(तेव्हा तुम्ही कुठे होता?) (बारा ची मती)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 9:59 am

प्रेरणा

दिल्लीहून जेट लीमिटेड़ ते उडती
म्हणे आय लव्ह काकांची बारामती
हे काय आज आमी डोळ्याने पाहीले
का भक्तगण असे तोंडावरी पडले ?

जेव्हा आलेले हे आपल्या दारी
म्हणाले संपवू काका पुतण्यांची जुलुमगिरी
थापा मारिल्या जनतेच्या सामोरी
दिसू लागली आता ती फेकुगिरी

दिले काकाला विकासपुरुषाचे सर्टिफिकेट .
सिंचनघोटाळा गेला बँकसीटच्या बासनात
म्हणे आमुचे सहिष्णू राजकारण भारतात.
पण हे आजच कसे घडले?
का असे फासे उलटे पडले.?
तेव्हा तुम्ही कुठे होता?
की तेव्हा भारत राजकारणात सहिष्णू नव्हता?

मुंबईवरती झाला हल्ला, त्यावेळी सडेतोड उत्तर द्या म्हणाला,
आज बीएसएफ वर हल्ला झाला, जिवंत अतिरेकीही पकडला
तरी त्या कासुरीला या म्हणणारी, हि कसली औलाद भारताची ?
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत स्वाभिमानी नव्हता?

दिली नथुरामला फाशी.
हजारो जमले त्याच्या गौरवाशी
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा कोर्टाचा निर्णय अंतिम नव्हता?

जेव्हा जमली ही भुतावळ उघडपणे मैदानी.
केली विचारवंताची हत्या, अफवेवरून निष्पापांची कुर्बानी.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत विकास करत नव्हता?

भ्रष्टाचार्याला पक्षात घेताना केला नाही विचार किंचित.
हाकलून लावले, केले बेघर निष्ठावान अन वृद्ध.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत चारित्र्यवान नव्हता?

किती सांगू? उदाहरणे आहेत फार.
पण नमोरुग्णसमोर मानतो मी हार,
कालचाच गोंधळ बरा वाटतो मग मला,
शांत बसून पेडा खावून, जीव माझा निमाला.

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

19 Oct 2015 - 10:05 am | श्रीरंग_जोशी

समयोचित अन मार्मिक.

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 10:31 am | मांत्रिक

सहमत!

तुषार काळभोर's picture

19 Oct 2015 - 12:18 pm | तुषार काळभोर

अन् बैलाचा डोळा!

याॅर्कर's picture

19 Oct 2015 - 10:24 am | याॅर्कर

मोदीसमर्थक, आणि शरद पवारांची थट्टा उडवणारे तथाकथित लोक्स यांची गोची झाली कि?

बजाज - शरद पवार म्हणजे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान.

मोदी - मी महिन्यातून तीन-चार वेळा फोनवरून शरद पवारांचा सल्ला घेतो.

बघितलात ना 'पवारांची पाॅवर'
काहीजण मात्र त्यांच्याबाबत पूर्वग्रह दुषित असल्याने उगीचच त्यांच्या नावाने बोटे मोडतात,आणि टिंगलटवाळी उडवतात

नाखु's picture

19 Oct 2015 - 10:32 am | नाखु

आणी "भीड-भाड" न ठेवणारे लिखाण.

या विचार गुंत्याचा विचार करायाला हावाच.

याचकांची पत्रे वाला नाखुस.

एस's picture

19 Oct 2015 - 10:47 am | एस

सहमत.

dadadarekar's picture

19 Oct 2015 - 11:17 am | dadadarekar

छान