सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. यावेळी समस्त विवाहित पुरुष वर्गासाठी कोकीळ व्रत सुचवले जाते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या
महिन्यात आहे.
हे व्रत विवाहित पुरुष करतात. (कारण त्यांनाच त्याची गरज असते ). हे व्रत केल्याने पुरुषांना दीर्घकाळ सौ माहेरी गेल्याचे भाग्य, म्हणून आपोआपच पौरुषवृद्धी, शेजारसौख्य व इतर प्रपंचात न अनुभवता येणारी सुखे प्राप्त होतात. हे व्रत ब्रह्मर्षी विश्वामित्रांना मेनकेने सांगितले.
कोकीळ व्रताची कहाणी: शंकराची बायको पार्वती. तिला नेहमी आपल्या नवऱ्याचा आणि गंगाबाईचा संशय येई. त्यामुळे ती शंकरावर कायम लक्ष ठेऊन असे. कध्धी म्हणून माहेरी जात नसे. शंकराने बघितले तर सर्व देवांच्या बायका वर्षातून एकदा तरी चांगल्या महिनाभर माहेरी मुक्कामाला जातात पण पार्वती चुकून सुद्धा माहेरचे नाव घेत नाही . शंकराला आपल्या अविवाहित मुक्त जीवनाची (बॅचलर लाइफ़) ची फारच सय येऊ लागली. त्याचवेळी तिथे नारद मुनी प्रवेश करते झाले. शंकराच्या मुखकमलाकडे पाहून त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी शंकरास मदत करायचे ठरविले.
नारदमुनी (कळलावे) तिथून कोकीळ पक्ष्याच्या रुपात थेट पार्वतीकडे आले व दक्षनगरीत चालू असलेल्या आभूषणे व वस्त्रे यांच्या अल्प किमतीतील विक्री आणि प्रदर्शनाचे आणि तिथे देवी लक्ष्मी, सरस्वती, इंद्राणी यांनी केलेल्या खरेदीचे रसभरीत वर्णन गाऊ लागले. ते ऐकून दाक्षायणीला फारच चुटपूट लागून राहिली. (इतर स्त्रियांनी फायद्याची खरेदी केली आपल्याला मात्र संधी मिळाली नाही याचा स्त्रियांना फार राग येतो हो!).
तिने शंकराच्या मागे भुणभुण चालू केली," मला माहेरची खूप आठवण येते. गेल्या अठरा वर्षात तुमची आबाळ होऊ नये म्हणून मी एकदाही तिथे गेले नाही, एकदा जाऊन यावेसे वाटते." शंकराने "तुझ्यामागे माझी काळजी कोण घेणार? जेवणाचे काय?" इत्यादी कारणे सांगत तिला अडवायचा लटका प्रयत्न केला. वस्त्रभूषणांच्या आनंदापुढे सर्व गोष्टी दुय्यम वाटल्याने "गंगाबाईला मी माझ्या हाताखाली साऱ्यांमध्ये निपुण केले आहे, माझ्यामागे ती तुमची व्यवस्था पाहील" असे सांगून पार्वती त्वरीत माहेरी जाण्यास निघाली आणि चांगली दोन मासांनंतर परत आली.
शंकराने कैलास पर्वतावर स्वर्गीय सुख भोगले ते वेगळे सांगायला नकोच. त्यावेळपासून शंकर कोकीळ पक्ष्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि जो कोणी विवाहित पुरुष तुझे व्रत करेल त्यावर मी प्रसन्न होऊन त्याच्या पत्नीस माहेरी पाठवेन असा वर दिला.
व्रत: प्रथम कोकिळ पक्षी शोधायचा. तो मिळाला की मला व्यनि करायचा. मगच मी पूर्ण व्रताची कृती देईन.
प्रतिक्रिया
25 Aug 2015 - 8:19 pm | दमामि
सा सं, मोबल्यावरून टंकल्यामुळे परिच्छेद नीट करता आले नाहीत. मदत कराल का?
26 Aug 2015 - 10:11 am | पगला गजोधर
समजा दोन पत्नी असलेल्या पतीने दोन कोकिळांची व्रते करावी, की एकच कोकीळ दोन वेळा पुजावा ?
25 Aug 2015 - 8:24 pm | एस
अविवाहित आयडीला हे व्रत कसे काय बरे माहिती? :-P
25 Aug 2015 - 8:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
अविवाहित लोकांनी हे व्रत करू नये... त्यामुळे ते कायम अविवाहित राहतात, असे नारदमुनींनी विशवामित्र मुनींना सांगताना कायप्पा मुनींनी ऐकले असे गुपचुपव्रतपुराणाच्या १४ व्या अध्यायात लिहिले आहे. :)
26 Aug 2015 - 11:57 pm | शेखरमोघे
मी काही काळ एका विदेशी काम केले. तेथे अविवाहित लोकाना नेहेमी ऐकवली जाणारी स्थानिक भाषेतील एक म्हण - ज्याना "तसेच" रोज दूध मिळवता येते, त्याना गाय (अथवा शेळी) विकत घेऊन, घरी ठेवून, तिची देखभाल करण्याची उठाठेव करण्याची काही जरूर नसते!
26 Aug 2015 - 2:26 pm | दमामि
अविवाहित???? कोण??? कधी????कसं????
25 Aug 2015 - 8:29 pm | सुबोध खरे
कोकीळ कि कोकिळा हे कसं शोधायचं?
म्हणजे कोकीळ शोधला आणी ती कोकिळा निघाली तर आमचा ढोल व्हायचा.
25 Aug 2015 - 8:46 pm | मुक्त विहारि
सो सिंपल यु नो.....
कोकिळ अथवा कोकिळेवर एक दगड फेकायचा, दगड फेकताच...
उडाला तर कोकिळ आणि उडाली तर कोकिळा.
25 Aug 2015 - 8:30 pm | मांत्रिक
अरे डांबरट पोरा हसून हसून मेलो की. कै पण करतोस तू लेका. तुम जियो हजारो साल.
26 Aug 2015 - 2:31 pm | दमामि
इथे लोकं विडंबन केल्याबद्दल शिक्षा द्यायला बसलेत, तुम्ही हजार साल काय घेऊन बसले भौ????
25 Aug 2015 - 8:33 pm | मांत्रिक
धन्य ते हेमंत लाटकर अन धन्य तो दमामी!!!
25 Aug 2015 - 8:37 pm | प्यारे१
हे व्रत कसे करावे हे आम्हा निरोपावे द-मामिमु-निवर
25 Aug 2015 - 8:41 pm | अजया
अच्र्त ब्व्ल्त मेला दमामि!!
25 Aug 2015 - 8:44 pm | प्यारे१
किती जणी मिळून चालवता ओ हा आयडी?
25 Aug 2015 - 9:00 pm | दमामि
ओ मेरे प्यारे मन्नू,तेरे अकल की नय्या बीच भवर में बुडबुड गोते खाये
25 Aug 2015 - 9:20 pm | प्यारे१
खिक्क्क
25 Aug 2015 - 8:44 pm | खटपट्या
धागा वाचला नाय पण पुनरागमनाबद्दल हाभिणंदन
26 Aug 2015 - 2:32 pm | दमामि
थँक्यु हो भौ!
25 Aug 2015 - 8:46 pm | जेपी
=))
25 Aug 2015 - 8:51 pm | बहिरुपी
__/\__ स्विकारा महाराजा!
25 Aug 2015 - 9:01 pm | पैसा
व्रताचा विधी मला म्हैत आहे. ११ अनाहितांना सोन्याचे कोकिळ वाटा. नाही वाटलेत तर तुमच्या पत्नीला कोकिळा व्रताची महालक्ष्मी व्रताची आणि संतोषीमातेच्या व्रताची पुस्तके भेट म्हणून देण्यात येतील.
25 Aug 2015 - 9:21 pm | प्यारे१
आता इकडे सोन्या कोकिळवाला शोधणं आलं.
27 Aug 2015 - 10:43 am | कहर
आपल्या सोन्याबापूंना इचारायचे काय ?
25 Aug 2015 - 9:24 pm | थॉर माणूस
आवडले हे व्रत. पण हे व्रत करताना प्रसादाची सोय कशी असावी? तसेच मित्र आप्तेष्टांना घरी बोलावल्यास "तिकडे" न कळण्यासाठी एखादा उपाय आहे काय?
25 Aug 2015 - 9:37 pm | रेवती
सुडंबन आवडले.
25 Aug 2015 - 10:06 pm | सूड
एक नागपूरातला विवाहित मित्र हे व्रत करीत असे. त्यामानाने प.महाराष्ट्र आणि कोकणात या व्रताबद्दल अनभिज्ञता आढळते. अठरा वर्षांपूर्वी शेजारच्या काकांनी हे व्रत केले होते, व्रताचे नियम नीट्ट पाळले नाहीत म्हणून की काय देव जाणे काकांच्या साबा आणि साबु दुसरा आषाढ येईस्तवर त्यांच्या घरी मुक्कामाला होते.
26 Aug 2015 - 12:35 am | अविनाश पांढरकर
हहपुवा!!!
25 Aug 2015 - 11:25 pm | हेमंत लाटकर
त्यापेक्षा लग्नच केले नाहीतर, बायको नाही म्हणजे कोकीळा व्रत नाही आणि आयुष्यभर स्वर्गीय सुख! कस काय दमामी खर आहे की नाही.
26 Aug 2015 - 1:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे व्रत आवडलं. भारीय.
26 Aug 2015 - 1:24 am | विकास
=)) मस्तच!
कोकीळ कसा दिसतो हे माहितीसाठी खाली चिकटवत आहे!

(चित्र विकीवरील असल्याने, अधिक माहिती हवी असल्यास माहितगारांना विचारावीत! ;) )
26 Aug 2015 - 7:17 am | अत्रुप्त आत्मा
बाप्रे! काय तो भयप्रद लालबूंद डोळा.. पांडु एखादी कथा पाडेल यावरुण. ;)
26 Aug 2015 - 9:44 am | यशोधरा
सगळे व्रत करुन त्याच्या नावाने कोकळतायेत म्हणून चिडल्या कोकिळ, त्यामुळे तो लालबुंद डोळा!!
26 Aug 2015 - 11:33 am | gogglya
दिल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळ चा फोटो आहे. म्हणुन डोळे लाल आहेत!
26 Aug 2015 - 10:25 am | हेमंत लाटकर
दमामी बाकी विंडबन भारीये!
26 Aug 2015 - 10:52 am | नाखु
दुसरी गोष्ट : हे व्रत करताना "कावळे"* दर्शन टाळावे. अन्य्था फल सांगतेवर परीणाम होतो.
आता पहिली गोष्ट : व्रत कथा विस्तार चांगला आहे. चतुरमासानिमित्त आणखी व्रत-कहाण्या याव्यात ही अपेक्षा.
"कावळे"* मध्ये डोम्/पर्/चोंबडे असे उप प्रकार आहेत याची नोंद घ्यावी.
भावीक नाखु
26 Aug 2015 - 10:53 am | माहितगार
हे व्रत करताना काही ड्रेसकोड असावा लागतो का ?
26 Aug 2015 - 11:13 am | बबन ताम्बे
सॉलीड विनोदी .
26 Aug 2015 - 11:22 am | बॅटमॅन
व्रतात सोमरसप्राशन किंवा पांढरे बटाटे अथवा गोश्तीची गोष्ट नसल्याने बहुधा फाऊल धरण्यात आला असावा.
26 Aug 2015 - 12:40 pm | तुडतुडी
देवा . अजिबात माफ करू नको अश्या अश्रद्ध, पापी लोकांना . विनोदाच्या नावाखाली काहीही बरळनार्यांना . अस्सल विनोद करायला जमत नाही म्हणून तुझ्या नावाने विनोद करून हीन थराला जातात
26 Aug 2015 - 1:33 pm | बॅटमॅन
अयि तुडतुडे, एतादृशोऽभिमानस्तु वॄथा एव | किन्तु अरसिकेषु क्रूरजनेषु एतादृश: विनोदस्तु सदैव स्पृहणीयः अत एव अस्मान्सदैव रञ्जय इति मे विज्ञप्ति: |
- भगवद्भक्तः वाल्गुदीश्वरः|
26 Aug 2015 - 2:01 pm | पगला गजोधर
भोः वाल्गुदनररत्न, तस्याः संस्कृत भाषाकौशलं सर्वत्र प्रसिद्धम्भ, यद्यपि भद्रं व प्रतिसाद मराठीभाष्ये लेखिष्यातु,
इती अनुरोधं करिष्यामी ।।
26 Aug 2015 - 3:29 pm | अस्वस्थामा
नै चांगलंय..
फक्त ते "करिष्यामी" चा "मी" पयला की दुसरा वो ??
26 Aug 2015 - 6:46 pm | दमामि
बॅट्या आणि पग, मान गये उस्ताद!!!
26 Aug 2015 - 10:42 pm | आनंदी गोपाळ
सोन्स्क्रूत काहून लिवाया लाग्ले बा?
आता जर मी हितं (समजा) मंडारिनात लिवाया लागलो, तर शिविगाळ करतोय की स्तुती, की नुसतीच प्लेन व्हॅनिला निर्भत्सना, हे तुडतुडीभाऊंना कसे कळावे?
27 Aug 2015 - 1:43 am | बॅटमॅन
प्रॉब्लेम इतकाच आहे की मँडारिन ही हिंदू धर्माची प्रमुख भाषा नव्हे. ते स्थान संस्कृतचे आहे. त्यामुळे मँडारिनात काही लिहिल्यास तो इफेक्ट येणार नाय.
27 Aug 2015 - 2:11 am | प्यारे१
संस्कृत मेड इन चायना????
27 Aug 2015 - 2:14 am | विकास
संस्कृत मेड इन चायना????
तसे नसावे कारण Sanskrit is long lasting language ;)
27 Aug 2015 - 9:33 am | पगला गजोधर
आमं, प्राचीन वैदिकहिंदूधर्म दर्पणः संस्कृतभाषायाम अस्ति खलु ।
किंन्तु मिपाः वैदिकहिंदूधर्मस्य मुखपत्र नस्ती, यत्र बहुधर्मीय बहुपंथीय जन मराठीसाहित्यवाचानार्थम आयान्तिच वर्तन्ति,
अतः यत्र संस्कृतप्रतिसाद प्रकटीकर्तुं किंमं प्रयोजनम अस्ति ? मन्ये छद्ममनोरथः शंकयः !
27 Aug 2015 - 12:14 pm | बॅटमॅन
नास्त्यत्र कोऽपि छद्ममनोरथः इति मे मति: - इतःपरम् भवान् यदि किञ्चित् निजमनसि धारयति तर्हि किं करवाणि? :)
27 Aug 2015 - 12:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
किं करवाणि?
वापरा गिर्वाणी, मग आमालाबी समजतील तुमची गाणी / गार्हाणी :) ;)
27 Aug 2015 - 12:31 pm | बॅटमॅन
खी खी खी ;)
27 Aug 2015 - 1:10 pm | पगला गजोधर
त्वं सन्तुलितव्यक्ती एतत् जानामि, तत्र कोपि सन्देहः नास्ति ।
अन्यथा अहम् इति प्रतिभाति मनशङ्के प्रकट न करोमिस्म ।
;)
26 Aug 2015 - 2:06 pm | प्रचेतस
खी खी खी =))
27 Aug 2015 - 7:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ते अयि च्या ऐवजी भो: तुडतुडीबंधो असावं असा सौंशय आहे रे =))
बाकी बॉलरच्या हातावर बॅट हाणुन थेट ष्टेडियमच्या बाहेर षटकार. =))
27 Aug 2015 - 7:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
देवा असल्या विनोदबुद्धीहिन लोकांना थोडसं विनोदबुद्धीचं वाटप कर रे बाबा. असं झालं तर मिपावर रोज एक विडंबन पाडिन हो.
26 Aug 2015 - 1:22 pm | बाबा योगिराज
आमाले पन द्या महिती.........
27 Aug 2015 - 8:27 am | दमामि
आधी कोकीळ पकडून आणि, मग सांगतो.
26 Aug 2015 - 1:41 pm | मृत्युन्जय
हाहाहा. अशक्य विडंबन आहे. का कुणास ठाऊक पण दमामिंच्या लेखनावर घासुगुर्जींच्या लेखनाची छाप आहे. ते देखील विडंबनविद्यापारंगत आहेत.
26 Aug 2015 - 2:04 pm | अत्रुप्त आत्मा
@का कुणास ठाऊक पण दमामिंच्या लेखनावर घासुगुर्जींच्या लेखनाची छाप आहे. ते देखील विडंबनविद्यापारंगत आहेत.>> :-D अट्यंट सहमत आहे! :-D
26 Aug 2015 - 2:25 pm | दमामि
यांच्याबद्दल खूप ऐकून आहे.
26 Aug 2015 - 2:02 pm | नि३सोलपुरकर
खूप छान, अतिशय उत्तम माहिती.
तसेच व्रतविधी दिला असता तरी बरे झाले असते.
26 Aug 2015 - 3:14 pm | सूड
ऐका कोकीळांनो, तुमची कहाणी.
स्वर्गलोकीं इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पाडवसभा इत्यादि पांची सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजाताहेत, रंभा नाचताहेत, तों तुंबोर्याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या मेर्या फुटल्या. असें झाल्यावर सभेचा हुकूम झाला. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. गांवांत कोणी वाणवशावाचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोर्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा.” असा हुकूम झाल्यावर किसनदेव आपल्या मनांत भ्याले.
माझा मित्र अर्जुन ह्यानं कांहीं वाणवसा केला नसेल. रात्रीच्या पार्टीतच तो टल्ली झाला होता. तेव्हा ते उठले, त्याच्याकडे जाऊन चौकशी केली. त्यानं कांहीं वाणवसा केला नाहीं. नंतर कृष्णांनीं त्याला कोकीळाकरवी वसा सांगितला. ” अर्जुना अर्जुना, आखाड्या चतुर्दशीपासून रोज सकाळी; आय रिपीट रोज सकाळी आंघोळ करावी, अभक्ष्यभक्षण केल्यानंतर दात घासावे, अपेयपान केल्यानंतर फ्लॉस करावे . हा वसा श्रावण्या चतुर्दशीस संपूर्ण करावा. उद्यापनाचे वेळीं ब्याचलरास जेवायला बोलवावे आणि पाच घरचे सवाष्ण बाप्ये बोलवून पार्टी करावी."
असं सांगून कोकीळ पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच अर्जुनानं सांगितल्याप्रमाणं केलं. पुढं सभेंत कळलं. अर्जुन वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पहातात, तों त्यानं वसा वसला आहे.
पुढं येतां येतां सुभद्रा त्यांना दिसली. तिने मोलकरणीला उद्योगाला लावले होते आणि आपण दक्षिणेस पाय करून 'होणार सून मी ह्या घरची' बघत बसली होती. तेव्हां तिला महिन्याभरासाठी माहेरी पाठवले. नंतर तंबोर्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेर्या वाजत्या केल्या. तशाच रंभा नाचत्या केल्या. जसं ह्या व्रताच्या योगानं अर्जुनावरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो.
ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
तात्पर्य : ऊतू नये मातू नये, भरला ग्लास ओतू नये.
26 Aug 2015 - 3:28 pm | थॉर माणूस
अग्गाग्गा... पार स्टेडीअमच्या बाहेरच मारलाय. एक नंबर.
26 Aug 2015 - 5:48 pm | अजया
जबराट!!
26 Aug 2015 - 3:40 pm | मांत्रिक
मस्तच हो सूडराजे.
26 Aug 2015 - 3:43 pm | प्यारे१
बेष्ट!
लगेच सुरु केल्या जाईल. ;)
26 Aug 2015 - 4:02 pm | पगला गजोधर
एका मिपाकर पुरुषाने, हे कोकीळ व्रत केलं, आणि त्यामुळे त्याचं खूप भलं झालं, त्याच्या पत्नीला माहेरचा उमाळा येवु लागला, प्रत्येक महिन्यात ती माहेरी २-३ दिवसांसाठी जावू लागली. पण नंतर दुसऱ्या वर्षी तो व्रत रीन्यु करायचं विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला. सगळे सासरची मंडळीना उमाळा येवून ते वरचेवर मुक्कामी यायला लागले, मेहुण्याला इंजिनीअरिंगला त्याच्याच शहरातील संस्थेत प्रवेश मिळाला आणि तो मुक्कामी आला, नंतर पुन्हा पुरुषाने लेट फी भरून कोकीळ व्रत रीन्यु केल्यावर, त्याच्या सासरच्या मंडळीचा उमळा कमी होऊन, ते सर्व येइनाशे झाले, मेव्हण्याच कॉलेजात ग्याटम्याट जुळले, त्यामुळे मेव्हण्याने, त्याच्याघरी स्टडी होत नाही असे वाटायला लागण्यामुळे, व अभ्यासाला प्रेरणा मिळावी या हेतूने कॉलेज वसतीगृहावर मुक्काम हलवला, त्या पुरुषाचं सुखकाळ परत मिळाला..
26 Aug 2015 - 5:02 pm | पगला गजोधर
26 Aug 2015 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा
शिलिंडर उचलेपरेंत मागे आलेली ख्रांन्ती फाऊन याला बाहुं(चा दिला)बली का म्हणू णये?
26 Aug 2015 - 4:12 pm | बॅटमॅन
अगागागागागागागागागा =)) =)) =)) =)) =))
बाकी ते "भरला ग्लास ओतू नये" हे झ्याकच पटलं. भरला ग्लास, मग तो वारुणीचा असो वा ताकाचा, ओतू नये उगा कधीच साचा.
26 Aug 2015 - 5:59 pm | पैसा
=)) =)) =)) =))
26 Aug 2015 - 6:44 pm | असंका
अफाट ....!!!
काय प्रतिभा!!!
26 Aug 2015 - 6:47 pm | दमामि
सही!!!!
26 Aug 2015 - 6:50 pm | दमामि
:):):):)
आता तुम्ही सुद्धा माझ्या पापात सहभागी झालात तर!!!
रच्याकने वाणवश म्हणजे???
26 Aug 2015 - 6:53 pm | सूड
आधी सगळं पाप घ्यावं लागेल, मग सांगतो.
27 Aug 2015 - 2:25 am | जुइ
27 Aug 2015 - 7:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
उत्तर धृवावरच्या ष्टेडियममधुन थेट दक्षिण धृवावरच्या ष्टेडियम मधे मारलेला षटकार (का शतकार? ६ का १०० तेचं कळलं नै)
27 Aug 2015 - 12:23 pm | भिंगरी
सूडा
अरे मला दवाखान्यात पाठवतोस काय आता?
हसून हसून पोटाची अन जबड्याची पार वाट लागली.
असे लेखन करू नये बाळा उगाच हसून हसून म्हातारी मेल्याचे पातक लागेल तुला.
26 Aug 2015 - 3:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता आमाला नाय म्हैत, लागलंच नक्की पाप तुला भो, ग्यारंटीने... (संदर्भसाठी खालील दुव्यावर क्लिकावे)
http://www.misalpav.com/comment/734549#comment-734549"
26 Aug 2015 - 6:37 pm | यशश्री-हर्श
Vrat awadale. Navaryala sangitala tar lagech tayar hoil karayala.. Kahani mastach..
26 Aug 2015 - 7:29 pm | वगिश
टवाळ कार्टा ह्यांचे प्रतिसाद आजकाल दिसत नाही. कुठे आहेत ते?
26 Aug 2015 - 10:46 pm | मुक्त विहारि
सध्या ते जरा बिझी दिसतात....
26 Aug 2015 - 10:55 pm | अविनाश पांढरकर
अशक्य विडंबन आहे.
27 Aug 2015 - 2:21 am | जुइ
विडंबन आवडले!
29 Aug 2015 - 11:51 pm | रातराणी
टू मच आहे हे!
सूडचा प्रतिसाद भारी!
30 Aug 2015 - 5:07 am | सुजल
अगगागा हसून हसून ठार :)