तेव्हा तुम्ही कुठे होता?

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
18 Oct 2015 - 4:53 pm

डॉक्टर कुल्बर्गी यांच्या हत्ये नंतर कर्नाटकातील बऱ्याच साहित्यिकांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार सरकारला परत केले. सुरवातीला हि गोष्ट कर्नाटक पुरतीच मर्यादित होती. पण हे लोन आता बऱ्याच राज्यांमध्ये पसरलेय. आणि याला कारण म्हणजे दादरी येथे झालेली घटना.

नेमके आज च तुम्हाला भारतात असहिष्णुता वाढत असल्याचा साक्षात्कार झाला काय?
हि घटना खरच दुर्दैवी होती. पण या घटनेचे भांडवल करून खूप राजकारण पेटले आहे. आणि या वाहत्या गंगेत हाथ धुवून घेण्याचे काम साहित्यिक करत आहेत. मला कोणत्याही प्रकारे दादरी येथील घटनेचे समर्थन करायचे नाहीये. फक्त एकच प्रश्न या सर्व साहित्यिकांना विचारायचा आहे. कि इतके दिवस तुम्ही काय झोपला होता काय????

दिले पुरस्कार परत.
म्हणे असहिष्णू झाला भारत.
पण हे आजच कसे घडले?
का असे फासे उलटे पडले.?

जेव्हा आला कसाब आपल्या घरी.
गोळ्या मारील्या निष्पापांच्या उरी.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
की तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?

दिली याकुब ला फाशी.
पंधरा हजार (+) जिहादी जमले त्याच्यापाशी
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?

जेव्हा जमली ही भुतावळ आझाद मैदानी.
केली शहिदांची बेअब्रू, लाथाडली त्यांची कुर्बानी.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?

अत्याचार, बलात्कार करताना केला नाही विचार किंचित.
हाकलून लावले, केले बेघर काश्मिरी पंडित.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?

भारतात राहून हा ओवेसी, पाकिस्तानची स्तुती करतो.
शंभर कोटी हिंदूंना एका मिनिटात संपवण्याची भाषा करतो.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?

उडवली देवळे आमची, केले भक्तांना ठार.
अमरनाथ, वैष्णोदेवी, वाराणसी, किती सांगू? उदाहरणे आहेत फार.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?

संसदेवरती झाला हल्ला, जगात नाचक्की भारताची.
तरी त्या अफजल्या ला मुक्त करा म्हणणारी, हि कसली औलाद भारताची ?
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?

वाढवली जाते लोकसंख्या, केली जाते दादागिरी.
भारतात राहून केली जाते, इतर देशातील मुस्लिमांची चमचेगिरी.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत असहिष्णू नव्हता?

साहित्यिकांनो, आता गंभीर विचार करण्याची वेळ आहे.
मतांच्या राजकारणासाठी केलेला हा सगळा खेळ आहे.
आजच कशी काय तुम्हाला असहिष्णुता जाणवते आहे?
मला मात्र आज तुमच्या प्रामाणिकते बद्दल शंका आहे..

डिस्कलेमर : मी कोणी कवी नाहीये. त्यामुळे कृपया वरील कोणत्याही कडव्यांना व्यकरण, शब्दसंख्या, यमक अश्या कोणत्याही कसोट्या लावू नये. कवितेतील फक्त भाव समजून घ्यावा हीच नम्र विनंती.

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

तुमच्याकडे दै. सकाळ येत असेल तर आजच्या 'सप्तरंग' पुरवणीत ह्यावर चांगले समतोल भाष्य केले आहे. अर्थात तुम्ही 'भक्त' असाल तर त्या लेखातील मतांची खिल्लीच उडवाल म्हणा. आज जी विचारसरणी भारतात सत्ता गाजवतेय तिला विरोधी मतांबद्दल भयंकर असहिष्णुता आहे. अशा परिस्थितीत साहित्यिक - विचारवंत नावाच्या क्षीण आणि नि:शस्त्र समुदायाच्या हातात केवळ हे एव्हढे एकच सांसदीय हत्यार उरते आणि तेही निर्ढावलेल्या झुंडशाहीच्या बधीर कानांवर पोहोचत नाही!

बोका-ए-आझम's picture

19 Oct 2015 - 2:13 am | बोका-ए-आझम

प्रत्येकच माणूस असहिष्णू असतो. तो ते कसं व्यक्त करतो ते महत्वाचं आहे. अजूनतरी भाजपला विरोध करणाऱ्यांवर आणीबाणीप्रमाणे तुरूंगात जायची पाळी आलेली नाही आणि ज्यांची हत्या झाली ती हिंदुत्ववाद्यांनी केली असं अजून सिद्धही झालेलं नाही.
तेव्हा तुम्ही कुठे होतात हा rhetorical प्रश्न आहे. ज्यांना तो विचारण्यात आलेला आहे, ते तेव्हा तिथे नव्हते हे उघड आहे. ते कदाचित झोपेचं सोंग घेण्याचा मूलभूत हक्क बजावत असतील. मजा म्हणजे जे लोक व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वगैरे शब्द सध्याच्या सरकारविरोधात वापरताहेत त्यांना आपण असं बोलतोय कारण आपल्याला असं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे हे समजत नाहीये का?ते वर्तमानपत्राच्या पहिल्या पानांवर किंवा वाहिन्यांवरील कार्यक्रमात जेव्हा लोक हे बोलतात तेव्हा आपण exactly तेच स्वातंत्र्य वापरतोय ज्याचा संकोच झाल्याची आपण टीका करतोय यातली विसंगती आणि विनोद त्यांना कळत नाही की काय?

नाव आडनाव's picture

18 Oct 2015 - 7:29 pm | नाव आडनाव

अण्णा हजारेंचं दिल्लीत उपोषण चालू होतं तेंव्हा लोक टीवीवर चर्चा करतांना विचारायचे - १९९२ मधे अण्णा कुठे होते, १९८४ मधे अण्णा कुठे होते ... २०११ मधे अण्णा काय करत होते याचं त्यांना काहीच पडलेलं नव्हतं / ते त्यांना अडचणीचं वाटत असणार.

हे भारीच आहे - "तेंव्हा तुम्ही कुठे होता" असं विचारा म्हणजे "आता तुम्ही काय करताय" या बद्दल बोलायची गरजंच नाही :)

बरं वाल्या कोळ्याला कोणी विचारलं नाही - "तेंव्हा तू काय करत होतास" :)

dadadarekar's picture

18 Oct 2015 - 10:18 pm | dadadarekar

स्वातंत्रलढा , फाळणी , पाक व बांग्ला युद्धे ... त्यावेळी संघ , जनसंघ व भाजपा कुठे होते ?

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 1:29 am | तर्राट जोकर

काळा पहाड यांच्या "सौजन्या"ने (काळा पहाड आणी सौजन्य एकाच वाक्यात..?)

"तेव्हा मी लहान होतो, एवढं काय समजण्याचं माझं वय नव्हतं, तेव्हा मी शाळेत होतो, मला काय कळत नव्हतं, पेपरात फार काय येत नव्हतं, दुरदर्शनवरून मर्यादित सरकारी बातम्या येत होत्या. तेव्हा आम्हाला काय झालं ते कळत नव्हतं.

नंतर आमचं ब्रेनवॉशिंग केल्या जायला लागलं, आम्हाला जे घडलं नाही तेही मिठ-मिरची लावून सांगितल्या गेलं, मग आम्हाला जे आहे ते नाही नाही ते आहे असे मानायला शिकवलं गेलं, आता आम्ही असा बदला घेऊ, झाल्या न झाल्या गोष्टींचा. पन्नास वर्षांआधी पर्यंत छळलं आम्हाला या राक्षसांनी.

आता पन्नास वर्षांनंतर, तीन पिढ्या गेल्यावर, आम्हाला आमची पोटं भरल्यावर, ब्यांकेत बर्‍यापैकी पैसा आल्यावर, ढेकर दिल्यावर गप्पा करायला मोप वेळ मिळाल्यावर, रेशनची लायनीत उभी रायाची कटकट गेल्यावर, चाळीतून फ्लॅटमधे आल्यावर, संडासच्यापुढे लायनीत उभे राहायचे दिवस गेल्यावर, कमोडवर बसून पेपर वाचायला मिळाल्यावर, रीटायरमेंटची ददात मिटल्यावर, देश सोडून परदेशात स्थाइक झाल्यावर, पोरं परदेशातून रसद पाठवतात त्या मिळकतीवर आराम करत असल्यावर.. भरपूर वेळ मिळतोय. त्यामुळे आम्ही आता शांतपणे, मजा घेत बदला घेणार... आम्हाला कारण काहीही पुरणार... लवजिहाद... गोहत्या..., अजून काय काय..."

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 1:36 am | तर्राट जोकर

अरेच्चा! हे पण तसंच साउंड होतंय नाही... दार-उल-हरब, दार-उल-हरम. म्हणजे तुम्हाला परिस्थिती अनुकूल नसते तोवर गप्प बसा, कुमक वाढवा, आपलं राज्य येउद्या.... मग काफरांना वेचून वेचून मारा.