राम राम मंडळी,
कालची बाप्पाची सुट्टी संपली आणि आज आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या रोजच्या कामधंद्यात गर्क होतो. एका अशिलाच्या हापिसात काही कामानिमित्त बैसलो होतो. तेवढ्यात आमचा भ्र ध्वनी किरकिरला,
"तात्या, मी बिपिन. बिपिन कार्यकर्ते. आहेस का खपलास रे? तुला भेटायचंय!"
अरे वा! कार्यकर्तेसाहेब आम्हाला भेटू इच्छितात याचा आम्हाला लै आणंद (च्यामारी, मा**व त्या शुदलेखनाच्या!) वाटला. आम्हीही त्यांना भेटू इच्छित होतोच.
"अरे आत्ता जरा मी पोटापाण्याच्या उद्योगात अंमळ मग्न आहे, जरा वेळाने भेटू."
"ओक्के, तात्या मी तुला जरा वेळाने फोन करतो!"
असा आमचा आणि बिपिनशेठचा संवाद झाला.
थोड्या वेळाने आमचं त्या अशिलाकडचं काम संपलं आणि तिथून आम्ही दुसर्या एका कामकरता एका बँकेत रवाना झालो.
जरा वेळाने पुन्ना (च्यामारी, मा*** त्या शुदलेखनाच्या!) आमचा भ्र ध्वनी किरकिरला.
"संहिता जोशी कॉलिंग...." असा निरोप भ्र ध्वनीच्या फलकावर दिसत होता.
"संहिता जोशी? म्हणजे मिपाची यमी आज्जी? अरे हिचं आपल्याकडे आत्ता काय काम बरं!?" - स्वगत.
"नमस्कार करतो यमी आज्जी! कश्या आहात?" :)
"हम्म! मी सगळ्यांची आज्जी नाहीये कै, मी फक्त टारगट टाळूबाळाचीच आज्जी आहे!" यमीने खुलासा केला! :)
बिपिनशेठ यमीला भेटले होते आणि ते दोघेही आता मला भेटायला बँकेत यायला निगाले होते. (निगणे हे क्रियापद आम्ही 'बिलानशी नागिन निगाली' या एका फक्कड गाण्यातून शिकलो आहोत. मस्त शब्द आहे! च्यामारी, मा*** त्या प्रमाणभाषेच्या!)
थोड्याच वेळात मिपाचे बिपिन आणि यमी हे आमचे स्न्हेही आम्हाला ब्यँकेत येऊन भेटले. हाय-हॅलो, इकुडच्या तिकुडच्या गफ्फा झाल्या. बिपिनशेठ सध्या काही कामाकरता आमच्या म्हम्मईला आले आहेत आणि हापिसला चक्क दांडी मारून यमीचाही मुक्काम सध्या ठाण्यात आहे.
आता काय करायचं, काय करायचं, कुठे टिपी करावा अशी आम्हा तिघांत चर्चा सुरू झाली. यमीला आणि बिपिनला वाटलं की तात्या अंमळ कल्पक आहेत, ते काहितरी छान टूम सुचवतील!
छ्या! पण जल्ला (शब्दसौजन्य : मिपाचा आगरी रामायणकार ब्रिटिश!) मी कुठला कल्पक! आमच्या कल्पकतेची उडी फार फार तर मिपा खाण्यापर्यंत! :)
म्हटलं,
"चला रे मुलांनो! मामलेदारची मिसळ खायला जाऊ!"
हे ऐकून यमी आणि तिचा नातू बिपिन (हो, टारूबाळा व्यतिरिक्त यमीने आता बिपिनलाही नातू करून घेतल्याचं आजच मला कळलं!) दोघेही खुश झाले आणि आम्ही खुशी खुशी मिसळ खायला मामलेदाराच्या हाटेलापाशी पोहोचलो. यमीआज्जीने आधीच काहितरी खादाडी केली असल्यामुळे तिनं मिसळ न खाता फकस्त ताक प्यायलं. तिघांणीही मस्तपैकी गफ्फा मारता मारता मिसळीची खादाडी केली आणि आणि एक झकास मिपाकट्टा ठाण्यात अचानक जुळून आला. नंतर बिपिनशेठनी त्यांच्या लै भारी अश्या वातानुकुलीत गाडीतनं आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडलं! यमीलाही तिच्या घरी सोडून त्याला परत पुण्याला काही कामानिमित्त जायचं होतं.
आम्ही बिपिनरावांच्या गाडीतनं आमच्या घरापाशी उतरलो आणि यमीआज्जीला आणि बिपिनला आम्ही टाटा, बाय-बाय केलं. जाताना आम्हाला बिपिनशेठनी खाऊ म्हणून एक छानसं चाकलेटचं पाकिट सप्रेम भेट दिलं! :)
अहो देणारच सप्रेम भेट! अर्रे मग! साला, तात्या अभ्यंकर म्हणजे साधीसुधी आसामी वाटली क्काय तुम्हाला?! :)
आपला,
(मिपाचा ठाणे कट्टाकरी) तात्या.
१) मिसळपाव! "दर्शनमात्रे मन कामनापूर्ती!" (अलिकडे जुन्या आरत्यांच्या चालींच्या अनुषंगाने येणार्या शब्दयोजनेबद्दल किंवा शब्दयोजनेनुसार बांधलेल्या चालींबद्दल काही शब्दप्रभू-संगीतज्ञांचे मत अंमळ चांगले नाही असे ऐकतो!) :)
२) बिपिन कार्यकर्ते! मिपावरचा एक भला मनुक्ष. मिसळपाव चापण्यात मग्न आहे!:)
३) यमी आज्जी आणि बिपिन. बिपिनच्या हातातला पाव आणि यमीच्या हातातील ताकाचा गिल्लास असं दोघांचं जगावेगळं 'चिअर्स' चाललं आहे! :)
४) ....... आणि मराठी आंतरजालावरचं एक अत्यंत हलकट अन् भिका**ट व्यक्तिमत्व! मिसळपावचा घास घेऊन धन्य झालं आहे!:)
५) आणि बिपिनरावांनी आम्हाला खाऊ म्हणून दिल्लेलं हे चाकलेट बरं का मंडळी! आता हा लेख इथेच थांबवतो आणि त्या चाकलेटाचा समाचार घेतो! :)
कळावे,
आपला,
तात्या.
प्रतिक्रिया
4 Sep 2008 - 5:47 pm | सर्वसाक्षी
तात्या,
तुझ्यापुढ्यात एकच बशी? आणि जादा तर्री पण नाही? सध्या काय पथ्यावर आहेस की काय?
5 Sep 2008 - 11:05 am | अवलिया
हेच म्हणतो मी
तात्या
तुझ्यापुढ्यात एकच बशी? आणि जादा तर्री पण नाही? सध्या काय पथ्यावर आहेस की काय?
हे चालणार नाही. यावत जीवेत सुखे जीवेत ऋणम कृत्वा तर्री पिबेत हे विसरु नका :)
कार्यकर्ते
अवो तुमी कारयकरते कमी अन न्येते जास्ती दिसता. वा वा :)
यमी आज्जी
ऑ अवो तुमी तर लय तरन्या हाय की वो .. ;)
जळवा लेको जळवा मिसळ खावुन
नाना
5 Sep 2008 - 2:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यावत जीवेत सुखे जीवेत ऋणम कृत्वा तर्री पिबेत हे विसरु नका
=))
ऑ अवो तुमी तर लय तरन्या हाय की वो ..
मंग, मी रोज आंगाला संतूर लावतो आनी योगा करतो! (पावती दावू का?)
5 Sep 2008 - 3:54 pm | अवलिया
मंग, मी रोज आंगाला संतूर लावतो आनी योगा करतो!
लावतो आनी करतो.... ऑ
मग फोटो कुनाचा डकवला जणू ....
5 Sep 2008 - 5:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग फोटो कुनाचा डकवला जणू ....
वो नाना, उगाच आमच्या मायीच्या भाशेला बोलाचा नाय ... आदीच सांगून ठेवतो!
5 Sep 2008 - 12:29 pm | प्रभाकर पेठकर
तात्यांसमोरील बाकीच्या डिशा आणि तर्री शिताफीने फ्रेमच्या बाहेर ठेवली आहेत.
5 Sep 2008 - 2:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तो फोटो मी काढलाय, आणि मिसळ, तर्री, पाव अशा सगळ्या गोष्टींबरोबर तात्या त्या फ्रेममधे माववायला किती त्रास झाला ते मलाच माहित?
अदिती
4 Sep 2008 - 5:49 pm | डॉ.प्रसाद दाढे
बरी मजा चाल्लीय ह॑ तात्या.. पुण्यात कधी येताय, स॑गीत कट्टा बाकी आहे.
(आगाऊ सल्ला: चॉकलेट खाल्ल्यावर दात घासा (त॑बाखूने नाही, कोलगेटने!) म्हणजे किडणार नाहीत.. :)
4 Sep 2008 - 10:59 pm | टारझन
अंमळ मजा केलेली आहेच... बिपीन भौंनी कट्टा जमवलाच तर .. रामदास भौ दिसत नाहीत कुठे ..... अहो बिपिन भौ अजुन थोडा वेळ थांबा तिकडे ... एक खास खफकर्स कट्टा होणार आहे पुण्यात .. तुम्हालाही आग्रहाचे आमंत्रण आहे. मिसळीचे आणि गुटगुटीत तात्यांचा फोटू पाहून आनंद जाहला. आमच्या आज्जी १७५च्या असून देखिल २५च्या दिसतात. अंमळ संतूर झिजवत असाव्यात सकाळी.
यम्मी आज्जींचा वैश्विक नातू
-- ( टारूबाळ)
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
4 Sep 2008 - 5:51 pm | मुक्तसुनीत
आहाहा ! मामलेदार !! डोळे निवले राव मामलेदाराचे दर्शन घेऊन !
हे पहा मामलेदाराचेच थोडेसे उजळसर भावंड : " आमंत्रण " ! मामलेदाराचे "इट्ट" अगदी हंड्रेड पर्सेंट नाही तरी आलेच आहे या शेंडेफळामधेही !
तात्या , "बिगर बटाटा" खाता काय अजून !! ;-)
4 Sep 2008 - 5:56 pm | छोटा डॉन
आयला आमच्या अभिरुची कट्ट्यानंतर लगेच "अत्यंत आणि तुरंत" दुसरा कट्टा !
आजी म्या धन्य झालो ...
मस्त मजा करा !!!
कधीतरी [ म्हणजे २००९ मध्ये ] पुण्यात "संगीत व रंगीत कट्ट्याचे" जमवा.
आम्ही खास इकडुन येऊ ...
ह्या कट्टेकर्यांचे अभिनंदन ...
अवांतर : अजुन ३-४ दिवसात एकदम जंगी ऽऽऽऽ "बेंगलोर मिपाकर हब्बा [ कट्ट्याला कन्नड प्रतिशब्द ] " होणार आहे.
अशीच आपली माहितीची देवाण घेवाण हो .
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
4 Sep 2008 - 6:19 pm | ऍडीजोशी (not verified)
डान्या लेका, मागल्या वेळेसारखा फ्रुट ज्यूस घेऊन आलास तर ते तुलाच प्यावं लागेल.
तात्या ह्याला जरा समजवा ना.
मागच्या वेळी हा ज्यूस घेऊन आला. आणि प्रेमानं आणलंय तुमच्यासाठी असं म्हणून ते मला नी अभिज्ञ ला प्यायला लावलं. स्वतः मात्र JD मधे JD घालून पीत होता.
हा अन्याव आहे.
दोन साळसूद, गरीब, अश्राप बालकांवर डॉन गिरी केल्याबद्दल डॉन्याचा त्रीवार निषेध
निषेध १
निषेध २
निषेध ३
4 Sep 2008 - 5:59 pm | धमाल मुलगा
"चला रे मुलांनो! मामलेदारची मिसळ खायला जाऊ!"
तात्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
आम्हाला नाय नेलं मामलेदाराकडं मिसळ खायला :(
बाकी, बिपीनशेठ सक्काळी सक्काळी मला हापिसात भेटायला आले हो...खरंच काय भला मनुक्ष!
आणि मी मात्र त्यांना करंट्यासारखं कटींग चहावर कटवलं :( काय तिच्याआयला आमच्या कंपनीन तरी जागा शोधलीये, एखादा चचला तर त्याला खांदा द्यायला ४ माणसं सुधा गोळा नाय व्हायची, तिथं हाटीलं कुठुन येणार?
जल्ला, निवांत गप्पा टाकायच्या होत्या, पण ना त्यांच्याकडे वेळ होता ना माझ्याकडे!
असो, छोटा कट्टा मस्तच :)
अहो ती यमी आज्जी स्वतःच जगावेगळी आहे तर ह्यात नवल ते काय????
4 Sep 2008 - 8:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> अहो ती यमी आज्जी स्वतःच जगावेगळी आहे तर ह्यात नवल ते काय????
=))
हे मात्र भारी हो धम्या! तू मला फोन करणार होतास त्याचं काय झालं?
4 Sep 2008 - 6:01 pm | ऋचा
मस्त हो तात्या!!
आमाला पण सांगा की कट्टा असताना!!
:(
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
4 Sep 2008 - 6:02 pm | श्रीमंत दामोदर पंत
धम्या जाऊ देत रे एवढा निषेध नको करु...........
आपला पण छोटे खानी कट्टा झाला की शनिवारी आणि काल पण.................
तात्या पुण्यात संगीत कट्टा करणार आहात असं कळलं.....कधी करताय??????????
5 Sep 2008 - 9:59 am | धमाल मुलगा
अरे दामु,
निषेध मी कट्ट्याला बोलावलं नाही म्हणुन करत नाहीय्ये रे,
तात्यांबरोबर मामलेदाराची मिसळ खायला जायचं..जायचं.. केव्हाचं चाललंय, पण तात्या काय मला घेऊन जाईनात :(
म्हणुन मी निषेध केला !
4 Sep 2008 - 6:14 pm | ऍडीजोशी (not verified)
वा वा वा मंडळी, माम्लेदाराच्या हाटेलात भ्येटलात हे लै भारी झालं बर्का.
पण तात्या ह्ये काय अघटीत? अहो, पापणी लवायच्या आधी आपण प्लेटा रिकाम्या करता असं ऐकून व्हतो आमी. मामलेदारांनीच सांगलं सोता. नी फोटूत चक्क मिसळ दिसतेय की वो. का खास फोटूसाटी पोज दिलेय ह्यी?
4 Sep 2008 - 6:15 pm | ऋषिकेश
अरे वा! मस्त! :)
मामलेदारच्या जगप्रसिद्ध मिसळदर्शनाने धन्य जाहलो
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
4 Sep 2008 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झटपट कट्टा वृत्तांत झक्कास.
यमी आणि बीपीन मिसळपावच्या वारकर्यांच्या दर्शनाने संत तात्याबा आपण आम्हाला धन्य केले आहे.
आभारी आहोत :)
(स्वगतः ते काही नाही पुढील ठाणे दौ-यात तात्याला दोन पेग, दोन चिकनचे लेगपीस मिळतील अशा हॉटेलात घेऊन जायचा आग्रह करावाच लागेल.)
4 Sep 2008 - 6:37 pm | ब्रिटिश
ह्यो कट्टा कट्टा म्हन्जे क हाय र बालाव ?
मना त यकच कट्टा म्ह्याईत हाय
टिगरवाला
मिथुन काशिनाथ भोइर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
4 Sep 2008 - 6:41 pm | मुक्तसुनीत
... छप्पोपानी काय ??
4 Sep 2008 - 6:50 pm | ब्रिटिश
टिगर म्हन्जे चाप.
कट्टा म्हन्जे घोडा
मिथुन काशिनाथ भोइर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
4 Sep 2008 - 6:56 pm | मुक्तसुनीत
मला वाट्ले तुम्ही "कट्टयावर" खेळायच्या "टिक्कर" या खेळाबद्दल बोलताय ...
4 Sep 2008 - 6:54 pm | संदीप चित्रे
धन्स तात्या :)
मामलेदारची मिसळ कधी खाल्ली नाहीये पण आता पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय !
------
बिपीनशेठ -- अशीच एक चक्कर इथे मारा की आणि येताना मिसळ घेऊनच या :)
यमी -- तू रामदेवबाबांसारखे 'प्राणायम' वगैरे करून वयापेक्षा तरूण दिसतेस काय ! ;)
4 Sep 2008 - 8:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यमी -- तू रामदेवबाबांसारखे 'प्राणायम' वगैरे करून वयापेक्षा तरूण दिसतेस काय !
मी त्याच्याकडून नाही, तो माझ्याकडून शिकलाय योगसाधना वगैरे!
बाय द वे, मी फक्त पंचवीस वर्षांची आह गेली ७-८ वर्ष, तुम्हाला नाही माहित?
अदिती
4 Sep 2008 - 8:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चुकून दोनदा एकच प्रतिसाद आल्यामुळे उडवला आहे.
अदिती
4 Sep 2008 - 7:29 pm | आनंदयात्री
मजा आहे राव .. मस्त कट्टा ! चला आता तयारीला लागायला हवं, आमचे दोन परममित्र (तसे कधी मधी पाठीत सुरा पण खुपसतात ते हलकट) लवकरच पुणेप्रांती दाखल होणार आहेत. प्रथम राणीच्या देशातुन छोटी टिंगी परत येत आहे मग डायरेक्ट आफ्रिकेतल्या दर्याखोर्यातुन टारझन परतत आहे. कामाला लागायला हवे, एकामागोमाग २ कट्टे आखायचे म्हणजे काय खायच्या गप्पा नाहित राव !
4 Sep 2008 - 7:41 pm | रामदास
क्या बात है? मामलेदाराची मिसळ!
बिपीन तूम भी क्या याद करोगे.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
4 Sep 2008 - 7:56 pm | मदनबाण
निषेध !!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
4 Sep 2008 - 8:40 pm | स्वाती दिनेश
छोटेखानी अचानक कट्टा मस्त झालेला दिसतो आहे,मामिचे फोटू पाहून 'जलन' झाली.उतारा म्हणून मामि आता केलीच पाहिजे..
स्वाती
4 Sep 2008 - 8:45 pm | लिखाळ
कट्टा छान झालेला दिसतो.. :)
>>मामिचे फोटू पाहून 'जलन' झाली.उतारा म्हणून मामि आता केलीच पाहिजे..<<
उम्म्ह ! ते फरसाण वगैरे वाचतोय खवहितून :(
--लिखाळ.
4 Sep 2008 - 8:46 pm | देवदत्त
व्वा, मिपाच्या कट्ट्यावर मिसळपाव की मिसळपावाच्या हॉटेलात मिपाचा कट्टा :)
आम्ही निषेध नाही करत. कारण आज जमले नसते. पण तात्या पुढील वेळी, सुट्टी असल्यास, आम्हालाही कळवा. जमल्यास आम्हीही येऊ.
4 Sep 2008 - 10:49 pm | llपुण्याचे पेशवेll
आयला..मज्जाच की राव.
हे कार्यकर्ते साहेब देखील हाडाचे कार्यकर्ते वाटत आहेत. म्हणजे गांधीटोपी झब्बा ते खाकी हाफ पँट, काळी टोपी कोणत्याही वेषात शोभतील.(कार्यकर्तेसाहेब अंमळ ह.घ्या.)
पण बाकी तुम्हाला बघितले की उगाचच तुम्ही ङॉक्टर आहात असे वाटते..
तात्या एखादा गाण्यागिण्याचा कट्टा जमव आता गणपतीनिमित्त...
पुण्याचे पेशवे
5 Sep 2008 - 8:20 am | शिवा जमदाडे
मस्त कार्यक्रम झाला की राव.......
पन हे असले फोटू टाकने बरे नाही - पाप बसल हो तूमाला...... शिवा च्या शिव्या लै डेंजर हाय राव, तवा आमाले असे जलवू नका बा...................
5 Sep 2008 - 8:50 am | सागररसिक
आरे पुन्या मधे घ्य लवकर एक
5 Sep 2008 - 9:58 am | शितल
मस्त छोटे खानी कट्टा आवडला.
:)
5 Sep 2008 - 11:44 am | अभिज्ञ
यमी आजीचा फोटु बगुन
५_६ काळेपणा कसा असतो ते तरी समजले.
(ह.घे.)
अभिज्ञ.
5 Sep 2008 - 2:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यमी आजीचा फोटु बगुन ५_६ काळेपणा कसा असतो ते तरी समजले.
चला माझा काहीतरी उपयोग झाला ठाण्याला येऊन! मिपावरच्या पोरांना रंग आणि गणित समजायला लागलं ... :-)
5 Sep 2008 - 12:32 pm | प्रभाकर पेठकर
बर्याच दिवसात मामलेदार मिसळ झाली नाही. पुन्हा ठाण्यात गेलं की तात्यांना सांगितले पाहिजे, 'जरा मलाही 'मामलेदारच्या' पायावर घालून आणा हो. जीव लई तडफडतोय.'
5 Sep 2008 - 12:37 pm | धमाल मुलगा
ओ काका,
जरा आमचीपण वर्णी लावता का?
ते तात्या आम्हाला मामलेदाराच्या पायावर घालुन आणायचं काय मनावर घेईनात बॉ.
आता, तात्या म्हणतील, एव्हढं आहे तर जा की स्वत:, आम्ही सोत्ता जाऊ हो, पण त्यात 'तात्या मला मामलेदाराकडे मिसळ खायला घेऊन गेले' ह्याची मजा आहे का?
5 Sep 2008 - 12:45 pm | प्रभाकर पेठकर
तात्या जमवतीलच. त्यांचे मनही त्यांच्या देहासारखेच विशाल आहे.
समजा कामाच्या व्यापात त्यांना नाहीच जमलं तर अजून ८-१० जणं जमवून आपण तात्यांनाच चक्क उचलून मामलेदाराच्या पायावर नेऊन आपटू. च्यायला, आहे काय आणि नाही काय.....
5 Sep 2008 - 7:43 pm | रामदास
आदमी ठिक ही ठाक है.
मूहमे छुरी और मनमे राम है
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
5 Sep 2008 - 12:59 pm | विजुभाऊ
जमलं तर अजून ८-१० जणं जमवून आपण तात्यांनाच चक्क उचलून मामलेदाराच्या पायावर नेऊन आपटू.
हे १००००% मान्य. ८ -१० लोकाना जमेल असेच काम आहे ते. अन त्यामुळे भूक लागेल ते वेगळेच.
पण बाकी काय म्हणा तात्याबा कट्टा बेष्टच
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
5 Sep 2008 - 2:38 pm | विसोबा खेचर
धमालमुलगा, पेठकरशेठ, विजूभाऊ, नाना आणि इतर रसिक खवैय्ये जनहो,
अहो कधीही हुकुम करा, आपल्यासारख्या रसिक खवैय्यांना मामलेदारची यात्रा घडवणे ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट असेल! :)
आपला,
(खाणारा आणि खाऊ घालणारा) तात्या.
5 Sep 2008 - 2:41 pm | अवलिया
जरुर एकदा भेटुच आपण
नाना
27 Dec 2010 - 4:09 pm | पर्नल नेने मराठे
बिप्स ने तात्यांना चॉकोलेट दिले मला बरेचदा भेतुन काहिच नाही :ओ :(
27 Dec 2010 - 4:11 pm | अवलिया
दोघांचा चांगला दोस्ताना आहे... एवढं पण कळत नाही !
27 Dec 2010 - 4:14 pm | पर्नल नेने मराठे
मग तु भेटुन दे ना :ओ
27 Dec 2010 - 4:16 pm | अवलिया
अनावश्यक आणि फालतु खर्च मी करत नाही.
कळावे लोभ असावा धन्यवाद
27 Dec 2010 - 4:19 pm | पर्नल नेने मराठे
अच्र्त!!!
27 Dec 2010 - 4:14 pm | टारझन
बरं मग ?
27 Dec 2010 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार
बिकाने स्वखर्चाने घेतलेले चॉकलेट दिले असा कुठलाही उल्लेख धाग्यात आढळला नाही.
27 Dec 2010 - 4:22 pm | छोटा डॉन
हे जुने धागे असे वर का निघत आहेत ?
एखादा माहितीपुर्ण धागा असला आणि त्यात अजुन एखादी जास्तीची गोष्ट सांगायची असल्यास असे जुने धागे वर येणे व ते आणताना त्यावर माहितीपुर्ण प्रतिसाद येणे ही बाब समजण्यासारखी आहे.
पण इथे तसे काही दिसत नाही :(
असो, पटकन जाणवलं म्हणुन आवर्जुन खरडलं, बाकी असोच.
- छोटा डॉन
27 Dec 2010 - 5:48 pm | चिंतामणी
उतारा म्हणून
किंवा
इनो ला पर्याय म्हणून.
>:)
27 Dec 2010 - 4:37 pm | सुधीर काळे
बिकाशेठ भलतेच हँडसम आहेत! आणि तात्यांनी आज चक्क दाढी केलेली दिसतेय्!
27 Dec 2010 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार
काळे काका २००८ सालचा धागा आहे तो ;)
बिका तेंव्हा जस्ट १६ व्या वर्षात पदार्पण करत होते.
27 Dec 2010 - 4:51 pm | टारझन
जाऊ दे रे .. .संभाळुन घे ... मला नव्हती का प्रतिक्रीया देता येत
:) दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन दोन दिवस आधीच त्यांचं बारसं झालं होतं .. आणि चुचु आंटीनेच त्यावर धागा काढला होता
- टारझन संभाळे
27 Dec 2010 - 5:06 pm | पर्नल नेने मराठे
=))
27 Dec 2010 - 10:07 pm | सुधीर काळे
एकदा हँडसम, नेहमी हँडसम! झकास 'मिसरूड' फुटलेली दिसतेय् कीं!!