असंच काहीतरी

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
15 Oct 2015 - 3:11 am

लिहावंसं वाटतं; कधीकधी उगाचच वाटतं.
काय लिहायचं ते नंतर ठरतं.

शिवशिव करतात हात, धडधडते छाती
होईल का नीट सुरुवात, की होईल साऱ्याची माती

लिहीलंय सगळ्यांनी खूप, कशाला हवी आणखी भर
आहे तेच झालंय फार, कशाला हवी पसाऱ्यात भर

शब्द झालेत द्वाड खूप, शब्दांना लागतंय वाटीभर तूप
म्हणतात येऊ बाहेर आम्ही, स्मराल जेव्हा सार्थ रुप

कुठली आम्हां सवड तेवढी, कशाला लागतोय एवढा वेळ
भरभर ठोकू खिळे 'रफट'चे, अहो सगळा तर आहे सोपा खेळ

खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव
उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव

उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही
वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

रातराणी's picture

15 Oct 2015 - 5:09 am | रातराणी

मुक्तक आवडले. _/\_

सस्नेह's picture

15 Oct 2015 - 6:23 am | सस्नेह

भा पो आणि सहमत !

कय लिवलंय!कय लिवलंय!कय लिवलंय!

मुक्त विहारि's picture

15 Oct 2015 - 7:44 am | मुक्त विहारि

"उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही
वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव."

ह्याला प्रचंड सहमत.

पण काही जण फूल्ल बॉटल लेमन वॉटर पिवून हितोपदेश करणारे वाद घालायलाच येत असतात.

इथे हे मुक्तक लिहिणारेही काड्या सारताना दिसतात की.संभावित मुक्तक!

प्यारे१'s picture

15 Oct 2015 - 11:10 am | प्यारे१

शत प्रतिशत सहमती.
मात्र आम्ही मूळ आयडीनावानंच जे काय करायचं ते करतो. उगाच 'सालसपणा' करीत नाही. ;)
मध्ये काही दिवस नाव बदललं होतं तेव्हा सांगून बदललं होतं आणि आयडी क्रमांक तोच होता.

दमामि's picture

15 Oct 2015 - 7:56 am | दमामि

मस्त लिहिलेय!

वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!

पद्मावति's picture

15 Oct 2015 - 11:01 am | पद्मावति

मस्तं लिहिलंय. आवडलं.

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 11:14 am | मांत्रिक

खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव
उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव

उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही
वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव सुंदर!!!

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 11:15 am | मांत्रिक

खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव
उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव
उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही
वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव

सुंदर लिहिलंय!

पैसा's picture

15 Oct 2015 - 1:50 pm | पैसा

लिखाण आवडले. यामागची भावना सच्ची असेल असे समजून प्रतिक्रिया देत आहे.

प्यारे१'s picture

15 Oct 2015 - 1:52 pm | प्यारे१

असो! आभार.

माम्लेदारचा पन्खा's picture

15 Oct 2015 - 7:43 pm | माम्लेदारचा पन्खा

अनबाँडेड लेडवाली प्यारेबुवा की कभी कभी चलनेवाली भार्री पेन्सिल !!

प्यारेच्या लेखणीत शिसं आढळलं ? ब्यान करा. सर्व स्तॉक जप्त करा. दिवाळी अंक होस्तवर सोडु नका ;)

खेळ खेळता फसतो डाव 'असला' खेळ खेळता फसतो डाव
उरती अक्षरे मृत वाकडे अन् रुततो उरी द्वेषाचा घाव .......................... उरते भांडण अन् वाद हां हृदयी, तुटते नाते झुरते मनही
वाटे नकोच असले विजयी होणे, विसरो सारा आपपरभाव

बरेच दिवसांनी एकदम म्हातारं झाल्यासारखे वाटले.

मदनबाण's picture

15 Oct 2015 - 7:46 pm | मदनबाण

वाह...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 9:16 pm | प्रचेतस

छानच लिहिलंय प्यारेकाका.

दीपा माने's picture

17 Oct 2015 - 7:53 am | दीपा माने

आवडलं. पटलंही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Oct 2015 - 9:46 am | ज्ञानोबाचे पैजार

बोळा निघाला आणि पाणी वहाते झाले,
मन मोकळे झाले, आणि गुरुजी लिहिते झाले.
परत एकदा पॅड बांधुन बॅटिंग करायला सिध्द झाले

एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या विषयांवरचे वाचनिय धागे?

एवढे दिवस हात बुडाखाली दाबुन का बसला होतात हो मग? ह्ट्ट केल्या सारखे?

चला आता उचला लेखणी आणि होउन जाउदे येळाकोट येळकोट जय मल्हार.

पैजारबुवा,

प्यारे१'s picture

17 Oct 2015 - 12:39 pm | प्यारे१

ऑयिंग?
असं काही झालेलं नाही.
आमचे बोळे आम्ही कधीच तुंबवत नसतो.
बाकी केम छे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2015 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान मुक्तक !

बर्‍याच दिवसांनी फक्त प्रतिसाद-प्रतिसाद खेळायचं सोडून लेख लिहायला सुरुवात केली हे फार चांगले झाले. सुस्वागतम आणि लिहीत रहा !