स्चीझोफेनिया.... आजार की पेर्सेप्शन भाग ३

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
19 Sep 2015 - 6:55 pm

भाग ३
गीतानेदेखील घड्याळाकडे बघितल आणि बर म्हणून ती केबिनच्या बाहेर आली.

"इतकावेळ काय करत होतीस आत?" ती बाहेर येताच विक्रमने तिच्याकडे संशयाने बघत तिला विचारले.

"अरे आज जी केस येणार आहे ना त्याच डिस्कशन करत होतो आम्ही. पुढची सेशन्स मीच घ्यायची आहेत ना म्हणून. का रे?" मुद्धाम निट एकस्प्लनेशन देऊन मग गीताने विचारल. त्यावर हळूच मोकळा श्वास सोडत विक्रम म्हणाला;"काही नाही. मला वाटल तू आपल्या सकाळच्या गप्पा सांगायला गेलीस की काय." गिताने मुद्धाम गोंधळल्यासारखा चेहेरा केला आणि मग आठवल्यासारख करत विचारल;"कुठल डिस्कशन? ओह! तू तुझ्या मित्रांबरोबर मजा केलीस ते? अरे, हे मी डॉक्टरांना कशाला सांगू विकी? तू पण कमाल करतोस ह!"

"तस नाही ग! डॉक्टरांना उगाच गप्पा मारत बसलेलं नाही आवडत न. आपल्या गप्पा तू ओघात सांगितल्या असत्यास ना तर ते तुला आणि मग मला रागावले असते. म्हणून विचारल." विक्रम आता मोकळेपणे बोलला आणि त्याच्या कामाला लागला.

आपल्या जागेकडे येताना गीताने डॉक्टर काकांना मेसेज केला, 'आपण क्लिनिकमध्ये विक्रमबद्धाल नको बोलूया. त्याच्या लक्षात येऊ शकत.'

डॉक्टर खरातानी लगेच रेप्लाय केला, 'ठीक आहे. आज दुपारी मी तुला लंचसाठी बाहेर भेटतो.'

ठरल्याप्रमाणे गिता लंचच्या वेळी बाहेर पडली. दुपारी क्लिनिक बंद असायचं. परंतु विक्रम तिथे बसून सगळे रिपोर्ट्स टाईप करायचा. त्यामुळे गीता रोजच एकटी निघायची. त्यामुळे विक्रमला काही त्यात वेगळ नाही वाटल.

ठरल्याप्रमाणे गिता डॉक्टर खराताना भेटली. त्यांच्याबरोबर अजून कोणीतरी गृहस्थ होते. हॉटेलमध्ये बसल्यावर डॉक्टरांनी त्यांची ओळख गिताला करून दिली. ते विक्रमचे वडील होते. त्याना डॉक्टरांनी बोलावलेल पाहून गिताला खूप आश्चर्य वाटलं. पण डॉक्टर म्हणाले;"गिता, हे विक्रमचे वडील. सुहास राजे! तुझ्या बोलण्यात असा उल्लेख होता की विक्रम वडील बोलवायला येईपर्यंत गच्चीत मित्रांबरोबर बसला होता. बरोबर? तू ते सांगितलस तेव्हाच माझ्या मनात आल की अस काही जर विक्रम वेगळ वागला असेल तर त्याच्या वडिलांनी मला कस काहीच कळवल नाही? म्हणून मग मी त्याना फोन करून इथे बोलावून घेतलं. एकतर आपल बोलण त्यांच्या समोर झालेलं बर म्हणजे त्याना ही जर काही सांगायचं असेल तर ते सांगतील आणि मुख्य म्हणजे विक्रमच्या वागण्यात काही बदल झालेच असतील आणि त्यांना ते कळले नसतील तर आता ते निट ओब्सर्व करू शकतील.

तर मी तुला सांगितलं की विक्रमची केस माझ्याकडे कशी आली आणि तोवरचे त्याच्याबाबातीतले अनुभव त्याच्या वडिलांनी जे मला सांगितले होते ते देखील मी तुला सांगितले. विक्रम त्यावेळेस खूपच लहान होता. त्यामुळे त्याला कोणता मानसिक आजार आहे हे सांगूनही त्याला समजले नसते. आणि जर ही गोष्ट बाहेर पडली असती तर त्याचा त्याच्या एकूणच आयुष्यावर परिणाम झाला असता. त्यामुळे आम्ही अस ठरवलं की सुरवातीला विक्रमला अस नाही सांगायचं की त्याला जे त्याचे मित्र दिसत आहेत ते खरे नाहीत. कारण विक्रमच्या मनातले विचार जे तो मोकळेपणाने सांगू शकत नाही ते तो मित्रांच्या माध्यमातून सांगू शकतो."

"म्हणजे नक्की काय काका?" गीताने विचारले.

संभाषणात प्रथमच भाग घेत विक्रमचे वडील म्हणाले," मलाच ते लक्षात आल होत. त्याच अस झाल जेव्हा मी त्याला विचारले की, तू मित्राना घरी का नाही आणत खेळायला? तेव्हा त्याने असे उत्तर दिले की आजीला कदाचित माझे मित्र नाही आवडणार. कारण तिला माझी आईदेखील आवडत नाही. त्याच उत्तर एकून मला खूप आश्चर्य वाटल. आणि जेव्हा मी खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा माझी आई माझ्या पत्नीला आणि विक्रमला त्याच्या आईवरून जे बोलायची ते विक्रमने मला सांगितल. मी त्याला विचारल,'बेटा तू मला अगोदर का नाही सांगितलस हे सगळ?' तेव्हा तो म्हणाला,'बाबा, आईने सांगितल होत की तुम्हाला त्रास होईल. म्हणून मी नाही सांगितल आणि आजीला पण आवडल नसत. मग ती मला खूप रागावली असती. मला आजीची भिती वाटते. तुम्ही नसताना मी घरी फार वेळ नाही थांबत. म्हणून तर राजन, प्रकाश, आणि हरीशी माझी इतकी मस्त मैत्री झाली.' त्याच हे उत्तर एकून मला वाटल की माझ्या आईमुळेच कदाचित माझ्या मुलाला असले भास होऊ लागले आहेत."

"त्यांचा हा गैरसमाज मी दूर केला." डॉक्टर खरात म्हाणाले. " हे खर आहे की अशा पेशंट्सवर आजुबाजूच्या लहान लहान भावनिक घटनांचा परीणाम होतो. पण अशा घटनांमुळे किंवा कोणा एका व्यक्तीमुळे हा आजार होत नाही; हे सुहासाजीना सांगणे खूप महत्वाचे होते. कारण नाहीतर त्यांच्या मते त्यांची आईच दोषी ठरली असती."

"खरय डॉक्टर. मला अगोदर माझ्या आईचा खूप राग आला. परंतु तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आल की ती जुन्या पिढीतली स्त्री आहे. त्यामुळे सून कायम आजारी असते हे स्वीकारणे तिच्यासाठी खूप अवघड आहे. कदाचित म्हणूनच ती कधी काही बोलली असेल. हे सर्वसाधारणपणे स्वाभाविक आहे. तिला बिचारीला हे कळलच नसेल की तिच्या अशा वागण्याचा लहानग्या विक्रमवर चुकीचा परिणाम होत असेल. कारण मला माहित होत की तिचा तिच्या नातवावर खूप जीव होता. परंतु जेव्हा मी तिला विक्रमच्या आजाराबद्धल सांगितल तेव्हा मात्र तिने एकून घ्यायची तयारीच नाही दाखवली. तिच्या मते विक्रमला त्याची आई दिसत होती आणि हे नसलेले मित्रही दिसत होते; याचा अर्थ त्याला भूताने पछाडल होत. आणि त्यासाठी तिच्याप्रमाणे मी देखील कसलेसे तंत्र-मंत्र करावेत अस तिच म्हणण होत. ते ऐकल्यावर मात्र मला कठोर निर्णय घ्यावा लागला. आमचा मोठा flat विकला आणि थोड्या वेगळ्या लोकॅलीटी मध्ये दोन लहान flats घेतले. आता आई आमच्या वरच्याच flatमध्ये राहाते. तिच्या वयामुळे आता तिच्या सोबतीसाठी एक मुलगी मी ठेवली आहे. हा बदल विक्रमच्या आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरला. पण मग विक्रमला शाळेव्यतिरिक्त कुठे ठेवायचं हा प्रश्न उभा राहिला. त्याला सर्वसाधारण पाळणाघरात ठेवण शक्य नव्हत. कारण त्याचा आजार एका वेगळ्या दृष्टीने बघितला गेला असता. म्हणून मग मी माझी ऑफिसची जागा देखील विकली आणि माझ ऑफिस घरातच सुरु केल. त्यामुळे घरात असलेल्या कामाच्या बाईंवर देखील मला लक्ष ठेवण शक्य झाल."

"हे सगळे बदल सुहासजीनी माझ्याशी बोलूनच केले होते. मीच त्याना हे बदल करण्यासाठी प्रोत्साहन दिल होत. कारण विक्रम अजून बराच लहान होता. त्यामुळे change of place मुळे तो लवकर सुधारला असता. मुख्य म्हणजे त्याचे मित्र मागेच जुन्या घराजवळ राहिले आहेत आणि आता त्याने नवीन मित्र करावेत हे त्याच्या मनावर बिंबवणे सोपे झाले."***

"पण मग विक्रमने हा बदल सहज स्वीकारला का?"गीताने विचारले.

"नाही गिता. तुझा अंदाज बरोबर आहे. मुळात घर बदलण्यासाठी विक्रम तयार नव्हता. पण मग दोन एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला समजावले; आणि सांगितले की नवीन जागी नवीन मित्र मिळतील तेव्हा तो अनिच्छेने का होईना पण तयार झाला." डॉक्टर म्हणाले.

"आम्ही नवीन जागी राहायला आलो. मी त्याची शाळादेखील बदलली. असे अनेक बदल अचानक झाले होते त्याच्या आयुष्यात. पण सुरवातीचे दोन दिवस सोडले तर मग त्याने फारसा त्रास नाही दिला हे बदल स्वीकारताना. नंतर तो नवीन घरात आणि नवीन शाळेत छान रमला. मात्र या नव्या बिल्डिंग मधल्या मुलांशी मैत्री त्याने नाही केली. तसा तो मग आपल्यातच असायचा. अधून मधून खाली जायचा. बराचवेळ. पण डॉक्टर म्हणाले होते त्याला फार प्रश्न नका विचारू. किंवा त्याच्यावर लक्ष ठेवता आहात अस त्याला कळू देऊ नका. त्यामुळे तो जोवर त्याच्या त्या जुन्या मित्रांचा उल्लेख करत नाही तोवर सगळ ठीक आहे अस समजायचं; अस डॉक्टरांनी सांगून ठेवाल होत.

नंतर त्याच दहावीच वर्ष होत. त्यामुळे शाळा, क्लासेस आणि अभ्यास यात तो busy झाला. त्याने परत कधी त्याच्या मित्रांचा उल्लेख नाही केला आणि त्याची आईदेखील देवाघरी गेली आहे हे स्वीकारलं होत त्याने. खूप शहाण्यासारखा वागायचा तो. infact म्हणूनच मग मला ते थोड विचित्र वाटायला लागल. दहावीचा रिझल्ट लागला. तो उत्तम मार्क्सनी पास झाला आणि जवळच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये आम्ही त्याची अडमिशन घेतली. सगळ सुरळीत होत. आणि एक दिवस तो घरी आला ते खूप खुश होऊन. मी त्याला कारण विचारल तेव्हा तो म्हणाला की राजन, प्रकाश आणि हरीसुद्धा त्याच्याच कॉलेजमध्ये आहेत. आणि आता जुन्या मित्रांबरोबर जास्त वेळ राहता येणार म्हणून तो खुश आहे. त्याच्या 'जास्त वेळ' या शब्दांचा मला संशय आला. पण त्याक्षणी मी काहीच बोललो नाही. मात्र रात्री जेवताना त्याच्या कलाने घेत प्रश्न विचारले आणि माझ्या लक्षात आल की मला वाटत होत की माझा विकी बारा झाला आहे, परंतु तो जे कधी कधी बाहेर जायचा संध्याकाळी ते त्याच्यामते त्याचे जुने मित्र त्याला भेटायला यायचे म्हणून त्याना भेटायला जायचा. मग मी त्याला विचारले की आता तर आजीदेखील नाही आपल्याकडे. मग तू त्याना घरी का नाही आणलस कधी. त्यावर त्याच उत्तर मलाच निरुत्तर करून गेल... तो म्हणाला बाबा खर सांगा तुमचा विश्वास आहे का की माझे हे मित्र घरी आले तर तुम्ही त्यांच्याशी निट बोलू शकाल? मुळात त्याचे असे कोणी मित्र नव्हतेच. तर मग मी काय उत्तर देणार होतो त्याला."

"त्यांच्यातल्या या संभाषणा नंतर सुहासजी मला येऊन भेटले. याचा अर्थ विक्रम त्याच्या त्या विचारांमधून बाहेर पडला नव्हता हेच खरे होते. म्हणून मग मी सुहासजीना सांगितले की आता विक्रम एवढा मोठा आहे की त्याला त्याच्या आजाराची कल्पना आपण दिली पाहिजे. त्याना देखील हे पटले. मी त्याची सेशन्स घ्यायला लागलो. तुला तर माहीतच आहे आपला साय्कोलोगीकाल सेशन्सचा patorn कसा असतो. अगोदर त्याच सगळ एकून घेतल आणि मग एक एक कॉन्फुजन क्लिअर करत गेलो. सुरवातीला विक्रमला काही पटायचं नाही. तो माझ्याकडे यायला तयार नसायचा. पण मग हळू हळू त्याने एकूण सत्य स्वीकारायला सुरवात केली. meanwhile तो ग्राजुएट झाला होता. गिता तुला अंदाज आहेच, असे पेशंट्स मनाने खूप कमकुवत किंवा हळवे म्हणू हवे तर.... असे असतात. त्याला पुढे शिकायचं होत. मिस्टर. राजेंनी आणि मी त्यासाठी त्याला एन्करेज केला. पण त्याच खूप वेळ एकट असण कदाचित परत त्याला त्याच विचारांमध्ये गुंतवेल या विचाराने मीच त्याला म्हंटल की तू माझ्याकडे कामाला यायला लाग. दुपारी क्लिनिक बंद असेल तेव्हा अभ्यास करत जा. बाकी माझ काम बघशील. त्यामुळे तुला स्वतः कमावता पण येईल आणि अभ्यास पण होईल. त्याने देखील थोडा विचार करून ते मान्य केल. by that time त्याला माझी सवय झाली होती आणि तोच म्हणायचा की त्याला इथे सुरक्षित वाटत. म्हणून मग सुहासजीनी देखील त्याला इथे जॉईन करायला हरकत घेतली नाही." डॉक्टरांनी सुहासजी सांगत होते त्यापुढचे details गिताला दिले.

हे सगळ एकून गीताने विचारले,"काका जर त्याने एकूणच स्वीकारले होते की त्याचे राजन, प्रकाश आणि हरी नावाचे मित्रच नाहीत; तर मग हे अचानक त्याने माझ्याकडे त्यांचा उल्लेख का केला? सुहास काका, तो मला म्हणाला होता की काल तो आणि त्याचे मित्र गच्चीत होते आणि तुम्ही आलात म्हणून त्याचे मित्र पळाले आणि विकी तुमच्याबरोबर घरी आला. काल नक्की काय झाल होत काका?"

कथा