ढगच दाटतात आकाशात सध्या,
नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली...
जगणे सुद्धा कठीण झाले सध्या,
पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली...
जरी बाप राबतो शिवारात त्याचा,
शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली...
पाहू कोण पुरुन उरतो सध्या,
मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली...
सारे नेतेच उदंड झाले सध्या,
आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली...
जिप्सी
प्रतिक्रिया
5 Sep 2015 - 12:18 pm | दमामि
वाह!
5 Sep 2015 - 1:16 pm | रातराणी
आवडली!
6 Sep 2015 - 11:00 am | होबासराव
सारे नेतेच उदंड झाले सध्या,
आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली...
६८ वर्ष झाले..हे असेच आहे.
6 Sep 2015 - 1:51 pm | पैसा
कविता आवडली. काय बोलणार!
6 Sep 2015 - 1:57 pm | अभ्या..
कोरा सातबारा हे चांगल्या स्थितीला वापरले जाणारे विशेषण आहे. म्हणजे कुणाचा बोजा जमिनीवर नसणे अशासाठी.
बाकी रुदन सवयीचे झालेय. :(
6 Sep 2015 - 2:06 pm | प्यारे१
हम्म्म्म.
अभ्या, तू म्हणतो ते काही अंशी बरोबर आहे.
सातबारा कोरा म्हणजे कर्ज नाही इथपत बरोबर आहे पण कर्ज नसणे म्हणजे चांगली स्थिती का?
हे म्हणजे अंधार नाही म्हणून प्रकाश असं म्हणण्यासारखं आहे. कष्ट करुन दोन पैसे मिळवून टोकं जोडण्याचा प्रयत्न करताना कर्ज काढण्याची वेळ आली नाही म्हणजे चांगली परिस्थिति नसते.
उलट हल्ली गच्च कर्ज घ्या नि नंतर बुडवा असं करणारे चांगल्या परिस्थितीमध्ये असतात.
6 Sep 2015 - 2:18 pm | अभ्या..
गरीब शेतकर्याला चार्वाक माहीत नसतो प्यारे.
कुणाचे चार पैसे देणे असेल तर झोप हराम होणारी पिढी नसेल आत्ता पण सोसायट्या, डीसीस्या अन पतसंस्थाची नावे लिहिलेला सातबारा कुणालाच नकोसा वाटतो.
अर्थात डॉलर दिनाराची ऊब देणारा घरातला एखादा मेंबर असेल तर होऊ दे खर्च. भरु दे सातबारा.
आपण मल्ल्या की जय म्हणू.
6 Sep 2015 - 11:21 pm | प्यारे१
सोड रे, म्हायत्ये.... काय है ते. शेतकरी किती गुणी असतेत ते पण आन तु पण.