pakistani writer, playwright and author who is considered to be among the greatest writers of short stories in South Asian history.

इथपर्यंत पोहोचायला मलातरी खूप वेळ लागेल किंवा पोहोचेन का नाही माहित नाही. पण तुम्हाला आठवण यावी अस काही आज लिहून गेलो त्याबद्दल स्वत:वरच बेहद्द खूष झालो! आज स्वत:लाच पार्टी देणार! ;-)

धन्यवाद!
Sandy

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 12:34 pm | चांदणे संदीप

इच्छुकांसाठी ही "मंटो"च्या परिचयासाठी लिंक...

http://www.misalpav.com/node/21706

जाणुन घ्यायला आवडेल !

सामान्य वाचक's picture

3 Nov 2015 - 9:13 am | सामान्य वाचक

मेलोड्रामा न करता संयत लिखाण

मिनेश's picture

3 Nov 2015 - 10:14 am | मिनेश

चांदणे साहेब, सुंदर कथा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2015 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय तरल आणि गावगाड्याचं सुंदर हळवं करणारं लेखन आहे. आवडलं.

अवांतर : काही प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. सवय करा. आजच्याच पेप्रात अमेरिकेच्या तुरुंगातून काही कैदी सुटून थेट मिपावर आल्याचं वाचलं आहे. सावधान. ;)

-दिलीप बिरुटे

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 11:12 am | चांदणे संदीप

अतिशय तरल आणि गावगाड्याचं सुंदर हळवं करणारं लेखन आहे. आवडलं.

धुआ धुआसा बन गया हू मै जमानेमे अब
तुमसा कोई मिले तो महसूस हो लेता हू!

धन्यवाद!
Sandy

याॅर्कर's picture

3 Nov 2015 - 11:07 am | याॅर्कर

छान

शित्रेउमेश's picture

3 Nov 2015 - 11:51 am | शित्रेउमेश

कथा आवडली. कथेचा शेवट भावला. कथेच नाव अगदी समर्पक...

चित्रगुप्त's picture

3 Nov 2015 - 12:40 pm | चित्रगुप्त

आवडलं लेखन. पण एक बाळबोध प्रश्न . चित्राच नाव ठेवण्याचे कारण नाही समजले. "चित्रवानी दिसते" आई म्हणाली होती म्हणून का ? आम्हाला दोनदा बघूनही पिच्चरची ष्टोरी कळत नाही कधीकधी. तसे झाले आहे .

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 2:00 pm | चांदणे संदीप

चित्रगुप्त साहेब, बाळबोध प्रश्न नाहीये...चांगलाच प्रश्न आहे!

चित्रवानी दिसते" आई म्हणाली होती म्हणून का ?

हे कारण आहेच. पण ते का आहे ते समजून घेतले पाहिजे.
कथेत ज्याप्रमाणे सासरचे चित्रण केले आहे त्यावरून, माय-लेकींना बाळाच नाव काय ठेवायचं वगैरेसाठी तेवढी मोकळीक (दडपणाच्या छायेत!)मिळाली नसणार हेच दिसते किंवा त्याविषयी बोलायचे राहून गेले असणार. त्यामुळेच लेकीने आईचे 'ते' नकळत बोल आईची इच्छा/आशीर्वाद असे गृहीत धरले!

धन्यवाद!
Sandy

पैसा's picture

3 Nov 2015 - 3:13 pm | पैसा

कथा आवडली.

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2015 - 3:19 pm | स्वाती दिनेश

गोष्ट आवडली.
स्वाती

पियुशा's picture

3 Nov 2015 - 3:35 pm | पियुशा

आवड्ली :)

उत्कृष्ट बारकाव्यांनिशी आलेलं संवेदनशील लेखन. आपल्या आजुबाजूला असलेल्या जगाकडे बघण्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती लेखकाकडे असल्याचं जाणवतं. आटोपशीरपणा हे आणखी एक बलस्थान.

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 4:27 pm | चांदणे संदीप

उत्कृष्ट बारकाव्यांनिशी आलेलं संवेदनशील लेखन. आपल्या आजुबाजूला असलेल्या जगाकडे बघण्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती लेखकाकडे असल्याचं जाणवतं. आटोपशीरपणा हे आणखी एक बलस्थान.

आता मला हार्टअटकच होईल बहुतेक!

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!
Sandy

अजया's picture

3 Nov 2015 - 4:28 pm | अजया

कथा आवडली.गविंच्या निरीक्षणाशी अगदी सहमत.
ही स्थिती लेकीच्या गावातल्याच नाही अगदी सुशिक्षित घरातल्या शहरी आईलाही जाणवून देणारे सासरचे लोक असतात.तुमच्यातल्या संवेदनशील लेखकाला ती'ची बाजू दिसली म्हणून कौतुक वाटले.

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 9:26 pm | चांदणे संदीप

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

अभ्यादादा, प्रा.डॉ., गवि, पैसाताई, प्यारेभाऊ, जव्हेरगंज, चित्रगुप्त, दमामि अशा शैलीदार लेखकांचे प्रतिसाद अंगावर मूठभर मांस चढवून गेले. या साऱ्यांच्या लेखनाचा मी खराखुरा चाहता आहे!

अजयाताई, मिनेश, सामान्य वाचक यांचेही प्रतिसाद सुखावून गेले. :)
आणखीही बर्याच जणांनी प्रतिसाद दिले त्यांचेही आभार!

धन्यवाद,
Sandy

बोका-ए-आझम's picture

3 Nov 2015 - 10:20 pm | बोका-ए-आझम

मस्त आहे कथा! आवडली! कुठे पाहिलीत की काय? निरीक्षण जबरी आहे!

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 11:22 pm | चांदणे संदीप

खरं सांगतो, तुमच्या लिखाणावर प्रतिसाद द्यायलाही मी घाबरतोय अजून. आणि तुम्ही काय भाऊ वगैरे म्हणताय! नुसत नाव टाईप केलं तरी माझा दिवसभराचा उर्दूचा कोटा संपला असे वाटते! ;-)

व्हाय डोन्ट यू ऑल पीपल जस्ट कॉल मी सॅन्डी?
Tumhi sagale mala fakt Sandy ka mhanat nahi?
तुस्सी..... (जौद्या, किती फालतू विनोद करायचे?!)

तुमच्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद आणि तुमच्या प्रश्नाच उत्तर म्हणजे, होय. दुर्दैवाने अशा आणि याहून काळीज हेलावून टाकणा-या, शब्दांना मुक्या करणा-या घटना पाहिलेल्या आहेत.

रच्याकने, कुणाला दूरदर्शनवरचा 'मिट्टी के रंग' हा खूप जुना कार्यक्रम आठवतो का? त्यात पाहिलेली एक कथा ज्यात पंकज कपूरने अभिनय केला होता, ती कथा अगदी काळजात घर करून बसलेली आहे. तसलं काही लिहिण्याची फार इच्छा आहे. त्या उंचीवर कधी पोहोचणार कुणास ठावूक?

धन्यवाद, ___/\___
Sandy

सायकलस्वार's picture

3 Nov 2015 - 11:00 pm | सायकलस्वार

"प्रतिक्रिया तर सहज मिळतात, पण मार्गदर्शन कोणीच करत नाही"

माझी कोणाला मार्गदर्शन करण्याची लायकी आहे असा माझा गैरसमज नाही, तरीपण वरच्या एका वाचकाच्या थोड्या पुणेरी स्टाईलने दिलेल्या (म्हणजे प्रशंसेला भयानक कंजूस, पण खवचट टीकेला तत्पर;)) प्रतिक्रियेचा काय अर्थ असावा, असे मला वाटते, (आणि मलाही थोडं तसंच वाटतं) ते लिहितो.
तर कथाशैली चांगली आहे, लिहिण्याची स्टाईल ओघवती आहे, कथा चित्रदर्शी आहे, फापटपसारा टाळला आहे. हे सगळे प्लस पॉईंट आहेत आणि इतरांनी त्याबद्दल लिहिलं आहेच, पण शेवट एकंदरीत फिल्मी वाटला. गावात पाय टाकल्यावरच आईचे (कोणत्याही कारणाशिवाय) आपोआप मरणे पटले नाही. शिवाय ते कावळा शिवणे वगैरे गोष्टी आता जुनाट वाटतात. तुमच्या आधीच्या कथा वाचल्या होत्या, त्या चांगल्या आणि जेन्युईन होत्या.
ही टीका नाही हे कृपया लक्षात घ्यावे. शिवाय हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ते पूर्णपणे चुकीचं असू शकतं.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Nov 2015 - 11:04 pm | परिकथेतील राजकुमार

माझी कोणाला मार्गदर्शन करण्याची लायकी आहे असा माझा गैरसमज नाही, तरीपण वरच्या एका वाचकाच्या थोड्या पुणेरी स्टाईलने दिलेल्या (म्हणजे प्रशंसेला भयानक कंजूस, पण खवचट टीकेला तत्पर;)) प्रतिक्रियेचा काय अर्थ असावा, असे मला वाटते, (आणि मलाही थोडं तसंच वाटतं) ते लिहितो.
तर कथाशैली चांगली आहे, लिहिण्याची स्टाईल ओघवती आहे, कथा चित्रदर्शी आहे, फापटपसारा टाळला आहे. हे सगळे प्लस पॉईंट आहेत आणि इतरांनी त्याबद्दल लिहिलं आहेच, पण शेवट एकंदरीत फिल्मी वाटला. गावात पाय टाकल्यावरच आईचे (कोणत्याही कारणाशिवाय) आपोआप मरणे पटले नाही. शिवाय ते कावळा शिवणे वगैरे गोष्टी आता जुनाट वाटतात. तुमच्या आधीच्या कथा वाचल्या होत्या, त्या चांगल्या आणि जेन्युईन होत्या.
ही टीका नाही हे कृपया लक्षात घ्यावे. शिवाय हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ते पूर्णपणे चुकीचं असू शकतं.

पुणेकर येवढे कष्ट घेत नाहीत.

'कशाला वीज वाया घालवता?' येवढेच विचारतात.

चांदणे संदीप's picture

3 Nov 2015 - 11:37 pm | चांदणे संदीप

तुमच्या मताचे स्वागतच आहे.

"गावात पाय टाकल्यावरच आईचे (कोणत्याही कारणाशिवाय) आपोआप मरणे पटले नाही."
कोणतही स्पष्टीकरण देत बसायच नाहिये पण यासाठी एवढच सांगेन की तपशिलात जाऊन, त्या दुर्दैवी आईला हार्ट ॲटॅक कसा आला किंवा लो बीपी, ब्रे. हॅ., असल लिहून कथेची लांबी वाढवायची नव्हती. नाहीतर त्या बिचारीच्या आजारपणावर एक परिच्छेद आणखी वाढला असता. शेवटी काय? होणार तेच होते!

पुढल्या लिखाणात असाही प्रयोग करून बघेन. तुमच्या परखड मतासाठी धन्यवाद!
येत राहा, वाचत राहा एवढेच म्हणेन!
Sandy

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2015 - 11:24 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम शैली. छान लिहिता.

रेवती's picture

4 Nov 2015 - 1:43 am | रेवती

लेखनशैली आवडली.

इडली डोसा's picture

4 Nov 2015 - 2:48 am | इडली डोसा

शेवट जरा घाईत उरकल्यासारखा वाटला. पण बहुतेक तुम्हाला कथेचा पसारा अजुन जास्त वाढवायचा नव्हता म्हणुन तसं झालं असावं.

एक एकटा एकटाच's picture

6 Nov 2015 - 8:20 am | एक एकटा एकटाच

उ त्त म !!!!!!!!!!!!!!!!

बाबा योगिराज's picture

6 Nov 2015 - 8:28 am | बाबा योगिराज

भेष्ट.
आवड्यास. अजून बी येऊ द्या.

सिरुसेरि's picture

9 Nov 2015 - 10:36 am | सिरुसेरि

भावपूर्ण कथा . सुखात सगळेच वाटेकरी असतात . दु:खद प्रसंगात मात्र दोष दुसरयांवर ढकलले जातात . यामध्ये गरिब स्वभावाची व्यक्ती नेमकी भरडली जाते .

नवीन वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार!

उगा काहितरीच's picture

9 Nov 2015 - 3:11 pm | उगा काहितरीच

कथा चांगली आहे याबद्दल दूमत नाहीये . पण दिवाळी सारखा सण असताना शोकांतिका प्रकाशित करणे टाळावे असे वाटते .
(फाट्यावर जाण्याची तयारी असलेला ) उगा ;-)