अवधूत (भाग-४)

मांत्रिक's picture
मांत्रिक in जनातलं, मनातलं
22 Sep 2015 - 6:11 pm

बैराग्यानं सल्ला देऊन बरेच दिवस लोटले होते. त्यानं त्र्यंबकेश्वरला जायचा विचार फारसा काही केला नव्हता. पण एके दिवशी मात्र त्याची इच्छा नसून देखील पावले त्र्यंबकेश्वरकडे वळली. काय घडू शकेल, ही उत्सुकता आणि कदाचित काही घडणार देखील नाही, ही निराश करणारी भावना.

भर दुपारच्या वेळेस तो निघाला. हिवाळ्याचे दिवस. पण आज सूर्य फारच त्रासदायक वाटत होता. त्याच्या अंगात देखील थोडासा ताप जाणवत होता. सकाळपासून त्यानं काही खाल्लेलं सुद्धा नव्हतं. विचार करण्यातच बराचसा वेळ वाया गेलेला होता.

संध्याकाळ होईतो, आभाळ चांगलंच भरून आलं. लालसर जांभळ्या रंगांचे अवकाळी पावसाचे ढग सर्वत्र दाटून आले. पानगळ झालेल्या झाडांच्या पार्श्वभूमीला ते काळे ढग अजूनच भयकारी दिसत होते. अभद्र शिट्ट्या वाजवत वारा देखील धूळ उडवत घुमू लागला. एक खिन्न, उदासवाणं वातावरण सर्वत्र निर्माण झालं. थोड्याच वेळात तडतड करत पाऊस जोराने कोसळू लागला. असा मोठा मोठा थेंब! जवळच्या एका झाडाखाली आश्रय घेईपर्यंत तो पुरता भिजलेला होता. बराच वेळ झाडाखाली उभं राहून देखील पाऊस काही थांबण्याची लक्षणं दिसेनात. अंगात ताप जाणवत होताच. जवळपास एखादं गाव असेल तर रात्रीपुरता निवारा तरी शोधता येईल, या हेतूने पडत्या पावसात तो निघाला.

काही अंतरावरच एक दमछाक करणारा उंचवटा लागला. वरती पोहोचल्यावर थोड्याच अंतरावर एक गाव आहे, असं त्याच्या लक्षात आलं. भराभर पाय उचलत तो चालू लागला. संपूर्ण रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं. गावाच्या बाहेरच एक काळोखात बुडालेलं, थोडंसं एकाकी असं छोटंसं घर त्याला दिसलं. खिडकीच्या गजातून आतला मंद पिवळसर प्रकाश बाहेर येत होता. त्या घराच्या आश्रयाला थंडीने थरथर कापत तो उभा राहिला. आता फार वाईट अवस्था झालेली होती त्याची. अंगात ताप भलताच चढला होता. अचानक दार खडखड वाजवीत एक प्रौढ स्त्री बाहेर डोकावली

“कुणाचा रे तू? कुठून आलास?”
“मी त्र्यंबकेश्वरला चाललोय. सप्तशृंगीवरून आलोय.”
“संन्यासी दिसतोस!”
“हं!”
“ये, आत ये बाबा. भिजलायस बराच”.

थोडा विचार करून तो आत घरात शिरला. बाहेरील थंडीच्या तुलनेत आत बर्‍यापैकी उबदार वाटत होतं. तीन-चार दिवे लावल्यामुळे अंधार असा आत वाटतच नव्हता. एका कोपर्‍यात मस्तपैकी शेगडी फुललेली होती. तिच्या उबेला तो चटकन जाऊन बसला. त्या स्त्रीनं त्याला अंग पुसायला एक कोरडं कापड दिलं आणि परत आतल्या खोलीत ती निघून गेली. कदाचित स्वयंपाकघर असावं. घरात दोनच खोल्या दिसत होत्या.

त्यानं खसाखसा अंग कोरडं करुन घेतलं. आणि शेगडीच्या उबेला अंग शेकत बसला. थोडंसं सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तापाने परत उचल खाल्ली. सगळ्या शरीरातील शक्ती गळून गेल्यासारखं झालं. भेलकांडत एखाद्या गर्दुल्यासारखा तो भिंतीला जाऊन टेकला. तेवढ्यात ती स्त्री बाहेर आली. तिच्या हातात दुधाचा पेला होता. हळद आणि आलं घातलेला.

“हे पी. तुला थोडं बरं वाटेल.”

थरथरत्या हाताने त्याने तो पेला घेतला. तापाने जिभेला चव काही कळतच नव्हती, पण तो उष्ण कढत द्रव पिल्यावर त्याला खरंच खूप बरं वाटलं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी बोलावं, म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं. अचानक तेव्हाच कडाडदिशी एक वीज चमकली. खिडकीच्या गजातून तिचा प्रकाश आत आला असेल-नसेल त्या क्षणार्धात तिचा चेहेरा उजळून निघाला. क्षणभर त्याला असा भास झाला की त्या चेहेर्‍याच्या जागी काहीच नव्हतं. पण क्षणभरच! पुन्हा तिचा खानदानी, आदबशीर तरीही अनामिक दुःखांनी भरलेला चेहरा त्या जागी दृग्गोचर झाला.

(क्रमशः)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

22 Sep 2015 - 6:16 pm | बाबा योगिराज

किती वाट बघायला लावलीत

दमामि's picture

22 Sep 2015 - 7:32 pm | दमामि

+1111

द-बाहुबली's picture

22 Sep 2015 - 6:31 pm | द-बाहुबली

मांत्रिक's picture

22 Sep 2015 - 7:43 pm | मांत्रिक

नवरात्रीसाठी पण दोन लेख तयार करतोय. आई जगदंबेच्या भक्तांना मोठीच भेट ठरेल अशी आशा आहे. खूप आव्हानात्मक आहेत. त्यासाठी देखील वेळ द्यावा लागतोय.

लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर . पण हा भाग फारच लहान झालाय. मागचा भाग पण असाच लहान होता. प्लीज़ जरा मोठे भाग टाका.

मांत्रिक's picture

22 Sep 2015 - 7:19 pm | मांत्रिक

पुढचा भाग थोडा मोठा आहे, विस्तृत संवादरूपात आहे, त्यामुळे आज इथेच ब्रेक घ्यावा लागला.

भाषेचा बाज अत्यंत सुरेख आहे.

पु भा प्र.

मांत्रिक's picture

22 Sep 2015 - 9:40 pm | मांत्रिक

धन्यवाद प्यारे१!!!

जव्हेरगंज's picture

22 Sep 2015 - 11:49 pm | जव्हेरगंज

मागचे भाग वाचले नाहीत.
हाच भाग पहिल्यांदा वाचला. तरीही आवडला.
शब्द कसे अगदी कसुन वापरलेत.
सकस कसदार लेखन.
आता पहिले तीन भाग वाचायलाच हवे.

रातराणी's picture

23 Sep 2015 - 12:35 am | रातराणी

पुभाप्र! सुंदर लिहताय!

काय नेम्क्या ठिकाणी थांबवलंत...! मानलं आपल्याला!!! ;-)

सुरेख सुरु आहे गोष्ट...!
धन्यवाद!

दिनु गवळी's picture

23 Sep 2015 - 8:46 am | दिनु गवळी

खरचं खुप छान लिहीताय आज पहाटेपासुनच वाचत होतो राव मस्त आहे आमच्या कडचे वातावरण लयच भारी तयार केलय

बोका-ए-आझम's picture

23 Sep 2015 - 8:50 am | बोका-ए-आझम

वाचायला सुरूवात नाही केली तोच संपला हा भाग. पुभाप्र!

शित्रेउमेश's picture

23 Sep 2015 - 11:20 am | शित्रेउमेश

खूप वाट पाहायला लावलीत...
पुढचा भाग लवकर येवुदेत.... आणि मोठा पण....

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Sep 2015 - 11:29 am | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही आवडला.

तुमचे भाषेवरचे प्रभुत्व लाजवाब आहे. संथलयीतल्या ओघवत्या वर्णनांमुळे वाचायला मजा येते आहे.

पुढचे भाग लवकर प्रकाशित करा.

पैजारबुवा,

धन्यवाद पैजारबुवा! अगदी बरोबर! कथेतील नाट्य, भव्यता, वेडीवाकडी वळणे यापेक्षा मला बारीक डिटेलिंगवर भर देऊन वाचकाला तेथे प्रत्यक्ष न्यायला आवडतं. मात्र दुसर्या लेखांच्या तयारीत असल्याने अवधूतकडे जरासं दुर्लक्ष झालं असं मलाही आता वाटू लागलंय.

मस्त. पण छोटा झालाय . मागच्या भागाची लिंक देत जावा कि राव वरती .

मांत्रिक's picture

23 Sep 2015 - 8:35 pm | मांत्रिक

तेवढंच जमत नाही अजून! आता बघू सं.मं.नी केलं तरच! आपल्याला तर नै जमणार!

प्रचेतस's picture

23 Sep 2015 - 5:24 pm | प्रचेतस

वर्णनशैली खूपच छान आहे.

नीलमोहर's picture

23 Sep 2015 - 5:40 pm | नीलमोहर

वातावरण निर्मिती खरंच सुरेख जमते तुम्हाला, स्वतः त्याप्रसंगी उपस्थित राहून सर्व पहात असल्यासारखं वाटलं...

मी या पुर्वीचे भाग वाचले नाही आहेत. आपली भाषा एखाद्या विशिष्ट लेखना साठी फार ओजस्वी आहे. छान लेखन आवडले

पैसा's picture

23 Sep 2015 - 10:25 pm | पैसा

छान लिहिताय!

कविता१९७८'s picture

24 Sep 2015 - 9:21 am | कविता१९७८

मस्त भाग, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

संजय पाटिल's picture

24 Sep 2015 - 10:39 am | संजय पाटिल

छान!! वाचतोय..
मोठ्या भागाची प्रतीक्षा..

विशाल कुलकर्णी's picture

24 Sep 2015 - 11:11 am | विशाल कुलकर्णी

चारी भाग एकदम वाचून काढले...
छान लिहीताय. पुभाप्र !

इतकी प्रतिक्षा करणे जीवावर येतेय...

चांदणे संदीप's picture

24 Sep 2015 - 1:05 pm | चांदणे संदीप

मी आतापर्यंतचे सगळे भाग वाचलेत पण प्रतिक्रिया देणार नाहीच्च!
शेवटाच्या भागाला छान लां…बलचक्क प्रतिक्रिया देणार आहे ;)

आर्र गंडलो बहुतेक :(

मांत्रिक's picture

24 Sep 2015 - 2:06 pm | मांत्रिक

???

चांदणे संदीप's picture

24 Sep 2015 - 2:17 pm | चांदणे संदीप

जरा गंमतीत लिहिलेला प्रतिसाद होता तो!

वाचतोय! सगळेच भाग आवडलेत!
पुभाप्र!

मांत्रिक's picture

25 Sep 2015 - 1:03 pm | मांत्रिक

सर्व वाचक व प्रतिसाद कर्त्यांचे आभार!!!
भाग मोठा करणे फारसे शक्य नाही. पाणी टाकून फजिती होईल. पण २ भाग एकत्र करुन टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.

राजाभाउ's picture

25 Sep 2015 - 4:13 pm | राजाभाउ

सर्व भाग एकदम वाचले. खुप सुंदर !!! तुमची शैली जबरदस्त आहे.
पुभाप्र

जरा जास्तच त्रोटक वाटला हा भाग, वर्णन मस्त आहे हेवेसांनल.

मांत्रिक's picture

25 Sep 2015 - 10:05 pm | मांत्रिक

धन्यवाद!!! वाल्गुदनरजी!!!

यशोधरा's picture

25 Sep 2015 - 10:10 pm | यशोधरा

सहमत आणि सहमत.

मस्त. छान लिहितायत तुम्ही.
पुभाप्र.

एक एकटा एकटाच's picture

25 Sep 2015 - 10:30 pm | एक एकटा एकटाच

मस्तय

नेहमीप्रमाणेच

पुढील लिखाणास शुभेच्छा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Sep 2015 - 11:39 pm | निनाद मुक्काम प...

भाग लहान होता पण उत्सुकता अजून चाळवल्या गेली आहे
पुढे काय होणार कथेला काय वळण लागणार
पुढचा भाग मोठा येऊ दे मालक

रेवती's picture

24 Nov 2015 - 2:55 am | रेवती

वाचतिये.

रुस्तम's picture

3 Feb 2016 - 10:24 pm | रुस्तम

मांत्रिक भाऊ, पु भा कुठे आहे?